आली दिवाळी - ३ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आली दिवाळी - ३

आली दिवाळी भाग ३

दीपावलीच्या पांच दिवसातील हा दुसरा दिवस नरक चतुर्दशी असतो
काली चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि नरक निवारण चतुर्दशी या नांवाने देखील संबोधले जाते.
हा सण हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला (चौदावा दिवस) असतो
या दिवशी भल्या पहाटे उठायचा रिवाज आहे .
हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.
नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.
कुटुंबातील आई बायको बहिण या प्रत्येक नात्याचा दिवाळीत एक दिवस असतो .
या दिवशी आईचा मान असतो आई मुलाला स्वतः स्नान घालते .
आईने ओवाळल्या वर तिच्या प्रेमाला मान देण्यासाठी तिला मुलगा काहीतरी ओवाळणी घालतो .
या सणाची पुराणातील कथा अशी आहे

पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता.
देव आणि मानव यांना तो फार त्रास देऊ लागला.
हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पण पीडा देऊ लागला.
त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्या स्त्रियांसोबत जबरदस्तीने विवाह केला, त्यांना बंदी करून आपले दास बनवून ठेवले.
त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला.
श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले.
जेंव्हा तो राक्षस श्रीकृष्णाच्या हाताने मारला गेला तेंव्हा त्या स्त्रियांचा उध्दार झाला. श्रीकृष्णाने त्यांना मुक्त केले. त्या १६००० स्त्रियांनी सांगितले की त्या आत्ता आत्महत्या करतील.
त्या सर्वजणी सामुदायिक आत्महत्या करणार होत्या कारण त्या काळी स्त्रियांनी पती शिवाय जगणे वर्जित होते. त्यांना समाजात सन्मान मिळणार नव्हता, खासकरून अश्या असुराच्या पत्नींना.
म्हणून त्या सर्वजणींनी श्री कृष्णाला सांगितले कि असुरासोबत राहिल्यामुळे त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना स्वीकारणार नाहीत आणि समाज देखील स्वीकारणार नाही. म्हणून आत्महत्या करणेच ठीक होईल.
यावर श्रीकृष्ण म्हणाले
मी तुम्हा सर्वाना माझे उपनाम देईन. तुम्हाला स्वतःला ही किंवा ती, नरकासुराची पत्नी म्हणवून घेण्याची गरज नाही.
श्रीकृष्ण त्याकाळातील खूप प्रसिध्द आणि लोकप्रिय होते.
असे केल्यास त्या सर्व महिला सन्मानपूर्वक जगू शकत होत्या. म्हणून श्रीकृष्णांनी त्यांचे स्वामी बनून, आपले नांव देऊन नरकासुराच्या १६००० स्त्रियांना सन्मान दिला.
श्रीकृष्णांनी त्यांना नवीन जीवन दिले. पण वास्तव जीवनात त्यांच्या तीनच पत्नी होत्या, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबवती.
मरताना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला,

आजच्या तिथीला जो भल्या पहाटे मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ देऊ नये .

कृष्णाने तसा वर त्याला दिला.
त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्यांला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

नरकचतुर्दशी या दिवसाच्या आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते.
या स्थित्यंतराचा अपेक्षित अशा या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते असे समजतात .
यालाच ‘आसुरी शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जीवन आरंभ करावयाचा असतो.
असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.ला आलिंगन दिले.

नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे, म्हणजे धर्मस्वरूप अवतरीत होऊन कार्य करण्यासाठी आल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे.
वस्त्रदान करणे, म्हणजे देवतांच्या लहरींना भूतलावर येण्यासाठी दानाच्या स्वरूपात, या माध्यमातून आपल्या धनसंचयाला धर्म स्वरूपाच्या कार्यासाठी अर्पण केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते असे मानतात .

यमदीपदान करणे, म्हणजे लयाच्या ऊर्जात्मक आणि चालनात्मक स्वरूपात होणार्‍या युद्धात स्वतःच्या रक्षणासाठी मृत्यूची देवता यम याला त्याचा भाग देऊन अपमृत्यूपासून स्वतःचे रक्षण करणे.

पुराणाप्रमाणे नरकासुराचा वध श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली या तिघांनी आजच्या दिवशी केला होता. म्हणून या दिवसाची पहाट धार्मिक अनुष्ठान, उत्सव आणि आनंदाने साजरी करतात.

अभ्यंगस्नान

चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणला जातो

'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।'

अर्धी आंघोळ झल्यावर आंघोळ करणार्‍याला औक्षण करतात .

या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करतात. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करतात. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावतात.

'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।

चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।'

संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करतात .
सर्व आप्तेष्ट व नातेवाईक मिळुन गोडधोड फराळाचा आस्वाद घेतात .
फटाके फोडले जातात .
असा पार पडतो दिवाळीचा दुसरा दिवस

क्रमशः