दुसरा दिवस उजाडला.... छान झोप झाली होती. रात्री पार्टीही उशिरापर्यंत चालली होती आणि आज सुट्टीचा दिवस... रोज सकाळी लवकर उठणारा अभी... आज सकाळी १० वाजता उठला... छान फ्रेश वाटतं होतं त्याला, सुट्टी असल्याने आणि वाढदिवस... मूड चांगला होता, कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला असा त्याने मनात plan केला. अंघोळ करून तो तयार झाला. सगळ्या कुटुंबाला आपला plan सांगणार इतक्यात त्याचा mobile वाजला,पोलिस स्टेशन मधून call होता,
" हेलो... बोला काय झालं ? " , अभिषेकने विचारलं,
" हेलो सर.... प्रसिद्ध संगीतकार " सागर " यांचा खून झाला आहे.. तुम्हाला लवकर यावं लागेल... त्यांच्या घरी.. ",
" ठीक आहे.. निघतोच मी." सगळा plan रद्द . अस अनेकवेळा झालं होतं, त्यामुळे कुटुंबाला त्याची सवय झाली होती.
अभी काही बोलण्याच्या आधीच त्याची बायको बोलली," मला काही problem नाही , Duty first " .
थोड्याच वेळात अभिषेक पोहोचला तिथे... मिडियावाले तर कधीच पोहोचले होते.. त्यांच्या रूम मधे पोहोचला अभी.... तसे बाकीचे पोलीसही होते तिकडे..
" सर, यांच्या नोकराने फोन करून सांगितलं आम्हाला.. " ,
"OK , काही मिळालं का घरात ? पुरावा वगैरे .",
" नाही सर, फक्त एक letter मिळालं आहे .... त्यातलं वाचून काहीच कळलं नाही आम्हाला.. " ,
" बघू इकडे... आणि बॉडी post-mortem साठी पाठवा." अभीने Letter उघडून पाहिलं...
त्यात काहीतरी वेगळाच मजकूर होता," संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा " डोक्याच्या वरून गेलं अभिषेकच्या...
खोलीत त्याने अजून काही पुरावा मिळतो का ते पाहू लागला. रूम मधील सामान होते तसेच होते. कसलीच तोडफोड नाही, उलटा-पालट नाही, मारामारी ... झटापट अस काहीच झालं नव्हत रूममध्ये.... चोरी झाली नव्हती, पैसे... दागिने... कसलीशी महत्वाची कागदपत्र.... सगळ जागच्याजागी होतं…. टेबलावर कपबशी होती तेवढी..
" याचा अर्थ , खुनी.. ओळखीचा व्यक्ती होता.. टेबलावर २ कप आहेत.... घरातल्या वस्तू तशाच आहेत... काहीच चोरी झालेली नाही,मग खून कशाला केला असेल त्याने... " , गोळी मारली होती त्यांना… आणि पिस्तुल बाजूलाच ठेवली होती.. पुरावा म्हणून त्याने ते दोन्ही कप आणि पिस्तुल बरोबर घेतली.
काहीच तपास लागत नव्हता. दुसऱ्याच दिवशी "सागर" यांचा वाढदिवस होता आणि त्या अगोदरच , आदल्यादिवशी त्यांचा खून झाला होता,खूप पाहुणे आले होते.. त्या सगळ्यांचे बोटांचे ठसे घेण्यात आले. एक गोष्ट होती मात्र कि बाहेरचा कोणीही अनोळखी व्यक्ती नव्हता तिथे... आणि कोणाचेही ठसे त्या पिस्तुलवर किंवा दुसऱ्या कपावर नव्हते. शिवाय सगळी पाहुणे मंडळी.. या " बडया " व्यक्ती होत्या. मोठी नावाजलेली माणस होती. त्यामुळे कोणावरही संशय घेऊ शकत नव्हता अभिषेक... सगळ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले.
post mortem चा रिपोर्ट आणण्यासाठी तो स्वतः पोहोचला डॉक्टर महेशकडे.
" काही तपास लागला का अभी.. ",
" नाही रे .... काहीच कळत नाही, कोणताच पुरावा नाही मिळत, कोणाचे बोटांचे ठसे नाही.. तुझा रिपोर्ट काय म्हणतो ? " ,
" रिपोर्ट जरा विचित्र आहे." ,
" काय विचित्र ? " ,
" त्यांची हत्या गोळी मारून नाही झाली आहे." ,
" काय बोलतो आहेस तू ? " ,
"त्यांना विष देण्यात आलं होतं.",
"मला जरा सविस्तर सांग .",
"त्यांना जेव्हा त्याने गोळी मारली तेव्हा ते अगोदरच मेलेले होते.",
" मग गोळी का मारली असेल ? " ,
" कदाचित confirm करण्यासाठी.... ",
" आणि पिस्तुल वर कोणाचे ठसे मिळाले का ? " ,
" नाही , एक गोष्ट आहे... पिस्तुल त्यांचाच आहे.... त्यांनी safety साठी ठेवलेलं असेल कदाचित.... ",
" कोणत विष वापरलं होतं ? " ,
" हं ... हेच तर सांगायचे आहे तुला.... खुन्याला science ची चांगली माहिती आहे.... कारण त्याने अगदी साधं विष वापरलं होतं... ",
"म्हणजे रे " ," मला त्यांच्या शरीरात Plaster of Paris चे कण मिळाले... शिवाय त्या कपात तर तेच सापडलं... " ,
" मग त्याने काय होणार आहे?",
" हेच तर..... जास्त कोणालाच माहित नाही आहे.... Plaster of Paris ची थोडी पावडर जर दुधात किंवा दुधापासून बनणाऱ्या पदार्थात mix केली तर ते एक slow poison बनते. यांनी तर चहा घेतला असणार.... त्यात आरोपीने ती पावडर mix केली असेल... सुरुवातीला काहीच जाणवत नाही… मात्र नंतर त्याचा प्रभाव जाणवू लागतो,किमान २ तासांनी माणूस जीव सोडतो." डॉक्टर महेशने सांगितलं,
" चांगली माहिती दिलीस मित्रा.. आणि ते पत्र... त्यावरून काही कळल का ?",
" हा..... ते जे काही लिहिलं आहे ते कळण्यापलीकडे आहे पण ते अक्षर " सागर " यांचाच आहे. म्हणजे त्या खुन्याने त्यांच्याकडून लिहून घेतलं असेल... मरण्याअगोदर... " सगळीच गुंतागुंत होती....
आठवडा झाला तरी काहीच सुगावा लागत नव्हता.... पुरावे काहीच नव्हते.होतं ते फक्त ते Letter. चौकशीसाठी त्यांच्या नोकराला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले,
" शेवटची तुझी भेट कधी झाली होती ?",
" रात्री १० वाजता... ",
"आणि त्यांनतर कोण भेटायला आलं होतं का त्यांना?",
"त्यांचा सावत्र मुलगा आलेला भेटायला... ११ वाजता,पण तो लगेचच बाहेर पडला... १०-१५ मिनिटात…" डॉक्टरच्या रिपोर्ट नुसार " सागर " यांचा मृत्यू रात्री ३ ते ४ दरम्यान झाला होता... " म्हणजे त्यांना.... विष साधारणपणे १,२ च्या सुमारास दिलं असणार... याचाच अर्थ त्यांच्या सावत्र मुलाचा यात काही हात नसणार... मग नक्की आहे तरी कोण ? बरं... CCTV मधून काही मिळालं असतं तर तेही आरोपीने येण्याअगोदर बंद करून ठेवले होते. विचार करत करत २ आठवडे निघून गेले.. तपासाला काहीच गती येत नव्हती, सारखा तोच विचार अभिषेकच्या मनात...
" आज काहीतरी नक्की भेटलं पाहिजे ." असा विचार करून अभिषेक पोलिस स्टेशनमध्ये आला..खुर्चीवर बसणार तोच त्याचा फोन वाजला,
" hello, Inspector अभिषेक " ,
"yes सर.... बोला.. " अभिच्या सरांचा फोन होता...
" अभिषेक... एक केस आहे... तुम्हाला तातडीने पोहोचावं लागेल.. " ,
" OK,सर .. कुठे जायचे आहे ? ",
" क्रिमिनल लॉयर " रेशमा टिपणीस" यांचा काल त्यांच्या घरी खून झाला आहे. लवकरात लवकर पोहोचा तिथे." अभिषेक तसाच पोहोचला तिथे.... मिडिया तर त्याच्याही अगोदर पोहोचली होती तिकडे," या मिडीयाला अगोदर कशी माहिती मिळते.",
" माहित नाही सर... आमच्याही अगोदर हे आलेले होते. " ,
" त्यांना बाहेर करा आधी.... तपासात गडबड होईल नाहीतर.... " तसं हवालदारने त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं.... अभिषेकने तपास सुरु केला.... पुन्हा तसंच सगळं... गोळी मारून हत्या... पुरावे काहीच नाहीत.. चहाचे कप... तसंच Letter , तोच मजकूर.... रूम मधल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी.... post mortem चा रिपोर्ट तोच... " हा खून... त्यानेच केला आहे.... ज्याने सागर यांचा खून केला होता.... पद्धतही तीच आहे. चहाच्या कपात पुन्हा मला Plaster of Paris ची पावडर मिळाली. त्यांच्या पोटातही तेच मिळालं... गोळीही त्यांच्या safety gun मधून मारली गेली आहे, तीसुद्धा त्या मेल्यानंतर.. ",
------------------- क्रमश : ----------------