अपूर्ण... - भाग ६ Harshad Molishree द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण... - भाग ६



सकाळी हरी ठरवल्या प्रमाणे लवकर ऑफिस ला गेला, आणि संध्या ची फाईल त्याने मागून घेतली आणि त्या वर कामाची सुरवात केली... सगळं करता करता दुपार झाली तेव्हाच हरी च्या मोबाईल ची रिंग वाजली, ईशा चा फोन होता

"Hello.... बोल"

"Busy आहेस का"....??? ईशा

"हो थोडं काय झालं बोल ना"....

"काही नाही तुझ्या ऑफिस च्या खाली उभी होती.... फ्री असलास तर कॉफी प्याला जाऊया"..... ईशा

"बरं ठीक आहे, येतो मी १० मिनिट्स".... हरी

ईशा हरी ला कॉफी house मध्ये घेऊन आली, दोघे पण बसले होते तेव्हाच ईशा ने विचारलं.......

"हरी काय झालं, तू इतका शांत का आहेस"....

हरी बोलला..... "काही नाही शांत कुठे मी"

"अच्छा बरं"...

"ईशा एक विचारू अचानक मध्ये काल खूप काय घडलं ना, अच्छा बरं आठवलं, काल तू बोलीस की तुझ्या घरी माहीत आहे, हे कधी झालं"....

ईशा थोडी लाजली आणि बोलली...
"पर्वा जेव्हा तुझा कॉल मी कट केला, आई मागे उभी होती, आईने आपलं बोलणं फोनवरचं ऐकलं, मग जेव्हा आईने मला विचारलं तेव्हा मी सगळं आईला सांगितलं.... infact तुला माहीत आहे आई सगळं ऐकून खूप impress झाली, आईने शेवटी आईच्या बोलण्यावर मी तुला हिम्मत करून मेसेज केला आणि भेटली"... ईशा

"संध्या"... हरी मधेच बोलला, ईशा काय बोलते त्यावर हरी चा लक्ष नव्हतं

"काय बोललास संध्या.... ही कोण आहे संध्या"..... ईशा

"काही नाही ईशा, ऐक मला एक urgent काम आहे मी निघतो संध्याकाळी भेटूया".... हरी तिथून उठून निघून गेला

हरी फटाफट ऑफिस मध्ये आला संध्या ची file घेऊन तो सरांचा केबिन मध्ये गेला...
"Sir may i come in"... हरी

"हां yaa come in".... सर

"Sure sir"... हरी

"आज सकाळ पासून ह्या एका फील वरच काम करत होते तुम्ही, काय झालं anything personal or what"....???

"Yess sir, माझी जवळची मैत्रीण होती ती file सर दोन महिन्यांपासून अडकली आहे file so"..... हरी

"Oook let me check"..... सर

हरी file ठेऊन निघून गेला, आणि संध्याकाळ पर्यंत चेक रेडी झाला.... जास्तच चेक हातात आला हरी खूप खुश झाला

"आता अजून उशीर नको करायला, मीच जाऊन चेक देऊन येतो स्वता".... हरी ने मनातच ठरवलं

आणि हरी संध्या च्या घराचा पत्ता घेऊन निघाला....

४.३0 झाले होते हरी संध्या च्या घरा बाहेर थांबला होता... घराच्या इथं पोचताच त्याचे हात पाय थंड पडले, हरी जसा तसा घरा च्या दारावर येऊन थांबला...

दार उघडाच होता, हरी ने हाक मारली.... "कोणी आहे का".... हरी

सांध्याची छोटी बहीण तितक्यात आली... "हां एक मिनटं"

पण तिने जसच हरी ला बघितलं, ती बोलली... "तुम्ही" आणि ओरडून
तिने बाबांना हाक मारली.... "बाबा"

हरी shock झाला की ही त्याला काशी ओळखते....
"तुम्ही मला कसं ओळखता".... हरी

तितक्यात संध्या चे बाबा तिथं आले.... संध्या च्या बाबांनी जसं हरी ला बघितलं बोलले

"तू इथं, तुझी हिंमत कशी झाली इथं यायची, निघ इथून"....

"अरे काका, तुम्ही काय बोलताय ऐका तर मी"....हरी

पण संध्या चे बाबा काहीच ऐकत नव्हते.... हरी ला त्यांनी धक्के मारून घराच्या बाहेर काढलं आणि दार बंद करून टाकलं

हरी ला काहीच समजत नव्हतं की काय करावं, जे काही घडत होतं त्याला काहीच कळत नव्हतं की काय आणि का होतय....

हरी ने पोलिसी ची चेक, दाराच्या खालून आत टाकली आणि खाली उतरला....

काय कशे लोक आहेत, हरी असं म्हणत जात होता तेव्हाच ईशा चा फ़ोन आला....

"कुठे आहेस तू कधीची वाट बघते मी".... ईशा

"ईशा ऐक घरी जा उद्या भेटूया, जरा कामात आहे मी".... हरी

"कामात म्हणजे कुठे आहेस".... ईशा बोलताच होती आणि हरी ने तिथून फोन ठेवून दिला हरी जे काय आता झालं त्याचा विचार करत होता... तेव्हाच त्याला बाबांचा फोन आला....

"Hello".... हां बाबा बोला

"हरी कुठे आहे तू , मूर्ख कुठला एवढं सगळं करून तुझं पॉट भरलं नाही का".....

"बाबा काय झालं"....

"तू संध्या च्या घरी का गेला होता"....

"हो बाबा मी ते, बाबा एक मिनटं तुम्हाला कसं माहीत मी संध्या च्या घरी गेलो होतो..... संध्या, संध्या ohhhhhhh shitttt".…..

हरी ने फोन ठेवला आणि एका क्षणा साठी शांत झाला, हरी ला घाम फुटू लागला, त्याचे हात पाय थंड पडले अचानक घसा पण सुखला.....

"No no no.... यार".... हरी पटकन फाटक जवळ पोचला आणि पट्टरीवर येऊन जोर जोराने ओरडू लागला.....

"संध्या, संध्या..... आआआ"....

तेव्हाच समोरून गाडी आली हरी स्वतःला वाचवण्यासाठी फिरला आणि पाय सरकून तो पट्टरीच्या दुसऱ्या बाजूला पडला....

गाडी वेगाने निघून गेली.... हरी रडू लागला जसं तसं उठून उभा रहायला आणि परत जोरात तो ओरडला.... "संध्या please यार संध्या"....

हरीला च्या डोक्यावरून रक्त येत होतं.... तो रडत रडत जोर जोरात संध्या ला हाक मारत होता, इथं एक बाजूने गाडी जाता होती....
पण संध्या काय आली नाही.....
------------------------------------------------------------------- To Be Continued --------------------------------------------------------