अपूर्ण बदला ( भाग ५ ) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग ५ )

रव्याला काही ठीक वाटत नव्हते, बाकी सगळ्यांनी आंबे खाल्यानंतर घरची वाट पकडली, हरी रव्यासोबत तिथेच थांबला तसही त्याला कुठे लांब जायचं होतं .रव्या तू आंबे का नाही खाल्ले रे? हरीने रव्याला त्याच्या मनामध्ये आलेला प्रश्न विचारला .पण रव्याचा काहीच उत्तर आले नाही. तो स्वतःच्या विचारात मग्न झालेला. त्याला सारखे तेच विचार मनामध्ये फिरत होते. त्या विचारात त्याला कुणीतरी आपल्याला स्पर्श करतय अस जाणवल आणि तो एकदम अचंबित होऊन ओरडणार तेवढ्यात हरीने विचारलं काय झालं? तु एवढा का घामाघुंम झाला आहेस . आईला न सांगता गेलो त्यांबद्दल घाबरलायस का? त्यामुळे हरी त्याला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला .

अरे मी त्यावरून नाही घाबरलो. ते वादळ आणि अचानक वरच्या बाजूला कसलीतरी होणारी हालचाल नक्कीच ते नैसर्गिक नव्हतं तेथे काहीतरी अमानवी वास्तव्य आहे. रव्याने मात्र त्याला दिसलेली ती अमानवी काळी विचित्र सावलीबद्दल हरीला थांगपत्तासुद्धा लागून नाही दिला.

रात्रीचे सात वाजले होते, रव्या घरात बसून आईची वाट पाहत होता. आज खूप वेळ झाला तरीसुद्धा ते आले नाही. जरा उशीरच झालेला. रव्याला घरात एकट्याला भीती वाटत होती म्हणून तो बाहेर येवून वाट पाहू लागला. वाट पाहता पाहता त्याला मनामध्ये कुठेतरी थोडीशी धुकधुक होतीच. त्याच्या डोक्यामध्ये सारखे तेच अंधुक सावलीचे विचार येत होते, त्यातच त्याला अंगणाच्या कोपर्याला कसलीतरी हालचाल जाणवली, त्याला तिकडे कोपर्यामध्ये कोणीतरी असल्याचा जाणवलं . त्याला समजत नव्हत आपल्याला भास होतोय का खरच तिथे कोणीतरी आहे. त्याच्या संपूर्ण शरीरावर भीतीचे शहारे जाणवायला लागले. ते शहारे हात भाजल्यानंतर येणाऱ्या फोडासारखे वाटत होते. रव्या त्या दिशेने पुढे सरकू लागला जसजसा तो पुढे जाई त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते.

आकाश पूर्ण काळोख्यात गेलेले, वादळ वारा यांचा विध्वंसक रित्या खेळ सुरु झाला, झाडे झुडपे डुलू लागलेली, विजेचा कडकडाट सुरु झालेला, काळ्या भिन्न आकशात भली मोठी वणव्यासारखी तेज वीज चमकत होती, त्या विजेच्या उजेडामध्ये ती आकृती उघडझाप दिसत होती. त्या काळोख्या रात्री रव्या एकटाच घरी होता म्हणून त्या आकृतीने त्याचा फायदा घेतला असावा. रव्या मंद गतीने हळूहळू पाऊल टाकत त्या दिशेने सरत, घाम पुसत पुढे चालू लागला. त्याचवेळी त्याला दमट आणि उग्र वास येऊ लागलेला, वास त्याच काळ्या विचित्र आकृतीचा दिशेने येत होता. जणू कुणीतरी श्वापद खूप दिवस मरून तिथेच पडलेल आहे, रव्या थबकलाच! त्याची बोलती बंद झाली,संपूर्ण शरीर लटलटू लागले त्याला दरदरून घाम सुटू लागला. ज्या सावलीला आपण नदीपल्याड पाहिलं तीच विचित्र सावली तिथे उभी होती. पण ह्यावेळेला तीच रूप वेगळच होत. खोल आतवर गेलेले लालकाळे डोळे,जागोजागी फाटलेल शरीर लटकत मांस, तोंडातून निघालेला घानेरडा स्त्राव, अर्धवट तुटलेली तिरपी मान आणि तिरप्या नजरेनेच रव्याला घुरत असेलेल लाल पांढरे डोळे, बाहेर पडलेलं बिबुल आणि त्याच्या शरीरातून निघणारा उग्र दमट वास, हवेमार्फत बाहेर जाताना स्पष्ट दिसत होता. रव्याला पाहून त्या किळीसवाण्या शक्तीने जोरजोरात हसायला सुरु केलं ते घुर घुरणे असुरी शक्तीचे हसणे पाहून रव्या जोरात किंचाळला आणि जाग्यावर पडला.

त्याच क्षणी रव्याचे आईबाबा येउन पोहचले, हरीची आईसुद्धा लगेच घरातून बाहेर आली. रव्याला असं बेशुद्द पडलेलं पाहून त्यांचा जीव कासावीस झाला. काय झालं कुणालाच थांगपत्ता नाही लागला? रव्याला घरात घेऊन आईने सोफ्यावर झोपवला. अंगावर पाणीही शिंपडले तरीही काही फरक जाणवला नाही.रव्याची आई आता जास्तच घाबरली. मुलाच्या काळजीने मुळूमुळू रडू लागली. एकुलत्या एका मुलाला आशा अवस्थेत बघून ति मतीबंद झाली.खूप वेळ झाला तरी मुलगा अजून शुद्धीवर आलेला नाही, त्यामुळे सगळेच काळजीत पडलेले सगळेच हताश झालेले. त्यामुळे रव्याच्या उशाशी त्याची शुद्धीवर येण्याच्या आशेवर सगळेच तिथेच झोपी गेलेत.

क्रमशः