Rahashy Saptsuranch - 6 books and stories free download online pdf in Marathi

रहस्य सप्तसुरांच ( भाग ६)

त्यादिवशी त्याला करमतच नव्हतं. रात्रीही तो तळमळतच होता. किती वाजता झोप लागली माहित नाही, परंतु त्याला जाग आली ती फोनच्या रिंगमुळे... त्याला माहित होतं कि call कसला असणार.... आणि तोच call होता...

" हेलो अभी... ".... पण या वेळेस महेशचा call होता...

" हा महेश... बोल.. ",

" आपला अंदाज चुकला रे.. ",

"कसा काय ? " ,

" तुला इतिहास संशोधक " धनंजय " माहित आहेत ना... ",

"हो.. ",

"त्यांचा खून झाला आहे... " त्या बातमीने अभीची झोपच उडाली...

" तू पोहोच तिथे, मी येतो लगेचच... " ,अभीने फोन कट्ट केला आणि तसाच झटपट तयारी करून घटनास्थळी पोहोचला... महेश आणि इतर पोलिस आधीच पोहोचले होते.... मिडिया होती. महेशने अगोदरच तपास केलेला होता. पुन्हा चहाचा कप... Letter. तेच ते. Dead Body , महेशच्या Lab मध्ये पाठवली गेली. " धनंजय " एकटेच राहायचे म्हणून त्याचं घर पोलिसांनी तपासणी साठी बंद करून ठेवलं. महेश आणि अभी , महेशच्या Lab मध्ये आले.....

" रिपोर्ट तेच असणार , तरीही मी चेकिंग करतो. " महेश म्हणाला....

" अरे पण याचं नाव कुठे होतं लिस्टमध्ये.. " अभी , महेशला म्हणाला... तसा महेश त्याला त्याच्या केबिन मध्ये घेऊन गेला.

" त्याचं नावं होतं.. ",

" अरे,.... आपण किती वेळा चेक केली लिस्ट, याचं नाव तुला तरी दिसलं का ? " अभी बोलला.

" आपण फक्त तिथे आलेल्या लोकांची लिस्ट बघितली. पार्टीला न आलेल्या व्यक्तींची लिस्ट मी नंतर चेक केली आणि त्यामध्ये यांचं नाव होतं.",

"कसं शक्य आहे... " असं म्हणत अभीने पुन्हा सगळ्या लिस्ट बघायला सुरुवात केली. त्याचं नाव होतं खंर... सगळ्या लिस्ट मध्ये....

" मला एक गोष्ट खटकते आहे... " महेश अभीला बोलला,

" धनंजय याचं नाव सगळ्या लिस्ट मध्ये आहे, तरी ते एकाही पार्टीला गेले नाहीत... अस का.. ? " ,

" कदाचित.... त्यांना काहीतरी माहित असेल ? " ,

" असेलही... पण यावरून अस म्हणू शकत नाही ना... कारण इतर बरीच लोक होती जी पार्टीला हजर राहू शकली नव्हती. " महेश बोलला तसे दोघेही शांत झाले.....

" चल, उद्या भेटू... आणि येताना रिपोर्ट घेऊन ये... " असं म्हणत अभी त्याच्या पोलिस स्टेशनकडे निघाला.

दुसरा दिवस, रिपोर्ट्स तेच होते, त्यात अभिषेकला interest नव्हता... अजून एक व्यक्तीची हत्या झाली होती.... राहिलं फक्त एक अक्षर .. " नी "... त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता.. अभिषेकने सगळ्या लिस्ट पुन्हा पुन्हा चेक केल्या... त्यात " नी " अक्षरावरून कोणतेच नावं सुरु होतं नव्हते. गूढ अजूनच वाढत जात होतं.. ,

"लिस्टमधील व्यक्तींचे खून होत आहेत, तर लिस्ट मध्ये तर कोणीच नाही ज्याचं नाव " नी " वरून सुरु होते... " अभीने महेशला प्रश्न केला.…

" मलाही तोच प्रश्न पडला आहे कि शेवटची व्यक्ती कोण असेल.. ?" कोणाचंच डोक चालत नव्हतं...

" मला वाटते , या सगळ्यांमध्ये काहीतरी गोष्ट असेल म्हणून तो निवडक लोकांनाच मारत आहे... ",

"मग याचं उत्तर कसं सापडणार? " ,

" आता एकच पर्याय उरला आहे.... सगळ्यांच्या घरांची तपासणी करायला हवी.. त्यातूनच काही मिळालं तर... " महेशलाही तो पर्याय पटला...... लागलीच अभिषेकने त्यांच्या घरांची तपासणी करण्याची permission घेतली ... अभीने आपली संपूर्ण team कामाला लावली...

" जर तुम्हाला काही महत्वाचं वाटलं , तर लगेचच तो पुरावा म्हणून गोळा करा.... कागदपत्र... Letters... फोटो... काहीही…पण मला ते सगळ तीन दिवसात पाहिजे आहे.... " अभीने त्याच्या team ला स्पष्ठच सांगितलं.. स्वतः अभिषेक धनंजय यांच्या घरी तपास करत होता... तपासात तीन दिवस गेले.... जे काही मिळालं ते सर्व गोळा करण्यात आलं.. आणि अभिषेकच्या office मध्ये ठेवण्यात आलं...... महेश सुद्धा अभीच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचला... दोघेही थोडयाच वेळात तपासात गढून गेले.. त्याचवेळेस अभीचा फोन वाजला,

" हेलो सर.... " ,

" बोला सावंत काय आहे… ?",

" सर लेखिका सुप्रिया तुम्हाला भेटायला आलेल्या आहेत... पाठवू का केबिनमध्ये ? " ,

" हो... पाठवून दे आत त्यांना... " ,

" कोण ? " ,

" अरे... त्या लेखिका माहित आहेत ना... सुप्रिया... त्या येत आहेत.. " ,

" कशाला... तू बोलावलस का.. ",

" नाही रे.... बघूया.... काय बोलतात ते... " थोडयाच वेळात लेखिका सुप्रिया आणि त्यांचा सेक्रेटरी दोघेही अभिषेकच्या केबिनमध्ये दाखल झाले. प्रसिध्द लेखिका होत्या त्या... शिवाय पोलिसांमध्ये तर जास्तच दरारा होता त्यांचा... कारण त्यांचे अनेक लेख पोलिसांविरुद्धच प्रसिद्ध झाले होते, परखड लेख अगदी. त्यामुळे सर्व पोलिस डिपार्टमेंट त्यांना जरा घाबरूनच असायचं. म्हणून अभिला तसं tension च आलं.

"Inspector अभिषेक,……. तुम्हीच तपास करत आहात ना... या सर्व खुनांचा.. ",

" हो... मी आणि डॉक्टर महेश, आम्ही दोघे... ",

" OK, मी काही सांगण्यासाठी आलेली आहे इकडे. " , तसं अभी आणि महेश एकमेकांकडे पाहू लागले.

"मी या सर्वांना चांगली ओळखायची.... चांगली मैत्री होती आमची सर्वांची, खूप वर्षापासूनची.... या सर्वांचं असं होईल अस मला वाटलं नव्हतं.... जाऊ दे... तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे..... माझ्या मित्रांच्या खुन्याला शिक्षा व्हायलाच हवी.",

" हो हो , तुमची मदत खूप उपयोगी पडेल आम्हाला. " ,

" OK…. आज मी पुण्याला चालली आहे.... तर मी आज काही तुम्हाला सांगू शकत नाही." ,

" हो चालेल... मग तुम्ही पुण्यावरून आलात कि तुम्हाला भेटायला येतो आम्ही. ... " ,

"मी आता कायमची पुण्याला चालली आहे.. त्यामुळे तुम्ही आता तिथेच या... सेक्रेटरी तुम्हाला पत्ता देईल. " असं म्हणत त्या खुर्चीतून उठल्या आणि त्यांच्या गाडीत जाऊन बसल्या.

" हाय... माझं नाव नीरज... तुम्हाला जर madam ला contact करायचा असेल तर मला call करा... हे माझं कार्ड.. " ,

"आणि त्यांचा पुण्याचा पत्ता …?",

" हं....हो, अजून कार्ड नाही छापली आहेत, तेव्हा मी तुम्हाला पेपरवर लिहून देतो... पेन दया जरा तुमचा... " तसा महेश पेन शोधू लागला... नव्हताच पेन तिथे.. " थांबा.... " असं म्हणत त्याने bag मधून वही व पेन काढला आणि त्यावर त्याने पत्ता लिहुन दिला.

" हा पेन madam चा आहे, त्यांना राग येतो त्याला कोणी हात लावला तर म्हणून मी आधी बाहेर नाही काढला." असा नीरज बोलत होता इतक्यात बाहेरून गाडीच्या होर्नचा आवाज आला, आणि नीरज पळतच गेला...


------------------- क्रमश : ----------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED