This is a send-off - 6 books and stories free download online pdf in Marathi

एक पाठवणी अशी ही...भाग ६

तो तिला घेऊन जाते, सगळीकडे शांतता असते, तो तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो, आणि पुढे बघते तर , फुलाच्या पाकळ्यासोबत केक सजवलेला असतो, लतीकाचे सगळे फोटो लावलेले असतात , पूर्ण रूम फुलांनी, फुगेनी, नि मेणबत्यांनी सजवलेले असत. ☺️☺️ हे तिच्या आयुष्यामधलं खूप छान सरप्राईझ असतं. तिला खूप आनंद झालेला असतो, आणि एकदम अचानक "हैप्पी बर्थडे लतिका " सगळ्यांचे आवाज येतात , बघते तर 10 मधले मित्र मैत्रणी आलेले असतात,
तिला हे बघून सगळं शॉक बसतो.
बर्थडे सॉंग लावतात , लतीकाचा मस्त वाढदिवस साजरा करतात , सगळ्यांचं इतकं प्रेम बघून लतिका थोडी नर्व्हस होते कारण तिला असं कधी भेटलेल नसत, अक्षयने जे काही केलं असत त्याचे आभार मानणं खूप कमी असत.
सगळे जातात तेव्हा ती स्वतःहून," अक्षयच्या जवळ जाते त्याला घट्ट मिठी मारते"
अक्षय," काय ग वेडा बाई काय झालं?"
"काही नाही रे सहज thank you so much"
अक्षय मिठी त च तिला खूप जवळ घेतो, आणि तिच्या कपाळाला किस करतो ," माझं पिल्लू आहेस तू लतू तुझ्यासाठी कायपण"
दोघे कितीतरी वेळ एकत्र असे मिठीत राहिलेले असतात,
अचानक अक्षयचा मोबाईल वाजतो आणि ते दोघे भानावर येतात. लतिका अक्षय स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येतात .
लतीकाच्या आईला प्रॉमिस केल्याप्रमाणे लातीकाला तो घरी नेऊन सोडतो.
घरी आल्यावर बघते तर , आई झोपलेली असते , पप्पा बाहेर गेलेले असतात. आवरून ती स्वयंपाक घरात जाते आणि बघते तर आई जेवलेली नसते, म्हणजे ह्याचा अर्थ कि पप्पा खूप बोलतात तिला आपल्यामुळे तिला खूप त्रास होतोय , लतीकाचा जीव खालीवर होतो, ती श्वास घ्यायचा प्रयत्न करत असते, आणि खाली बसून खूप रडत असते, कारण तिला आता सगळं सहन होत नसत. ती तर आता ठरवते बस आता हे कुठे तरी थांबायला हवं.

दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो. सगळेजण घरी आलेले असतात, लतिका बघते तर आईची तब्येत बिघडलेली असते. कारण पण तसंच असते, तिने काल रात्री पासून काही खाल्लं नसत आणि तिला त्रासामागे मागे तर मीच असते .
लतिका जवळ जाते, आईच्या पायाजवळ बसते आई कडे बघून तिच्या डोळ्यात अचानक पाणी येत आणि बोलते , " आता तुला त्रास कधीच होणार नाही माझ्यामुळे हे मी तुला वचन देते" ती आईच्या हातात हात घालते. "खूप सहन केलयस आज तू माझ्या साठी आई आता अजिबात नाही"
आई," बाळा लतिका अशी काय बोलतेस , जा मस्त तयारी कर पाहुणे आलेत आणि हां नको काळजी घेऊस बाळा जा तयारी कर"

लतिका आत रुम मध्ये जाते, एकटीच असते ती आरश्यात बघते आणि हसते , आपला हात आरश्या जवळ घेते आणि स्वतःच्या तोंडावरून हात फिरवते, आणि एक वेगळाच आनंद तिला होतो, ती स्वतःला बघून हसते आणि तयारीला सुरुवात करते.
ती बघते तर हळदीची सारी,लग्नाची सारी तिच्या समोर असते , ती सारी नेसायला सुरुवात करते, गाणं गुणगुणत तर कधी स्वतःला आरश्यात हसून साथ देत असते.
कानातले घालते , हातात बांगड्यां भरते , गळ्यात दागिने भरते,कपाळाला टिकली लावते अगदी लग्नाला नवरी मुलगी दिसते तशी ती दिसत होती.
सगळी तयारी झाली तेव्हा एकदा आरश्यात बघते,"स्वतः स्वतःची नजर काढते आणि हसते.

जवळच एका टेबलवर ती बघते तर , तिचे पप्पा ड्रिंक घेत असतात त्याची ती बॉटल चोरून घेऊन ठेवलेली असते. ती त्या बॉटल कडे बघते आणि एका ग्लास मध्ये ती ड्रिंक ओतते , आरश्या सामोर जाते आणि बोलते," cheers to life Latika ever never done happy married life " आणि ती हसायला लागते. आणि ड्रिंक पिते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED