रहस्य सप्तसुरांच ( भाग ३ ) Vinit Rajaram Dhanawade द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रहस्य सप्तसुरांच ( भाग ३ )


" आणि अजून काही मिळालं का तुला तिकडे अभी.. ",

" बाकी काहीच नाही... ना बोटांचे ठसे.... ना काही पुरावे... मिळालं ते letter आणि तोच मजकूर.... "संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा " कश्यासाठी खून होत आहेत ते कळतच नाही आहे. "

सागरप्रमाणे रेशमा यांचाही खून त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी झाला होता.... दोन्ही खुनात खूप साम्य होतं.... खून रात्रीचाच झाला होता, साधारण ३-४ च्या दरम्यान... CCTV बंद करून..... वाढदिवसासाठी आलेले पाहुणे, त्यातही कोणीच नव्हतं.. संशय घेण्यासारखं... एका महिन्यात २ प्रसिद्ध व्यक्तीची हत्या आणि अभिषेक व डॉक्टर महेश या दोघानाही आरोपीला पकडण्यात यश आलं नव्हतं. खूप तपास चालू होता, दोन्ही हत्येचा… कसलेच धागेदोरे हाती लागत नव्हते.... पुरावेच नव्हते त्यांच्याकडे.... मग कोणाला अटक करणार... २ महिने होत आलेले , तरी काहीच प्रगती नव्हती. अभीवर सुद्धा त्याच्या मोठ्या अधिकारीचं प्रेशर होतं. हल्ली रोज उशिरा येऊ लागला होता अभिषेक घरी. दोन्ही केसेस मध्ये बुडून गेलेला अगदी तो.. अशातच एका सकाळी , तो नुकताच आंघोळ करून चहा घेत होता, तयारीसुद्धा झाली नव्हती आणि त्याला call आला ...

" Hello सर, TV लावा लवकर , Breaking News आहे... " ,

" काय आहे ? " अभिषेकने वैतागूनच फोन कट केला आणि TV चालू केला,

" प्रसिद्ध नृत्यदीरदर्शक गजेद्र यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला आहे... पोलिस तपास करत आहेत.. " पुढंच काहीच त्याने ऐकल नाही. अभी ने तशीच पोलिसची वर्दी चढवली आणि निघाला तो घटनास्तळी. मिडिया नेहमी प्रमाणे त्याच्या अगोदर पोहोचली होती. त्यांचा अभिषेकला खूप त्रास व्हायचा. त्यांच्याकडे एक नजर टाकून अभी त्यांच्या खोलीत पोहोचला, बाकीचे पोलिस इतर ठिकाणी तपास करत होते... अभिषेकने एक नजर फिरवली रूममध्ये... पुन्हा तसच सगळं.... कुठेही तोडफोड नाही, मारामारीची चिन्ह नाहीत... तशीच " Well Plan Murder "... तेच Letter, तोच मजकूर.... एकच गोष्ट वेगळी होती ती म्हणजे चहाचे कप नव्हते.त्याऐवजी एक रिकामा ग्लास होता तिथे... अभीनी तोही मग डॉक्टर महेश कडे पाठवून दिला.

रिपोर्ट हि तेच होते, मागच्या दोन खुनांसारखे... फक्त त्या ग्लासमध्ये दुध होतं. " यावेळी त्याने चहाच्या ऐवजी दुधात पावडर मिसळली आहे. " महेशने अभी ला माहिती पुरवली. " तुला काय वाटते महेश.... कशासाठी खून करत असेल तो ? " अभिषेकने महेशला विचारलं,

" मलाही काही कळत नाही, तरीही काहीतरी कारण नक्की असेल त्याचं आणि त्या Letter वरून काहीच कळत नाही ना... " ,

" गेल्या ४ महिन्यात ३ नावाजलेल्या व्यक्तिच्या हत्या झाल्या आणि मला काहीच मिळत नाही. " ,

" कदाचित तुझ्याकडून काही सुटत असेल बघ " ,

" नाही रे . काहीच नाही... एकही पुरावा नाही मिळत... कुठेच त्याचे फिंगर प्रिंट्स नाही आहेत, Letter हि तो मरणाऱ्या व्यक्तीकडून लिहून नंतर त्यांना मारतो... CCTV बंद करतो... कसलाही आवाज न करता स्वतःचा काम पूर्ण करतो.. विचित्र आहे अगदी.. " ,

" अरे अभी... पण तूच म्हणतोस ना.... आरोपी कितीही हुशार असला तरी काहीना काही पुरावा मागे सोडतोच, मग आता काय झालं ? " ,

" नाहीच भेटत आहे रे पुरावा." मग दोघेही शांत झाले, थोड्यावेळाने दोघेही आपापल्या घरी गेले.

अभिषेकला तर झोपच लागायची नाही आता.. मिडिया खूप त्रास देत होती पोलिसांना... तिसऱ्याच दिवशी, अभिषेक पुन्हा काहीतरी शोधण्यासाठी " गजेंद्र " यांच्या घरी गेला, अगदी सकाळीच, त्याने शोधायला सुरुवात केली.... आणि त्याचा फोन वाजला.... हल्ली फोन वाजला कि त्याला तेच वाटायचं सारखं,

" Hello Inspector अभिषेक speaking... कोण बोलतंय... ? " ,

" Hello .... मी महेंद्र यांचा मुलगा बोलतो आहे.... लवकर या तुम्ही इकडे ... " ,

" Hello....Hello....काय झालंय नक्की .. ",

" माझ्या पपांना गोळी मारलीय कोणीतरी" तो रडतच सांगत होता. अभिने फोन कट केला...

"सावंत... चला गाडी काढा लवकर... " ,

" काय झालं सर... आताच तर आलो होतो ना पुरावा शोधायला.. " ,

" हो... पण आपल्याला जावं लागेल ." ,

" कुठे सर ? " ,

" बिजनेसमन महेंद्र माहित आहेत ना... त्यांची हत्या झाली आहे."

अभिषेक त्याच्या टीमसहित पोहोचला त्यांच्या घरी, मिडीयाने त्यांना आल्या आल्याचं घेरलं..... ," काय करताय तुम्ही .... गेल्या ४ महिन्यात ४ था खून... तुम्ही पकडत का नाही खुन्याला... "अभिषेक काहीही न बोलता Dead Body जवळ आला... तीच पद्धत खून करण्याची... Letter लिहिलेलं... सगळं तेच पुन्हा... यावेळी मिठाईचा बॉक्स होता तिथे... खूप तपास करूनही काहीही नाही मिळालं. Dead Body आणि मिठाईचा बॉक्स त्याने चाचणीसाठी डॉक्टर महेश कडे पाठवून दिलं. विचार करतच तो बाल्कनीत आला,घराबाहेर मिडिया तशीच होती. त्यांचा तर अभिषेकला खूप राग यायचा. पण यावेळेस कुणास ठावूक.... त्याला त्यांच्याकडे बघून काहीतरी आठवलं.

" सावंत... त्यांच्यापैकी एकाला वर घेऊन या इथे माझ्याजवळ" ,

" OK सर... " तसं एका पत्रकाराला वर घेऊन आले... पत्रकार जरा घाबरलेलाच होता,

" काय झालं सर ? मी काही चूक केली आहे का ? मलाच बोलावलं म्हणून विचारलं मी... ",

" नाही... मला काही प्रश्न विचारायचे होते... विचारू का ? " तसा पत्रकार थोडा relax झाला. ,

" विचारा ना सर.. " ,

" आतापर्यंत ४ हत्या झाल्या... तुम्ही होतात ना प्रत्येक वेळेस तिथे... " ,

" हो सर , In fact आम्हीच पोहोचलो होतो... तुमच्याही अगोदर... " ,

" हेच..... हेच विचारायचे आहे मला... आमच्या अगोदर कशी खबर मिळाली प्रत्येकवेळेस .... " तसा पत्रकार जरा बावरला...

" मला .... प्रत्येक वेळेस call आले होते... " ,

" कसले फोन ? " ,"हेच कि... यांचा यांचा खून झाला आहे…. तर त्यांच्या घरी पोहोचा लवकरात लवकर.. ",

" साधारण किती वाजता call यायचे ? " ,

" चारही वेळेस call पहाटे ४.३० लाच आलेले होते." ,

" आणि हे फक्त तुलाच आले होते कि खाली जमलेल्या मिडिया ला सुद्धा आले होते. " ,

" हो... बहुतेक सगळ्यांना call गेले होते, अगदी same timing ला.. " अभिषेकने अजून काही पत्रकारांना बोलावलं, त्यांचाही तेच उत्तर होतं... अभिषेकने त्या सगळ्यांची call History चेक केली.सगळ्यांनाच ४.३० ला call आले होते. नंबर मात्र वेगळाच होता. अभिषेक पोलिस स्टेशन मध्ये आला, त्याने त्याच्या computer expert ला विचारलं,

" हो सर, असा एक program आहे ज्यावरून सगळ्यांना एकत्रच call करता येतो.",

" कस काय ? " ,

"एक program आहे... त्यात फक्त तुम्हाला तुमचा record केलेला message टाकायचा असतो आणि नंतर कोणाकोणाला तो call करायचा आहे त्यांचे नंबर टाकायचे... बसं.. सगळ्यांना एकदम call जातात. " चांगली माहिती मिळाली होती अभिषेकला. आता post mortem चा रिपोर्ट बाकी होता.

------------------- क्रमश : ----------------