अपूर्ण बदला ( भाग १२) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग १२)

रव्याच्या घरी जमलेले पाहुणे मंडळी जे त्याचा आई वडलांना सांत्वना द्यायला जमा झालेले, ते आत्ता हळू हळू जाऊ लागले. रम्याची आजी सुद्धा होती तिथे त्यामुळे रम्या आपल्या आजी आणि आईबरोबर तिथेच थांबला. हरीसुद्धा तिथेच होता.त्याचे सगळे मित्र अजूनही तिथेच होते. त्यामुळे ते सगळे हरीच्या घरी रव्याच्या आठवणीमध्ये आसवे गाळत होती.

जरी त्याने त्याचा बदला घेतला नसेल तरी तो वापस येणार आजी मध्ये बोलल्या. म्हणजे ? प्रश्नार्थक चेहऱ्याने सगळेच आजीजवळ पाहत होते. जरी रव्याचा आकलनीय मृत्यू झाला असला. तरी तो त्याच्यामुळेच झालाय. हे काही आपल्याला टाळायला नकॊ काय मंगेश ? म्हजेच रव्याचे बाबा. रव्याची आई ,हरीची आई आणि रम्याची आई त्यांना ह्यामधील काहीच माहिती नव्हतं त्यामुळे ते प्रश्नार्थक चेहऱ्याने मंगेश कडे बघत होते? मला आता तो विषय नाही काढायचा आहे मी विसरलोय आणि तसाही त्याला आता पेटीमध्ये कैद केलाय त्यामुळे ते गूढ मला बाहेर काढून त्याचा विषय नाही बनवायचा.अगोदर मी माझ्या मुलाला गमावला आहे. त्यामुळे मला आता त्या विषयात नाही घुसायचे आहे. त्याला साथ देत सुरेश(हरीचे बाबा ) बोलला बरोबर आहे जे अगोदर आपल्या भूतकाळात झालं ते आत्ता काढून काही फायदा नाही आहे. वर्तमान जो आहे त्याला स्वीकारा. आजी काही त्याला सहमत नव्हती तिला काहीतरी चुकतंय असच वाटत होत. तो वापस येईल असच वाटत होत.रव्याच्या बाबानी लगेचच सर्वाना सांगून ठेवले कि आम्हाला आता इथे राहण्यात काहीही वावगं वाटत नाही आहे. आम्हाला सारख रव्याचा विचार येईल त्यामुळे आम्ही दोघे उद्याच शहराकडे जातोय. त्यामुळे सुरेश घराकडे लक्ष ठेव आणि हरीची काळजी घे. सगळे उठले आणि आपापल्या घरी गेले.

सुरेशला त्याच्या मुलाची काळजी होतीच आणि मनामध्ये कुठेतरी त्याचीही भीती होती तो वापस आला तर..................?

****

हरी चल उठ लवकर, आज शाळेत नाय जायचं का ? झाल्या तुझ्या दोन दिवसाच्या शाळेच्या सुट्ट्या संपल्या. चल निघ पटापट तुझे मित्र आलेत. हरी अजूनही उठला नव्हता त्यामुळे त्याच्या आईचा राग जरा अनावर झाला. त्याच रागात तिने त्याच्याकडे आगेकूच केली. तावातावातच गेली त्याला फटके देऊन उठवणार, तेवढ्यात खोलीच्या दारातून आवाज आला. अग काय करते तू ? झोपेतच कुठे त्याला मारतेस? पहिलं त्याला नीट गोंजारून प्रेमाने सांग सरळ मारायला जातेस. बापाला मारतेस ते मारतेच आता सरळ त्याच्या मुलाला पण हरीचे बाबा जरा मूड मध्ये येऊन बोलले.

तुम्ही गपा हो! काय चावटगिरी करताय. तुमच्यामुळे हा पण बिघडलाय. नुसती कुंभकर्णसारखी झोप! कोठून येते काय माहित? हरीची आई जरा वैतागूनच बोलली. मग काय बाप तसा बेटा! बापाचा पाटा नको का कोणी चालवायला? हरीचे बाबा गंमतीतच बोलत होते. हो बापाचा पाटा चालवायला पाहिजे ना पण वाईट सवयीचा नाही, चांगल्या गुंणाचा? हरीची आई जरा रागातच म्हणाली. अजून जर पुढे काय ,म्हणालो तर १०० टक्के हि बाई भांडायला उठणार त्यामुळे हरीच्या बाबानी चुप्प राहायचं ठरवलं. हा बघ त्याला हळव बघ का नाही उठत? आत्ता तर त्याने नक्कीच उठायला पाहिजे होत तुझा एवढं मोठ्या आवाजाने. खरंच तो न झोपलेला म्हणजे सोंग धरून झोपलेला माणूस पण वैतागून निघून जाईल.

हरीच्या आईचा पारा आता चढलेलाच तरी तिकडे दुर्लक्ष करून हरीला उठवायला पुढे सरसावली. आणि एकदम स्थिरावली तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलेले. काय झालं गं? चेहरा का पडलास ? कसला विचार करतेस उठव त्याला? आहो बघा ना हरी ला काय झालाय त्याच अंग का एवढं गरम आहे आणि तो एवढं थरारतोय का? आणि तो उठत का नाही आहे? ती लगेच पाजळली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. ताप आलाय ना मग एवढी काय घाबरते? काळजी करू नको आपण वैद्यबुवांना कळवू. बाबानी लगेच वैद्यबुवांना आणले.


क्रमशः