The Incomplete Revenge - 3 books and stories free download online pdf in Marathi

अपूर्ण बदला (भाग ३)

शुभ प्रभात! हरीला खालच्या अलीकडून श्याम आणि रम्याने येताना आवाज दिला.

तब्बेत कशी आहे ?

मस्त.आणि शुभ प्रभात.

त्यांना चाय आणि नाश्ताचा फर्मान सोडला. आणि घरात बोलावून घेतलं. बोलता बोलता हरी विचारनारचं होता कि गोट्या नाही आला अजून? तेवढ्यात दारातून आवाज आला, शुभ प्रभात! तो गोट्या होता. त्याला पाहताच श्याम हसत त्याला म्हणाला तुला शंभर वर्ष आयुष्य आहे, आत्ताच तुझ्या बद्दल हरीने विचारलेलं

माणसाच काही खर सांगता येत नाही, आज आहे तर तर उद्या नाही. आणि तू म्हणतोस मला शंभर वर्ष आयुष्य लाभेल म्हणून. इथे पन्नास वर्षे कशीबशी सरत आहेत. यातच आश्चर्य आहे काय रम्या बरोबर का नाही ?

अरे तो तुझ्याबद्दल बोलत असताना तू समोर आलास, म्हणून म्हणाला. त्याच्यावर एवढ भाषण द्यायलाच लागत का?

काही म्हणा गोट्या जे काही बोलला, त्याचाशी मी सहमत आहे. हरी तोंड पडलेला चेहरा करून बोलला. त्याचे असे बोलणे आणि बोलताना त्याची नजर समोरच्या घराकडे असताना, तिघांनाही त्याला काय बोलायचे आहे ते त्यांना समजले.

आपल्या आयुष्यात काय होईल याचा नेम नाही.

आपल्या रव्यासोबत जे काही झाल ते अचंबित आणि अघटीत होतं. श्याम डोळ्यातले अश्रू हाताने पुसत बोलू लागला.

श्यामचं बोलण ऐकुन त्या चारही जणांच्या अश्रुधारा नकळत वाहू लागल्या. त्या सुकलेल्या डोळ्यांच्या कडा आपोआप ओळ्या झाल्या.

असं काय होतं त्या घरामध्ये? आणि कोण राहायचं त्या घरामध्ये ? कोण होता रव्या ....? त्यामुळे हे चौघे पांडवाना रडू येत होत ? अशी त्यांची कोणती आठवण त्या घराशी निगडीत होती ? काय नात आहे त्याचं त्या घराशी ?

*************

एक महिन्यापूर्वी.............................

गोट्या श्याम हरी आणि रम्या ह्यांच्या व्यतिरिक्त त्यांचा अजून एक मित्र होता. “रव्या”! आईवडलांना एकुलता एक आणि त्यांचा लाडका सुद्धा. गोरा दामटा चेहरा,काळे भुरे केस आणि वयानुसार शरीराची आकृती सगळ काही ठीक होत. रव्या हरीचा जिवलग मित्र लहानपणापासून एकत्रित वाढले,खेळले त्यामुळे हरी आणि त्याची चांगलीच गट्टी जमली होती. तसही त्या दोघांचही घरे समोरासमोर होती. त्यामुळे त्यांच्यासाठी चांगलच होतं. त्यांना एकमेकांच्या घरी जाण्यासाठी वेळेचं निर्बंध नव्हता. कधीही आणि कोणत्याही वेळेला एका उडीत एकमेकाच्या घरी जाऊ शकत होते.

रव्याचे आईवडील बोलायला चालायला तसे चांगलेच. त्यांना ह्या पाच जणांची जोडी आणि मैत्री चांगलीच वाटायची. म्हणून ते सतत त्यांची स्तुतीही करायचे. सारखे बोलायचे महाभारतातले पाच पांडवांची जोडी आहे तुमची. असेच एकत्र राहा आणि खूप मोठे व्हा.आणि नाव कमवा.

शाळेला सलग दोन दिवसांसाठी सुट्ट्या असल्यामुळे कुणाला शाळेत तर जायचे नव्हते. त्यामुळे ते रव्याच्या अंगणात खेळू लागले. मुलांनो निट खेळा रे, मारामारी करू नका. आणि कुठे हिंदडायला जाऊ नका. मला जर समजले कि तुम्ही नदीमध्ये पोहायला गेलाय. तर मग तुमची काय खैर नाही . हरीच्या आई ने अगोदरच बजावून ठेवले. हरीच्या आईचा आदेश ऐकताच सगळे हो म्हणाले. हरी बघ हा जर मला कळले कि तुम्ही सगळे तिकडे गेलात तर पहिलं तुला बधाडून काढील . हरीला ताकीद देऊन ठेवली.

नाही जाणार आम्ही. आणि एवढ काय आहे त्या नदीमध्ये? ते तू आम्हाला जाऊ देत नाहीस. आणि नदीही पोहण्यासाठीच असते. हरी मित्रांकडे डोळे मिचकावत हसत बोलला.

तुला सांगतेना. हरीची आई आता जरा रागातच पण आईच्या काळजीने बोलली, त्या नदीमध्ये आणि नदीच्या पलीकडे नाय जायचं म्हणेज नाय.त्यातच हरी काही बोलायच्या अगोदर त्याचे बाबा म्हणाले, अग आत्ता ते मोठे झालेत, वयात आलेत, कुठे पहिली-दुसरीत आहेत? आत्ता नाय मजा करणार मग आपल्या वयात आल्यावर करणार ,पाचही जण एकसाथ हसायला लागले. आणि बाबाही हसायला लागले . तू कशाला एवढी त्यांच्यावर रागावतेस? आहो पण ते झाड ! तेवढ्यात तिला मधेच थांबवून हरीचे बाबा म्हणाले मुलानो तुम्हाला जेवढी मस्ती मज्जा करायची आहे ती इथेच करा. पण बाहेर कुठे जाऊ नका आणि नदीच्या पलीकडेही जाऊ नका. आपली हद्द्द नदीच्या अलीकडे आहे जर तुम्ही पलीकडे गेलात तर भूत पकडून घेऊन जाईल. हरीचे बाबा हसत हसत हसत म्हणाले कारण भुताचा विषय काढला कि कोणीही घाबरतच नां.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED