Rang he nave nave - 12 books and stories free download online pdf in Marathi

रंग हे नवे नवे - भाग-12

खर तर तिला त्याला काहीतरी वेगळंच बोलायचं होत पण ती काय बोलत होती हे तीच तिला ही कळत नव्हतं. मैथिली च अस बोलणं ऐकून इतक्या वेळ शांत असलेल्या विहान च डोकच सरकल ! त्याने तिच्या दंडाला पकडले आणि तिला जवळ ओढलं 'मैथिली काय अर्थ लावायचा मी तुझ्या अश्या वागण्याचा', 'काय चुकी केली मी तुला बोलून' 'आणि तुला मी नाही आवडत मग का आली माझ्या सोबत इथपर्यंत', 'मी बोलवलं तेव्हा तू हजर असायची', 'मला राग आला की काढण्यासाठी किती प्रयत्न करायची!'का ? मैथिली का? 'ह्या सगळ्या वागण्याचा काय अर्थ होता?', विहान खूप चिडून बोलत होता. 'विहान माझा हात सोड दुखतोय!' मैथिली त्याला म्हणाली. 'ऐ, आता मला नाही फरक पडत!' 'मी प्रत्येक वेळेस तुझा विचार केला' 'मैथिलाला काय वाटेल!' आणि तू काय म्हणतयेस मला वाटलं नाही तुझ्या डोक्यात अस काही असेल ?'मग सारख माझ्या मध्ये हरवून जाण,' 'आणि मला इतकं जवळ का येऊ दिलं?'' तेव्हा च का नाही बोलली,'' माझ्या सध्या flirting वर सुद्धा लाजयचीच मैथिली तू!''मग ते सगळं उगाच?' मी दुसरी मुलगी बघितली म्हंटल की चेहरा कसा झाला होता तुझा ! ती जेलसी,ते सगळं काय होत मैथिली? 'बोल ना दे माझ्या प्रश्नांची उत्तरे'. 'हे बघ विहान मी काही विचार केला नाही आणि हे तुझं अस वागणं अगदी अनपेक्षित आहे माझ्या साठी माझ्या कडे नाही आहे तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे किंवा तू असही म्हणू शकतो मी बांधील नाही आहे तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी!' 'spare me!' आणि विहान ने तिचा हात सोडला 'जा', 'आणि लवकर जा','मला एक क्षणही तुला पाहण्याची इच्छा नाही आहे!' 'तुला समजून घेण्यात मीच चुकलो'.मैथिली ही त्याला उत्तर न देताच तिथून निघून गेली. विहान च्या डोक्यात बराच राग होता तिच्या बद्दल तो तिथेच बसला. 'मला वाटलं नव्हतं मैथिली अशी वागेल''काय समजलं होत मी तिला आणि काय निघाली.' 'का विचार करतोय मी तिचा?' आज पासून आयुष्याच्या कॅनव्हास वरून मैथिली हे नाव कायमच खोडुन टाकणार! तो मनातच विचार करत होता.
'हॅलो आदु कुठे आहेस तू ?''मला तुला भेटायचं आहे आता च्या आता!'मैथिली ने आदिती ला फोन लावला. 'अग मैथिली काय झालं?'' is everyting ok?' 'are you fine!?' 'आणि मी घरीच आहे ये तू', आदिती म्हणाली.'मी घरी नाही येणार तूच बाहेर ये!' मैथिली म्हणाली. 'ok कुठे आहेस तू मला address मेसेज कर मी लगेच पोहचते!'आदिती म्हणाली.दुष्यंत एक मला आता मैथिली चा फोन आला होता मी तिला भेटायला चालली आहे. 'नक्कीच काही तरी झालं खूप डिस्टर्ब वाटत होती मैथिली''आणि अस अचानक भेटायला बोलवलं नक्कीच काहीतरी झालं असणार!' 'अग साहजिक आहे तीच डिस्टर्ब होणं परवा विहान जातोय म्हंटल्यावर त्रास तर होणारच', दुष्यंत म्हणाला. 'हो तेही आहे', 'पण मैथिली अस बाहेर भेट लगेचच ये अस कधी बोलत नाही रे!',अदिती म्हणाली. 'तू जा तिला भेटून ये', 'मी ही विहान शी बोलून बघतो सगळं नीट आहे ना!, दुष्यंत म्हणाला. 'okk then ,मी निघते बाय' अस म्हणून आदिती निघाली.
hii, मैथिली काय झालं इतकं अर्जंट का बोलावलं? इतक्या वेळ शांत असलेल्या मैथिलीचा अदितीला पाहून बांध फुटला. आणि ती रडायला च लागली. 'मैथिली काय झालं?' आणि तू चक्क रडतीये!मैथिली तरीही काही बोलली नाही. 'अग बोल ना बाळा काय झालं ?'' मला कस कळेल तू बोललीच नाही तर?' आता आदीतीच टेन्शन वाढत होत.आदु''अग विहान च आणि माझं भांडण झाल'.मैथिली म्हणाली. 'काय पुन्हा!' अदितीने डोक्यालाच हात लावला. 'काय ग मैथिली, परवा जाणार आहे ना तो मग का भांडले ' आता तर सगळं नीट झालं होतं ना? 'हो पण त्याने मला एकदम लग्नासाठी च विचारलं' 'आणि मी नाही आहे ह्या गोष्टी साठी prepared मला नाही करायच लग्न !''आणि त्या रागात मी विहान ला बरच काही बोलून गेले तोही खूप चिडला आणि सगळंच संपल'. 'मला विहान ला नव्हतं ग अस काही बोलायचं पण निघून गेल','आणि त्याने नको का समजून घायला!' तो ही किती चिडला. मैथिली रडतच बोलली. 'तर अस झालं सगळं", 'बर मला एक सांग नाही करायचं ना लग्न, ठीक आहे ना''आणि तू विहान ला नाही पण म्हंटल', मग आता काय का एवढा त्रास होतोय ! 'संपल सगळं आता अभ्यासावर लक्ष दे', 'आणि असाही विहान चाललाच आहे', मग काय विषयच संपला! आदिती म्हणाली.'आदिती तू काय बोलतीये', 'मला त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टींचा'! मैथिली म्हणाली.' तेच का त्रास होतोय ?'कारण सांगू, 'तुलाही विहान तितकाच आवडतो पण तुला ते मान्य करायचं नाही आहे''आणि ह्याच गोष्टींमुळे तू विहान ला कायमच गमावणार आहे मैथिली'. मान्य आहे मला तुला अभ्यासच टेन्शन आहे. ठीक आहे ना तो तुला सगळं सोडून त्याच्याशी लग्न कर अस तर अजिबात म्हणत नाही आहे. हवा तेवढा वेळ देतोय आणि मुळात त्याच काय चुकलं किती समजून घ्यायच त्याने तुला तुझा मूड असला तर तू त्याचे फोन उचलणार नाहीतर बोलणं बंद तरीही तो च सगळं बाजूला ठेवून बोलतो तुला पण तुझं आपलं एकच, आणि मैथिली, 'एक लक्षात ठेव आज ना उद्या तू कितीही नाही म्हणाली तरीही लग्न हे करावंच लागणार आहे', 'मग कोणाशीही करण्यापेक्षा विहान काय वाईट आहे' 'तुम्ही इतके चांगले ओळखता दोघांची आवडही एकच आहे तुला प्रत्येक गोष्टीतsupport च करणार तो मैथिली!' आदिती म्हणाली. आता मैथिली कडे बोलायला काहीही नव्हतं कारण आदिती जे बोलत होती ते शब्द नि शब्द खर होत. तिला तिची चूक कळाली होती. 'आदु चुकलंच ग माझं मी नव्हतं बोलायला पाहिजे असं,' 'पण आता पश्चाताप करूनही काही फायदा नाही', तो खूप दुखावला गेला आहे 'तो नाही ऐकणार ह्यावेळेस! मी माझ्या मूर्खपणा मुळे गमावून बसले विहान ला!' आणि परत तिच्या डोळ्यांत पाणी आलं. 'नाही मैथिली अस काहीही नाही आहे, तू एकदा जा त्याच्या कडे बोल त्याला ऐकेल तो'.'कर फोन कर',आदिती म्हणाली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED