Addiction - 4 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 4



श्रेयसी स्वतःच्या आईला विसरून आता नव्याने जीवन जगू लागली ..आजीने तीच शाळेत नाव टाकलं आणि ती शाळेत जाऊ लागली ..दिवसभर शाळेत असली की तिला बर वाटायचं पण घरी आल्यानंतर वडिलांचा रागीट चेहरा पाहिला की मग मात्र अवसान गळायच ..सायंकाळी स्वयंपाक बनविताना थोडा वेळ मस्ती - मजाक करण्यात जायचा ..त्याच वेळात ती आजीकडून स्वयंपाक देखील शिकू लागली ..हे काही क्षण म्हणजेच तिच्यासाठी काय तो आनंद ..श्रेयसीची आई पळून गेली होती त्याचा संपूर्ण राग तिच्यावर निघायचा शिवाय ती आपल्यापेक्षा लहान मुलासोबत पळून गेल्यामुळे श्रेयसीसुद्धा त्याचीच मुलगी असल्याची शंका त्याच्या मनात निर्माण झाली होती आणि म्हणूनच तो पुन्हा - पुन्हा तिच्याशी वाईट वागू लागला ..
दिवस जाऊ लागले आणि मागे बराच काळ सुटला ..आता ती 10 वर्षाची झाली ..श्रेयसीच्या आजीमध्ये आणि वडीलांमध्ये नेहमीच भांडण होत असत ..त्यामुळे वडील घरी आले की ती एका कोपऱ्यात बसून सर्व काही पाहायची ..आजसुद्धा तसच काहीतरी घडणार होत उलट त्यापेक्षा जास्त काहीतरी घडणार होत ..तिचे बाबा आज खूप रागातच घरी आले होते ..आजीने दररोजप्रमाणे त्याच्या मागे किरकिर करण्यास सुरुवात केली ..तसाच तो तिच्या अंगावर धावून गेला आणि संपूर्ण जोर काढून त्याने आजीला ढकलून दिले ..आजी बाजूला असलेल्या टेबलवर जाऊन आदळली ..क्षणात तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागल..तरीही त्याने तिच्याकडे लक्ष दिलं नाही ..रक्त कितीतरी वेळ तसच वाहत होत आणि आजीने तडफडत - तडफडत आपला श्वास सोडला ..तो आता थोडा घाबरला होता ..सर्व काही आपल्यावर येईल याची त्याला भीती वाटू लागली ..त्याने कुणाला माहिती होऊ नये म्हणून घाबरत - घाबरतच तिचे रक्तबंबाळ डोके पुसले आणि आजी घसरून पडली त्यामुळे जागीच मरण पावली अस त्याने भासवल ..कुणालास शंका येऊ नये म्हणून रडण्याच नाटक करायला विसरला नाही ..श्रेयसी हे सर्व आताही कोपऱ्यात उभी राहून पाहत होती ..आपण तोंडातून एकही शब्द काढला तर आपलीसुद्धा हीच स्थिती होईल हे तिला माहीत होतं म्हणून तिने शांत राहनच पसंद केलं .तिचा एकमेव सहारा म्हणजे आजीदेखील तिला एकट सोडून गेली ती कायमचीच ..
घर आता जणू भयानक वाडाच वाटू लागलं ..त्यातही बाबा आले की हातपाय थरथर कापायला लागायचे ..आजी होती तेव्हा ती सर्व सांभाळून घ्यायची पण तीही तिला एकट सोडून गेली आणि एवढ्या छोट्याश्या मुलीवर घराची जबादारी येऊन पडली ..तिने आजी जिवंत असताना स्वयंपाक शिकून घेतला होता त्यामुळे कशीतरी भूक भागवल्या जायची ..वडील कधीतरी घरी खायचे नाहीतर संपूर्ण वेळ नशेतच असायचे व बाहेरच खाऊन यायचे ..पण कधीतरी जेवायला आले की छोट्या - छोट्या कारणावरून त्याने ताट फेकून दिले होते त्यामुळे ती भीती सतत तिच्या मनात रुजली होती ..पण सुदैवाने त्याने तिच्यावर हात उचलला नव्हता ..
आजी जाऊन चार महिने झाले होते ..श्रेयसी आज स्वयंपाक बनवून झोपी गेली होती ..तिचे बाबा नेहमीप्रमाणेच दारू पिऊन घरी आले होते ..आज ती एवढी थकली होती की त्यांच्या येण्याची चाहूल देखील तिला जाणवली नाही ..तिला शोधता - शोधता ते तिच्या रूममध्ये गेले ..ती शांतचित्ताने झोपून होती ..त्याक्षणी तरी तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद होता ..तिचे बाब समोर - समोर पाऊल टाकू लागले ..आज त्यांना जास्त प्रमाणात नशा झाली होती ..तेवढ्यात अचानक त्याच लक्ष तिच्या शरीराकडे गेले..त्याने तिला पहिल्यांदाच अशा अवस्थेत पाहिलं होतं ..आता कुठे ती वयात येऊ लागली होती त्यामुळे शरीरावरचे काही भाग अगदीच स्पष्ट दिसू लागले ..राजकुमारी गेल्यापासून राजकुमाराची शारीरिक इच्छा अतृप्त होती ..तिला तस पाहताच त्याचा स्वतःवरच ताबा सुटायला लागला ..एक तर तो तिला स्वताची मुलगी मानत नव्हता त्यामुळे तिच्याकडे बघण्यातसुद्धा आता त्याला कसलीच लज्जा येत नव्हती ..नजरेत होती ती फक्त भूक ..त्याची ती पुरुषी इच्छा अधिकच तीव्र होऊ लागली आणि तो पुढे सरसावला ..हळूच त्याने तिच्या नकळत स्वतःचे कपडे काढण्यास सुरुवात केली ..नेमकी त्याचवेळी श्रेयसी जागी झाली ..तिने मोठ्याने ओरडू नये म्हणून तिच्या तोंडावर हात ठेवला आणि बेडवर जोराने पाडले ..त्याने एका हाताने तिचे संपूर्ण कपडे काढले आणि तो तिच्यावर अधीन झाला ..एक तर कोवळ शरीर त्यातही त्या शारीरिक वेदना तिला सहन करणदेखील अशक्य झाल होत ..तोंडावर हात असल्याने ओरडताही येणार नव्हतं ..पण तिच्या वेदना एवढ्या जास्त होत्या की तिच्या डोळ्यातून आपोआवच अश्रू बाहेर आले ..बाबा मी तुमचीच मुलगी आहे मग तुम्ही माझ्याशी असे का वागत आहात असे प्रश्न तिचे अश्रू विचारू लागले होते ..पण तरीही तो नराधम काही थांबायला तयार नव्हता ..त्याने आपली शेवटी पुरुषी जात दाखवलीच आणि तीच संपूर्ण आयुष्य उध्वस्त केलं ..
( ती बोलता - बोलता थांबली होती ..तिला हुंदकेही आवरेनासे झाले होते ..डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या ..माझीही काहीशी अशीच स्थिती झाली होती ..मी तिला पाणी देऊ केले आणि ती शांत झाली )

" मग श्रेयसीच पुढे काय झालं " , अश्रू पुसत तिला विचारू लागलो ..

ती स्वताला सावरत पुढे बोलू लागली ...

त्या फक्त एका क्षणाने तीच संपूर्ण आयुष्य उध्वस्त केलं ..त्या रात्री तिला झोपच आली नाही ..सतत तेच विचार तिच्या डोक्यात होते ..पाहता - पाहता पहाट झाली ..तिने उठताच आपल्या वडिलांकडे नजर टाकली ..तिच्या मनात त्यांच्याविषयी घृणा निर्माण झाली होती परंतु आपल्याच वडिलांनी आपल्यासोबत इतकं घाणेरडं कृत्य केलं आहे हे स्वीकारण्याची तिची हिम्मत होत नव्हती मग इतरांना सांगण्याचा प्रश्नच वेगळा ..आज तिला स्वतःलाच आरशात पाहताना स्वतःविषयी किळस वाटू लागली ..तिने विचार करतच संपूर्ण दिवस काढला ..
पुन्हा एक रात्र ..कालच्या प्रसंगाने तिची झोप उडवली होती त्यामुळे आज ती जागीच होती ..तो नराधम पुन्हा तिच्या खोलीत आला ..त्याला पाहून ती फारच घाबरली ..त्याने पुन्हा एकदा स्वतःचे कपडे काढण्यास सुरवात केली आणि ती भीतीने थरथर कापू लागली ..तो पुढे सरसावला ..तेव्हा तिने आपल्या संपूर्ण ताकदीनिशी त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण एका बलदंड पुरुषासमोर तिची शक्ती मात्र अपुरी पडली ..त्याने तिच्या गालावर दोन - तीन मारल्या आणि ती तशीच शांत पडून राहिली ...त्याने पुन्हा एकदा आपली अतृप्त इच्छा पूर्ण करून घेतली ..आता दररोज असच घडू लागलं ..तिला तशा जगण्यावर किळस येऊ लागला होता ..स्वताला संपवायचा विचार तिच्या मनात भरपूरदा आला पण हिम्मत मात्र झाली नाही ..
ती शाळेत गेली की सर्व काही बर वाटायचं पण घरी यायची वेळ झाली की तिला भीती वाटायची ..तरीही नाईलाजाने तिला त्या नरकात यावच लागे ..आता तर प्रतिकार करूनदेखील ती थकली होती त्यामुळे तो दिसला की ती स्वताच त्याला आपलं शरीर अर्पण करू लागली ..दिवस जाऊ लागले आणि ती मोठी होऊ लागली ..आपणही आपल्या आईसारखं कुठेतरी बाहेर पडून जावं अस तिला सतत वाटायचं पण कुठे जाऊ , काय करू असे प्रश्न पडायचे आणि तिला आपला निर्णय बदलावा लागायचा ..
ती आता 15 वर्षाची झाली होती म्हणजे सुमारे पाच वर्षे तिच्यावर हा अत्याचार सुरू होता ..तो कधी घरी असला आणि ती खेळताना बाहेर दिसली की तिला नजरेनेच खूण करून बोलवायचा आणि नाहीच आली तरी जबरीने हात ओढून आणायचा ..हवं ते साध्य झाल की पुन्हा आपल्या नशेत धुंद व्हायचा ..काहीही झालं तरी आता आपण या नरकातून पळून जायचं मग आपलं जे होईल ते पाहून घेऊ अस तीच मत झालं ..परंतु ती वेळच तिच्यावर आली नाही ..दारू पिऊन - पिऊन त्याचे लिव्हर खराब झाले आणि तो कायमसाठी निघून गेला ..ती त्यादिवशी सर्वात जास्त आनंदी होती ..तिच्या डोळ्यातून एक अश्रूदेखील पडला नव्हता ..तो गेला पण दरिद्री बनवून ..आता श्रेयसी मोकळी होती ..पण त्या घरातल्या आठवणी तिला खूप त्रास देत होत्या त्यामुळे तिने ते घर कायमच सोडायच ठरवलं ..

( आमच्या दोघांच्या डोळ्यात आताही अश्रू होते )

तरीही मी स्वतःला सावरत म्हणालो , " मला दोन प्रश्न पडले आहेत ..एक म्हणजे तुझा या कथेशी काय संबंध आणि दुसरं मला आताही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही .."

तिनेही स्वताला सावरलं आणि अश्रू पुसत म्हणाली , " माझंच नाव श्रेयसी "..

तिचे शब्द ऐकताच अंगावर थरकाप सुटला आणि संपूर्ण शरीराची लाही - लाही झाली ..पण ते सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर एक लज्जात्मक भाव होता हे मी अचूक हेरलं ..तिला वाईट वाटू नये म्हणून विषय बदलवत म्हणालो , " मग पूढे काय झालं ?"

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED