आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 11 Lekhanwala द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 11

तारीख बावीस डिसेंबरच्या अगोदरची

सकाळी सकाळी

बातमी वा-यासारखी पसरली, भाऊ एरियात आला, त्यांच्या बरोबर तीस-चाळीसजण होते, भाऊच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती तो एकदम गुरगुरतच बोलला “भेनचोद कोणतो अपक्ष लढतोय, आईझावाडया बाहेर ये आधी, मादरचोद तुम्हाला खायला भेटत म्हणून तर लयं माज आला काय, मला एरियातला एक मत पण अपोजिट पार्टीला नकोय, आणि एवढी कसली झाटयाची आपली गाजवता रे, त्या लवडयाला सांगा जिथं कुठं असेल तिथं चालता हो इथून, वन्टास चल फूट इंथून नाहीतर गेम होईल आणि जरा जवानीचं रक्त असल्याकारणं जरा जास्त वळवळत असशील तर एरियात विचारुन घे एकदा आपण काय चीज आहे म्हणून, बापला बाप नाय बोलत इलेकशनच्या टाईमाला, तुझ्यातले सुलेमानी रेहमानी किडे जरा जास्तच वळवळायला लागले वाटतं, हजार हजार रुपये वाटतो काय” एवढयात एकाने शहाणपणाने हळूच कॅमेरा सुरु केला मोबाईलचा, “मोबाईल घे रे त्यांचा, कॅमेरा बंद कर भाडखाऊ“ भाऊंचा माणूस ओरडला, सुमेध घरात नव्हता, सुमेधच्या बाजूला राहणा-या माणसांकडे चौकशी केली, बायको-पोरांना गावी सोडायला गेलाय म्हणून सांगितलं त्यांनी “त्यांची आय घालतो मी, पोराबाळांना गावाला ठेवलाय ना…… बरं केलं, पण त्याला सांग…. याद राखं…. जर का अर्ज मागे नाय घेतलास तर…. गाव गाठायला पण कमी नाय करणार“ एरियात माणसं जमत होती तिथं एक दहशतीवाली शांतता तयार झाली,

भाऊला असा बघायचा मौका ब-याच दिवसांनी दिसत होता, एरियातल्या लोंकाना फुल फुकट मध्ये पिक्चर बघायला मिळत होता, पार पब्लिक जमली, एरियातल्या बायका पुढे पुढे करत आपआपसात पुटपुटत होत्या ”आपलं मत तर भाऊनांच, कोण यांच्या लफडयात पडेल, भाऊसारख्या माणसाच्य विरोधात जातो म्हणजे काय, लय डेंजर हाय भाऊ….. तीन तीन खून केलेत, दोन हाफ मर्डर, पहिला भाऊ पण इथंच राहायचा रिक्षा चालवायचा आणि आता तिकडं मेन रोडला बंगला हाय बघ तो हयायचा, आजकालची पोर काय ऐकातायत,” त्या भाऊसोबत आलेला एक माणूस बोलला “हे सगळं त्या धारीडाया बिल्डरने पैसा पोचता केलापासून चालू झालयं” “त्याला बघतो मी नंतर” भाऊ आता सुमेधच्या घराच्या गल्लीतून बाहेर आला, तितक्यात समोर बायकाच्या घोळक्याकडे बघतं म्हटलं, “काय मावशी आपली निशाण माहित आहे ना, दया वोट, लक्ष ठेवा” भाऊ गाडीत बसला. “आणि जर सध्याकाळ पर्यंतआपल्या कंट्रोल मध्ये मॅटर नाय बसला तर त्या नवीन पोराला घेवून ये बंगल्यावर यांचा विषयच क्लोज करुन टाकतो“.

तुम्ही आणि भाऊ

तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही मंजूर पण केलात, भाऊंच्या बंगल्यावर एकदा जाणं झालं, त्यांची खात्री पटली तुम्ही त्यांच्या कामाचा माणूस आहात यांची, आता तुमचा मुक्काम हॉटेलवर केलाय, पण तुम्हालां बघायचं होतं की सुमेध जांईन्ट किलर बनतो की नाही, तुम्ही तिथं 22 डिसेंबरला साईमंदीरापाशी येतचं नाही, सकाळी इकडे तिकडे फिरता आणि दुपारी बारा वाजता डायरेक्ट भाऊंच्या बंगल्यावर जाता, वॉचमन रोखतो, गेटवरुन वॉचमन आतमध्ये बंगल्यावर लॅडलाईनवरुन फोन लावतो, वॉचमन लॅडलाईन रिसिव्हर तुमच्याकडे देतो, “ये भाउखाऊ तूला इथं कुणी यायला सांगितलं, गांड फाटली तुझी कळालं मला ते” भाऊ भडकतात, तुम्ही आतमध्ये यायची परवानगी मागता, भाऊ परवानगी नाकरतो,

**********

**********

चौथा तुकडा – निकाल

हो लोकांनी बदल घडवला भाऊंना जे वाटायचं ते खरं ठरलयं, निव्वळ दिडशे मताच्यां फरकांनी अपक्ष सुमेध जिकूंन आला…… पार जल्लोष सुरु झाला, लोकामध्यें भाऊच्या त्या बिन्या मिशीवाल्या अवताराची जोरदार चर्चा होती…… सगळं काही सुटत चालल्यासारखं……

तुम्ही बदल बघितलायं, किमान आतातरी मारा सुमेधला उचला ती बंदूक…… ठोका त्याला, बना भाऊचे गुलाम पण भाऊ तरी तुम्हाला का जवळ करेल. भाऊंने सत्ता राखली होती, अभिनंदनाचा फोन सुमेधला भाऊ करण्याच्या तयारीत होता.

रेट करा आणि टिप्पणी द्या

Rajan Bhagat

Rajan Bhagat 2 वर्ष पूर्वी

शेयर करा