Other side Life books and stories free download online pdf in Marathi

पलीकडलं जगणं

झोपडपटटीच्या त्या शेवटच्या कोप-यातल्या गल्लीतील चाळीत माझ्या घराला लागून सातवी खोली… सुमार आणि मोडकळीस आलेलं ते घर, सताड उघडा दरवाजा, एक झाप बंद असलेल्या खिडकीपाशी एकटक समोरच्या रहदारीच्या रस्त्याकडे त्या अशाच आशाळभूत नजरेने एकटयाच वाट पाहत बसायच्या. मी हल्लीच त्यानां पलीकडून बघायला लागलो होतो. पूर्वी वेळ नसायचा आता मी निवांत होतो. वयाच्या सत्तरी उलटलेल्या सुरकतलेल्या चेह-यावरचे निस्तेज भाव, वाढलेल्या साधेंदुखीमुळे नीटसं चालता न येणं….खोकला होताच दिमतीला…. सार काहीं आता मरणाच्यां दाराशी नेण्यास भर घालणार… आणि त्यात आजूबाजूचं भकास एकलंकोडं वातावरण….अजूनच मन खायला उठायचं आजीचं… मायेची म्हणावी अशी माणसं, नातेवाईक कोणी नव्हतं या म्हातारपणात विचारपूस करायला…सांभाळ करायला… आपल्या तब्येतीच्या पाऊलखुणा जपत जीव जगवणं तेवढं चाललं होतं… नाही म्हणायला चाळीतल्या लोकांची मदत होती पण ते तरी किती आपुलकी दाखवणार?… लोकांना आपली काम असतात… खिडकीसमोरच्या रस्त्यापाशी मागची अनेक वर्ष त्यांच्या ‘अहो’च्या येण्याच्या आशेवर काढली होती…. न सांगता कधी ऐके काळी जो नवरा कामावर गेला तो परत आलाच नाही…. पण तीला विश्वास होता तो परत येईल…. लोकांनी तीला हजारदा समजावलं पण नाही !…. अर्थात इतक्या वर्षात खरचं त्यांच्या अहोचा सुदधा खरंच मागमूस नव्हता… पण तीला आशा होती नव्हे श्रध्दा होती तो परत येईल….आजही अशीच खोकल्याची उबळ तीलां एका जागी स्वस्थ बसू देत नव्हती….पण मनही आतून बैचेन होतं…काही तरी हरवलं होतं… जे अजून तरी इथेच कुठेतरी गवसेल…अशी आशा होती… पण आता कुठेतरी खोलवर मनाच्या तळात काहीतरी समजण्या-उमजण्याच्या पलीकडे होत होतं….काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटत होतं…. खोकल्याची उबळ वाढतचं होती…तिच्या खाकरण्याचा आवाज आता अख्या चाळीभर ऎकू येत होता. आजूबाजूच्या इतर शेजा-यांना तीची काळजी होतीच…. म्हाता-या लोकानं बदलचीं सहानूभूती, पुण्यकर्म वैगरे सारं काही… “एकदा का आजीबाईनी डोळे मिटलें की बरं होईल…! हे हाल आता बघवत नाहीत… नरकापेक्षा हाल कमी आहेत का इथ म्हातारीचें?, दोन हार्ट-अटैक येऊन गेलेत… काय करते म्हातारी देवाला ठाऊक ?… बाईचं नशीबचं फुटकं लग्न झाल्यावर आई होण्याचं सुख नाही की म्हातारपणात सुखा-समाधाननं मरण नाही” लोकं पाठून काही-बाही बडबडायाची… मी तरुण जरी असलो तरी आता माझ्या हाती काही राहिल नव्हतं…. त्या दिवशी दुपारी मी त्याच वाटेने चाललो होतो… त्यांच्या रुमपाशी… दरवाज्याजवळच उभा होतो, जाता-जाता म्हटलं एक हाक मारावीच आजीबाईला…. म्हटलं चौकशी करु सहजच…. “आहेत का बाई घरात…..” सगळे बाईच म्हणायचे तिला… “अरे… ये… आत मध्ये…तुला तर सकाळी दवाखान्यात नेला होता ना रे….काय वाटतं होतं…तुला?….” विसकटलेल्या केसाचां झुबका सावरतं एक-एक पाऊल सावकाश टाकत बाहेर आली…. नाहीतरी तिला कोणीतरी हवचं होत सांगायला….काहीतरी सागंण्याची तलब तिच्या हातवा-यावरुनचं दिसत होती…. “औषधपाणी संगळ घेतायना वेळेवर…” मी आपलं दारावरती उभं राहून विचारलं…. “अरे आत ये…नाव पण विसरले बघ.” ती आपला घसा साफ करत म्हणाली….मी अजूनही उंब-याबाहेरच होतो… “घेताय ना औषधं…” पुन्हा एकदां विचारलं…. “घेतेयं….औषध….! अरे मला की नाही आज सकाळी आमचे हे दिसले बिल्डींगबाहेरच्या रस्त्यावरं….” ती सांगत सुटली…. घसा काही खवखवणं बंद होतं नव्हतं….मी आपली एकनजर समोरच्या खिडकीच्या दिशेने वळवली खरी… तीचं हे नेहमीचचं पालपुदं होतं…सगळ्या लोकांना अशीच सांगायची…लोकहीं मग बाईचं डोकं काही ठिकाणावर नाही हे समजून तिथून निघनूचं जाणं पंसत करायची. “मला पणं दिसलं तसलंच कोणतरी…. तिथं रस्त्यापलीकडें, पण काही ओळख पटली नाही नीट…. मी स्वतः जावून आलो…” मी म्हंटल. म्हातारीला वाटलं मी चेष्टा करतोय. मी तिथूनं निघून जाणचं पंसत केलं…..बिचारी म्हातारी वयं झालं होतं ना….

आता मात्र रात्रीपर्यंत त्या भागात जास्तच गर्दी जमली होती… बाईच्या खोलीपासून सहावी का सातवी खोली…. मयत आणार होते बहुतेक रुग्णवाहिकेतून.. जाणा-या-येणा-या प्रत्येकाला येऊन ती हेच सांगत फिरायची “….आमचे अहो रस्त्यापलीकडे उभे आहेत….. मला जाणं शक्य नाही होणारं… तब्येतमुळे … तुम्ही जाऊन घेऊन येता का…?” लोकांना कळकळीने विनंती करायची… काही लोकं तुच्छतेने बघायची… काही आपली चेष्टेवर नायची…काहीनां तीच्या अश्या बोलण्यामुळे तिची दया यायची…. लोकांनी त्या मयताची खबर अदयाप आजीला कळवली नव्हती… आधीचं हार्ट पशेंट ती… रात्री बाराच्या सुमारासं आजीच्या खोलीतून जोरात किचाळण्यांच्या आवाज येतं होता… लोक तर जागे होतेच… तब्येत खूप नाजूक झाली होती बाईचीं…. शेजा-यांनी बाईला हॉस्पीटलमध्ये एडमिट केलं. सर्वच शेजा-यांनी आशा सोडली होती…. मी मन मोठं करुन त्याच्या सलाईनसह निपचित पडलेल्या देहाकडे एकदाच डोकावून पाहिलं…हिमंतच नाही झाली… डॉक्टरनेही आशा सोडली होती…हॉस्पीटलच्या व्हरांडयात चाळीतली खूप सारी लोक जमा झाली होती… “काय बाई अक्रित एका दिवशी आधीच दुपारी एक मयतं झालं चाळीत, ही तर म्हणायाला…म्हातारी हायं…पण त्या रवीचं तर वीस वय होत ना…बिचारा किती मेहनती होता मुलगा…कधी घरी नसायचा.. कामाला जावून रात्रीच्या कॉलेजला जायचा, कोणा मेल्याची नजर लागली कोण जाणे ?…. त्या रवीच्या आईने दुर्लक्ष केलं… बाईच्या मरणानंतर रुम चाळीच्या नावावर कशी करायची….नवरा एवढया वर्षात कधीच कसा आला नाय…?आणि उदया आला तर?” यां एकनाअनेक चर्चांना उधाण आलं होत.

बाई परतल्या. दिसत तर अगदी पहिल्यासारख्याच होत्या अंगाने… पण चालत होत्या… खोकलाही नव्हता…. आणि चेह-यावर आंनद होता, खरंच इतक्या दिवसानंतर आज पहिल्यादां खूश होत्या….अगदी मनापासून….कारण ही तसचं होतं…त्यांचे अहो त्यांच्यासोबत होते…आपला हात त्यांच्या हातात टाकत…खरोखर आज तहान भागली म्हणायला हरकत नव्हती चातकाची…. शेवटी तारु लागलं एकदा किना-याला…बाई आपल्या नव-यासोबत समोरच्या बिल्डींग पार करुन चाळीपाशी येऊन थांबल्या माझ्या घरापासून सातवी रुम… खोली खुलीच होती…येणारा-जाणारा खुशीत होता…पण त्यां दोघांच्या येण्याचं कौडकौतुक कुणालाच नव्हतं. दोघांना कोणीही ढुकूनंदेखील पाहत नव्हतं… घराच्या आतल्या भितीचां रंग बदलला होता…सगळं घर सजवलं होत…आजींचा नव-याच्या हातातला आपला हात सुटतच नव्हता… त्यांना फार भरुन आलं होत….प्रतिक्षा संपली होती… पण हे कायं घरात वास्तूशांती !… कोणीतरी जोडपं बसलं होत… “माझ्या घरात काय चालय हे… अहो तुम्ही बोला काय तरी यांना…थांबवा…यांना…” तीं जोरजोरात ओरडत होती… थांबवू पाहत होती सार काही…. पण नाही… कोणी ही थांबायला तयार नव्हतं… शेवटी बाईच्या अहोनी त्यांना रोखलं “….सावरा स्वतःला…. भानावर या, तुम्ही आता या जगाचे भाग नाही आहात…इथल्या आपल्या खाणाखूणांना केव्हाच पुसल्या गेल्यात…आता आपण पलीकडच्या जगाचा भाग नाही राहिलो…” त्यांनी आपलं एक बोट समोरच्या आरशाकडे नेत….बाईना बघायला सांगितलं…बाई दिसतचं नव्हत्या आरश्यात. त्यांनी बाईच्या कानात हलक्या आवाजात काही तरी पुटपुटल्या… लोक आपल्याला आता “भूत” म्हणतात… इतक्यात त्यांनी खिडकीपलीकडे माझ्या दिशेने हात करत हयाचं जगणं माझ्या नंतर काही तासानीं सुरु झालयं असं म्हटलं. एकाकी बाईना जाणीव झाली या अलीकडच्या जगाची. आणि काय आश्चर्य शेवटी बाईनी मला नावासकट ओळखलंच “…..अरे रवी तू….! ! !”.

-लेखनवाला

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED