माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ४ PrevailArtist द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ४

असेच दिवस जातात लग्नाला आता फक्त दोन दिवस राहिले असतात, त्यातच मंजिरीची आई बरी होऊन येते, आपल्या मुलीला बघून मंजिरीच्या आईला बर वाटत, आई पूर्ण रिकव्हर झालेली बघून मंजिरीला पण बर वाटत
आज त्यांच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो, मंजिरी आपल्या भाऊला म्हणजे पियुषला थंड पाण्याच्या बॉटल आणायला सांगते
पियुष जरी लहान असला तरी तो खूप समजूतदार होता, तो त्यांच्या मित्रांसोबत पाण्याची बोट्टल्स आणि इतर काही वस्तू आणायला जातो, तो त्याच्या तीन मित्रांना घेऊन जातो पण त्यांच्या मनात एक विचार येतो की आता पाणी घ्यायला जातोय तर बहिणीच्या लग्नाचं मज्जा आज करायची ती कधी करायला मिळणार आहे म्हणून पियुषला ते फोर्स करतात आज आपण बिअर घेऊया
पियुषला त्यांचा फोर्स पूर्ण केल्याशिवाय गत्यंतर नव्हते कारण हे आज मागतील नंतर कधी मागणार नाही म्हणून तो परमिशन देतो आणि ते 2,4 बोट्टल्स घेतात त्यातला एक मित्र 1 बोट्टल्स गाडीतच उघडतो विचित्र वास येतो, पियुषला हे आवडलं नसत पण मित्रामुळे तो काही करू शकत नव्हता त्यामुळे शांत बसतो
आणि अचानक बघतो तर समोर पोलीस उभे असतात ते त्यांची गाडी थांबवतात, ते बघतात की 3 मुलं धुंद पडलेली असतात, ते डायरेक्ट गाडी पोलिस स्टेशन ला आणायला सांगतात
पीयूशची पूर्ण वाट ल।गाते त्याला आपले आईबाबा, दीदी चा चेहरा आठवतो तो खुप रडवेला झालेला असतो पोलीस स्टेशन ला पोहचल्यावर त्याला खूप टेन्शन येत, तो आत जाणार तर बाहेर बघतो तर शुभम उभा असतो त्याला अजून भीती वाटते आणि त्याला बघून शुभम पुढे येतो, शुभमला झाला प्रकार कळतो, तो पियुषच्या खांद्यावर हात ठेवतो न धीर देतो , शुभम तिथेच रडायला लागतो , त्याला बाहेर थांबायल सांगतो आणि शुभम आत जातो नि बाहेर त्याच्या सोबत पोलीस येतात तेव्हा पोलीस बोलतात कि," बाळा जा पण असं चूक पुन्हा नको करू जाताना तुझ्या मित्रांना नीट घेऊन जा"

पियुष ला धक्का बसतो कारण त्याला समजत नव्हतं इथे नक्की काय होतंय, तो बाहेर पडतो तेव्हा तो शुभम त्याच्या सोबत येतो , " मला माहितीय कि तू काय विचार करतोयस कि मी काय केलं असं
अरे ते पोलीस होते ते माझे खास मित्र आहेत नि थोडी settelment केली आणि तुला सोडलं "
चल ते राहू दे घरी लवकर जा आणि काळजी घे "
असं बोलून शुभम तिथून निघाला पण पियुषच्या मनात एकच प्रश्न पडतो की जीजू इथे काय करत होते रात्री"
ह्या विचारात तो कधी घरी पोचला ते कळलं नाही, आल्यावर मंजिरीने त्याला मारलं नि खोट खोटं ओरडली कि "काय रे होतास कुठे जीव गेल्यावर पाणी आणणार काय...?"

तिच्या अश्या बोलण्याने त्याला रडायला आलं तो ताईला मिठी मारतो मंजिरी त्याला शांत करायचं प्रयत्न करते सगळ्यांना वाटत कि ताई लांब जाईल म्हणून रडतोय कारण तर दुसरंच होत आज जर शुभम जीजू नसले असते तर माझ्यामुळे घरी सगळ्यांना त्रास झाला असता.

लग्नाचा दिवस उजाडतो, मंजिरीच्या मन खूप चलबिचल होते कारण आता तीच आयुष्य बदलणार होत आता आपल्या नवीन आयुष्याची वाटचाल एका नवीन व्यक्तीसोबत करणार आहोत , अखेर तो दिवस आला

मंजिरी लग्नाच्या मंडपात येताना सगळ्यांचे डोळे तिच्याकडे होते आज ति खूप सुंदर दिसत होती, तिच्या चेहऱ्यावरून येणारी एक बट, तिचे डोळे बोलके वाटत होते कारण तिच्या डोळ्यातली काळजाने , तिच्या चेहऱ्यावरची लाली, तिचा गळ्याभोवती शोभणारा हार आणि तिने घातलेला घागरा आणि त्याच्यावर मस्त नेसलेली ओढणी पदर