एक पाठवणी अशी ही...भाग ५ PrevailArtist द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक पाठवणी अशी ही...भाग ५

असेच दिवस जात होते, एक दिवस सकाळी 6 ला तिचा मोबाईल वाजला आणि तिने पहिला तर अक्षयचा फोन होता, तिने घेताला ,"many many happy returns of the day dear my dear Princess"
हां असा काय बोलतोय म्हणून तिने मोबाईल पाहिलं तर आज अरे आपला बर्थडे आहे. आणि आपण विसरलो.
" thank you so much ☺☺ I love you hubby"
"मग आज काय प्लॅन" अक्षय
"नाही रे रोजच आहे, तर काही प्लॅन नाही आता तर दोन दिवसांनी आपलं लग्न तर आहे"
"बरं झालं तर मग ऐक कोणताच प्लन नको करुस , आज माझ्यासोबत पूर्ण वेळ घालवायचास , आणि तुझा दिवस आहे तो माझा आहे कळालं आणि ऐक आता आपण शेवटच असं girlfriend boyfriend भेटणार मग काय तू कायमची माझी बायको म्हणून मिरवायचास थाटात" अक्षय
(आता काय करू मी एक तर पापांनी भेटायची परवानगी नाही देणार, आणि मी ह्याला नाही कसं म्हणू)
"हो हो मी येईन चल मी ठेऊ आता सगळं आवरते"
अक्षय ,"जानु अशीच जाणार काय ग?,प्रेमाचे दोन शब्द बोल माझ्यासोबत जाताना तरी"
"I love you dear, thanks for call"
"I am always with you dear", जा आता मस्त फ्रेश हो आणि संध्याकाळी हां माझा वेळ असणार आहे".

लतिका फ्रेश होते,सगळं आवरून ती आपल्या खोलीत येते , तेच आई जवळ येते आणि तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन एकदा बघते," माझं पिल्लूच आता हां इकडचा शेवटचा वाढदिवस मग काय पुढे सासरी तर मज्जा आहे ना, नंतर तिकडेच तुझे वाढदिवस साजरे होणार"
आईच हे बोलणं ऐकून ,लतीकाच्या डोळ्यात पाणी आलं तिला काय बोलाव सुचत नसत, लतीकाने आई ला एकदम घट्ट मिठी मारली , हुंदका मारण्यासारखी रडत होती.
आई, " ऐ वेडाबाई असं रडतात,
हातात ओवाळणीची ताट घेऊन तिला ओवाळते , "असं रडू नकोस मग अक्षय येईल आणि बोलेलं का मग रडवल नी काय, तू खूप खुश राहा, कोणी काय बोलल तर मनाला लावून नको घेऊस".
लतिका आईच्या पाया पडते
लतिका," आई ग , अक्षयने सांगितलं आहे की, संध्याकाळी आपण बर्थडे celebrate करूया मग आई मी जाऊ काय?"
आई," अग पण घरी माहितीय ना तुला, काय बोलतात हे मी जा बोलेन पण ह्यांना कस समजावू "😢
लतिका," हां ना मग मी नाही जात आहे त्याला सांगते काही ते"
आई," नाही नाही असं नको ग करुस, तू जा मी बघते इथे नाही तर असे दिवस कुठे परत येतील बाळा तू जा मस्त मज्जा कर पण लवकर ये , बाळा" .
लतिका इतकी खुश असते की तिला भारी वाटत. ती तयारी करायला लागते , आणि मस्त ड्रेस घालते.
अक्षय तिला घ्यायला घरी येतो तेव्हा , तो लातीकाला पाहत च बसतो , त्याची नजरच हलत नाही
तेवढ्यात लतीकाची आई ," हुंम्म काय ओ जावाईबापू कुठे हरवला त "
अक्षय ," लतीकामध्ये "
लतीकाची आई अक्षय ला हात लावते ," अहो जागे व्हा मी आहे सोबत" आणि जोरात हसायला लागते .
आईचा आवाज ऐकून अक्षय भानावर येतो, आणि इकडे तिकडे बघत असतो.
लातीकाला पण हे बघून हसायला येत.
अक्षय डोपऱ्यावर बसून हात पुढे करतो ,"मग तुम्ही माझ्या सोबत यायला तयार आहात?"
लतिका हसते आणि त्याच्या हातात हात देते, आणि डोळे मिचकाउंन त्याला प्रतिसाद देते.

तिचा हातात हात घेऊन आईला बाय करत , अक्षय आणि लतिका निघतात , इथे लातीकाला काही कल्पना नसते. अक्षयतीच्या डोळ्यावर पट्टी बांधतो, तिच्या कानाच्या जवळ तिला सांगतो की ," आता काही बोलू नकोस, बस माझ्यासोबत चल"
मान डोलाउंन ती हो बोलते.