बाबानी कधीच ओळखलेले, तो आलाय! त्यामुळे तिला शु करून मुलांना एकसाथ जमवले. आणि आणि तो आवाज आला.
"जयासाठी मी सरली इतकी वरीस,
आला तो दिवस नजदिक,
करुनि अंत तुझ्या मुलाचा
जसे घेतले वचन मरताना
तेच पूर्ण करावाया आलो मी परतून.."
हिईईई हिहीई......हा ............हा...आसा हसण्याचा आवाज सुरु झाला आणि क्षणातच बंद झाला.
बाहेरील वातावरण शांत झालेलं. कदाचित तो तिथे त्याची आलेली चाहूल सांगायलाच आलेला.
सगळे भीतीने गार झालेले. कुणाची हिम्मत होत नव्हती पुढे व्हायची.
आहो कोण आहे हा ? आणि हे काय प्रकरण आहे? आणि त्याचा माझ्या मुलाशी काय संबंध ? ती ढसाढसा रडायला लागलेली. तिच्या प्रमाणे तिथे असेलेल्या हरीच्या मित्रांना पण तेच प्रश्न पडत होते. मात्र त्या प्रश्नांच उत्तर ज्याच्याकडून अपेक्षित होत, तो मात्र चिडीचूप झालेला. न कळत झालेल्या ह्या आघातातून हरीचे बाबा अजूनही बाहेर आले नव्हते.
आई......आई ....हरीला शुद्ध यायला लागली. हरीची आई लगेचच हरीच्या बाजूला आली. बाळा बोल काय पाहिजे ?
पाणी....पाणी गोट्या जा पाणी घेऊन ये बोलून हरीचे बाबा बाहेर फोने वर बोलत बाहेर गेले.
हॅलो मंगेश मी सुरेश बोलतोय, कशी तब्बेत आहे तुझी ? विचारपूस झाल्यानंतर हरीचे बाबा म्हणजेच सुरेश थेट त्यांच्या मुद्द्यावर गेले. आणि मंगेशला म्हणजेच रव्याच्या बाबांना म्हणाले, अरे मला तुला भेटायचं आहे आणि त्यासाठी तुला आणि वहिनीला गावी यायला लागेल.
सुरेश तुला माहिती आहे मी त्या गावात पुन्हा कधीच पाय टाकणार नाय म्हणून. त्या गावाने माझा मुलगा.........बोलता बोलता मंगेशच्या डोळ्यातून पाणी आले.
अरे मी समजू शकतो तुझी अवस्था पण ! सुरेश मधेच थांबला आणि त्याला गहिवरून आले. सुरेशचं असं फोनवर अडखन आणि हुंदकन मंगेश ने हेरलं. लगेच त्याला विचारलं काय झालं सुरेश ? तू का रडत आहेस.? काही समस्या आले का ?
सुरेश ने आदल्या दिवशी झालेला सगला प्रसंग मंगेशला सांगितला. सगळं प्रकरण समजून घेऊन मंगेशने होकारार्थी गावाला येण्यासाठी सुरेशला हो म्हटलं. आणि फोने ठेऊन दिला.
आपल्याला गावाला जायचं आहे. पटकन निघायला लागेल मंगेशने आपल्या पत्नीला सांगितले . का? आणि कशासाठी? तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मी त्या गावात वापस नाही जाऊ शकणार. तिथे गेल्यावर माझा जीव गुदमरल्यागत होईल रव्याच्या आठवणीमध्ये ........रव्याची आई मुळूमुळू रडू लागली.
आपल्याला हरीसाठी वापस जायचं आहे. सुरेश च्या मुलाचा जीव धोक्यात आहे ? काय? आणि कुणापासून ? रव्याची आई चमकली तिने त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि मंगेश ने होकारार्थी मान हलवली आणि रव्याच्या आईने कपाळावर हात ठेवला.
पण हरीच का ? रव्याच्या आईला सुद्धा तोच प्रश्न पडला जो हरीच्या आईला पडलेला, माझाच मुलगा का? कारण एकच होता आणि उत्तरही होती.आणि ती आत्ता सांगायची वेळ आलेली. मी तुला गावात गेल्यावर सगळं सविस्तर सांगेल. आत्ता आपल्याला लवकरात लवकर निघायला लागेल.
हरीच्या अंगावर कशाने तरी ओरबाडले होते. एखाद्या मोठ्या नखाने त्याला ओरबाडले होते आणि मध्ये मध्ये दातांचेही निशाणे होती त्यामुळे हरीचे शरीर रक्ताने माखलेलं कुणाच्या तरी हातामध्ये उलट टांगलेले आणि त्याच तोंड एखाद्या कुवतीप्रमाणे वाकडे होती, मांस लोंबकळलेले, लाल खोल डोळे, पांढरे बिबुल बाहेर आलेले, अर्धी मान तुटलेली, हातापायाचे मांस गळत होते, त्यातून रक्ताचा सडा वाहत होता. ती विचित्र किळसवाणी आकृती रात्रीच्या अंधाऱ्यामध्ये चंद्राच्या उजेडात खूप भयंकर दिसत होती. ती त्याच घराच्या टोकावर बसलेली आणि जोरजोरात किंखलात होती, माझा बदला पूर्ण होणार. माझा बदला पूर्ण होणार. हिईईईईईईईई हिईईईईईईईई.
आईईईईईईई जोरात किंचाळून रम्या झोपेतून उठला. त्याच पूर्ण शरीर घामाने माखलेले, हात ओठ थर थर कापत होत. आई लागलीच रम्याच्या जवळ आली काय झाला बाळा एवढा का घाबरला आहेस? आणि हे काय किती थरथरतोय वाईट स्वप्न बघितलं का ?
क्रमशः