This is a send-off - 7 books and stories free download online pdf in Marathi

एक पाठवणी अशी हि... भाग 7

"लतिका अग झालं काय चल सगळे वाट बघत्यात" बाहेरून आवाज येतो. लतिका स्वतःकडे बघून हसते आणि "चला आता आपल्याला निघायची वेळ झालीय मग आता आपण जाऊया" असं म्हणून ती, जायला निघते.
ती दार उघडते, तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत असतात, लतिका अशी काय दिसते, लतिका दीर्घ श्वास घेत चालत असते, डोळे लाल झालेले असतात, लतिकाची अशी अवस्था बघून सगळेजण तिला सावरायच प्रयत्न करतात. पण ती कोणाला अजीबात हात लावायला देत नाही. ती चालत असताना तिच्यामागे रक्ताचे थेंब पडत असतात , कारण लतिकाने तिची नस कापलेली असते.
लतिका अशी अवस्था बघून लतीकाचा भाऊ खूप रागावतो, तो येतो आणि तिच्या कानाखाली देतो, कानाखाली दिल्यावर लतिका जमिनीवर पडते आणि जोर जोरात हसायला लागते," मार अजून मार ना हां का थांबलास" हळू हळू ती उठायला सुरुवात करते पण कापलेला हातावर जोर येतो तेव्हा ती जोरात किंचाळते , श्वास रोखून ठेऊन ती उठते," अरे मार ना रे हां,
ती खूप प्यायली असल्याने तिला नीट उभं पण राहता येत नसत
मला मारतोय तो , आणि मी काही नाही करू शकत कुठे गेला रे तुझे पप्पा हां त्यांना पण बोलावं मारायला"
तेवढ्यात लतीकाचे पप्पा समोर येतात, मुलीला असं बघून ते सुध्दा रागत येतात तिला मारण्यासाठी पण सगळेजण त्यांना आडवतात.
" अरे का अडवत्यात त्यांना येऊ द्या त्यांना पप्पा ओ पप्पा हे बघा मला काही समजत नव्हतं हो मी तुमची दारू प्यायलीय, मला हिमंत च होत नव्हती ओ हे असं करायची मग बघा तुमच्याकडून हिमंत आली आणि मी केलं.
लतीकाची आई जवळ येते," बाळा चल तुझं खूप रक्त जातंय ग बाळा असं नको वागुस चल आपण डॉक्टरकडे जाऊया "
लतिका," नाही नाही आई आज तू मला थांबवलस तर मी नाही बोलू शकत तू बस मला काही नाही होणार "
लतिका आई ला बसवते.
"बघा आई ला तरी कळालं माझं रक्त जातंय, आणि लगेच मला घेऊन जायला आली , आणि पाहिलात ना मला हे दोघे मारायला आले ,त्यांचं प्रतिष्ठा महत्व।ची आहे. सतत सतत मला टोचून बोलायचं अहो तिथेच मी मेले होते आता तरी कुठे जिवंत होते हां , सतत माझी लायकी काढणं,
पप्पा मी एकटिच आहे ना मुलगी मग मला तस का नाही सांभाळालात हां, हो मला माहितीय मी शिक्षण घेतलंय पण मी प्रयत्न करतेय ओ, मी फुकटी नाही ओ मला पण तुमच्याकडून पैसे मागायला लाज वाटते, माझा पण जीव कासावीस होतो की मी का नाही करत हा विचार करून ,
आणि दादा मला भाऊंभिज, रक्षाबंधन करते ते मला आवडत म्हणून आणि मला पैसे हवे असे नाही रे , मला कधी तू स्वतः बहीण नाही रे मानलस एकदा मला तस पाहिलं असतस तर मी भेटले असते,
हां जो लग्नाचा घाट घातला त्यात तुमचे खूप पैसे खर्च झालेत, आणि मान्य करते मी पण हां खर्च होणार हे बापाला कळत ते कधी जेव्हा त्याच्या आयुष्यात मुलगी येते तेव्हा ,
तेव्हा पासून तो तयारी करायला सुरुवात करत असतो अगदी हौशीने पण काय ना माझ्या मध्ये असं काही नाही आहे
हां सगळं खर्च करताना माझा बाप आणि भाऊ खूप शिव्या नि शाप देत होते आणि ह्या च ओझं घेऊन मी अशी किती दिवस जगणार सांगा ना, मग म्हटलं आता हे सगळं संपून टाकूया नको कोणाला काहो त्रास ,
मी पण थकली आहे आता आई मला जवळ घे ना ग ,
लतिका खूप रडत असते, उभं राहून राहून तिचा तोल जातो आणि ती खाली बसते, घसरत घसरत आई कडे जाते, आईचा हात हातात घेते आणि बोलते," आई मला थोपटव ना ग म्हणजे मला शांत झोप लागेल"
सगळेजण लतीका कडे बघून रडत असतात.
लतीकाची आई लतीकाच्या डोक्यावर हात ठेवते आणि थोपटवायला सुरुवात करते
लतिका हळू हळू श्वास घेत ,"आई आता बघ आता तुला काही अडचडण नाही आता सगळे प्रोम्बलें solve झालेत"
आईला घट्ट पकडते आणि डोळे मिटून शांत राहते.

हे सगळं बघून लतीकाचा दादा खूप रडतो, आणि आता तिच्या दादाला आणि बाबांना आपली चूक कळून येते , ते दोघे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडत असतात.

तेवढ्यातच लतीकाची आई जोरात ओरडते सगळ्यांना समजत नाही काय झालं ,
लतीकाच्या आईला आपल्या मुलीचा श्वास जाणवत नाही,ती तिला हलवायचा प्रयत्न करते पण लतिका का नाही बोलत हे तिला कळत नसत , लतीकाचे बाबा जवळ येतात आणि मुलीला बघतात आणि ते पण मोठ्याने ओरडतात ,"लतिका नको ग अशी सोडून जाऊस चुकलं पोरी माझं"

सगळेजण लतीकाच्या भोवती जमा होतात .
तेवढ्यात अक्षय येतो, सगळीकडे इतकी शांतता का आहे..?
म्हणून तो आत जाण्या आधी कोणी तरी त्याचा हात पकडत , तो मागे वळून बघतो तर लतिका असते,
अक्षय," लतिका (तो तिच्याकडे बघत बसतो) अग किती सुंदर दिसत आहे तु , आणि हे काय आज का हे घातलंय उद्या आहे लग्न आपलं"
लतिका,"तुला दाखवायला का नाही चांगली दिसत काय?"
अक्षय," मी असं कुठे बोलोलो ग वेडे तू साधी पण छान दिसतेस , आणि मला तशीच आवडतेस तू, i love you dear"
तो जवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करतो, मी नेहमी सोबत असेन तुझ्या आणि काय झालं रडायला..?"
लतिका ,"नको इतकं प्रेम करुस मला त्रास होईल"
अक्षय ," नको काय आता बघ खूप प्रेम करणार,
लतिका," I love you too अक्षय , तू खूप चांगला आहेस पण..."
अक्षय ," पण काय ग"
लतिका,"माझी पाठवणी अशी होईल असं वाटलं नव्हतं"
अक्षय," अशी म्हणजे कशी? तू काय बोलतेस समजत नाही"
लतिका त्याचा चेहरा आपल्या हातात घेते आणि त्याच्या ओठाजवळ नेते त्याला किस करते आणि तो पण तिला डोळे मिटून घट्ट मिठी मारतो, त्याचा तर जीव धडधडत असतो "
डोळे उघडतो तेव्हा समोर कोणी नसतं
पुढे जातो तेव्हा लतीकाच्या घरी शांतता पसरलेली असते, आणि हे असं काय आहे म्हणून तो पुढे बघायला जातो तर लतिका आईच्या जवळ पडलेली असते, आणि तिच्या हातातून रक्त बाहेर आलेले दिसत . तो ते बघून शॉक होतो म्हणजे लतिका आपल्याला शेवटची भेटलेली असते मघाशी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED