माझ्या आयुष्यातलं एक डील भाग १ PrevailArtist द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या आयुष्यातलं एक डील भाग १

आज ती उठली आणि तीच अंग साथ देत नव्हत खूप त्रास होत होता, घर अस्ताव्यस्त पडलं होतं, आज शरीरात कणकण भरली होती, मनाशी ठरवलं तरी तिला तिची हालचाल करता येत नव्हती, कारण आता मन पण खूप थकलं होत, डोळ्याच्या कडेतून अश्रू वाहत होते आणि ते थांबत नव्हते, फक्त आवाज येत होता तो घडाळ्याच्या काट्याचा, उठायला जाताना अंगातून कळ गेली आणि मंजिरी पुन्हा जमिनीवर पडली, आता तिला स्वतःच अंग पण नीट सावरता येत नव्हतं, ती अशीच जमिनीवर पडून राहिली,हळूहळू हे असं आयुष्य कोणामुळे झालाय ह्याचा विचार करत होती तिला पहिले आई आणि बाबा आठवले, मग तिचा दादा

खूप खूष होती मंजिरी स्वतःच्या आयुष्यात बिंदास, मनमौजी,बडबडी,अगदी सगळ्यांना आपलंसं करणारी,करिअर ओरिएंटेड
तिला स्वतःच्या करिअर बद्दल खूप काळजी होती कारण तिचे inspiration च डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिला आपलं करिअर झालं की एक मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊन आपल्या पैशातून त्याला किंवा तिला शिकवावं अशी तिची इच्छा होती, तिच्या ह्या विचाराने ती लोभस होती तिला सतत दुसर्यांना मदत करण्यात खूप आनंद वाटायचा,

मंजिरीसाठी तिचे आई बाबा खूप महत्वाचे असायचे
तिची आई खूप सौम्य होती तिला खूप प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची
बाबा थोडे तापट होते कारण त्यांच्या मनात कोणती गोष्ट आली ती करायची म्हणजे करायचीच
पण त्यांचा जीव मंजिरी मध्ये अडकला होता पण त्यांनी कधी जाणवून दिल नाही कि
पण ते सतत ती मंजिरी समोर कडकच राहायचे

तिच्या आई बाबांनी तिच्या शिक्षणामध्ये कधी अडवलं नाही तिला जे पाहिजे त्यांनी तिला करून दिल, कारण त्यांची पण इच्छा होती कि तिने आपल्या सारखं न राहता आपल्या पेक्षा नीट आयुष्य मिळावं,
मंजिरीच्या दादाने पण खूप सपोर्ट करत होता त्याचा आपल्या बहिणीवर खूप जीव होता दरवेळी रक्षाबंधांला तिला जे हवे ते आणून द्यायचा
घरात कोणी एक नसेल तर घर सूनसून वाटायचं , ते जेवढे मस्ती करायचे तेवढेच एकमेकांना सांभाळून घ्यायचे,

ती MBA कॉलेजमध्ये असताना तिला एक स्थळ सांगून आलं
जेव्हा मंजिरीला समजलं की तिच्या साठी एक स्थळ आलय तेव्हा तिला टेन्शन आलं कारण तिला लगेच ह्यामध्ये पडायचं नव्हतं आणि तिला स्वतःच्या करिअर मध्ये काही प्रोम्बलें नको हवे होते,तिने आपल म्हणणं पण घरच्यांसामोर मांडले तेव्हा तिला बाबानि समजावलं," मंजिरी अग करिअर होतच राहील पण ज्या वयात जे होयला हवं आहे ते नको का, तुझ्याच आईला बघ वयाच्या 19 वर्षी लग्न केलं आणि तू बघ आता 22 ची आहेस आता आपल्याला बेटा लग्नाचं बघायला हवं"
मंजिरी ," बाबा जबाबदारी खूप पडते हो आणि मला हे इतक्यात नकोय आधी माझं करिअर होउ दे मला थोडा वेळ द्या please"

आई बोलली," मंजिरी अग बघ माझं किती लवकर झालं अंग जबाबदारी काय ती अशी पण पडते ग आणि मी ती लवकर घेतली , माझ्याकडे बघ सगळं होईल नीट सगळ्यांना समाजवून घ्यायचं असत आणि एक बाईचं एका कुटुंबाला सावरू शकते....
आईच अर्थवट वाक्य मोडत मंजिरी संतापून बोलली, " अग तुझ्या वेळेचं गोष्ट वेगळी होती आता तस राहिलेलं नाही समजावून घे ग, मंजिरीला रडूच कोसळलं
ती स्वतःच्या रूम मध्ये जाऊन बेड वर पडली तिला आज खूप एकटं वाटत होत आणि भीती पण कारण आता आपण असं अर्थवट उठून आलो आणि आता आपल्याला बाबा रागावणार म्हणून ती खाली रात्री जेवायला पण आली नाही.कारण तिच्या मनात बाबा हेच विचार येत होते , आणि त्यात तिची भूक पण मारून गेली होती.