माझा शंतनु भाग ५ PrevailArtist द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझा शंतनु भाग ५

Present day

सकाळचे आठ वाजले होते आणि पाऊस पण थांबला होता, नेहाच्या लक्षात आलं की आज आपण पूर्ण रात्र हॉस्पिटल् ला च घालवली, तिने लगेच बाबाना कॉल केला ," की बाबा मी आता निघतेय येताना काही आणायचं आहे का...??" तीच बोलणं झाल्यावर तिने निघायची तयारी केली तेव्हा कळलं की, आज हॉस्पिटॅल मध्ये accident ची केस आलीय, तिचे कलिग ती केस हॅण्डल करत होते त्यांचा निरोप घेऊन नेहा घरी गेली.
घरी गेल्यावर तिचे बाबा तिच्या आवडीचे पदार्थ तयार करून देत असे. नेहाची आई गेल्या नंतर नेहा आणि बाबा दोघ पण एकमेकांसाठी जगत होते. नेहाचे बाबा नेहासाठी खूप खुष होते कारण तिने त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं होत. त्यांना अभिमान वाटायचा तिला हॉस्पिटलमध्ये जाताना.

आता नेहाचे बाबा तिच्या साठी राजकुमार च्या शोधात होते,आज डायनिंग टेबलवर त्यांनी एक एक प्रोफाइल दाखवायला सुरू केले, नेहाचा मन नव्हतं पण तिने टाळायचं म्हणून टीव्ही लावला तर त्यात न्यूज आली होती ," एका ट्रक खाली गाडी आली त्यातले गंभीर जखमी लोकांना तात्काळ हॉस्पिटॅल ला नेल"
येवढ्या पावसात कशाला तो प्रवास करायचा असं बोलून ती आपल्या रूम मध्ये निघून गेली
आज खूप थकली होती नेहा म्हणून तीने स्वतःला बेडवर झोकून टाकलं.आज तिला खूप झोप लागली आदल्या दिवशीच्या तणावाने.

दुसऱ्या दिवसापासून रोजच्या सारखे routine ला सुरुवात झाली, हॉस्पिटॅलला नेहा सगळ्यांना हवीहवशी वाटायची, कारण ती सगळ्यांशी अस वागायची की त्यांचा अर्धा आजार गायब होयचा. सगळ्यांशी मिळूनमिसळून वागायची.

असच एकदा ती हॉस्पिटॅलच्या कोपऱ्यात एक रूम पहिली होती तिथे जास्त कोणी जात नसत पण नेहाच्या मनात curiosity होती की आपण तिथे जाऊन बघायचं म्हणून एक दिवस तिने आपलं काम पटपट आवरलं आणि त्या रूमच्या दिशेने गेली, तिथे गेली तेव्हा तिथे कोणीतरी बसल होत, नेहा जवळ जात असताना त्या पेशंटची जास्त चुळबुळ होत होती, नेहाला समजत नव्हतं की पेशंटची एवढी का चुळबुळ चाललीय , नेहा समोर गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, तिला धक्का बसला जेव्हा तिने ह्या अवस्थेत शंतनुला पाहिलं , तिला आधी सांगितलं होत की ह्या रूममधाला पेशंट नेत्रहिन आहे, तर हां माझाच शांतनू च कसा... ती हळूहळू त्याच्या समोर गेली त्याची खूप चळवळ होत होती म्हणून तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला.
शांतनू तेव्हा थोडा शांत झाला जणू शांतनुला तिचा स्पर्श कळला होता, शंतानुने पण तिला दुजोरा दिला.
"तू कशी आहेस...??" ह्या प्रश्नाला तिच्या तोंडून उत्तर बाहेर पडत नव्हतं कारण आज आपण दोन वर्षांनी असे ह्या अवस्थेत भेटू अस स्वप्नात पण वाटलं नव्हतं, तिचे हुंदके तो ऐकत होता ," मी बरी आहे, (
त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत ती बोलत होती.)पण
शांतनू हे असं कसं रे"

तिच्या ह्या प्रश्नाने दोघ थोडावेळ शांत बसले

"अग हे मी फिरायला जात असताना झालं आमची गाडी एका ट्रक खाली आली गाडी मीच चालवत होता"
नेहाच्या मनात ती न्यूज आठवली जी आपण पहिली होती त्यात आपला शांतनू होता तर तिला खूप वाईट वाटलं.

शांतनू पुढे बोलत होता," आणि त्या accident मध्ये माझे डोळे गेले आणि मी नेत्रहिन झालो आणि माझे दादा-वहिनी मला ह्या अवस्थेत सोडून गेले आणि आता मी एकटाच राहीलोय"
त्याच्या ह्या बोलण्यावर ," तू आता एकटा नाही आहेस मी आहे सोबत तुझ्या", नेहा
त्याला नेहाच्या ह्या बोलण्यावर आधार वाटतो आणि
पुढे बोलतो," मी तुला खूप दुःख दिलय ग, आज आपण दोन वर्षांनी इथे