निनावी नात Vanita Bhogil द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निनावी नात

#@निनावी नात@#
अलीशान मांडव वाडयाच्या दाराशी सजला होता,
सनई चौघडे मंद स्वरात वाजत होते,
दारावर हार तोरण लावली जात होती.
सगळीकडे घाई गडबड चालू होती,
आहेर चढ़वायचे चालू होते.
पै पाहुणे काही आले होते, काही येत होते,
मांडवा समोरचा रोडवर मोठ मोठ्या गाड्यानी गर्दी केली होती.
वरबाप सगळ्यांची सरबराई करण्यात मग्न होते,
लग्नाची तयारी जोरात सुरु होती,
मोठ्या गाडितुन पांढऱ्या कडक खादी कपडयातले पुढारी येत होते,
फटाकयांच्या लडीने अख्खा आसपासचा परिसर दनानत होता...
मंडपातील स्टेज ला गुलाबाणी सुशोभित केल होत,,
कारंज्यामधुन रंगीबेरंगी फवारे उड़त होते,
सगळीकडे लखलखाट होता...
अहो कारणच तस होत, एका मोठ्या नेत्याच्या मुलीच लग्न होत......एकुलती एक मुलगी लाडकी, म्हणजे तिचा शब्द घरात अमान्य होण शक्यच नाही,
अशी ती स्वरूपा नावाप्रमाणेच सुस्वरूप होती.
तिचच आज लग्न होत,
मुलाकडील मंडळी पण भरपूर नावजलेली होती, मुलगाही देखनाच.
थोड्याच वेळात नवरदेव घोड्यावरुन येताना दिसला,
मस्त रुबाबदार,म्हणूनतर स्वरूपाची पहिली पसंती होती त्याला,एकाच कॉलेज मधे होते दोघे घरचे पण सगळे चांगलेच होते म्हणून सगळ जुळवुन आल होत.
नवरदेवासमोर पंचविशितला तरुण अगदी बेभान होऊन नाचत होता, कसलिच शुद्ध नव्हती त्याला.
धुमधडाक्यात लग्न पार पडल,
मोठ्या घरच लग्न म्हणजे थाटामाटाला कमीच नाही.
पाहुणे मानपान घेऊन निघाले, थोड्याच वेळात नवरीची पाठवनी होणार होती...
अलीशान गाड़ी गुलाबानी सजवली होती,
नवरदेव,नवरी गाडीत बसले, हळू हळू गाड़ी मंडपाच्या गेट वर आली..
सगळेच आनंदाश्रु नी स्वरूपाची पाठवनी करत होते.
सगळ्यांना निरोप देऊन गाडी निघाली.
सगळे परत फिरले,
घरचे सगळेच आनंदात होते,
घरी सगळ शांत वाटत होत,
नवरीला पाठवनी करून तासभर झाले असतील तोवर फोन वाजला, नोकराने फ़ोन उचला,
पण कानाला लावून तसाच उभा होता, काही बोलेना म्हणून स्वरूपाच्या बाबा नी फ़ोन घेतला..
समोरून अनोळखी व्यक्ति बोलत होती,
तुमच्या लग्नाच्या गाडीला अपघात झाला आहे, तुम्ही ताबड़तोब हॉस्पिटल ला या......
काही कळायच्या आत फ़ोन कट झाला.
स्वरूपाचे बाबा भानावर आले, गाड़ी काढा रे म्हणून घाईतच गाडीत बसले मगोमाग अहो काय झाल म्हणत आईपन गाडीत बसली..
गाडी हॉस्पिटल च्या दिशेने घ्यायला सांगितली..
थोड्याच वेळात हॉस्पिटल ला पोहचले,

स्वरूपा बेशुद्ध होती, हॉस्पिटल मधे सांगण्यात आले, दोन जण अपघातात गेले...
स्वरूपाचे आई बाबा तिकडेच अंगात त्राण नसल्यासारखे बसले,
नवरदेवाकडचे तोपर्यंत सगळे पोहचले.
डॉक्टर नी त्याना सांगितले नवरा मुलगा आणी ड्राइव्हर अपघातात जागिच गेले..
कुणाला काहीच सूचत नव्हते....
दोन्ही मयत घरच्यांच्या स्वाधीन केले, तस घरच्यानी एकच आक्रोश केला,
मुलाच्या आईन सगळा आरोप स्वरूपावर लावला, तुमची स्वरूपा अपशकुनी म्हणून आमच्या मुलाचा घात झाला, तिला आता आमच्या घरी जागा नाही.
स्वरूपाच्या आई बाबा नी खुप समजवल पण कुणी ऐकण्या च्या मनस्तिथित नव्हते,
स्वरूपाला दोन दिवसात डिस्चार्ज मिळाला,
आईनी विश्वासात घेऊन सगळ सांगितले,
आभाळ कोसळयासारखे स्वरूपा रडू लागली.
ज्या मुलाशी लग्न केले होते त्याच्याशिवाय तिने दुसऱ्या कुणाचा विचार कधी केला नव्हत...
आई वडिलांना तर तिच्या आयुष्यातला अंधार समोर दिसत होता...
थोड्या दिवसात स्वरूपाचे मामा तिला घ्यायला आले,
गावी घेऊन गेल्यावर तिला थोड बर वाटेल म्हणून..
कॉलेज मधे असताना पण स्वरूपा मामा कड़े सुट्टीत जात असे, तिला गावकडच सगळ खुप आवडायच..
म्हणून तीला मामा घ्यायला आले.त्याच गावात लग्ना अगोदर सुट्टीत स्वरूपा बऱ्याच दिवसासाठी गेली होती...
गाव होतच तस, म्हणजे अगदी रमणीय ठिकाण.मामा पण राजकारणी होता,घराना सुशिक्षित,
तेव्हा स्वरूपा गावी फिरायला गेली होती मामा कड़े,
मामाकडे एक तरुण यायचा,कुणाच्या गावात काहिपण समस्या असल्या की मामा च्या मदतीने त्या सोडवत असे.
येण्या मुळे स्वरूपा आणी त्या तरुणाची चांगली ओळख झाली..
"सारंग" सारंग त्याचे नाव होते, त्याचे वडील बऱ्याच वर्षापुर्वी वारले होते, आई आणी तो असे दोघेच,
वय पंचवीस, रंगान सावळा,
घरी चांगली बागायत जमीन होती, तो ही पदवीधर होता, पण समाज सेवेच वेड असल्यामुळे नोकरी कधी विचार केला नाही,
घरची शेती करायची, गावच्या समस्या सोडवायच्या, गावातील अडले नडले ची काम करून दयायची...
सगळया गावाचा तो लाडका होता, सारंग ला सगळे प्रेमाने रंगाच म्हणत.
स्वरूपाची रंगाशी ओळख झाली,
गावातील रम्य ठिकाण दाखवने, फेरफटका स्वरूपाचा रंगासोबतच होई..
मनान रंगा खुप चांगला होता,
स्वरूपा बऱ्याच दिवस होती गावी, त्यात दोघांची चांगली मैत्री झाली.
रंगा होतच एवढा चांगला की यांच्या मैत्रीवर कधी कुणी चुकीचा विचार सुद्धा करु शकत नव्हते.
..... दोघे जास्त वेळ सोबतच असायचे,
नदिवर, शेतावर स्वरूपा रंगासोबत जायची.
पवित्र मैत्री होती त्यांची.
पण नंतर रंगाला तिच्याबद्दल वेगळ काहीतरी वाटू लागल,
हे प्रेम तर नाही न?
रंगा स्वत:शिच वीचारु लागला.
अस होण शक्य नाही.
स्वरूपा शहरातील परी, मी तिच्या कोणत्याच अपेक्षेत बसणार नाही.
पण मन मानायला तयार नव्हत.
......एक दिवस सारंगने विचार केला..
बोलून बघू तिच्या काय मनात आहे ते तर समजेल..
दुसऱ्या दिवशी दोघे फिरत फिरत नदी किनारी गेले.
मनाला धीर देत रंगान विषय काढला.
स्वरूपा! तुझे प्रेम,लग्न याविषयी तुझ मत काय?
त्यावर स्वरूपा म्हणाली, का रे? तू कुणाच्या प्रेमात पडलास की काय?
अग तस नाही, सहजच विचारल.
त्यावर ति हसुन म्हणाली.
माझ्या स्वप्नातला राजकुमार मी निवडलाय,
शिकलेला, देखना समंजस खुप स्मार्ट आहे रे तो.
सारंग ला वाटले ति त्याच्या बददल बोलत असावी.
पन नंतर ति म्हणाली, आम्ही कॉलेज मधे सोबतच आहोत.
हे एकल्यावर सारंग ला काय बोलाव तेच कळेना.
डोळे डबडबुन आले,
तसाच परत फिरला, मागे स्वरूपा हाका देत होती, पण सगळ हरवल्या सारख तो निघाला होता....
त्यानंतर तो स्वरूपाला भेटलाच नाही.
स्वरूपाचे लग्न जमले तेव्हा खास मित्र म्हणून स्वरूपाने स्व:ता येऊन त्याला आमंत्रण दिले होते.
तो ही लग्नाला गेला, तोच जो नवरदेवा पुढे बेभान होऊन नाचत होता..
पण लग्न लागले तस तो निघुन आलेला,पुढे स्वरूपाच्या आयुष्यात काय झाले याची कल्पना सुद्धा नव्हती त्याला..
......
मामाकडे जाऊन राहीलिस तर विसरने शक्य नाही पण थोड बर वाटेल अस सगळेच म्हणत होते.
स्वरूपा मामा सोबत निघाली,
गावी गेल्यावर दुसऱ्या दिवशी सारंग मामा कड़े काम निमित्त आला.
त्याला स्वरूपा दिसली.
तू इथे कशी??
तुझ तर लग्न होऊन काहीच दिवस झालेत न मग??
ती काहीच बोलत नव्हती.
नंतर मामा ने सारंगला सगळी हकिगत सांगितली.
स्वरूपाच काय होऊन बसल हे...
रंगा खुप दुःखी झाला...
पण स्वरूपाला या दुःखातून बाहेर काढन गरजेचे आहे अस रंगा मामाला म्हणाला..
त्यावर मामा म्हणाले तू तिचा चांगला मित्र आहेस, आता तूच बघ काय करायच ते..
आता रंगा स्वरूपाला बाहेर घेऊन जाण्यासाठी रोज जाऊ लागला,
बाहेर पडलीस तर थोड मनाला बर वाटेल.... तो खुप समजवायचा...
कधी कधी ति निघायची कुठेतरी त्याच्यासोबत पण कुठेही गेल तरी झालेल्या अपघाताचाच विषय असायचा,
नवरया बद्दल भरभरून बोलायची....
त्याला विसरने शक्य नाही हे खुप वेळा बोलायची....
हिच्यासाठी काय करु म्हणजे हीच दुःख कमी होईल अस रंगा ला वाटे....
थोड्या दिवसात गावात चर्चा सुरु झाली,
लग्नाच्या दिवशीच नवरा मेला अपशकुनी मुलगी आहे.....
बरेच महीने ती गावी राहिली, बरच मन हलक झाल होत सारंगच्या सहवासात...
पण गावात काहीबाहि ऐकू येऊ लागल तिच्या बद्दल, तीन आईबाबा कड जाण्याचा निर्णय घेतला...
रंगान खुप समजावल नकोस जाऊ म्हणून पण तीं निघालीच....
ती गेल्यावर सारंग मामाकडे कधीतरी येऊ लागला, आला तरी बोलत नसे काही बोलायच झाल तर स्वरूपा बददल च असायच...
गावात पण उदास राहायचा...
त्याला एकच विचार असायचा, स्वरूपाच्या पुढच्या आयुष्याचा काय?
एक दिवस मामा कड़े स्वरूपाची चौकशी करत होता,
तेवढ्यात मामा म्हणाले, सारंग!!!! मी काही बोलो तर तुला राग नाही न येणार?
अस का विचारता मामा?
बोला न मला नाही येणार राग.
तुझी आणी स्वरूपाची खुप चांगली मैत्री आहे,
तू तीची किती काळजी करायचा हे मी स्व:ता पाहिलय,
तिच्यासाठी तू काहिपण करायला तयार असायचा..
पण तीच नशीब फुटक म्हणून तिच्या बाबतीत अस घडल..
पण मला वाटत तिला दुःखातून तूच बाहेर काढू शकतोस...
..मी?
मी काय करु शकतो मामा सांगा.
तीच दुःख कमी होणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे....
...
मामा....
लग्न करशील स्वरूपाशी????
अहो मामा... तुम्ही काय बोलता, तिच्या आयुष्यात काय घडल आहे आणि मी तिला लग्नाच बोलू...
तु तयार असशील तर मी तिच्या आई बाबाशी बोलतो.
ते नाही म्हणार नाहीत...
हो मामा ते सगळ ठीक आहे, मी तयार असलो तरी स्वरूपाची मानसिकता हवी न?
आपण तिला समजावु.
अक्ख आयुष्य असच कस काढेल ती.
सगळ्यानी समजवल तर ऐकेल ती.
बर तुम्ही म्हणाल तर बघू प्रयत्न करून.
सारंग तिथून निघाला,
घरी जाऊन आईला सगळ सांगीतल..
आई लग्नाला तयार नव्हती.
आई म्हणाली रंगा तू मला एकुलता एक आणी त्यात तू विधवेशी लग्न करणार हे मि नाही होऊ देणार....
मग सारंग ने आईला सांगितले मी स्वरूपावर अगोदर पासुनच प्रेम करतो, मग मी जिच्यावर प्रेम करतो तिच्याशी लग्न करण्यात काय चूक..
आणि राहिला तिच्या लग्नाचा प्रश्न पण आई अक्षदा पडल्याने कुणी अपवित्र किंवा अपशकुनी होत नाही न ???
आई ने पण विचार केला,
मुलाच्या प्रेमाखातर तयार झाली..
मामा आणी सारंग दोघी स्वरूपाच्या आईबाबा ना भेटले..
मामा ने सारंग बददल सगळ त्याना सांगीतल,
तो किती गुणी आहे,कर्तबगार आहे, आणी स्वरूपाला सुखी ठेवल हे सर्व मामानी सांगितले...
दोन दिवस विचार करून, ते लग्नाला तयार झाले...
पहिली घटना घडून जवळ जवळ वर्ष होत आलेल.
मग स्वरूपाला विश्वासात घेऊन लग्नासाठी विषय काढला..
ति खुप चिडली, मग खुप सगळ्यानी तिला समजवल..
स्वरूपा लग्नाला तयार झाली,लग्ना अगोदर तिने सारंगला भेटायला बोलावले,
तो लगेच आला,, तिने सारंगला लग्नाला तयार असल्याचे सांगितले...
सारंग चा आनंद गगनात मावेना...
पण तिने त्याला अट घातली..
मी लग्न तुझ्याशी करते पण माझ प्रेम होत त्याला मी विसरु शकत नाही,
मी जीव असेपर्यंत त्याचीच असेन...
तुला अट मान्य असेल तर माझ्याशी लग्न कर नाहीतर माझा विचार सोडून दे..........
..... सारंग थोडा वेळ विचार करतो, काहीही असो पण माझ प्रेम तर आयुष्य भर माझ्यासोबत राहिल.
तो स्वरूपाची अट मान्य आहे म्हणून सांगतो...ति त्यांच्याकडून तस वचन घेते,, तोहि तिच्यासाठी वचन देऊन तयार होतो...
दोन्हीकडचे चार पै पाहुणे बोलावून मंदिरात लग्न होते..
स्वरूपाला घेऊन सारंग गावी येतो..
नवी नवरी म्हणून आई सगळे रीति रिवाज करते..
सगळ आनंदित असत.
स्वरूपापन गावच्या वातावरणात मिसळून जाते.
पण दोघे ही दिल, घेतलेल वचन पाळत असतात...
महीने जातात मग आजुबाजुला कुजबुज चालू होते, सारंग ला जोडीची मूल चिडवू लागतात, गूडन्यूज़ कधी देणार म्हणून.
घरी आईपन सारखा विषय काढू लागते.
सगळ्यांना काय उत्तर दयावे हे सारंगला कळत नाही.
एक दिवस आई सारंग ला म्हणते, तालुक्याला दोघे जा मोठ्या डॉक्टर ला भेटून तपासणी करून या.
काय करावे काहीच कळत नव्हते.
दोघे घरातून निघाले, काय करावे याच विचारातच दिवस तालुक्यात घालवला...
आईला तरी ख़र सांगव म्हणून परत फिरले दोघे..
,, घरी आल्यावर आईन विचारले, काय म्हणाले डॉक्टर?
अस काहीच सांगीतल नाही अस बोलून स्वरूपा आत निघुन गेली..
काहीतरी वेगळच कारण आहे हे आईच्या लक्षात आल होत.
तिने सारंगला विचारल, तस तो म्हणाला आई काय घाई आहे होईल की नंतर..
आईनी सारंगचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला, म्हणाली माझी शपथ घेउन सांग, काय प्रकार आहे तो...
दूसरा पर्याय शिल्लक नव्हता सारंग कड़े..
त्याने स्वरूपाला दिलेल्या वचनाबद्दल सर्व सांगितले, आईला ऐकून धक्का बसला, आई जमिनीवर कोसळली, आईला शब्द बोलवत नव्हता, तेवढ्यातुन पण आई म्हणाली अस राहिल तर रंगा लोक तुला नपुंसक म्हणतिल...
आईला श्वास घेता येत नव्हता, स्वरूपा पानी घेऊन धावत आली, आई बेशुद्ध पडली होती,
सारंगने उचलून आईला गाडित ठेवल सोबत स्वरूपा होतीच हॉस्पिटल ला नेले.
पण काहीच उपयोग झाला नाही, आईचा हृदय विकारच्या धकयान मृत्यु झाल्याचा डॉक्टर नी सांगितले.
सारंग वर आभाळ कोसळल,, आईचा अंत्यविधि झाला,, पण जाताना आई बोललेल लक्षात होत,
तुला लोक नपुंसक म्हणतिल...
आणी सारंग आता स्वरूपाच्या प्रेमापायी कुणी विचारले असता नपुंसक असल्याचा सांगतो.....
स्वरूपाला एखाद्या परी प्रमाणे जपतो...
जगात नसलेल्या प्रेमाची ति स्वप्न पाहते, आणी समोर असणाऱ्या खऱ्या प्रेमाच्या स्वप्नात तो गुंग असतो,........
@सौ.वनिता स.भोगील@