The Incomplete Revenge - 11 books and stories free download online pdf in Marathi

अपूर्ण बदला ( भाग ११ )

बघता बघता रात्रसुद्धा संपून गेली. दिनचर्या आपला दिनक्रम तिच्या वेळेनुसार निभावत होती. सकाळ झाली आणि कोंबड्याने त्याचे नित्यनियमाचे म्हणजेच आवरण्याचे काम केले. म्हणतात ना मुकी प्राणी, पशु आपला दिनक्रम किंवा काम वेळेअभावीच पार पाडतात. त्यांना रोज रोज सांगायला किंवा आठवण करून द्यावी लागत नाही. माणसाला सकाळी लवकर उठायलाही दुसऱ्या माणसाचा आधार लागतो. तो जेव्हा उठेल तेव्हा आपण राजा माणूस उठणार, नाहीतर मनसोक्त वेळेत बांधतंत्री करून किंवा अजून थांब करून, करून पूर्ण एक दोन दास झोप घेतो. शिवाय आत्ता सायन्स आणि टेकनॉलॉजिही पुढे गेले. एक अलार्म लावला कि सकाळी वेळेवर तो वाजतो. ह्या अशा गोष्टीवर माणूस अवलंबून राहिला आहे. तो विसरत चाललंय कि माणसानेच ह्या सर्व गोष्टी घडवून आणल्या आहेत. आणि त्याचा प्रमाणाच्या बाहेर वापर करून त्याचीच सवय झाले. हे पाहता असंही म्हणता येईल कि माणूस हा जगातील सर्वात आळशी प्राणी आहे जरी कोआला (koala )असला तरी. कोंबड्याच्या ओरडण्यात त्याला असे काही सुचवायचं होत कि"उठा उठा सकाळ झाली तुमची रात्रनिंदा संपून गेली" आजचा हा आनंदाचा दिवस तुमची आतुरतेने वाट पाहत आहे.

रव्याची आई सकाळी लवकरच उठली होती. मुलाच्या काळजीने तिला धड नीट झोपही लागली नव्हती. त्यामध्ये तिला सारखं तिच्या डोळ्यासमोर एकच दृश्य दिसत होत. सकाळी सुद्धा त्याच स्वप्नामुळे तिची झोप उडाली होती, कोणीतरी झोपलेले दिसतंय आणि त्याच्या शरीरावर पांढरा सफेद कापड अंथरला आहे आणि त्याच्या बाजूने बरीच मंडळी बसलेली आहेत आणि समोरच एक बाई घसा कोरडा होईपर्यंत रडत होती. स्वतःला हणून मारून घेत होती. कानामध्ये नुसता रडण्याचा आवाज घुमत होता. नकळत तिच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागले. शीतल आणि तेजस्वी चेहरा जरा घाबरा झालेला त्या डोळ्यांमध्ये काळजी होती. तिला सारखी रव्याची काळजी वाटत होती.

साधारण आठ-साडेआठ च्या दरम्यान रव्याच्या आईने तीच घरातले रोजचे काम आटपून आपल्या मुलाला म्हणजेच रव्याला आवाज देऊ लागली. तिने एक दोनदा आवाज मारला पण तिला काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती स्वतः रव्याच्या खोलीमध्ये जाऊन त्याला आवाज देऊ लागली. आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली तिच्या सारखे सारखे ओरडण्याने रव्याचे बाबा नुकतेच उठलेले. रव्या उठत का नाही आहे म्हंणून आईने स्वतः रव्याला उठवण्याचा प्रयत्न केला आणि ती थबकली तिच्या तोंडातून आवाज बाहेर निघत नव्हता तिचा कंठ भरून आला ,एक आवंढा गिळत परत रव्याला हात लावला ह्यावेळी तिच्या अश्रुना मोकळीक मिळाली. रव्याचे शरीर पूर्ण थंड गार झालेले.जस हिमालयातील बर्फ.

अ....आ....आ............हो ......आहो ब .........बघा ना रव्याला काय झालय हा उटत का नाही आहे? त्याच शरीर का एवढं थंड झालं आहे? ती अडखळत अडखळत हुंदके देत बोलत होती. काही काय बोलतेस? तुला माहिती आहे ना तो कधीपासून आंथरुणावरच आहे. त्याला जाग आल्यानंतर होईल बरोबर कशाला एवढी काळजी करतेस? रव्याच्या आईला मात्र हे असे बोलणे आवडले नाही. ती ह्यावेळी जरा उंच स्वरातच गरजली. अहो बघा ना तुम्ही माझ्या लेकराला काय झालाय ते. तिच्या आवाजामध्ये कळकळही होती आणि रागही होता, तिच्यातली ममता जागी झालेली आणि जेव्हा स्त्री च्या आतली ममता,आदिशक्ती जागी झाली कि ती पुढे कोण आहे तेही बघून घेत नाही. जेव्हा पार्वतीमधली महाकाली जागी झाली तेव्हा पृथ्वीचा विनाशच झाला असता जर महादेव पुढे आले नसते तर.

रव्याच्या आईच्या व्याकुळतेने बाबानी लगेचच वैद्यबुवांना बोलावले. वैद्यबुवांनी रव्याच्या हातावरील धमन्या तपासल्या आणि त्यांनी एकच उत्तर दिले की मला सांगताना दुःख होतंय कि तुमचा मुलगा आता ह्या जगामध्ये नाही आहे. पूर्ण घरामध्ये शांतता पसरली वैद्य बुवांच्या तोंडातून निघालेल्या शब्दांवर रव्याचे बाबा पाठच्या पाठी भिंतीला जाऊन धडकले. रव्याची आई मात्र तशी रव्याकडे शून्यात नजर टाकून बघत होती. नकळत अश्रुधाराही सुरु झालेला मात्र कंठ साथ देत नव्हता. तिचा आवाज बाहेर येत नव्हता, तिला चांगलाच धक्का बसलेला जी ममता जी आई आपल्या मुलाच्या उठण्याच्या आशेवर व्याकुळतेने वाट बघत होती, तोच मुलगा आता कधीच उठणार नव्हता. ह्या विचाराने ती बधीर झालेली तिला काहीच कळत नव्हते. तिच्याच पदरात का अशी सजा नियतीने लिहिलेली? तिलाच का एवढं भोगायला येत होत? तीच डोकं सुंन्न्न झालेलं घरात शांतता पसरलेली तीही वाईट घटनेची आणि त्याच शांततमध्ये आईने एकदाच जोरात हंबरडा फोडला. जे रडणे तिने तिच्या मनामध्ये साठवून ठेवलेले ते बाहेर आले. रव्या............माझ्या बाळा का तू गेलास आम्हाला एकटं सोडून. तीच आश्रू आता अनावर आलेले आणि जोरजोरात रडू लागली.

बघता बघता बातमी पूर्ण गावात पसरली तसे रव्याचे सगळे मित्र त्याच्या घरी जमा झाले. बिचारे आपला मित्र आज ठीक होईल उद्या होईल आशा आशेवर होते, तोच आता न उठण्यासाठी कायमचा झोपलेला. आणि त्याचाच विचारात घसा कोरडा होईपर्यंत रडू लागले.

म्हणता म्हणता रव्याच्या चितेला अग्नी दिली. आणि तो अनंतात विलीन झाला.रव्याच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आणि इकडे आपल्या पाच पांडवांपैकी एक पांडव आपल्याला सोडून कायमचा गेलेला ह्यावरून चारही मित्र एकदम शांत झालेले.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED