अपूर्ण बदला ( भाग २ ) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग २ )

संध्याकाळच्या वेळेला सगळे मित्र क्रिकेट खेळण्यासाठी जायला निघाले. रम्या आणि श्याम ब्याट आणि बॉल घेऊन हरीच्या घरी आले. थोड्या वेळाने गोट्या सुद्धा फ्रेश होऊन हरीच्या घरी आला. पण हरी घरी झोपला होता. त्याला प्रत्येकवेळी डोळ्यासमोर ती हिडूसवानी भयानक आकृती दिसत होती. त्यामुळे तो अंथरुणातही थरथर कापत होता.त्याचे ते सडके तोंड जागो-जागी फाटलेल त्याचबरोबर वरून कापलेली मान,त्याचे बाहेर आलेले पांढरे शुभ्र बिबुल आणि लाल रक्तासारखे तीक्ष्ण डोळे त्याला डोळ्यासमोर दिसत होते.

हरी विचारांतच होता कि, त्याला कोणीतरी हात लावला आणि एकदम जोरात ओरडत उठला. डोक्यामध्ये त्याच काळ्या आकृतीचे विचार होते आणि अचानक त्याला कोणाचा स्पर्श झाला त्यामुळं तो एकदम दचकलाच. त्याला काय झाले म्हणून त्या तिघांनी त्याला एकसाथ विचारले? पण त्याची पूर्ण दातखिळीचं बसलेली. त्याचं शरीर घामाने चिंब भिजलेले. जणू त्याच्या एकट्यावर पावसाच्या सरी बरसल्यात. त्यांनी हरीच्या आईला सुद्धा विचारले कि हा शाळेत सुद्धा एवढा घाबरला होता आणि आत्तासुद्धा. काय झालय....?

हा शाळेत जातो, आणि तिकडे काय टवाळगिरी करतो? काय बघून येतो? आणि असा घाबरत बसतो. मला काही माहिती नाही तुम्हीच बघा. मी बाजूच्या काकुकडे जात आहे. तोपर्यंत कुठे जाऊ नको असा बजावून सांगून आई बाजूच्या घरात गेली. तिघेही जण त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तसंच बघत राहिले. काय होतं हे?

हरी एवढा घाबरला होता कि त्याला जागेवरून उठणं हि मुश्कील होतं होतं .असो तसेपन त्याचे मित्र त्याच्या जवळच होते.

त्यांनी त्यांच्या गप्पा चालु ठेवल्या. मात्र हरीला कुठेतरी त्याच्या बाजूला कोणीतरी बसले आहे? असा मनात भासू लागलं, 'भास' नाही म्हणता येणार त्याला तसं जाणवू लागला. पण त्याला वाटलं आपण अगोदरच घाबरलो आहे म्हणून असं होत असेल.

बॅट कोपऱ्यात बाजुला ठेऊन श्यामने दबक्या आवाजात हरीला विचारले, तू एवढा का घाबरलेलास? आणि असं काय बघितलस ते तू एवढा थर थर कापत होतास?

नक्कीच ह्याने त्या आंबे मालकाला बघितला असणार गोट्या हसत हसत बोलला .

नाही ह्याने नक्कीच कायतरी अजिवीत नाहीतर खतरनाक प्राणी बघितला असेल? रम्याने लगेच आपलं मत सादर केलं.

असच काहीसं झाला होतं . हरीने मान हळवून होकारार्थी इशारा केला.तसेच त्याने सगळं आपल्या मित्रांसमोर वर्णन केल. त्याच हे भयानक वर्णन ऐकून रम्या आणि श्याम दोघीही थोडावेळ निपचिपचं झाले. ते चांगलेच घाबरले होते.

आजची रात्र हरीने घाबरत घाबरत आणि आपल्या उशाला कोयता व देवाचे फोटो घेऊन झोपी गेला, असे बोलतात कि आपल्या उशापाशी काही लोखंडी किवा धारधार वस्तू घेतल्यास अमानवी शक्ती आपल्याला काहीच करू शकत नाही. ह्यामध्ये सुद्धा किती तथ्य आहे हे त्यालाही माहित नव्हते. पण पूर्वजांपासून आलेली हि अंधश्रद्धा पाळणं त्यालाही त्यावेळेस भाग होतं.

सकाळच्या त्या छान चिमण्यांच्या किलबिलाटामध्ये हरीला जाग आली. खिडकीमधून येणारे ते कोवळे उन त्याच्या मनाला सुखद व ताजे टवटवीत भासत होत . त्या चिमण्यांचा आवाज त्याला तसाच ऐकवासा वाटत होता . हरी घराच्या बाहेर बागेत आला चारही बाजूनी आभाळाला हेरलेले , त्या डोंगरांच्या माथ्यावरून सूर्याने आपला मार्ग निवडलेला, हळूच डोके वर काढत काढत तो सर्वाना त्याचं दर्शन द्यायला आला. त्याच त्या कोवळ्या उनाची किरणे झपाझप जमिनीवर येताना पाहून असं वाटत होत, जस त्यांच्यामध्ये शर्यत लागली आहे. जो सबसे पहिले जमीन छुयेगा वही होगा इस धरती का सिकंदर.

चिमण्यांचा थवा त्या किरणांचा आनंद घेण्यासाठी एकमेकांच्या मागोमाग आकाशातून सफर करत होते.इवली पिवळ्या फुलपाखरांचा सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात पकडापकडीचा डाव सुरु होता.भृंगराज भून भून करत फुलातील मधाचा आस्वाद घेण्यासाठी भ्रमण सुरु केलेले. बागेतील ती फुलझाडे रात्रीच्या त्या उजाड अंधारत कोमेजून गेलेली आता सूर्याच्या कोवळ्या उनात आपली पर्ण बाहेर काढून त्या कोवळ्या उन्हाच स्वागत करत आहेत. सकाळच्या त्या कोवळ्या उन्हामध्ये फुलांच्या कळी टवटवीत होऊन मोठे फुल होणाच्या आकारात आलेली आहेत.पश्चिमेकडे तोंड मुरडून उभे असलेले सुर्यफुल आता पूर्वेकडे सूर्याच्या दिशेन मान ताठ करून कोवळ्या उन्हाचा आनद घेत आहे.आईच्या कुशीमध्ये निजलेले ते वासरू आईबरोबर आता वनात गवताच्या शोधात निघालेले आहे. दुडूदुडू चालून आई पहिले मीच शोधणार असं अट्टाहास धरून ते आपल्या आईच्या पुढे लागले आहे.कोठूनतरी खुराड्यातून जागा झालेला कोंबडा सर्वाना उठवण्याची मदत आपल्या आरोळीने करत आहे .अशा या गोड आणि मधुर सकाळचा आनंदच वेगळा.

क्रमशः