एक पाठवणी अशी ही... भाग २ Prevail_Artist द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक पाठवणी अशी ही... भाग २

(लतिका ह्या बोलण्यावर शॉक च होते) म्हणजे काय तर त्या मुलाकडच्या घरच्यांना सगळं माहितीय तिकडून काय अडचंडण नाही तर मग फक्त एक फॉर्मलिटीझ तू आम्हाला सांगितलंस, लतिका तू जो मुलगा निवडला आहेस त्या बद्दल बोलायचं तर , काय ग तुझं किती शिक्षण झालाय हां तुला आम्ही इतकं शिकवलंय तर त्याच काय , तो मुलगा जास्त शिकला पण नाही (लतिका मनात पण त्याला तरी पण सरकारी नोकरी तर आहे नि मला जास्त शिकून पण नोकरी नाही मनासारखी )
काय किती तफावत आहे तुमच्यात तू एक मास्टर पदवी प्राप्त केलेली आणि त्याने त्याच फक्त कॉमन graduation complete केलंय ,तुला थोडं तरी कळालं हवं
लग्न म्हनजे काय खायचा भात नाही आहे, आणि नाही तो भातुकुलीचा खेळ , तू घेतलायस तुझा निर्णय तर आम्ही लग्न करून देऊ त्याशिवाय आमच्याकडे काय पर्याय सोडणार आहे ."
लतिका आतून आनंदात होती, ती बेडरूममध्ये गेली तेव्हा तिला जाणवलं की आई बाबा तिच्याबद्दल बोलत होते
"तोंडात शेण घातलंय तिने आता आपण काय करायच कोणाला काय सांगायचं नि काय करायचं"
तिला हे ऐकून खूप वाईट वाटलं कारण अक्षयच्या घरी कोणी शिकलेल नाही तो सोडून आई-बाबा शिक्षण नाही घेऊ शकले आणि त्यांनी मला भेटीतच पसंत केली होती.माझ्या बॅकग्राऊंड बद्दल काहीही न विचारता आणि इथे माझे आईबाबा शिकून पण असा नकारात्मक विचार कसा करू शकतात ह्या विचाराने लतिकाला रात्रभर झोप नाही लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लतिकाने घरी सांगितलं असा कॉल लावला अक्षयला , अक्षय पण बोलाला," ठीक आहे तू नको टेन्शन घेऊस सगळं ठीक होईल आता माझं घर झालं की आपण बोलणी करूया पण त्या आधी तुम्ही माझ्या घराभरणीला या घर बघा बरं वाटलं माझ्या घरच्यांना आणि तू हस ग तू तोंड नको पाडूस "
मी इकडे तिकडे पाहिलं तर कोणी नव्हतं ह्याला कस काय कळत कि मी upset आहे ते
"मला कस कळालं हाच तू विचार करतेयस ना लतिका आता आपण एक झालोय मनाने आणि मला सगळं कळतं"
हेच खरं प्रेम आहे ना कि मला ते मिळालं.

रोजच्या प्रमाणे लतिका अभ्यासाची तयारी ला जात होते तेवढ्यात लातिकाचा फोन वाजला लतीकाला ते समजलं नाही पण जेव्हा पापांनी पाहिलं तर ते भडकले आणि बोलले," बघ ग चैन पडत नाही वाटत ...उचल कॉल" त्यांचं हे बोलणं लतिकाला खूप लागलं ह्यावर काय रिऍक्ट होऊ समजत नव्हतं , पापांचा ह्या लग्नाला इतका विरोध आहे पण ते न सांगता त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून लातीकाला समजत होत आणि त्याच च तिला खूप वाईट वाटत होत, त्यांच्या जातीचा नाही , शिक्षण जास्त नाही म्हणून त्यांना राग येत असतो, पण प्रेम केलय तर त्याला तरी लतिका काय करणार , आणि लतिका पण ठाम होती की ती अक्षय शिवाय कोणा दुसऱ्या सोबत लग्न नाहि करू शकत. तिला माहित होत जर अक्षयला जेवायला नाही मिळालं तर तो लतिकाला कधी उपाशी नाही ठेवणार.
आणि म्हणूनच ती त्याला होकार देते, त्याला तिने पाहिलं असत त्याच hard working त्याने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट, घर बांधण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यातच आई-बाबाना वेळेवर डॉक्टर ट्रीटमेंट देणं अशी खूप काम लतिकाने पाहिलेली असतात कारण तो एकटाच मुलगा हे काम करतो पण लतीकाचे दोन भाऊ असून पण आपल्या बाबां कडे लक्ष नाही देत,सगळीकडे लतीकाचे बाबा बघत असतात. लातीकाचे बाबा जे ह्या वयात काम करतात , त्याच वयात लतीकाच्या बाबांच्या वयाची काम अक्षय करत असतो , म्हणजे काय अक्षय ची तुलना होईल दुसऱ्यांसमोर.