अपूर्ण बदला ( भाग १३) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग १३)

वैद्यबुवांनी हरीला तपासले आणि हरीच्या बाबांकडे बघून त्यांना विचारले ह्याने कसली धास्ती घेतली होती का? म्हणजे असं काही तरी बघून तो घाबरलेला आहे नाहीतर कुठे मारामारी केली का? ह्याच शरीर पूर्णतः थरथर कापतंय. घाबरला असल्या कारणानेच त्याने ताप घेतला आहे. मी तुम्हाला काढा बनवून देतो तो त्याला पाजा मग ठीक होईल तो. असे सांगून वैद्यबुवा निघाले जाताना ते कोणालातरी धडकले असे चेहऱ्यावर हावभाव आणून मागे पुढे बघितलं. काय झालं वैद्यबुवा? बाबानी विचारलं. पण वैद्यबुवा काहीही न बोलता तेथून निघून गेले.

हरीच्या आईला चांगलाच धक्का बसला होता. आणि तो साहजिकच होता तिने अगोदरही असच प्रकरण आपल्या डोळ्यांनी बघितले होते. सोबत त्याचा परिणाम ही! ते आठवल्यानेही तिला घाम यायचा. त्यामुळे तिला आता चिंता आणि काळजीनं ग्रासलेले. आहो तुम्ही त्या गुरुजीना वापस बोलवा, जेव्हा रव्याच्या वेळेला बोलावलेला तेव्हा त्याच गुरुजीना बोलवा. मला अजून ईशाची परीक्षा नाही घ्यायची आहे. ते पोर जाऊन एक महिनाही नाही झाल तर लगेच आपला हरीला तसाच त्रास होयला लागलाय. तरी रव्याचे बाबा म्हणाले होते काळजी घ्या म्हणून. पण मला ते कळत नाही ते आपल्याच मुलाला का म्हटले.? ते जाऊदे पहिलं तुम्ही त्या गुरुजीना बोलवा हरीच्या आईचा जीव टांगणीला लागलेला. तिला काहीच सुचत नव्हते त्यामुळे तिचे प्रश्न येणे साहजिकच होते .पण उत्तराची तिने ह्या अशा क्षणाला तरी अपेक्षा नाही केली.तिच्या मुलाचा प्रश्न होता.आहो बघत काय बसलाय एखाद्या खांबासारख! जा ना पटकन आणा त्या गुरुजीना ह्यावेळी आई जोरातच ओरडली .तसे हरीचे बाबा दचकले ते पण कोणत्यातरी विचारात गुंतलेले, नाही! ते पण त्याच गोष्टीचा विचार करत होते. हा त्याच गोष्टीचा."तो परत आला तर.....! आणि तो परत आलेला. त्यांना माहिती असून हे का होतंय तरीसुद्धा त्यांनी आईला प्रश्न केलाच तू का एवढी घाबरली आहेस बघितल असल त्याने काहीतरी? तसं पण कोठे गेलेला तो काय पाहायला ?

त्यादिवशी हरी शाळेतून आला तेव्हा खूप घाबरलेला, आई रडत डोळ्यातील आसवे पुसत बोलू लागली. घरी आल्यावर तो झोपला आणि झोपेतही तो खूप थरथर कापत होता. त्याचे मित्र बोलत होते त्याने काहीतरी खूप भयानक अस पाहिलं त्यामुळे तो खूप घाबरलेला म्हणून. काल रात्री सुद्धा तो खूप अस्वस्थ होता म्हणून मी त्याला झोपू दिलं. मनातच विचार केला की उद्या सकाळी विचारेल. पण,पण मला काय माहित उद्याची सकाळ अशी येईल म्हणून. ती आत्ता मुळूमुळू रडू लागली.

तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. असं बोलून हरीच्या आईची नजर समोरच्या घराकडे होती तिचे आसवे अजूनही टिपत होते. म्हणजे तो वापस आला..........! आणि त्याने माझ्या मुलाला त्रास देणं सुरु केलं. असं बोलून हरीच बाबा खाली बसले आणि माथ्यावर हात ठेवला. न कळत त्याच्याही डोळ्यातून पाणी आले.

आहो आपण काय बिघडवलं कोणाच? आणि हरी. हरी तर आजून एवढाच आहे, त्याने कोणाचं काय बिघडवलंय? असं बोलून हरीच्या आईने बाबांच्या कुशीमध्ये आपली आसवे गाळली.

शाळा सुटली होती आपला मित्र का नाही शाळेत आला? म्हणून सगळे सरळ हरीला भेटायला त्याच्या घरी गेले.

काका हरी घरी आहे का ? तो शाळेत का नाही आला?

हो आहे ना आतमध्ये या.

काका हरी अजूनही झोपला आहे का? काय होतंय का त्याला...? रम्याने विचारलं

मला पहिलं सांगा दोन दिवसाअगोदर तुम्ही लोक कोठे गेलेलात ? त्या आंब्याच्या झाडावर वापस नव्हते ना गेले ?

हरीच्या बाबांचं असं प्रश्न विचारताच सर्वांची बोलती बंद झाली काय बोलावं काहीच समजत नव्हतं.

खरं खरं सांगा कुठे हुंदडायला गेलेले पाठून हरीच्या आईचा आवाज आला.

सगळेच अजून भितरले एकाचे सवाल कमी नाही होत तेच दुसरं संकट त्यांच्यावर आलं. आत्ता तर त्यांना खर सांगणं भाग होत.

हो काकी रम्या घाबरत घाबरत बोलत होता, तोच गोट्याने त्याच बोलणं मधीच अडकवलं आणि म्हणाला म्हणजे आम्ही नव्हतो गेलो हरी एकटाच भर दुपारी तिकडे आंबे जमवायला गेलेला, पण तो आंबे न घेताच शाळेत परत आला. खूप घाबरलेला त्याच संपूर्ण अंग घामानं भरलेलं हातपाय थरथर कापत होते.आम्हाला वाटलं तो आंबे मालकाला घाबरला असेल म्हणून.

मधेच गोट्याच बोलणं कापत श्याम बोलला, त्या दिवशी आम्ही विचारलं त्याला आणि त्याने जे आम्हाला सांगितलं तेव्हा पासून आम्ही सगळे एकसाथ असतो, कुठे जातच नाही.

काय बघितलं त्याने? ..आई आश्चर्याचा भावात बघत म्हणाली.

काकी तो म्हणाला कि त्याने एक भयानक किळसवाणी आकृती त्या आंब्यावर पहिली. ज्याचं लालसर डोळे त्यामध्ये पांढर बिबुल आणि त्यात काळा ठिपका बाहेर आलेला, आर्धी मान तुटलेली आणि मोठे मोठे हात. त्याच्या शरीरावरची सडकी चांबडी लोळत होती.खिल्यासारखं दोन दात वाढलेले. हे सगळं सांगताना श्यामला एवढा घाम आलेला कि पूर्ण भिजलेला तो, त्याचे ओठ थरथर कापत होते.

हो काकी आणि त्याने जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हाच आम्ही खूप घाबरलेलो रम्या म्हणाला..

आणि हो त्यादिवशी जेव्हा रव्या आजारी पडलेला तेव्हा माझी आजी बोलत होती कि हे आपलाच कर्म आहे जे भूतकाळात घडून गेलं आणि ते आता भोगायला येतंय. पण ह्यांच्याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हतं त्यामुळे आम्हाला काही समजलं नाही.

हे ऐकताच हरीच्या बाबांचे हावभाव बदलेले, त्याने आपल्या कर्माला हात लावला आणि आता त्याला पक्के जाणवले तो परत आला जसे कि त्याने म्हणले होते. तेव्हाच आकाशात ढग गडगडले अचानक बाहेर विजेचा प्रवाह सुरु झाला संध्याकाळचे सहा वाजून गेलेलं आणि अचानक झालेल्या हालचालींनी सगळेच घाबरले. घराचे खिडक्या मागे पुढे होऊ लागल्या घरावर काळ्या ढगांनी घेरले होते, त्यातच अचानक हि हि हा हा. ........हा हसण्याचा आवाज आला आणि त्या आवाजात सगळेच घाबरलेत.

हे काय होतंय ? हरीची आई उद्गारली...

क्रमशः