गोष्ट एका प्रेमाची - ब्रेकअप च्या शेवटच्या भावना Sagar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गोष्ट एका प्रेमाची - ब्रेकअप च्या शेवटच्या भावना

Hiiii. कुठून सुरुवात करू कळत नाही मला, खूप विचार केला. सर्व भूतकाळ एकदा पुन्हा अनुभवून पाहीला , इतक्या चुका केल्यात मी खरेतर त्याची लिस्ट जर केली तर लिस्ट चा अपमान होईल , इगो , attitude दाखवायच्या नादात जे काही मिळवलं ते सर्व मी गमावून बसलो , जस हातातून पाणी निघून गेल्यानंतर जी ओल राहते तशी .कारण ओल्या हाताने ना तहान भागू शकते ना काही होऊ शकत
सद्ध्या सेम तशी स्थिती माझी झाली आहे काहीच नाही करू शकत दिवा जसा विझायला आल्यावर फड फड करतो तसा, त्या स्थितीत आहे मी ,
माहित नाही कदाचित एक गोष्ट बोलायची होती मला कारण आता नाही बोललो तर मनात टी तशीच राहून जाईल. तू वापस यावी मला फॉर्गिव. माफ कराव म्हणून मी अस बोलत नाही . कारण ती पातळी मी कधीच ओलांडली आहे हे मला खरोखर कळून चुकले आहे , माहितीये मला तुला विश्वास नाही बसणार ....
तू भेटायच्या आधी मी खूप हुशार होतो किंवा खूप मला समजत होते अस नव्हतं, लाईफ बोअरिंग होती खूप सगळे होते पण नेहमी काहीतरी कमी वाटायचं , आणि मला तेव्हापासूनच स्वतहावर विश्वास होता की तू मला भेटणार म्हणून , आणि बस मध्ये तू भेटली त्याहून जास्त आनंद मला तेव्हा झाला होता तू बाळा कडून माझा नंबर घेतला होता आणि तेव्हापासूनच माझी यशस्वी जर्नी चालू झाली . स्मार्ट व्हॅल्यू फक्त कारण होत तुला भेटण्याचं ते मी कधीच सोडून दिलं होत तू भेटण्या आधीच आणि तू भेटली तेव्हा खूप मी सुद्धा स्वप्न पाहायला लागलो होतो फक्त तुझ्यामुळे
: त्यात , खूप काही दिलं मला जेव्हा मी आता बाकीच्या लवर लोकांना पाहतो ना खूप प्राउड फिल होत की यार तू तशी नव्हती , माझातला कमी पणा नेहमी तू झाकलास. आणि बदल्यात मी काय दिलं कायम मानसिक त्रास , साधं तुझा फ्रेंडस ना पण अडजस्ट नाही केलं वेळोवेळी तू प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या पाठी positive. राहीली आणि मी नेहमी चुका दाखवण्यात वेळ घालवला , डाऊट घेण्यासारखे चीप गोष्टी केल्या , तुझा परमिशन शिवाय अकाउंट पाहिली, नेहमी माज कोड्यात बोलणे तुला कन्फ्युजन दिलं. मी ज्यावेळेस मागे तुझ नी माज नात भूतकाळात पाहतो तर मी फक्त आणि फक्त भांडण सोडून काही केलं नाही , तुझा वाढदिवसाला तुला रडवल, दुसऱ्या वाढदिवसाला तुला रागावलो , माझा इगो इतका मोठा झाला होता त्यात मी हे विसरलो होती की तुझ्यामुळे मी आहे , माझ्यामुळे तू नाही पण काय करणार विनाशकाले विपरित बुद्धी सुचली
: मी माझ्या आयुष्यात काहीच नाही करू शकलो , जे काही केलं ते तू केलेल्या मदती मुळे , स्वतः ही त्रास करून घेतला आणि तुलाही खूप दिला , कस विसरलो यार मी, शाळेपासून केलेल्या उपकराला रूनी राहायचं सोडून मी काय करून बसलो , मी काय गमवून बसलोय शब्द नाही माझाकडे.
दुःख याच गोष्टीचं वाटत की तुझ मन का नाही समजून घेतलं मी, किती त्रास झाला असेल तुला जेव्हा आपल कुणी असून आपण ओपन नाही होऊ शकत , कारण ते आता मला जाणवत आहे . दुसऱ्याच्या मनाचा विचार नाही केला क्की असाच होत , हमेशा निगेटिव्ह थिंकींग त्यामुळं मी फक्त एका खोट्या अहंकारात वाहून जाऊन तुला गमावलं मी
मला माहितीये तुला विश्वास नाही बसणार , काहीही बोलणे , कसाही बोलणे , स्वताला शहाणे समजण्यात च सगळ गेलं माझं
पण डिअर मनापासून सॉरी बोलतो यार माफ नको करुस मला , पण माझा द्वेष नको करुस , मनापासून सॉरी यार . पण एक गोष्ट खूप चांगली झाली आणि एक तुझ ऐकलं होत मी त्याचा फायदा आता झालंय मला.
बस अजून बोलून तुला बोर नाही करायचं मला
माहित नाही कधी बोलेल का नाही पण खरंच सॉरी
मी तुला अजूनही बोलतोय की तू वापस यावी म्हणून किंवा तुझी सिंपती मिळावी यासाठी असा मेसेज नाही करत आहे
शेवटचं हेच बोलायचं होत कारण गेल्यानंतर तर नाही ना बोलू शकत कायम मनात तुझ्याही राहील असतं.
पण या सर्व गोष्टीत एक गोष्ट खूप खरी होती ती ही की फक्त आणि फक्त मला तूच आवडायची , दुसरे कुणाला नाही मी adjust. करू शकत नाही , खरंच सॉरी आज असा मेसेज का केलाय तुला प्रश्न पडला असेल ना दसऱ्याला आऊटी मळ्या मध्ये गेलो होतो . शपथ अस फिल झालं की आपण लहान च बरे होतो तू आणि औटी मळा कस होत लहान पण , पाण्याचा हप्सा होता तिथं बराच वेळ घुटमळत रहावस वाटलं पाणी आणि तुझा डोक्यावरील हंडा माहित नाही स्पष्ट दिसला. तुझ्या घरापासून गेलो तेव्हा पेरूच झाड आणि वखार खूप काही आठवणी आठवल्या , रस्ते बदलेल , घर बदलली , चिंचेचं झाड , जांभूळ सगळं कसं चेंज झालं पण जेव्हा जेव्हा मी तिथं जातो तेव्हा मला अजूनही सर्व स्पष्ट आठवत , छोटी सायकल तुझ हॅण्ड writing , note book. शाळेचा ड्रेस , चित्रकला ट्रीप , मोनिकडून चोरलेला तुझा शाळेचा फोटो , व्हॉटसअप चॅटिंग , मुंबई बस ने कल्याण ला सोबत जाणे , गुपचूप भेटी, तू सेमिनार साठी आलेली पुणे ट्रेन रात्री उशीर , तुझ गिफ्ट शर्ट , घड्याळ ,तुझा वस्तू पेन कॅडबरी चा कागद , मॉल मध्ये तुझा फ्रेंड समोर तू भरवलेल, खूप काही आठवत , आठवण येत राहते जेव्हा एकटा पडतो आपोआप सगळं आठवत ,
व्हॉटसअप चा नोटिफिकेशन पहिलं तर वाटत तुझा मेसेज आला की काय , wrong time la. फोन आल्यावर असा वाटत की तू फोन केला , आता तर फक्त वाटत भास आभास सारखं , पाऊस तुझा मनातला पाऊस माझ्या मनातला , पाऊस असाच उन्हातला , असाच आहे पाऊस अगदी तुझ्यासारखा कधी सोबत गारवा, सोबत ओल्याचिंब आठवणी घेऊन येणारा , एक सांगू त्या पावसाशी नाते माझे जुने आहे कारण त्या पावसाविना जगणे म्हणजे तुझ्याविना जगणे आहे... जाता जाता एक शायरी शेवटची बोलतो..
एक रोज एक दोस्तने पूछ लिया
क्या उनका इंतजार करना सही है
जिनके लौट के आने की कोई उम्मीद ही नहीं
मैंने भी कहा
मुनासिब तो नहीं है मगर भूल जाना जायज़ भी तो नहीं है
क्यूंकि जो लोग जिंदगी में नहीं रह सकते वो दिल में तो रह सकते है ना, मगर वादा तो नहीं करता पर कभी ना कभी तो लौट के आऊंगा और जब आऊंगा मिलेंगे तुमसे लेकिन अंदाज वहीं पुराना होगा...
? SORRY for everything ?
Punha nahi kuthlach sms karnar, miss you