Vayvarsh fakt saath books and stories free download online pdf in Marathi

वयवर्ष फक्त...साठ

@वयवर्ष फक्त@............
🌹साठ🌹
आज थोड गमतिदार विषया कडे जाऊ...
काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर एक मेसेज फिरत होता,
'ये ग गायी गोठयात, बाळाला दूध दे वाटीत,आणी पुढे लिहलेल असायच,' तुमच वय काय? तुम्ही वाचताय काय?
खरच काही करायला वयाची बंधन असतात का हो?
मला तरी नाही वाटत, तुम्हाला वाटत असेल तर मला जरूर कमेंट करून कळवा हं.
सौ. सुमित्रा जयराम शास्री वय वर्ष पासष्ट(फक्त)
पण आता त्या सौ नव्हत्या, त्यांचे ते दोन वर्षापूर्वी हृदयविकारच्या झटक्याने अचानक गेले,
सुमित्रा काकू एकटया पडल्या,
एकट्या म्हणजे तशा एकट्या नाही.....
दोन मूल आहेत न त्याना, मोठी मुलगी नयना.
आणी मुलगा नीलेश दोन्ही मूल खुप संस्कारी, तेवढीच हुशार...
शिक्षणात एक नंबर, मुलीच MBA झाल, तस जयराम शास्री नी मुलीच्या लग्नाची घाई सुरु केली,
चांगल स्थळ सांगून आल. मुलगा चांगल्या नोकरीला दुबईला, घरची स्तिथी अतिउत्तम होती.
मग काय सगळ जमावून आल आणी लगिन घाई चालू झाली,
लग्न धूम धड़ाक्यात पार पडल..
सगळ होऊन नयना सासरी गेली म्हणजे दुबईला गेली सुद्धा.
आता नीलेश च बघायच चाल होत, तो ही लंडन ला मोठ्या कंपनित नोकरीला लागलेला, पण आई वडिलांच्या आज्ञेतला.
जवळच्या नात्यातील सुंदर, सुशील मुलगी पाहुन त्याचहि लग्न उरकुन टाकल. तो ही पंधरा दिवसात लंडनला शिफ्ट झाला.
सुमित्रा काकू आणी जयराम काका अगदी आनंदी आणी रिलेक्स आयुष्य जगत होते, पन एक दिवस अचानक जयराम काकांच्या छातीत दुखायला लागल, हॉस्पिटल ला नेइपर्यंत ते सगळ्यांना सोडून गेले.
ते गेल्यावर नयना आणी नीलेश दोघानी आईला सोबत येण्यास खुप आग्रह केला,
पण त्या काही केल्या तयार झाल्या नाहीत.
माझ पूर्ण आयुष्य याच घरात गेल मी माझ्या सगळ्या आठवणी सोडून तुमच्या सोबत नाही येणार.
मग काय नयना आणी निलेशच नाईलाज झाला.
काकूना काका गेले तरी निम्मी पेंशन मिळायची,
तस पण त्या संसारात खूपच हुशार होत्या, त्यांनी स्वताही चांगली बचत करून ठेवलेली.
दोन्ही मुलांनी जाताना बरीच रक्कम आईच्या एकाउंट वर डिपोझिट करून ठेवली.
सगळे गेल्यानंतर घर अगदी काकूना खायला उठायच, मन रमवन्यासाठी त्या सकाळ संध्याकाळ मंदिरात जात असत,
हरिपाठ, भजन चालू असायच.
घरी पण देव,देव्हारा आणी देवपूजा हा नित्यक्रम.
एक दिवस सकाळीच त्या मंदिरात जाताना मागून कुणीतरी हाक दिली, वळून पाहिल तर ओळखीचा कुणी दिसेना,
पण एक साठीतिल बाई समोर येऊन उभी राहिली, ट्रेकपैंट अन टि शर्ट घातलेली, पायात वॉकिंग शूज, कानाला हेडफोन.
ए सुमित्रा हाय.....
हाऊ आर यु?
काकू पण शिक्षित होत्याच.
हाय... आय एम फाइन.
पण कोण तुम्ही? मी नाही ओळखले,
आग मी नीलिमा, आपण नवीन सोसायटित राहायला एकाच दिवशी आलेलो, आम्ही नंतर मुलाच लग्न झाल्यावर दुसरीकडे शिफ्ट झालो.
अग बाई......
नीलिमा.... तू कशी आहेस.
मी मस्त आहे,
आणी तू ग सुमित्रा ?
मी पण ठीक आहे.
सुमित्रा काकु नीलिमा कड़े टक लावून बघत होत्या.
किती फैशनेबल राहते ही,
हिचे मिस्टर जावून तर बरीच वर्ष झाली पण ही मात्र कसलिच बदलली नाही.
सुमित्रा... कुठे हरवलीस?
काही नाही ग सहजच,
बर येतेस का वॉक ला?
रस्त्याने बोलू आपण,
नको ग आज पुन्हा कधीतरी,
मी मंदिरात निघाले न,
नाहीतर एक काम कर जवळच तर आहे घर मी पूजा करून येते मग माझ्या घरीच चल,
बर ठीक आहे, आज तुझ्यासाठी वॉकिंग कैंसल.
काकु पूजा करून बाहेर आल्या, बोलत बोलत दोघिजनी काकु च्या घरी , घर उघडले तसा उदबत्तीचा सुगंध दरवळत होता,
नीलिमा चहा घेणार की कॉफी?
चहा चालेल...
चहा बनवून काकु घेऊन आल्या, मग चहा घेत घेत खुप जुन्या नव्या,सुख दुःखा च्या गप्पा गोष्टि झाल्या.
बोलण्यात वेळ कधी गेला समजलच नाही, निलिमाच लक्ष घड्याळ कड़े गेल, नऊ वाजले होते,
अग चल मी जाते सुमित्रा, मला सगळ आवरुन पार्टिला जायच आहे.
काकुंचा निरोप घेऊन नीलिमा मॅडम निघाली, निघतान बोलली आज तुझ मी एकल उदया तू माझ्या सोबत यायच, आणी हे विचारत नाही सांगते, सकाळी आवरुन बस मी येते बोलवायला.
अस म्हणून गेल्या.
काकु तिच्याकडे बघत विचार करू लागल्या...
या वयात असला अवतार, शूज काय? टीशर्ट पैन्ट काय आणि पार्टी काय, शोभते का हिला, नवरा जाऊन किती वर्ष झाली,मुलगा सुन परदेशात विचारायला कुणी नाही म्हणून कस पण चालत का? स्वत:शीच प्रश्न विचारत होत्या.
नंतर यांचा दिनक्रम परत चालू झाला, पूजा पठन आरती.

दुसऱ्या दिवशी सकाळीच नीलिमा आली, काकु पूजा करून जपाला बसणार होत्या,,
ए सुमित्रा चल लवकर उशीर झालाय अगोदरच ग्रुप वाट बघत असेल..
नको ग हे सगळ मला नाही जमनार..
मी विचारत नाही सांगते चल लवकर.
अस म्हणून हात पकडून बाहेर काढल.
अग दार तर लावूदे..
.......... दोघी निघाल्या, थोड पुढे जाऊन नीलिमा ने हाय म्हणून आवाज दिला.
तस आठ दहा जनाचा ग्रुप लेडीज जेंट्स चा हाय नीलू म्हणून यांच्याकडे आला.
काय ग काल आली नाहीस आज पण लेट ?..
ए सगळे एका ही सुमित्रा आपल्या ग्रुप ची नवी मेंबर, आणी माझी मैत्रीण.
....... सगळे काकु कड़े बघून हाय म्हणाले तस यानी सगळ्यांना नमस्कार म्हणाल्या.
सगळे साठ ते सत्तरी च्या वयाचे पण सगळे एक्टिव.
हाफ पैंट , टीशर्ट मधले.
सुमित्रा काकुना अस अवघडल्या सारख वाटत होत, त्यांची कॉटन साडी, अर्धवट पिकलेल्या केसांचा अंबाडा, डोळ्यावर मोठ्या भींगाचा चश्मा.
आणी समोरचा ग्रुप सगळा पंचवीस तिशीतिल असल्यासारखे...
थोडावेळ थांबुन त्या निघुन आल्या,
निघताना नीलिमा म्हणाली संध्याकाळी पार्टी ठेवली बघ दयानंद च्या बर्थडे ची आपल्याला जायच आहे, तू पण छान तयार हो मी घ्यायला येते....
काकु नुसतच मानेन हो म्हणाल्या आणी पदर सावरत निघुन आल्या..
घरी येऊन खुर्चीत बसून त्याना सगळ्यांच्या गप्पा जोक आठवू लागल.
सगळे जेमतेम आपल्याच वयाचे मग आपल्याला अस वेगळ का वाटाव?
त्या तशाच उठून आरशासमोर जाऊन स्वताला बघत राहिल्या.
कशी दिसते मी? स्वतःला कधी निरखुन पाहिलच नाही..
डोळ्यावरचा चश्मा काढला, आरशात स्वताच्याच डोळ्यात पाहू लागल्या.
आज त्यांचा नित्यक्रम बाजूला राहिला,
परत येऊन खुर्चीत बसल्या खरच आपल जगायच राहून गेल का? स्वत:शिच प्रश्न वीचारु लागल्या.
मी माझ आयुष्य खरच जगले का?
आज भूक तहान सगळ च राहिल होत.
तेवढ्यात फोन वाजला...........
समोरून नात बोलत होती(दुबई वाली)
हाय आजी कशी आहेस तू?
मी मजेत बाळा,तू कशी आहेस?
आणी नातीला बोलतानाच त्या विचार करत होत्या.
जगले न मी मला हव तस, सगळ तर आहे माझ्याकडे.
मूल, नातवंड, सगळा परिवार आजुन काय हवय मला.....
बोलून झाल फोन ठेवून दिला.
परत फोन वाजला... आता कोण?
हेलो..... सुमित्रा मी नीलू मी पाच वाजता येते तू तयार होऊन बस. आणी फोन काही बोलायच्या अगोदरच कट केला समोरून..
आता काय करावे नीलिमा एकायची नाही..
बघू ती आल्यावर.
विचार काही डोक्यातुन जात नव्हते.
बघू जाऊन ,नाहीच आवडल तर येईल परत.
कपाटातून कड़क इस्री ची साडी काढून ठेवली.
चार वाजले असतील तेवढ्यात दार वाजल..
बघितल तर दारात नीलिमा उभी होती..
काकु म्हणाल्या काय ग तू तर पाच वाजता येणार होतिस मग?
अग तुझ्या घराच्या जवळच पार्लर आहे म्हटल मेकअप पण करून होईल म्हणून लवकर आले..
बर चल पार्लर मधे जाऊन येऊ.
पार्लरमधे आणी मी? नको ग बाई तू जा...
नीलिमा म्हणाली हे ग काय चल न माझ्यासोबत.
नाइलाज म्हणून जाव लागल.
निलिमाने पार्लर मधे गेल्यावर काकुना अगोदर बसवल म्हणाल्या हिचे केस काळे करण्यापासुन सगळा मेकओवर करा..
बाजूला स्वताच मेकअप करून घ्यायला बसली..
नाही नको म्हणायची सोय नव्हतिच.
काकु गप बसून होत्या. काय करते मी?
या वयात पार्लर मेकअप शोभते का मलाच.
या निलिमाच्या नादी लागून हे काय करते मी?
विचार करून होईपर्यंत केस काळे करून झाले, आइब्रो झाला, तोपर्यंत निलिमाच उरकून झालेल.
काकु आरशासमोर उभ्या राहिल्या, आणी त्यांचा स्वतावर विश्वास बसेना.
वीस वर्ष मागे गेल्यासारख वाटू लागल.
चेहऱ्यावर हसू उमटल.
दोघी घरी आल्या, साडी घालायची ति निलिमाला दाखवली तिने ति साडी सरळ बाजूला फेकली काय घे सुमित्रा? फ्रेंड्सपार्टिला कोणी साड़ी घालून जात का?चल आपण जाताना दुकानात जाऊन बघू...
काकु....
नको ग मी साडी मधेच ठीक आहे.
नीलिमा....
ते काही नाही चल.
जाताना कपडयाच्या दुकानात गेल्या. निलिमाने छान पंजाबी ड्रेस काढला, जा सुमित्रा चेंजिंग रूम मधून चेंज करून ये....
सगळ अवघडल्यासारख वाटत होत.
काकु जाऊन चेंज करून आल्या,
नीलिमा..... अरे काय सुंदर दिसते तू,
तुझ तर काहीतरीच ह,
काहीतरी नाही तूच बघ न समोरच्या आरशात.
काकु मागे फिरुन पाहू लागल्या.
स्वताच्याच प्रेमात पडल्या, एका क्षणात आयुष्यभराचा आत्मविश्वास जागृत झाल्यासारख वाटू लागल.
दोघी निघाल्या काकु ना वाटत होत ( अभी तो मैं जवान हु)
दयानंद च्या घरी सगळा ग्रुप जमलेला होता,
आजही सगळ्यानी हाय केल तस काकु नि पण आज नमस्कार न करता हाय म्हणाल्या.
त्यांच् त्यानाच आश्चर्य वाटत होत,
केक कापून, नास्ता कोल्ड्रिंक घेऊन पार्टी धमाल झाली.
परत येताना काकु वेगळ्या विश्वात होत्या,
आता त्या रोज ग्रुप सोबत वॉक ला जात होत्या, एन्जॉय करत होत्या.
आणी हो आपले संस्कार न विसरता सकाळ संध्याकाळ देवपूजा पण करत होत्या....
ग्रुप मधे राहून व्हिडिओ कॉल वर बोलायच शिकल्या, आता नातीला व्हिडिओ कॉल करून बोलू लागल्या.....
मुलगा आणी सुनेशी पण एकमेकांना बघुनच गप्पा होऊ लागल्या...
मूल पन शिक्षित होती आईमधील बदल सगळ्यांना आवडला.
आणी मूल म्हणू लागली आय लव यू डिअर मॉम
मग सुमित्रा मॅडम पण रिप्लाय मधे बोलायच्या 🌹आय लव यू टू माय डिअर🌹
😍त्यासाठी म्हणते एन्जॉय करायला सुद्धा कुठल्याच वयाची अट नसते बर का...
आणी हो, हा लेख फक्त महिलांसाठी च नाही बर का.... वयाच बंधन नसत हे पुरुषाना पण लागू होत च हं 😍

@ सौ. वनिता स. भोगील@

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED