आई आई तो वापस आला. त तो तो हरीला घेऊन जायला आलाय. कोण तो? आणि काय स्वप्न बघितलंस ? रम्याच्या आईने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. तोच जो काळ हरीच्या घराच्या वरून जोर जोरात काहीतरी बडबडत होता. किहळत होता. काय? म्हणजे! आईला तो काय बोलतोय काय समजलं नाही. आई काल हरीच्या घरी शाळा सुटल्यानंतर गेलो होतो. आणि काही तासानंतर संध्याकाळी कोणी तरी त्यांच्या घरावर येऊन जोर जोरात ओरडत होता बाहेर जोरात वारा सुटलेला, त्यामुळे आम्ही सगळेच घरामध्ये गेलेलो , तो जे काही बोलत होता ते त्याच्या राहिलेल्या बदल्याबद्दल बोलत होता. रम्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलेले. तिने लगेच त्याला विचारले म्हणजे तू पण तिथे होता. गावात पण काहीतरी कुजबुज चालू आहे पण त्यांनी असं काही पहिला नाही तिकडे. तू जे बोलतोय ते नक्की खर आहे ना? हो आई पाहिजेतर श्याम आणि गोट्यालाही विचार ते सुद्धा तिथेच होते. मला आत्ता तेच स्वप्न पडलेले पण खूप विचित्र होत.
विचित्र म्हणजे? काय बघितलंस तू नक्की ? तीच आकृती जशी हरीने पाहिलेल त्या नदीपल्याड, म्हणजे त्याने सांगितल्याप्रमाणे सगळं मिळतंजुळतं होत. लाल खोलवर गेलेले डोळे, बाहेर आलेले पांढरे बिबुल, लोंबक मांस फाटलेला जबडा तुटलेली मान हे सांगताना अक्षरशः रम्या घाबरून गेलेला. त्याला सतत घाम फुटत होता आणि हे सगळं आपल्या मुलाच्या तोंडून ऐकताना त्याच्या आईच भानच हरपलेले. बाजूला ठेवलेलं पाणी रम्याला दिल. एका घोटात संपवलं आणि परत सुरु झाला. त्याने हरीला त्याच्या हातात उलट पकडलेले त्याच्या हाताचे मांस गलत होत आणि हरीच्या पूर्ण शरीरावर नख्यांचा ओरबाडा होता काही जागांवर दातांनी चावून काढलेले आणि त्यातच तो त्याच्या बदल्या बद्दल बोलत होता.
रम्याची आई पूर्ण गांगरून निघालेली. तिला आत्ता तिच्याच मुलाची काळजी वाटू लागली. आईने पाठीमागे पाहिलं तर आजी सगळं ऐकत होती. आणि तीपण विचारात पडलेली आता ह्या मुलांना कोण वाचवणार? ह्यांचा कोण वैरी होता तो ह्यांना आत्ता ह्या प्रकारे त्रास देतोय? ह्यांचा कोण वाली ह्यांच्या मदतीला येणार आहे? आजी पुढे पुढे चालत रम्याच्या बाजूला आली रम्याच्या डोक्यावर हात ठेऊन त्याला समजावू लागली. सगळं ठीक होईल पोरा, तू घाबरू नको. आई पण हा कोण आहे जो आपल्या मुलांच्या जीवावर उठलाय? काय संबंध आपला? आपला काही संबंध नसला तरी हरीचा आहे. म्हणूंन तो त्याच्या जीवावर उठलाय. अगोदर त्या रम्याला गिळलं त्या थेरड्याने. आत्ता ह्या गरीबाच्या मागे लागलाय त्याचा बदला तो पूर्ण केल्याशिवाय तो राहणार नाय. आई कसला बदला काय केलेलं त्याने? ते सगळं तुला समजेल आपल्याला पहिलं सुरेशकडे जायला हवं चल आवर पटकन. ठीक आहे आई रम्या तू इथेच थांब. बाबा आहेत घरी आणि घाबरू नको आम्ही आलोच.
त्या वाईट शक्तीने जरी हरीच्या घरावर घेराव घातला असला, तरी तो हरीला स्पर्श सुद्धा करू शकत नव्हता आणि त्याच संतापात ती आकृती त्वेषाने फुत्कारायची. हरीला सतत त्याच्या आजूबाजूला कोणतीतरी शक्ती त्याची रक्षा करते असं वारंवार वाटायचं त्यामुळे त्याच्या अंगात एकदम ताकत उफाळून यायची. हरी जरी अंथरुणावर खिळून असला तरी त्याला अशक्तपणा जाणवत नव्हता.
संध्याकाळी पाच च्या नंतर गावात एक गाडी येऊन ठेपली. बसथांबाच्या आजूबाजूला असलेले मुलांची आणि काही मोठ्या माणसांची नजर त्या गाडीवर गेली. सर्वांच्या डोक्यात एकच प्रश्न होता आणि सगळे विचारात्मक नजरेने गाडीच्या दिशेनं आपल्या नजरा रोखून पाहत होते. गाडीतून दोन ३०-३५ वयाचे गृहस्थ उतरले एक पुरुष आणि एक स्त्री होती. त्यांना पाहून सगळेच त्यांच्याकडे पाहत राहिले. सगळे कुजबुज करत होते, आत्ता कशासाठी हे इथे आले आहेत? आत्ता कोण राहिलंय इथे ह्यांच्यासाठी? अरे गंप्या तू ह्यांच्या शेतावर चोरून तुझी शेती करतो हे तर माहिती नाही ना झालं ह्यांना? त्यासाठी त्यातला त्यांचा हिस्सा मागायला तर नाही आले ना ? बघ बाबा तू मेहनतीनं केलेले शेती अर्धी ह्यांच्या घशात घालायला लागेल. तर दुसरं कोणी बोलत होत मुलाच्या राहिलेल्या आठवणी घेऊन जायला आले असतील. बिचार्यांना एकुलता एक मुलगा होता आणि तोही काळाने ह्यांच्याकडून हिरावून घेतला. काय नशीब असत ना प्रत्येकाचं? कुणाला मूल होत नाही त्यामुळे ते देवाला दोष देत त्याला कोसत असतात, कुणा दाम्पत्याला मुलं होऊन सुद्धा त्याची त्यांना प्रचिती येत नाही, त्यामुळे ते त्यांना कुठल्या अनाथाश्रमात नेहून टाकतात,आणि कोणाला मुलं होत नाही म्हणून दत्तक घेतात पण तेही त्यांच्या नशिबी नसत ते असे सोडून जातात.
क्रमशः