Addiction - 5 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 5


माझ्या प्रश्नावर ती हसत म्हणाली , " हो ...हो ..थांब जरा ..सांगते आहे ...बाबा तर गेले पण मी मात्र कायमची पोरकी झाले ..किरायाच घर असल्याने ते देखील खाली करावं लागलं ..त्यामुळे घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही ..मी पहिल्यांदाच या चार भिंतीच्या बाहेर पडणार होते ..काय करू ? ...कुठे जाऊ ??.....असे कितीतरी प्रश्न समोर होते पण तरीही निघाले एकटीच ..एका अनोळखी जागेवर स्वताच अस्तित्त्व शोधण्यासाठी ..
कधीतरी मुंबईच नाव एकल होत ..मुंबई म्हणजे स्वप्नांच शहर ..एकल होत की ईथे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतात त्या स्वप्न पूर्ण करणार्यात मीही सामील झाले ..स्वतःकडे थोडे फार पैसे होते त्या भरवशावर मुंबई गाठली ..सी . एस. टी . वर उतरले आणि समोरची गर्दी पाहून गांगरलेच ..बलाढ्य अस शहर ..माणसांनी भरलेलं पण इथे कुणालाच कुणाची सवड नसते ..प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या बळावर स्वताच नाव कमवित असतो आणि मोठा होतो ..त्यात मीही माझा शिक्का आजमावणार होते आणि प्रवासास सुरुवात केली ..तशी वाट फारच कठीण होती पण अपयश हीच यशाची पहिली पायरी समजून मी येणारा दिवस घालवू लागले .. प्रत्येक जागी मिळणार अपयश पचवू लागले ..कुठेतरी काहीतरी चांगलं घडेल ही आशा मनात ठेवून सदैव चालू लागले ..चालता - चालता ठेच लागायची मग कुठेतरी थोडा वेळ विसावा घेऊन परत चालू लागायचे ....चालता - चालता चपलाही झिजून गेल्या पण यशाची वाट काही मिळेना ..फक्त 5 दिवसात मला माझी लायकी कळून चुकली ..कुठेतरी आपल्याला साजेस काम मिळेल म्हणून भटकू लागले पण तू फार लहान आहेस , तुला मागे पुढे कुणीच नाही शिवाय जास्त रिस्क असेल म्हणून काम देण्यास नकार कळवीत होते ..तर काहींच्या पुरुषी नजरा डोळ्यांपासून सुरू होऊन पायाच्या नखापर्यंत जाऊन थांबत होत्या त्यामुळे ओघळल्यासारखं होऊ लागलं ..पुरुष हे सर्विकडे सारखेच असतात हे तेव्हा प्रत्यक्षात पाहत होते ..आधीच या शरीराची किळस येऊ लागली होती त्यामुळे त्या नजरांपासून स्वताला दूर ठेवू लागले ..पुन्हा तो किळसवाना , लाजीरवाना खेळ मला नकोसा होता ..
परंतु नियतीला मात्र काहीतरी वेगळंच मान्य होत ..मी सतत पाच दिवस इकडून - तिकडे फिरत होते ..पोटात अन्नाचा कण सुद्धा नव्हता ..फक्त होत ते पाणी ..कशीतरी पाणी पिऊन पोट भागवत होते पण आता त्याने काम चालणार नव्हतं ..हाता - पायातली ताकद गळून पडली होती तरीही थांबण्याचा पर्याय माझ्याकडे नव्हता पण आता भुकेचे चटके सहन होणार नव्हते ..मी या अनोळखी शहरात जिकडे - तिकडे फिरत होते .. मी धारावीच्या जवळपास होते ..काही अंतरावर असेल ..चालून - चालून हात पाय दुखू लागले त्यामुळे थोड्या वेळासाठी विसावा घेणे गरजेचे होते ..जवळपास पंधरा मिनिटे मी तिथेच बसून होते आणि पोटातली आग मस्तकात जाऊ लागली ..तेव्हा लक्षात आलं की काही अंतरावर मला एक मुलगा न्याहाळत होता ..मी तिथे एकटीच बसून असल्याने त्यांच्या मनात त्या पुरुषी इच्छा जागृत होत आहेत अस त्याच्या वागण्यावरून वाटत होतं ..मी बराच वेळ त्याच्याकडे पाहू लागले तोही माझ्याकडे पाहत होता ..भुकेने साऱ्या मर्यादा तोडायचा ठरवल्या आणि ज्या गोष्टीपासून पळायचं ठरवत होते आता त्याच गोष्टीला स्वीकारायचं ठरवलं ..त्याला पाहत असताना हलकेच हाताने इशारा करून बोलावून घेतलं पण झालं उलटंच मी त्याला कदाचित ओरडेल म्हणून तो मागे सरकू लागला ..शेवटी मीच त्याच्याजवळ जाऊ लागले ..तो थोडा घाबरला होता ..त्याच्या जवळ पोहोचताच आवाजाची संपूर्ण ताकद गोळा करून त्याला बोलून गेले , " मला माहित आहे तुला माझ्याकडून काय हवं आहे ? ..मी तुला ते सर्व देऊ शकते ?? .."

हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरची संपूर्ण भीती नाहीशी झाली ..त्याबदल्यात मी फक्त एका वेळेचं जेवण मागितलं ..तो त्यासाठी तयार झाला ..
काही वेळात आम्ही एका छोट्या हॉटेलकडे गेलो ..ऑर्डर दिल्यापासून मी आतुरतेने जेवणाची वाट पाहू लागले ..शेवटी जेवण झाल व त्यावर मी तुटून पडले .. मागील पाच दिवसापासून सोसलेला उपवास मला काही क्षणातच संपव्हायचा होता त्यामुळे मिळेल तेवढ्या लवकर सर्व पोटात ढकलू लागले ..तो मला फक्त न्याहाळत होता ..आणखी किती दिवस मला खायला मिळणार हे माहिती नव्हत त्यामुळे पोटभरून खाऊ लागले ..तो मला अस खाताना पाहून हसू लागला पण मी त्याकडे दुर्लक्ष करू लागले ..शेवटी माझं जेवण करून झालं ..त्याने बिल पे केलं आणि मी त्याच्यासोबत निघाले ..तो कुठे घेऊन जाणार होता हे मला माहिती नव्हत पण मी सोबत निघाले ..
तो मला त्याच्या गाडीवर बसवून घेऊ जाऊ लागला ..त्याने रस्त्यात बऱ्याच वेळा ब्रेक मारला आणि मी त्याला जाऊन आदळायचे ..माझं शरीर त्याला जाऊन भेटायचं आणि तो खुश होऊन जायचा ..मीही आता त्याला काहीच म्हणू शकणार नव्हते त्यामुळे सर्व काही मुकाट्याने सहन करू लागले ..शेवटी गाडी एका इमारतीखाली थांबली आणि काही क्षणातच आम्ही एका फ्लॅटसमोर जाऊन थांबलो ..घरातून एक मुलगा बाहेर आला त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि आम्ही आत गेलो ..तो स्वतः हॉलमध्ये येऊन बसला आणि आम्ही त्याच्या बेडरूममध्ये गेलो ..त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक अवतार अवलंबिला ..त्यामुळे तो या क्षेत्रात तरबेज असावा असं जाणवू लागल..त्याने ओठांपासून तर मांडीपर्यंत सर्व भागांना चुंबन घेण्यास सुरुवात केली ..सुरुवातीला फक्त नाईलाज म्हणून शारीरिक संबंध ठेवण्यास तयार झालेले मी आता मात्र मोहरून गेले ...कोवळ वय आणि त्यातही तो स्पर्श ..नसानसात रोमांच उभा राहिला ..त्याने ते 15 मिनिटे फार मजा केली ..प्रत्येक सेकंदाला तो माझ्या शरीराशी खेळत होता आणि मी त्यात गुंतून गेले ..शेवटी त्याची पुरुषी ताकद संपली आणि तो रूमच्या बाहेर गेला ..
मी आपले सर्व कपडे अंगावर चढवू लागले ..तितक्यात मला दरवाजाच्या बाजूला एक परछाई दिसली ..मी तिकडे पाहिलं तर त्याचा मित्र तिथेच उभा होता ..त्याची मला त्या अवस्थेत बघून द्विधा मनस्थिती झाली होती ..त्याच्या वागण्यावरून जाणवत होतं की त्याने त्यापूर्वी कधीच कुठल्याही स्त्रीला स्पर्श केला नव्हता ..तो लाजत होता त्यामुळे मला विचारण्याची हिंमत करू शकला नाही ..मी त्याची ती द्विधा मनस्थिती ओळखली आणि लगेच येण्याचा इशारा केला आणि तो धावतच येऊन शरीरावर पडला ..पहिल्यांदा एखाद्या मुलीला स्पर्श करण्याची मजा तो अनुभवत होता आणि ती मोहकता त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट जाणवत होती ..तो क्षण देखील बरच काही सांगत होता ..हो पण त्याची इमानदारी मात्र मला फार आवडली ..त्याच काम झाल्यावर त्याने काही पैसे माझ्या हातावर ठेवले ..पण मला पैसे नको होते ..मी त्याला पैशाऐवजी आजची रात्र तिथे राहण्याची विनंती केली आणि तो तयार झाला ..
त्या रात्री आम्ही तिघेही बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो ..मी दिसायला सुंदर होते ..तुम्हा मुलांच्या भाषेत सांगायचं झालं तर माल होते त्यामुळे तो मला माझ्याबद्दल बरच काही विचारत होता ..मीही त्याला मागील पाच दिवसात घडलेल सर्व काही सांगितलं ..तो काही क्षणांसाठी विचारात मग्न झाला आणि लगेच म्हणाला , " जर मी तुला कस्टमर आणून दिले तर ..तू फार सुंदर दिसतेस शिवाय एकटिच आहेस तेव्हा बक्कळ कमाई करशील "..

तो एवढं बोलून थांबला ..मी मात्र फारच गोंधळात पडले ..मागील पाच दिवसात माझं अस्तित्त्व काय आहे हे या शहराने दाखवून दिलं होतं शिवाय निंदा करायला मागे पुढे कुणीच नव्हते ..तू चांगली वागते आहेस की वाईट हे सांगायला आपलं मनावं अस कुणीच नव्हतं त्यामुळे त्याला होकार कळवला ..पण सर्वात मोठी समस्या होती ती राहण्याची ..त्याने मला एका फ्लॅटवर राहण्याची व्यवस्था करून दिली ..दररोज कस्टमर वाढत गेले आणि मी इथेच सेटल झाले ..ज्या शहरात मला खाण्यासाठी तडफड करावी लागली होती त्याच शहरात माझं स्वताच घर आहे आणि मी मुंबईचा भाग झाले ..
एका दिवसाची गोष्ट आहे ..एक मुलगा आला ..त्याने स्पर्श करण्याआधी काहीतरी चाखून पाहिलं आणि मी त्याला कुतूहलाने विचारलं , " हे काय आहे ? "

आणि तो म्हणाला , " जादू की पुडीया ..इसे एक बार जो चख लेता है उसपर जिंदगीभर गम का साया राज नही करता और हम अपनी खुद की दुनिया मे जिते रहते है .."

मीदेखील ते चाखून पाहिलं ..ते होत ड्रग्स ..मी पहिल्यांदा चाखून पाहिलं आणि आजतागायत ते माझ्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे ..तो मला त्या सर्व नावडीच्या स्पर्शापासून वेगळं ठेवतो कदाचित मी त्यावेळी त्यांच्यासोबत असूनदेखील नसते ..आज या शहरात वास्तव्य करून पंधरा वर्षे झाली आहेत ..मी उडत असते पाखरावांनी हवं तसं हव्या त्या दिशेला ..
मला माहित आहे की लोक म्हणतील मी अस करायला नको होतं पण म्हणतात ना " प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असत इथे तर जीवन जगण्याचा प्रश्न होता मग त्यासाठी जे करावं लागलं ते मी केलं ..और वैसे भी ये दुनियावाले बडे शातीर है मदद करणे वक्त साला कोई नही आता पर बाते बनानि हो तो सारा सैलाब साथ निकल पडता है ..मला नाही माहीत मी चुकीच वागले की बरोबर पण कधीकधी ठरवलेल्या गोष्टी वेळ आल्यावर पूर्ण करता येत नाही त्यामुळे जो निर्णय वेळेवर घेतल्या जातो तेच तुमचं आयुष्य ..तेव्हा हे नक्कीच सांगेल की मी आनंदी नसले तरी समाधानी नक्कीच आहे ..

कदाचित

जिंदगी की यही रीत है
हार के बाद ही जित है

तर अशी होती माझी कहाणी ..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED