अपूर्ण बदला ( भाग २० ) - Last Part Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग २० ) - Last Part

इकडे सुरेश आणि मंगेश घायाळ झालेले त्यांना काही सुचत नव्हते. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता, तोच मंगेशची बायको म्हणाली तेव्हा गुरुजींनी सांगितलेले याचा सामना फक्त आणि फक्त एक चांगली आत्मा करेल यासाठी आपल्याला त्या गुरुजींना वापस आणावे लागले. पण तेवढा वेळ नव्हता ह्यांच्याकडे. त्यांनी देवाला गाराने घातले सगळ्यांनी हात जोडून देवाचा धावा करत होते. हरी आणि त्याचे मित्र डोळ्यातील आसवे पुसत देवाचा धावा करू लागले. रम्याची आजीने तर सगळं देवावरच कुरबाण केलं. देवा सांभाळ रे ह्या पोरांना. आता तूच काय करशील ते. असं बोलत सगळ्यांनी देवाला डोळे मिटून हाका मारू लागले. सगळीकडे वारे सुरु झालेले हवामानात बदल झालेला घरांमधून भांडी कोसळण्याचा आवाज येऊ लागले. जमीन हादरू लागली. तोच सुरेशच्या घरातून खूप सारा प्रकाश बाहेर पडला आणि त्यातून निघाली एक तृप्त मनाची आत्मा.सगळ्यांची तिकडे नजर गेली. काय झाले कुणाला काही समजत नव्हते ?डोळ्यावर प्रकाश येऊन त्यांचे डोळे दिपू लागलं आणि सगळ्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर आला. रव्या! मंगेश आणि सुमतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि नकळत रव्याच्या डोळ्यातूनही आसवे गळू लागली. मरताना त्याने त्याच्या आईबाबांना बघितले सुद्धा नव्हते. तिथे सगळे रडू लागले पण हि वेळ रडण्याची नव्हती लढण्याची होती. रव्याची आत्मा जागेवरून गायब झाली.आणि सगळे त्या आंब्याच्या दिशेने पळू लागले .

ज्यांनी गांवाबाहेरची वेष ओलांडली होती त्यांची त्या सैतानाने भयानक हत्या केली. त्याच त्वेषात गावकरांनी हातातल्या मशाली त्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने फेकल्या. आंब्याच्या झाडाने पेट घ्यायला सुरुवात केली. आणि बघता बघता आगीचं रूपांतर एक रौद्र रूपात झालं. त्या आगीच्या उजेडात संपूर्ण गाव न्याहाळू शकत होता.आता मात्र सैतान चवताला त्याच्या जागेवर हल्ला चढवलेला. त्या सैतानाला त्या माणसांमध्ये त्याची शिकार दिसली. त्याला सुरेशचा पोरगा हरी दिसला. तो चवताळला जोर जोर जोरात हसू लागला. त्याने हरी वर झेप घेतली पण अचानक त्याच्यावर कुणाचं तरी नियंत्रण असल्या सारखं वाटू लागलं. त्यासाठी त्याने मागे पाहिलं आणि त्या पिवळ्या उजेडात वेगळाच प्रकाश उमजू लागला आणि त्या प्रकाशातून एक हात ज्याने त्या सैतानाला पकडला होता तो दिसू लागला हळू हळू त्याच्या समोर उंच च्या उंच अशी रव्याची पवित्र आत्मा दिसली आणि त्या प्रकाशात त्याच्या शरीरावर आगीसारखे चटके बसू लागले. रव्याच्या असा अवतार बघून सगळी लोके पाहताच राहिलीत. आणि सगळ्याने त्याला हात जोडून नमन केले तोच होता खरा गावाचा कैवारी. त्याच क्षणात रव्याने त्या सैतानाला आपल्या सोबत त्या आंब्याच्या भल्यामोठ्याअग्नीत घेऊन गेला. सैतान जोर जोरात चौतालायला लागला, ओरडू लागला मात्र त्याला एका पवित्र आत्म्याने घट्ट पकडले असल्याने त्याची सुटका नव्हती आणि तो त्या आगीत संपूर्ण खाक झाला.

रव्याने आपल्या मित्राचे प्राण वाचवले होते आणि त्याची आत्माही आता मुक्त झाली होती. त्याने मरताना आपला आईवडलांना बघितले नव्हते, त्यामुळे तो घुटमळत होता, पण आता ते पूर्ण झालं होत. आणि तो आत्ता खार अग्नीत विलीन झाला होता.

सुमतीने तर तिचे गुढगेच टेकले या आणि ढसाढसा रडू लागली सगळा गावच त्याच्यासाठी रडू लागला. पन खऱ्या अर्थाने तो मुक्त झाला आणि त्यांच्यामुळं मंगेशला बरं वाटलं.


************************ समाप्त :-) ****************************

"हि कथा पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्ती, स्थळ वा घटकांशी संबंध नाही . आणि जर आढळ्यास तो पूर्णतः योगायोग समजावा . हि कथा निखळ मनोरंजनासाठी आणि काही सामाजिक संदेश देण्यासाठी असून त्यातून कोणतीही अंधश्रद्धा वा भीती पसरवण्याचा लेखकाचा हेतू नाही .माझ्या परवानगीशिवाय माझी कथा कोणीही कोठेही वापरू नये.

जर तुम्हाला माझी काल्पनिक रित्या जोडलेली कहाणी आवडली असेल तर टिपणी द्यायला विसरू नका जर तुम्ही टिपणी केली तर माझा पुढच्या स्टोरी लिहनीसाठी अजून उत्साह वाढेल.

जर माझी काल्पनिक कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या whatsapp,facebook,अजून कोणतेही साधन असेल तिथे शेअर करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबतही शेअर करायला विसरू नका.

****

©Dipak Ringe