माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ५ PrevailArtist द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ५

मंजिरी लग्नाच्या मंडपात येताना सगळ्यांचे डोळे तिच्याकडे होते आज ति खूप सुंदर दिसत होती, तिच्या चेहऱ्यावरून येणारी एक बट, तिचे डोळे बोलके वाटत होते कारण तिच्या डोळ्यातली काळजाने , तिच्या चेहऱ्यावरची लाली, तिचा गळ्याभोवती शोभणारा हार आणि तिने घातलेला घागरा आणि त्याच्यावर मस्त नेसलेली ओढणी पदर टाईप आज ती कोणाची दृष्ट लागेल अशी दिसत होती,
आणि ती मंडपाजवळ आल्यावर तिच्या समोर शुभम तिच्या समोर हात पुढे करतो , तोही तिला बघतच राहतो ती त्याच्या हातात हात देते दोघे पण मंडपात बसतात आणि दोघे एकमेकांना बघतात शुभम हात पुढे घेतो मंजिरीला जवळ करतो आणि तिच्या कापळाची किस घेतो आणि मग लग्नाचे विधी सुरु होते,
लग्न एकदम निर्विघ्न पार पडत , आता मंजिरिची पाठवाणीची वेळ होते तेव्हा शुभम सगळ्यांना दिलासा देतो त्याच्या दिलासने सगळ्यांना बर वाटत
, शुभम तिचा हात आपल्या हातात घेतो तेव्हा मंजिरीला खुप आधार वाटतो,

लग्ना नंतरचे दिवस सुरु होतात, दोघ एकत्र रहत असतात तरी एकमेकांना दिवासातुन 4,5 वेळा कॉल करत असतात,मंजिरीला तो प्रोत्साहान देतो की तू वेळ वाया घालऊ नकोस जॉब बघ त्याच मान्य करते नि मंजिरी जॉबसाठी apply करते तर तिला एका आठवड्यात कॉल येतो आणि तीला एका जॉब साठी कॉल येतो ती हे शुभम ला सांगते शुभम ला खूप आनंद होतो
आता तिला 2 दिवसात interview ची तयारी करायची असते शुभम तिला काही काम करायला सांगत नाही तीला फक्त interview वर focus करायला सांगतो
शुभम पण तिला काय लागेल ते आणून देतो
मंजिरी स्वतःला खूप लकी समजत असते की इतका loving, caring husbund मिळाला,
मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केले असतील म्हणूनच ना

आज तिचा interview चा दिवस उजाडतो ती उठते तेव्हा नाष्टा,चहा तयार असतो शुभम आज सकाळी उठून मेहनत घेत होता
आज शुभम ने मंजिरी साठी सुट्टी घेतली होती कारण
आज जऱ ती interview नीट होउ दे अगर नको आपण बाहेर सेलिब्रेट करायला जायच
मंजिरीने लगेच तयारी केली आणि बाहेर पडली तिच्या सोबत शुभम पण ऑफिस पर्यन्त सोडायला गेला
all the best म्हणून शुभम ने गाड़ी घराच्या दिशेने फिरवली,
मंजिरी थोड़ी घाबरलेली कारण तिच्या आयुष्यातला हां पहिला interview होता, आणि तिला तो succesful करायचा होता, मंजिरी केबिन मध्ये गेली, आणि interview ला सुरुवात झाली
खूप वेळ झाला तिचा interview होऊन आणि तिला लगेच joining च letter दिल
मंजिरी मनातून खूप खूष होती, तिला असं वाटतं होत की आपण हि बातमी कधी देतोय शुभमला , तिने कॉल करण्यासाठी मोबाइल हातात घेतला पण नंतर तिच्या मनात आल कि आपण घरी काहीतरी गोड पदार्थ घेऊन च त्याला surprise द्यावं म्हणून तिने मोबाइल ठेवला आणि घरी जायला निघाली, शुभमने सांगितलं होत की त्याला एका important कामामुळे घ्यायला येता येणार नाही मंजिरी बसमध्ये बसली आणि तिला कधी आपण हि गोष्ट सांगतोय असं झालेलं, त्यात हे ट्रॅफिक खूप लांबणीवर टाकत होत आणि त्यात मंजिरी चा धीर सुटत चालला होता
अखेर मंजिरी घरी पोचली, दरवाजा उघडण्यासाठी तिने चावी काढली, बेडरूमच्या दिशेने गेली आणि दरवाजा उघडला,तेव्हा पाहिलं तर शुभम एका मुलाच्या सहवासात होता,दोघे एकमेकांच्या खूप जवळ येऊन त्याचे ते चाळे तिच्या समोर जे होत होते त्याने तिला खूप किळस वाटत होती
त्या वेळी तिच्या कोणी तरी श्वास काढून घेतल असं वाटत होत, मंजिरी पूर्ण सुन्न पडली होती, तिचे हात पाय थरथर कापत होते,