माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ६ शेवट PrevailArtist द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ६ शेवट

अखेर मंजिरी घरी पोचली, दरवाजा उघडण्यासाठी तिने चावी काढली, बेडरूमच्या दिशेने गेली आणि दरवाजा उघडला,तेव्हा पाहिलं तर शुभम एका मुलाच्या सहवासात होता,दोघे एकमेकांच्या खूप जवळ येऊन त्याचे ते चाळे तिच्या समोर जे होत होते त्याने तिला खूप किळस वाटत होती
त्या वेळी तिच्या कोणी तरी श्वास काढून घेतल असं वाटत होत, मंजिरी पूर्ण सुन्न पडली होती, तिचे हात पाय थरथर कापत होते, हातातला मिठाईचा बॉक्स पडला तेव्हा शुभमला कोणीतरी आलय ह्याची जाणीव झाली तो स्वतःला सावरून
मंजिरीच्या पुढे आला तेव्हा तिने त्याला जोरात बाजूला ढकलून दिल, आणि रडत रडत हॉल मध्ये आली,

मंजिरीला स्वतःचा इतका राग आला होता की , तिला खूप रडायला आलं, शुभम समोर आला तेव्हा त्या मुलाला पाहून तिने शुभमला त्या मुलासमोर कानाखाली दिली आणि त्याला विचारलं," का ...मीच का शुभम माझ्यासोबतच का हे असं...??"
ती खूप किंचाळून बोलत होती त्याचा शुभमला राग आला, तीच तोंड बंद कराव म्हणून त्याने तिचे तोंड हातात घेतल नि बोलला "कारण मी नाही राहू शकत ह्या शिवाय मला तुझ्या मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता पण घरच्यांचा जबरदस्तीने मला हे करावं लागलं फक्त घरातली प्रॉपर्टी मला मिळावी म्हणून मी तुझ्या सोबत लग्न केले"

मंजिरीची खूप कोड्यात पडली अशी अवस्था झाली होती "अरे पण मीच का...? तुझं हे असं आहे हे घरच्यांना सांगायचं तरी ना "

शुभम: "कस सांगणार होतो सांग हां.... मला पाहिलं सांगून आलेलं स्थळ हे तूच होतीस आणि मी लगेच होकार दिला मी तुला right time आल्यावर हे सगळं सांगणार होतो पण तुला हे असं कळलं तेच बरं झालं, मी असाच आहे आणि ह्यात मला काही वाईट वाटत नाही"
शुभम हे बोलताना एका सिगारेटचा भुरका तिच्या तोंडावर उडवतो आणि त्या मुलाला आपल्या जवळ आणतो

मंजिरी ची खूप वाईट अवस्था झाली असते, तिला हे सहन होत नसतं, ती आईबाबांना कॉल करण्यासाठी मोबाइल हातात घेते तेवढ्यात शुभम तिला एक कानाखाली मारतो, ती टीपॉय वर डोकं आपटून पडते, तिच्या दंडाला जोरात पकडून तिला खेचतो एक-दोन कानाखाली देतो तेवढ्यात तिच्या ओठातून रक्त येत आणि तिचे केस जोरात धरून बोलतो " तू जर घरी हे सांगितलं तर तुझ्या घरच्यांचं काय खरं नाही तुला एक गोष्ट माहितीय काय एक दिवस तुझा भाऊ पियुष पोलीस स्टेशन ला आला होता drunk च्या केस मध्ये मी सोडवलं होत, मला आता जर वाटलं तर मी आता त्याला एका वेगळ्या केस मध्ये अडकून त्याच आयुष्य उध्वस्त करू शकतो
पुढे अजून एक तुझ्या आईला अचानक बर वाटत नव्हतं कारण मी तिच्या चहात विष मिसळलं होत आणि ते जर हे केलं नसत तर तुझ्या सोबतच good looking,caring husbund चा 'किताब मिळाला नसता म्हणून म्हणतोय, जरा जपून अग उगाच स्वतःला त्रास करून का घेतेस हां"

मंजिरी काही बोलण्याच्या स्थितीत नसते तिला आता काही करायची ताकदच नसते कारण तिच्या शरीरापेक्षा तिच्या मनावर खूप मोठा घात झालेला असतो,

शुभम पाणी घेऊन येतो आणि तिला जबरदस्तीने पाणी पाजतो आता तिला त्याचा स्पर्शचा पण किळस वाटत होती,
शुभम," हे बघ ऐक मी तुला एक चांगली ऑफर देतो तू काही नाही कारायचस फक्त इतकं कर आपण आहोत तसेच राहूया कोणाला काही कळून द्यायचं नाही,तुला काय हवं ते तू कर पण माझ्या आयुष्यात मध्ये अजिबात यायचं नाही,त्याचा मला राग येतो,
तिच्या गालावर हात फिरवून गरम फुंकर मारतो तिच्या जखमेवर अजून तिला त्रास होतो
बघ ना तुला किती लागलंय
त्याचा हात झटकते मंजिरी
तुला फक्त बस एक वर्ष करावं लागणार बस्स कारण मला तर पैसे मिळणार आहे तो पर्यंत कळ काढ,त्यानंर मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईल खूप दूर कळलं, हे डील मंजूर आहे काय तुला..??
मंजिरीला अजून हे काही नको हवं होतं ती ह्या डीलसाठी मंजूर झाली.
त्या नंतर शुभम त्याच्या सोबत असलेल्या मुलाला घेऊन तो बेडरूम जातो, बेडरूम चा दरवाजा लावण्याचा आवाज ऐकल्यावर ति भानावर येते , तेव्हा मंजिरी ढाईमोकलून रडते
अगदी कोण गेलय अशीच रडते तिला असं वाटत आपल आयुष्य आता कोणत्या वळणावर येऊन राहिलाय कि काय करावं सुचत नव्हतं, ह्या विचारात तिला कधी झोप लागली तिला कळलंच नाही

सकाळ झाली तेव्हा दरवाजाच्या आपटण्याचा आवाज आला तेव्हा मंजिरीला जाग आली पण आज तीला कालच्या प्रहाराने उठल जाता येत नव्हतं आणि तीच अंग साथ देत नव्हत खूप त्रास होत होता, घर अस्ताव्यस्त पडलं होतं, आज शरीरात कणकण भरली होती, मनाशी ठरवलं तरी तिला तिची हालचाल करता येत नव्हती, कारण आता मन पण खूप थकलं होत, डोळ्याच्या कडेतून अश्रू वाहत होते आणि ते थांबत नव्हते, फक्त आवाज येत होता तो घडाळ्याच्या काट्याचा, उठायला जाताना अंगातून कळ गेली आणि मंजिरी पुन्हा जमिनीवर पडली, आता तिला स्वतःच अंग पण नीट सावरता येत नव्हतं, ती अशीच जमिनीवर पडून राहिली,हळूहळू हे असं आयुष्य कोणामुळे झालाय ह्याचा विचार करत होती तिला पहिले आई आणि बाबा आठवले, मग तिचा दादा

आईबाबांनी जर लग्नासाठी फोर्स केला नसता तर मी आज चांगले राहिले असते , पियुषने रात्री झालेल्या घटनेबद्दल सांगितलं असतं तर तेव्हा मी काहीतरी केलं असतं, मला फक्त चांगली बाजू दाखवली, बस आज मी helpless झालेय स्वतःचा राग यायला लागला आहे ,

मग मंजिरी स्वतःशी ठरवलं की," शुभम ने दिलेल्या डील आपण accept करूया,
आहे तसा दिवस धकलूया,
नाही त्याच्या मध्ये जायचं असं समजुया आपल्या आयुष्यात हे मिळालेलं एक मोठं challenge आहे , आता रडायचं नाही बस स्वतःला स्ट्रॉंग करायचं रडून वीक करायचं नाही,
मंजिरी उठते आणि स्वतःच्या नव्या आयुष्याची सुरुवात करते, आयुष्यामधल्या नव्या challenge ला तोंड द्यायला उभी राहते आणि आपल्या कामाला सुरुवात करते
तिला कळलं होतं आता कोणाला दोष देऊन उपयोग नाही आहे ते accept करायचं...


(मनापासून खूप धन्यवाद माझी कथा वाचल्या बद्दल
तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर नक्की share करा,like kara, comment करा
माझ्या अजून असे नवी नवीन कथा येत राहतील नवीन कल्पना मध्ये )