Addiction - 1 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 1मुंबई ...स्वप्ननगरी ...इथे प्रत्येक व्यक्ती काही स्वप्न घेऊन येतो ..काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींना खाली हातानेच घरी परताव लागत ..तस या शहराने लोकांना खूप काही दिलं ..जेव्हा आयुष्यात काहीच करण्याची आशा उरत नाही तेव्हा तो मुंबईची वाट धरू लागतो ..स्वाभाविकच मुंबई कुठलाही भेदभाव न करता त्यांना सामावून घेते ..शिवाय इथे जो व्यक्ती हरतो तो देखील अनुभवाची सुंदर शिदोरी घेऊन नव्या प्रवसात स्वताला गुंफून घेतो ..अशी ही मुंबई ..
अशाच एका दिवशी मी इथे आलो आणि याच मुंबईचा भाग होऊन बसलो ..मी प्रेम ...गेल्या 4 वर्षांपासून इथे राहतो आहे ..या शहराने तस मला खूप काही दिलं अगदी विचारही केलं नव्हता तेवढं.. पण एक गोष्ट हिरावून घेतली ..जी माझं आयुष्य होती ..त्या गोष्टीची आठवण झाली की डोळे आपोआप भरून येतात आणि मन बेचैन व्हायला लागत ..त्यावेळी संपूर्ण मुंबई धावत असताना मी मात्र एकटाच असतो ..मग ना मित्र असतात ना कुणी.. मी चालत असतो ..एकटाच ...
नेहमीप्रमाणेच आज ऑफिसवरून सायंकाळी परतलो होतो .. ऑफिसमध्ये काम भरपूर झाल्याने मला थकवा आला होता त्यामुळे घरी पोहोचून लवकर झोपावस वाटत होत ..सायंकाळी परत येताना मित्रांसोबत थोडं खाऊन घेतलं होतं त्यामुळे भूकही नव्हती ..घरी आलो आणि फ्रेश होऊन बेडवर पडलो ..वाटलं लगेचच झोप लागेल पण झोप काही येईना ..मी एकटाच रूममध्ये बसून होतो ..मला फार तर जुन्या गोष्टींमध्ये रमायला आवडत नाही पण आज अचानक त्या क्षणात पोहोचलो आणि बेचैनी आणखीच वाढू लागली ...बेडवरून इकडून तिकडे पलटत होतो तरीही झोप येईना . शेवटी चेहऱ्यावर पाण्याचा थबका मारला आणि गाडीची चावी घेऊन बाहेर पडलो ..
जेव्हा - केव्हा मी असा बेचैन व्हायचो तेव्हा माझ्या आवडत्या पार्कला जाऊन बसायचो ..आजही गाडी पार्क केली आणि आतमध्ये जाऊ लागलो ..तिथला गार्ड माझ्या ओळखीचा होता ..त्याने येताच मला सलाम केला ..मी त्याचा तो सलाम स्वीकार केला आणि एक सिगारेट त्याच्या हाती देऊन आतमध्ये पोहोचलो ..मी बेचैन असलो की फक्त साथ द्यायला एकच गोष्ट होती ...ती म्हणजे सिगारेट ..जिने मला कधीच एकट सोडलं नाही ..तस मला नेहमी प्यायला आवडत नसे पण अशा स्थितीला फक्त तीच होती जी मला यातून बाहेर काढू शकत होती ..पॉकेटमधून एक सिगारेट बाहेर काढली आणि ओठांना लावली ..सिगारेटला लायटर लावणार तेवढ्यातच एक तरुणी बाजूला येऊन बसली ..काही क्षण फक्त तिच्याकडे पाहण्यातच गेले ..दिसायला गोरीशी , अंगाने स्लिम ट्रिम आणि अंगावर मॉडर्न अशे कपडे ..त्यामुळे कुणीतरी राजकुमारी आपल्या बाजूला येऊन बसल्याचा भास होऊ लागला ..मी तिला पाहण्यात व्यस्त होतो तेवढ्यात ती म्हणाली , " ए हिरो सिगारेट मिळणार का ? " .... मी काही उत्तर देणारच त्याआधी तिने माझ्या ओठांवर असलेली सिगारेट ओढून घेतली आणि स्वतःच्या ओठांना लावली ..काही क्षणात तिने सिगारेटच्या नशेत स्वताला झोकून दिल..सिगारेटच्या धुव्यात बहुतेक ती स्वताच टेंशन बाहेर काढत होती ..पाहता - पाहता एक सिगारेटदेखील तिने संपवली आणि माझी कुठलीही परवानगी न घेता सिगारेट पॉकेट मधून काढून पून्हा एकदा ओठांवर धरली ..सुमारे अर्धा तास ती एकावर एक सिगारेट ओढत होती आणि मी फक्त तिच्याकडे पाहण्याच काम करीत होतो ..काही वेळाने मी आणलेल्या सर्व सिगारेट संपल्या आणि तीही आता शांत झाली ..सुरुवातीला आल्यावर तिच्या चेहऱ्यावर जाणवणारी बेचैनी आता कुठेतरी दूर पळून गेली होती ..ती शांत होत म्हणाली , " धन्यवाद बर का सिगारेटसाठी !! " ..

मी हसून म्हणालो , " सिगारेट तर होती त्यासाठी धन्यवाद म्हणण्याची गरज मला वाटत नाही .."

ती लगेच उत्तरली , " धन्यवादसुद्धा कमी आहे ..कधी - कधी तर याच सिगारेटसाठी मुलांनी कित्येकवेळा शरीरावर हात घातला आहे तेव्हा एवढं तर म्हणूच शकते मी .."

तिच्या या शब्दांनी मी आता गोंधळात पडलो होतो ..एक तर ती दिसायला अगदी श्रीमंत घरातली वाटत होती आणि त्यातही फक्त एका सिगारेटसाठी तिच्या शरीराला कुणी हात का लावेल ?? आणि समजा लावलाही तरी ही का त्यांना हात लावू देईल ..बराच गोंधळलो होतो त्याच स्थितीत तिला म्हणालो , " गंमत करत आहेस का माझी ? "

तिने फक्त हसण्याच काम केलं ..त्या वरवरच्या हसण्यात मला बरच काही सापडत होत आणि जाणवलं की तिने बोललेला एक - एक शब्द खरा होता पण तिच्या शब्दांनी मला तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण केली ..मी लगेच म्हणालो , " सॉरी हा !! मुळात मला तुम्हाला अस विचारायला नको तरीही मन मानत नाही म्हणून विचारतो की फक्त एका सिगारेटसाठी तुम्ही आपल्या मौल्यवान शरीराला स्पर्श का करू दिला ? "..

ती पुन्हा एकदा माझ्याकडे पाहून हसू लागली ..एकदा तिने मोबाइलमध्ये वेळ बघितली आणि पुन्हा एकदा धन्यवाद म्हणून निघू लागली ..मी तिला जाताना पाहून लगेच म्हणालो , " मिस उत्तर तर देऊन जा ? " ..

यावेळी मात्र ती पलटली आणि म्हणाली , " नशिबात असेल तर पुन्हा एकदा भेटू आणि त्यावेळी मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल ..तेव्हा वाट बघ त्या क्षणाची " ..

एवढं बोलत तिने पार्क सोडला ..मी आताही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो आणि काही वेळात तिची पाठमोरी आकृतीदेखील गायब झाली ...
मी पार्कला जेव्हा आलो तेव्हा फारच बेचैन होतो ..सिगारेट घेऊन स्वताच दुःख दूर करावं याच विचाराने मी इथे आलो होतो .. एक सिगारेटही ओठाला लावली नाही आणि बेचैनी गायब झाली पण त्या बेचैनीची जागा आता मात्र आतुरतेने घेतली ..कोण होती ती ? ..ती अस वेड्यासारखं का बोलून गेली ? आणि खरच तिच्यासोबत अस काही झालं असेल तर त्यामागे कारण काय ??.अशा कितीतरी प्रश्नांनी मला हैराण करून सोडलं होत ..रात्रही बरीच झाली होती शिवाय आता सिगारेटही संपली असल्यामुळे घरी जाण भाग होत ..मी हातातला सिगारेटचा पॉकेट फेकून दिला आणि वाचमनला हात दाखवून घराकडे निघालो ..घरी पोहोचलो तेव्हाही सारखीच स्थिती होती ..आधीही झोप येईना आणि आताही ..फक्त फरक एवढाच की आता झोप तिचा विचार करून येत नव्हती ..शेवटी घरी आल्यावर एक सिगारेट ओढली आणि मन शांत झालं पण तेच मन आतुर होत तिच्याबद्दल जाणून घ्यायला .रात्री कितीतरी वेळाने मला झोप लागली ...
रात्री उशिरा झोपल्याने आणि सकाळी लवकरच उठल्याने डोळे फारच लाल झाले होते ...तरीही सकाळी उठून कॉफी घेतली आणि ऑफिसच काम करू लागलो ...काम संपेपर्यंत 9 वाजले होते ..लगेचच शॉवर घेतला आणि तयार होऊन ऑफिसला पोहोचलो ..ऑफिसला मी मॅनेजर पदावर काम करीत होतो त्यामुळे ऑफिसला प्रवेश करताच सर्वांनी गुड मॉर्निंग विश केलं ...मी सर्वाना रिप्लाय करून केबिनला पोहोचलो ..डेस्कटॉप ओपन केला आणि कोणते - कोणते काम करायचे आहेत त्या फाइल चेक केल्या ..पण माझं आज कामात मन लागतच नव्हतं ..कॉफी दोनदा घेऊन झाली होती तरीही तिचा विचार डोक्यातून काढून टाकणे मला शक्य होत नव्हतं ..कामात थोडं जरी मन लावलं तरी तिचे शब्द आठवायचे आणि डोकं आणखीनच जड व्हायचं ..तेवढयात सरांचा फोन आला आणि त्यांच्या केबिनला पोहोचलो ..सरांना कुठल्यातरी महत्त्वाच्या प्रोजेक्टवर बोलायच असल्याने त्यांनी मला बोलवून घेतलं होतं ..." सर आत येऊ का ? " , मी नम्रतेने सरांना विचारलं

" अरे हो !! ये प्रेम मी तुझीच वाट पाहत होतो " , म्हणत सरानी आत येण्याची परवानगी दिली ..

सर मला प्रोजेक्टबद्दल माहिती सांगत होते आणि मी ऐकत होतो ..मुळात माझं डोकं जड झाल्याने मला त्यातलं काहीच एकूण घेण्याची इच्छा नव्हती पण सरांना तस सांगणं योग्य नव्हतं त्यामुळे शांतपणे एकूण घेण्यातच शहाणपणा होता ..पण बहुदा सरांच्या ते लक्षात आलं असावं आणि ते म्हणाले , " तुझी तब्येत ठीक नाही का ? ..तुझा चेहरा एवढा का पडला आहे ? "

" हो सर सकाळपासून डोकं खूप दुखत आहे त्यामुळे थोडं बर नाही " , मी उत्तरलो

" मग आधीच सांगायचं ना ?? ..बर एक काम कर आज विश्रांती घे उद्या बोलू यावर " , सर म्हणाले ..

मी मान हलवून सरांचं केबिन सोडलं ..आताही डेस्कवर जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत होतो पण डोकं जड झाल्याने कामात मन लागेना ..शेवटी दुपारीच घरी आलो ..पेन किलर घेऊन झोपी गेलो ...

सायंकाळी उठलो तेव्हा 7 वाजले होते ..आता डोकं दुखनही थांबलं होत ..थोडा फ्रेश झालो आणि चहा घेऊन स्वयंपाक करायला लागलो ...जेवण करून रात्रीचे 9 वाजले होते ..निवांत बसलो होतो पण तरीही तिच्या विचाराने माझा पिच्छा काही सोडला नव्हता आणि तिचे शब्द आठवले .." नशिबात असेल तर भेटू " ..हे शब्द कानावर पडताच लगेच गाडी काढली आणि पार्कला पोहोचलो ..सवयीप्रमाणे वाचमनला सिगारेट दिली आणि आतमध्ये गेलो ..माझी नजर आताही तिलाच शोधत होती पण तिचा कुठेच मागमूस लागत नव्हता ..मी एक - एक सिगारेट पेटवत तिची वाट पाहू लागलो ..बरीच रात्र झाली होती तरीही तिचा काहीच पत्ता नव्हता ..साधारणतः मी महिन्याला एखादी सिगारेट घ्यायचो पण आज संपूर्ण पॉकेट संपला होता तरीही ती आली नव्हती ..शेवटी निराश होऊन घरी पोहोचलो ...
मी दररोज दिवसभर काम करायचो पण तिचा विचार मात्र मनात घर करून गेला होता ..दिवसभर काम केल्यानंतर ती भेटायला येईल म्हणून रात्री रोज पार्कला जायचो ..नेहमीप्रमाणे सिगारेटचा पॉकेट संपून जायचा पण तिचा काहीच पत्ता नव्हता ..मी निराश होऊन पुन्हा घराकडे परत यायचो ..असाच माझा नित्यक्रम होत गेला ..ना धड कामात मन लागत होतं ना खाण्यात ..तरीही तिचा शोध घेण मी थांबवलं नव्हतं ..
तिला भेटण्याची इच्छा बाळगून सतत पार्कला येऊ लागलो होतो ..सात दिवस झाले होते तरीही तिचा काहीच पत्ता नव्हता ..नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सिगारेटचा पॉकेट संपण्याच्या मार्गावर होता ..मोबाइलमध्ये बघितलं तर 10.30 वाजले होते ..आता उद्यापासून परत इकडे यायचं नाही म्हणून उठून जायला निघालो ..पण पुन्हा एकदा समोरून कुणीतरी येतांना दिसल...ती तीच होती ..मला वाट पाहण्याच फळ मिळालं होतं त्यामुळे थोडा आनंद झाला ..आता काही वेळातच मला माझं उत्तर मिळणार होत..मी तिच्या दिशेने पाऊल टाकू लागलो..

क्रमशः ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED