A moth and Lights books and stories free download online pdf in Marathi

शमा आणि परवाना

कामचुकारपणा त्यांच्या रक्तात नव्हता तरी तो तिथं मनापासूनं काम मात्र करत नव्हता, आता पण तो डेक्स सोडून, बाहेर आला, तिथं जवळजवळ पाचशे कर्मचारी कानाला ते मोठालेवाले हेडफोन लावून समोरच्या कस्टमरला माहिती देण्याचं काम करतं होते, हयाचं मात्र अजिबात लक्ष नव्हतं, त्यांना दिवसाला दोनशे कॉल करणं कम्पलसरी होतं. हा मात्र नेमकेचं एकशे सत्तरच्या आसपास करी, त्यांचा सुपरवायझर त्याला फटकारात असे, त्याला मेमो देण्याची भाषा करे, हा मात्र “हा ट्राय करतो” सांगायचा पण झाट काही ऐकायचा नाही, तिथं सकाळी नऊ ते संध्याकाळी सहाची डयुटी होती, एक ते दीड लंच टाईम, दोन टाईम चहा भेटायचा तो पिण्यासाठी अजून पाच मिनिट प्रत्येकी म्हणजे एकूण दहा मिनिट, याशिवाय टाॅयलेट (आता नव्याने म्हटलं जाणारं वॉशरुम) यासाठी जास्तीच जास्त दहा मिनिटं, अधिकची अजून इतर वायफळ जाणारी पकडली तर दहा झाली….एकूण किती साठ मिनिटं… म्हणजे कंपनीला अपेक्षित होतं तुम्ही कंपनीसाठी आठ तास पूर्णपणे दयावे, पण यांच असं नव्हतं तो ते सगळं नाईलाजाने करत होता…सतत तिथूंन काम चुकवायचा प्रयत्न करायचा, आज ही त्यानं तसचं केलं, सुपरवायझरची नजर चुकवून तो त्या लिफ्टच्या समोरच्या दरवाज्याकडे गेला, इमरजन्सी लिहिलेल्या त्या दरवाज्याच्या आतमध्ये पाय-या होत्या ज्यांचा कोणीच वापर करीत नसे, तो तिथंच त्या दरवाज्यापलीकडे जाऊन एकटाच बसायचा, तिथं त्याला बरं वाटायचं, त्याला तसं एकटं राहणं हायसं वाटतं होतं, त्याला सतत गावची आठवण यायची, “हे नाही करायला आलो इथं” असं सारखं वाटायचं, त्याला त्यांच्या गावाकडे असलेल्या आईवडीलाची स्वप्न पूर्ण करायची होती पण त्यासाठी इथं असं राबणं पटत नव्हतं, पण नाईलाज होता त्याला एका ओळखीच्यांनी नोकरीसाठी म्हणून आणलं होतं त्यांच्याच घरी राहणं होतं त्यामुळे महिन्याशेवटी त्यांच भाडं देणं होतचं, याशिवाय थोडें पैसे गावी पण पाठवायचे होते, इथं या कॉलसेंटरमध्ये इन्शुअरनच्या डिपार्टंमेटला होता, नुसतं आठ तास एकच घोकत बसायचं, वेगवेगळ्या माणसानां एकाच गोष्टीची माहिती दयायची, त्यांना पटवायचं आणि ऑनलाइन इन्सुअरशची पॉलिसी घ्याला लावायची, ही त्यांच्या शहरातल्या नव्या जॉबची सुरवात होती, डोकं कामाला लागलं होतं, तो त्या भाडयांच्या घरी जाऊन झोपल्यावर पण त्याला हेच इनशुअरनसची वाक्य आठवत बसायची, मध्येच झोपेत पुटपुटायचा….. लंच टाईमला जेवण आटपली की तिथंली पोर सिगरेट पियाला जायची, अजून हा तिथं रमला नव्हता….. नवीन असे खास मित्र कोणी बनले नव्हते…. त्यामुळे झुरका वैगेरे टाळलं…. आज पण त्या पाय-यापाशी तो नुसता कण्हत होता डोळ्याशी रुमाल घेत आसवं पुसत होता. मनातल्या मनात बोलायचा ”हे सगळं नाय करायचं…” त्याला सतत वाटे कुणीतरी यावं आणि सागवं “नको करु हे तुला नाय आवडत तर…भेटेल काही तरी नवीन….”.

इकडे सुपरवायझर यांच्या डेक्सपाशी आला… अर्थातच तो जागेवर नव्हताच…. त्या सुपरवायझरला त्यांची डयुटी करायची होती… त्यांची पण काही सेट टारगेट होती… तो सुपरवायझर हयांच्यावर नजर ठेवून होता….. त्यानं ठरवलं वापस पाच मिनिटांनी येवून बघायचं. तो गावाला काय काय वाचून इथं आला होता…त्याला शिवाजी महाराजाचं स्वराज्य आठवायचं…असं इथं चार भिंतीत कोढून घेत एका चाकोरीत आयुष्य काढायचं नव्हतं….इतक्या लवकर तो असा निसटू पाहत होता….हा चालू महिन्याचा पगार झाला होता…दयायचं का सोडून…पुढे काय करायचं माहित नाही…पण हा असा गुरफटायला लावणारा जॉब नाही करायचा…एकवेळ रस्त्यावर शेगंदाणे विकेन पण हा शर्ट पॅन्ट इन करुन एकसुरी जगायला लावणारा जॉब नको… आता जास्तच आसवं यायला लागली…आता त्यांच्या नाकातून शेंबूड पण यायला लागलं…डोकं काम करत नव्हतं…डोळे पुसत तो आता आजूबाजूला पाहत होता, त्यांने डोक्यावर बघितलं……हा तिसरा मजला होता….तिथं डोक्यावर स्लॅब होतं… सिमेंटचं छप्पर…… त्या डोक्यावरच्या स्लॅबवर तिथं उगाचच लांबलंचक टयूबलाईटस लावून ठेवलेल्या….प्रकाशित… आणि त्या प्रकाशाला आकृष्ट झालेला तो पंख असलेला कीटक…. तो कीटक उगाचच त्या टयूबलाईटला आपटत होता… त्याला आता ठरवायचं होतं की हा जॉब करायचा की नाही… त्याला पुढचं काहीच कळत नव्हतं पण एक कळालं होत की आयुष्यात हे असं कॉलसेटंरवालं काही नाही करायचं….आता रडून झाल्यावर त्याला बरं वाटत होतं… तिथला तो कीटक तसाच त्या टयूबलाईटपाशी असताना… त्या आडव्या टयूबलाईटीपाशी डोक्यावरच्या भिंतीनपाशी गुरुत्वाकर्षण खालती ओढत असताना पाय घटट त्या भिंतीला आटवून घेत चाललेल्या दोन पाली एकाचवेळी तिथं आल्या….त्यांची नजर तीक्षण होती…त्यांना तो कीटक हवा होता…इथं इतक्यात त्या कीटकांची पण त्या दोघाकंडे नजर गेली… त्या टयूबलाईटीच्या प्रकाशाकडून त्या कीटकाला काही भेटणारं नव्हतं…

इकडे पंधरा मिनिट झाली….सुपरवायझर डेस्कपाशी आला…आता काय…त्यांच्या तोंडात शिव्या होत्या… पण तो तिथं बोलत नव्हता इतकंच… तो तिथूंन वॉशरुमला गेला… एकूणएक तिथल्या संडासाचें दरवाजे चेक केले… नव्हता तो तिथं…”यांच्या तर आईची गांड हा गेला कुठे ?”, इकडे आता त्या कीटकाला बघण्यात याला इंटरेस्ट आला होता… तिथं अशे दोघे दोघे त्या कीटकाला खायला टपलेले असताना तो पुन्हा पुन्हा त्या टयूबलाईटच्या प्रकाशाकडे ओढला जात होता…का बरे?… हे सगळं बघत असताना या चालू घडामोडीचा कोणता अर्थ काढत तो आपल्या आयुष्याचा निर्णय घेणारं होता?… तो टयूबलाईटचा प्रकाश, त्या दोन पाली आणि तो कीटक… आणि यांना पाहणारा तो…. हा नेमंक स्वतःला असं काय समजणारं आहे?… हा ही नोकरी सोडणार का?… त्या दोन पालीपैकी एकीने त्या कीटकाला खाल्लं…त्याची ती गोष्ट तिथचं संपली..पण त्याचीं नाय….आता इकडे सुपरवायझर सीसीटीव्ही चेक करायला लागला….त्याला लिफटच्या समोरच्या दरवाजापाशी तो जाताना दिसला….सुपरवायझरच्या तोंडात शिव्या येत होत्या, आता तो बोलत सुटला “लवडया, मादरचोद, आयचा भोसडा…कॉलिगला बसायचं सोडून इथं झक मारतोय…चुतिया….तरी म्हणतं होते एचआरवाल्यानां हया फ्रेशरशना घेवू नका…आईघाल्यानां….” तो तिथं सीसीटीव्हीकडे बघत बोलत होता…आता तो त्या लिफटपाशी आला…..आणि काय त्यांने दरवाजा उघडला…त्यांचा निर्णय झाला होता..आता तो मुकाटयाने सगळी बोलणी खावून घेणारं की सुपरवायझरला काहीतरी सुनवत नोकरी सोडणार….

************************

त्याला वाटलं असतं तर तो तिथून उडुन जाऊ शकला असता पण निर्सगाने बनवलेल्या त्या शरीरात एक असं संप्रेरक सारखं उंचळबून त्याला त्या प्रकाशाकडे ओढत चाललं होतं…मानवानं आपल्यासाठीच्या शोधात जी प्रकाश तयार करणारी नवनवीन उपकरणीय साधन तयार केलीत त्यांचंही तितकचं भुललेपण या कीटकजमातीत टिकून होतं….त्याचं सारखं आपलं…त्या टयूबलाईटीपाशी आदळणं चालू होतं…हो हा त्या ज्योतीचा प्रकाश नव्हता…. त्या ज्योतीत खाक होण्याच्या हजारों कहाण्या होत्या. थोडया वेळात तिथं दोन पाली आपलं भक्ष्याच्या शोध्याच्या हेतूने त्या टयूबलाईटीपाशी आल्या. त्यांना हे असे सावज टिपण रोजचं काम होतं…. पण हे सगळं पाहणारा तो….. आज पहिल्यादां हे पाहत होता….. तो कीटक आपलं झेपावणं चालूच ठेवत होता. त्या पाली त्या टयूबलाईटच्या दोन्ही एका एका बाजूने पुढे सरकत होत्या. थोडयाच क्षणात त्या कीटकाला त्या पालीविषयी लक्षात आलं, पण त्याला ती टयूबलाईट सोडवत नव्हती… हे नेमकं कश्याच आकर्षण होतं प्रकाशचं की मोक्षाचं… इतकं ओढून जाण्यासाठी या कीटकाचं प्रेरणास्तोत्र काय असेल…? असं उगाच कोणी आपला जीव धोक्यात घालून का बरं प्रकाशाकडे खेचलं जाईल…? काय करावं दयावी नोकरी सोडून….? असं तीळ-तीळ आतल्या आत जळण्यात काय ठेवलयं…. जर मरायचं तर समरसून जगून मरा… हे असं फुकाचं जगणं काय कामाचं… जर मरण अंतिम सत्य आहे तर असं रोज रोज मरणं का म्हणून… तू तर काहीतरीच भेकडं निघालासं! तुझ्यापेक्षा तो कीटक बरा जो खुल्यादिल्यानं प्रेम करतो त्यांच्या तश्या असण्यावर…. जे आवडत त्यात गुंतवून घेतो, त्याला आपल्याच स्वतःचा साक्षात्कार झाला, त्या दोन पालीपैकी एकीने त्या कीटकाला गटटम केलं….तो आता त्या पाय-याजवळचा दरवाजा लोटत बाहेर येत होता तितक्यात सुपरवायझरच तिथं आला… त्यांच्या काळजात धस्स झालं.. पण मगाशी मन एकवटून घेतलेला निर्णय त्याला तोंडानी बोलायचा होता… तो आजच ‘आन द स्पॉट’ राजीनामा देणारं होता… तो काही बोलायच्या अगोदर तो सुपरवायझर शिव्या देत सुटला…. थोडयावेळात तो निमूटपणे त्या डेक्सवर काम करताना दिसत होता.. सुपरवायझरचा राग शमला होता…

************************

तीन साडेतीन वर्षानंतर तो आता सुपरवायझर झाला होता…तो आता त्या दरवाज्यापाशी एका दुस-या ‘तो’ला शोधत तिथं गेला…. तिथं तसाच एक कीटक… दोन पाली… आणि एक तरुण मुलगा होता.

************************

-लेखनवाला

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED