lazyism Four pieces and One Joint Hand - 8 books and stories free download online pdf in Marathi

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 8

तुमची ओळख: राहणीमान आणि सदयपरिस्थिती (काळ: निवडणुकीसंबधी घोषणा सुरु होण्याअगोदरचा)

संध्याकाळच्यावेळी पटरीवरच्या चहावाल्याला उगाच हात दाखवावा, त्यानं तुमच्या ऑर्डरचा इशारा समजावा, तुम्ही तितक्यात तिथं पोहचावं, चहाचा ग्लास हातात दयावा, थोडयावेळाने त्यांनं उधारीचा विषय काढला की “लिहलं आहेस ना माझ्या खात्यावर बास”, म्हणत बाजूच्या पानपटटीवालाकडनं एक सिगरेट घ्यावी ती पण उधारीवर, एका हातात चायचा कप दुस-या हातात झुरका सोडत शेगलेली सिगार, डोकं काम करायला लागलयं, आजूबाजूचं वातावरण नकळत बदल्यासारखं वाटतं, कुठल्यातरी अंधा-या खोलीचं दार करकर करत उघडावं आणि नवा प्रकाश आल्यासारखं वाटवं, असंच होत सिगेरट ओढल्यावर, लगेच घेतलेले सगळे निर्णय बरोबर वाटू लागतात, कश्याचाच पश्चाताप होत नाही, बरोबर केलं आपण प्रत्येक निर्णय बरोबरच होता, साला नशीब नव्हतं, पण आपण करेक्ट होतो पण आता जॅक लागेल, हा डाव सोडायचा नाय, कुठं हया नसत्या रोजच्या झंझटी करत बसायच्या, शर्ट इन करत जॉबला जायचं, आफिस बॉय कारकूनची नोकरी करायची, नुसती झंडगिरी, लुकेगिरी, इकडचा चेकबुक आण, चेक वटवं, त्या साहेबाच्या टेबलावर चाय ठेव, ही फाईल त्याला नेऊन दे, सिगरेटचा अजून एक झुरका जातो, हातातला चहाचा ग्लासही संपतो, चायची तलप गेली पण तिचा कडकपणा भिनायला लागलाय, करायचं का प्रपोजल एक्सेपट, धंदा नवा कोरा आहे, अशे पन्नास कमवायला दहा महिने जातील, इथं एकदा काम तमाम लगेच पैसे घ्यायचें, आपला कोण वाली नाय, आपण कुणाला बांधील नाय, संशय यायला आपण काय या कामात आधीपासून नाय, चेहरा तर भोळाभाबडा हाय, तसा ही स्वभाव अबोल, त्यामुळे संशय यायचा सवाल नाय, आपण कुणाच्या अधात नाय नी मध्यात नाय, शोधत बसतील पोलीस, तपास करत काय फरक पडतोय? “च्यायला मस्त पार एका सामासूम गावात थंड हवेच्या ठिकाणी बंगल्यात राहायची सोय, अजून काय, आणि आलचं प्रकरण चव्हाटावर तर थोडं दिवस होईल इकडं तिकडं बबल, मग काय लोक आपल्या कामाला आणि आपण आपल्या, हल्ली आळसवादाबदल वाचायला लागलोय, कळतयं थोंड थोंडसं” हे सगळं अंगावर येणारं जरी असलं तरी तुमची तयारी झाली होती पण अजून एकाची संमती बाकी होती, तुमच्याचं आतल्या माणसाची,

तुमचा परिचय

पस्तीसला आलेले वय, घटस्फोट घेवून माहेरी गेलेली बायको, इतर नातेवाईक नाहीत, आई बाप दोघेपण वारलेत, सिएसएमटीला(जुनं सीएसटी…..त्याहून जुनं व्हीटी….) तिथं शूटिगं रेंज मध्ये कामाला, आफिस बॉय म्हणून, आता आठ वर्ष होतील, तिथं काम करता करता शूटिगं शिकलात आता तुम्हाला एकदम परफेक्ट येतं निशाण्यावर बंदूक रोखून मारायला, तुम्ही असे ही वैतागला होता रोजच्या जगण्याला, तुमच्या उजव्या खिश्यात बंदूक होती, तुमच्या आतल्या माणसाने होकार दिला होता बहुतेक, बना ना बातमी, ठोका दोन चार लोकांना, का सगळं इतर लोकानींच करायचं, नाय वाटतं का हे असं रुक्ष रुक्ष जगणं सोडून दयावसं, आणि त्यांच्यातल्या नव्या माणसाने जुन्या माणसाला संपवला.

भाऊच्या माणसांशी बोलणं झालं, बाकी बोलणी पक्की झाली, मारलं की पन्नास हजार भेटणार, पार भाऊच्या खेडयात तिकडं बंगल्यात राहायची-खायची सोय, संशय वैगेरेचा प्रश्नच नाही. सगळीकडे संटिग आहे भाऊची, आणि तसचं काय झाल तरं भाऊ सोडवतील,

भाऊचा माणूस आला, ज्याला मारायचा त्याचं नाव सांगितल, पण तो काय करतो, त्यांचा नी भाऊचा काय संबध, कश्यासाठी म्हणून मारायचं, काही काही माहिती नाही, फक्त मारायचं, बाकी पहिल्या लाईफपेक्षा वेगळं होतं, तिथं सकाळी उठून कष्ट करावे लागणार होते इथं एक काम मग आरामच आराम, मस्त…..या असल्या स्थानिक निवडणुकीची पार खोलवर रिपोटिगं नाही करत मिडिया, हा! जो पर्यंत काही सिरियस मॅटर होत नाही, म्हणजे मारामारी खून वैगेरे, आणि त्यांची देखील आता सवय झालीय .....

**********

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED