माझा शंतनु भाग ४ PrevailArtist द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझा शंतनु भाग ४

त्यांना आपल्या सुरुवातीचे दिवस आठवले ह्याच रूममधून आपण आपल्या friendship ची सुरूवात केली नि आता लास्ट सेमिस्टर च्या वेळी आपण इथेच आलो ती दोघे ह्या विचारात खुप हसले, शांतूनेने तिच्या गालावर आपला हात फिरवला तिचे डोळे पुसले,तिच्या जवळ जाऊन बसला अजून तिचे हार्ट बिट्स अजून वाढत गेले,त्याला जी गोष्टी सांगायची होती तो ती बोलणार तेवढ्यात तिने त्याला आपल्या मिठीत घेतलं दोघांनी पण गच्च मिठी मारली,त्याने तीला लहान मुलासारख कुरवाळल तिच्या गालाच्या पाशी आला तिथे त्याने आपले ओठ टेकवले तिच्या अंगाला शहराला आला तिने तिला गच्चं धरलं मग त्याने तिच्या कपाळाला आपले ओठ टेकवले नंतर तिच्या केसावरुन हात फिरवला तिच्याकडे एकटक पाहत बसला तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले नि तिने पण त्याच्या केसावरुन हात फिरवत होती.असं खूप वेळ झाल शांतनू जेव्हा सकाळी उठला तेव्हा पण नेहा त्याच्या कुशीत झोपली होती.पण शांतूनला कळत नव्हतं कि आपल्या सोबत काय झालाय ते कस नि कधी सांगणार.नेहाकडे बघून त्याला खूप काळजी वाटत होती कारण तिची अवस्था त्याच्यामुळे झाली होती हे कळत होत.

नेहा उठली आणि शांतनू कुठे दिसतोय काय पाहत होती तर तो कुठे नाही ह्या विचाराने तिचा जीव कासावीस झाला नंतर तिने आपल्या बेडपाशी पाहिलं एक पत्र होत नेहा घाबरत त्या पत्राच्या जवळ गेली तिला जे वाटत होत तेच झालं तिने पत्र उघडून पाहिलं आणि ते पत्र शांतनूने आपल्या साठी लिहल होत.

प्रिय नेहा,

मला माहितीय तुझ्या मनात माझ्यासाठी काय आहे , आणि हा पण तितकंच माहितीय कि तू माझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि मी सुद्धा नाही राहू शकत. तुला कधी सांगितलं नाही पण आता सांगतोय " माझं तुझ्यावर खरच खुप प्रेम आहे ग ", तुझ्या इतकं प्रेम,माझी काळजी कोणी नाही करू शकत माझी
तू समोर आलीस की माझं हृदय धडधत,तुला खूप काही सांगावस वाटतं माझ्या वेदना,माझ्या बद्द्दल खूप काही पण तुला हैप्पी पाहायची सवय झालीय,
तूझ्यासाठी मी लायकीचा नाही म्हणून मी तुला सोडून जातोय.
मला तू पहिल्या दिवसापासून आवडली होतीस, प्रॅक्टिकल ला तुझा रुसलेला चेहरा, तुझ माझ्याकडे येऊन काळजी ने विचारणं, माझा हातात हात घेणं खरचं मला खूप बरं वाटलं होत.
नेहा तुझ्या आयुष्यात तू पुढे जा, माझ्यासाठी थांबू नकोस आणि माझी वाट पण नको पाहुस.
माझ्या बद्दल विचार पण करू नकोस, bye नेहा all the best for future
तुझाच
शांतनू


नेहा खूप वेळ पत्राकडे बघत होती, तिला धक्का बसला होता की, ह्याचा आपल्या वर जरापण विश्वास नाही का.. नेहाच अंग अजुन तापाने गरम होत होत. तिला तीच सुचत नव्हतं की काय करू नी काय नको, त्याच हे पुन्हा अस अचानक जाणं तिला त्रास सहन होत नव्हता.
नेहा त्याच अवस्थेत शांत बसली होती, समोर हातात पत्राकडे पाहत बसली होती, स्वतःला सावरत ती उठली आणि एकच मनात ठेवलं आता "आपण जास्त विचार नाही करायचा फक्त आपलं करिअर वर लक्ष द्यायचं खूप रडले मी शांतनू साठी त्याला नाही माझी किंमत मग मी पण का करावी"
ते पत्र नेहाने आपल्या बॅगमध्ये ठेवलं कारण ह्या पत्राने तिच्या आयुष्यात वेगळी कलाटणी मिळाली होती.

Present day

सकाळचे आठ वाजले होते आणि पाऊस पण थांबला होता, नेहाच्या लक्षात आलं की आज आपण पूर्ण रात्र हॉस्पिटल् ला च घालवली, तिने लगेच बाबाना कॉल केला ," की बाबा मी आता निघतेय येताना काही आणायचं आहे का...??" तीच बोलणं झाल्यावर तिने निघायची तयारी