BAHIRJI NAIK AANI AAGRAYHUN SUTKA - 2 books and stories free download online pdf in Marathi

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - २

"मिर्झा" म्हणजे राजपुत्र अकबर बादशहाने त्याचा सेनापती मानसिंग याला तो मान दिला होता...त्यांची कामगिरी तशीच होती...अशा शूर राजपूत कछवाह वंशात जन्माला आलेले मिर्झाराजे जयसिंग आपल्या वयाच्या आठव्या वर्षी जहागीरच्या सेवेत रुजू झाले. औरंगजेबाला गादीवर बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. शहाजहानच्या काळात शहजादा शहाशुजाबरोबर ते अफगाणिस्तानच्या मोहिमेवर सहभागी झाले होते...त्यांच्या उर्मट तलवारीने खूप मोठा पराक्रम गाजवला होता..काबुल, कंदाहारचा परिसर जिंकून मोगलाईला जोडण्यात त्यांचा मोठा वाटा होता.. मिर्झाराजे जयसिंग उर्दु, तुर्की आणि फारसी भाषांचे उत्तम जाणकार होते...मोगली शिष्टाचार,दरबारी रीतिरिवाज यात ते पारंगत होते...औरंगजेबाने त्या काळी फक्त मोगली राजपुत्रांना देण्यात येणार मन त्यांना दिला होता...त्यात उच्च प्रतीचा घोड़ा, हत्ती, मोत्यांची माळ असे काही होते आणि त्याने मिर्झाराजे जयसिंगाला माझ्याजागी मी तुम्हाला दख्खनेत पाठवित आहे असा संदेश दिला होता .

बडे बडे सेनापती राजांना वेसण घालण्यात अपयशी ठरल्यावर...औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांची निवड केली होती..आदेश फक्त एकच होता... ते चिमटीएवढे शिवाचे राज्य चिरडून टाका.....आणि दुसरा होता दिलेरखान औरंगजेबाच्या खास मर्जीतला सरदार...मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज दोघेही राजपूत आणि त्यात शंकराचे भक्त.... आणि कदाचित ह्याच कारणाने पुढे मागे एकत्र येतील आणि शतकानुशतकं मोठ्या डामडौलात उभे असलेले मोघली साम्राज्य कोसळायला वेळ लागणार नाही...या संशयाने औरंगजेबाने दिलेरखानाला बरोबर पाठवले होते..आणि कित्येक बडे बडे सरदार जसे कि दाऊद खान कुरेशी, राणा रायसिह ,कुबादखान,सुजनसिह, बुंदेला आणि मिर्झाराजे जयसिंग यांनी आपल्या तोफखान्याकरता मुख्य म्हणुन निकोलाओ मनुची यास घेतले होते आणखी एक महत्वाचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाही तळ कोकणातील बराचसा भाग १६५७ ते १६६५ पर्यंत जिंकून घेतला होता. त्यात प्रामुख्याने कल्याण, भिवंडी आणि आसपासचा परिसर या प्रदेशाचा समावेश होता. हा भाग १६३६ ला शहाजहान आणि आदिलशहा यांच्यात झालेल्या तहात मुघलांकडे आला होता. तो परत मिळवणे हा मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीमागाचा प्रमुख हेतू होता.

पुण्याला मिर्झाराजे जयसिंग यांचा तळ पडला होता.आदिलशाह,कुतुबशाह ,इंग्रज,डच, पौर्तुगीज, जावळीचे मोरे या सर्वाना येऊन भेटीची आमंत्रणे गेली होती...हे चिमटी येवढे स्वराज्य कायमचे नेस्तनाबूत करायचे होते...छावणी अस्ताव्यस्त पसरली होती...ठिकठिकाणी दारुगोळा,घोडे,तोफा,शस्त्रांना धार काढणारे कारागीर दिसत होते...पहिले दोन ते तीन दिवस बहिर्जी आणि साथीदारांचा वेळ कुठे काय काय आहे ते बघण्यात गेला...मिर्झाराजांचा शामियाना छावणीच्या बरोबर मध्ये होता...आणि आसपास बाकी सरंदारांचे शामियाने...अनेक मराठी सरदार पण मिर्झाराजांच्या सोबत होते...त्यामुळे बहिर्जी आणि त्यांचे साथीदार मराठी सैनिकांचा वेश करुनच छावणीत फिरत होते...आठवडा तर असाच गेला...पण मिर्झाराजांच्या शामियान्यात नेहमीचेच सरदार दिसत होते..बहिर्जी आसपासच घुटमळत होते... आणि अचानक छावणीच्या उत्तरेला..तुतारी, शिंगे, कर्णे, ताशा यांचा आवाज येऊ लागला...तसे मिर्झाराजे आवाज ऐकून छावणीतुन बाहेर आले...वय वर्षे ६० करारी मुद्रा अनुभवाने पार पांढरे झालेले केस..अक्कड मिशा उलट्या वळलेल्या...भरघोस दाढी..धिप्पाड माणूस...ज्याने कधी पराभव पहिलाच नाही आणि स्वतःच्या मनगटावर संपूर्ण भारतावर हुकूमत करू शकतो असे मिर्झाराजे जयसिंग....पण पण आज तेच मोघलांची चाकरी करण्यात धन्यता मनात आहेत ... बहिर्जी एकवेळ त्यांच्याकडे पाहतच राहिले....

कुतुबशाह आला होता त्याना भेटायला..बहिर्जी आपल्या नजरेने आणि कानाने सर्व काही टिपत होते...आणि पुढच्या पाच ते सहा दिवसात आदिलशाही सरदार, इंग्रज,डच, पौर्तुगीज, जावळीचे मोरे, आणि जे कोणी सरदार राजियांचा विरुद्ध होते ते सर्व येऊन मिर्झाराजांना भेटून गेले अनेकांना युद्धात सामिल होण्यासाठी खलिते पाठविले होते आणि जंजिराच्या सिद्धि त्याला कसे विसरणार...आणि सगळंयाकडून एकच वायदा घेतला होता शिवाजी ला कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही...शिवाय मावळी मुलुखातील अनेक सरदार ज्यांना मुलुखाची खडानखडा माहिती आहे...त्यानां साम, दाम, दंड ,भेद हर प्रकार आजमावून सैन्यात सामील केले जात होते...काही करून हे स्वराज्य त्या औरंगजेबाला चिरडायचेच होते...

बहिर्जी राजे आणि आणि अनेक मंडळी चिंतेत सदरेवर बसली होते आणि तेवढ्यात मिर्झाराजांचा स्वार खलिता घेऊन पोहचता झाला

क्रमश :

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED