आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 9 Lekhanwala द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 9

तुमची बाजू

मला प्रस्ताव आला होता, एकाचा खून करणार का म्हणून, पैसे भेटणार होते, नोकरीत रस नव्हता मुळात, तरी मारुन मुकटून केली संसार करत होतोना….. मला आता असं जगणचं पंसत नव्हतं, बायकोचा घटस्फोट जाम डोक्यात गेला, आईझावडीला माझं घर छोटं वाटत होतं, माझी नोकरी छोटी वाटत होती, चांगला चोपला एक दिवशी, गेली माहेरी निघून रागाने, आणि एक दिवशी ठेवलेले (घटस्फोटाचे) डिव्हासचे पेपर समोर, झाला सगळा मॅटर स्लोव्ह, आता काय करते रांड तिचं तिला माहिती, कुठं कश्याचा पत्ता नाही, मी काय जगतोय, कसा जगतोय विचारायला कोणी नाही. या भाऊच्या माणसानें हेरला आपल्याला, बोलला भाऊसाठी काम करणार काय म्हणून. मी विचार करुन हो बोललो.

आता माझी सोय एका हाटेलात होती, लॉज मध्ये रुमवर गेलो, सारखी ती बंदूक न्हाळात होतो, भाऊच्या माणसांनी ज्याला मारायचं त्यांच्या एरियाचा पत्ता सांगितला, फोटो मोबाईलवर दाखवला, पत्ता आयवल्ली गल्लीतला, हा पार ईस्टचा एरिया इकडं कधी जाण झालं नव्हतं, फक्त ऐकून होतो, नावाला मुंबईत राहतो आपण, विनाकारण फिरण्याची काही गरजचं नसते ना, ना कधी ताज हॉटेल बघितला….. ना तो सी लिंक….. कोण उन्हातान्हात फिरत बसेल, ज्याला मारायचा त्याचां फोटो बघितला एकदम यंग दिसतोय.

भाऊच्या माणसाला पुन्हा एकदा खात्री करुन बघायचं होतं मी घोडा म्हणजें बंदूक कशी चालवतो त्यांची, हयाला ट्रिंगर बोलतात, हयाला हे असं पकडयायचं, असं नी तसं, नुसतं हो म्हणालो पण त्याला खात्री होत नव्हती, चांगला चार तास सराव घेतला, मग एवढं बंदूक चालवायला येते तर मग स्वतः का नाय करत हे सगळं, तो गेला निघून बोलला रात्री दहाच्या सुमाराला भाऊ येतील, आता कंटाळा आला बातम्या लावल्या भाऊ भाषण करत होता, पत्रकार विचार होता किती सीट निवडुन येतील, आम्ही निश्चित सत्ता राखू इथं पुन्हा पार्टीचा झेंडा फडकवू भाऊचं उत्तर तयार.

**********

सुमेधचा परिचय भाऊच्या तोडूंन

हा माणूस काय साधा सूधा नाय, तो पण बारा बोडाचा त्याला संपवल ना की त्यांच्या त्या भडव्या कार्यकत्याचीची पण जिरलं, मग कोण समोर येतो का बघ लढयाला, झवाडयांनी निवडणुक प्रतिष्ठेची करुन टाकली भिखंमागानी, अरे असं सरळ सरळ लढायला काय प्राम्बेल नाय, पण यांच्या बरोबर कोण वाद घालत बसेल, ते मिडियावाले चर्चासत्र म्हणे, ही धावती गाढव अंगावर नका घ्यायला लावू, माझ्याच इलाक्यात येवून मलाच प्रश्न विचारणारं विकास केलात का च्यायला, दोन दिवसांपूर्वी यांच्यातले दोघे पञकार आले होते, म्हणतात भाऊ तुमचा शब्द हवायं, त्या बिल्डर कडून कमी रेटने फलॅट विकत घ्यायला , आणि हे विकास केला का म्हणून विचारणार तिथं कॅमेरासमोर, अरे हे कोण झाटलीमन आम्हाला विचारणारे, अरे जनता नाय विचारत प्रश्न, अरे आपण प्रश्नच ठेवला नाय इथें, रस्ते आहेत, पाणी पण व्यवस्थित येतं एरियात आता, नवीन प्राईव्हेट हास्पिटल बांधू थोडया दिवसात, उडडाणपूलांची काम चालू आहेत, करतोय ना संगळ, आणि आम्ही कार्यकत्याला कधी दुखावला का सांग?, आता सगळयानांच तिकीटी कुठून देणार आणि आम्ही जरी नाव सांगितली तरी अंतिम निर्णय हायकंमाड घेतं, आता ही महानगरपालिका सतत पाच वेळा जिकंत आलोय, आता ही जिंकूच की, आणि तसंही कुणीही निवडून आलं पक्षातलं तरी तुमचं काम कधी अडलयं काय…..थोडा धीर धरायला शिका… आम्ही काय आईच्या पोटातून येवून लगेच आमदार-नेते नाय झालोय, एकेकाळी रिक्षा चालवलीय, कधी स्वप्नात पण विचार नाय केला की आमदार होऊ……. पण झालोच ना, अरे उदया तुमच्याच मधला कुणी तरी होईल, पण नाय यांना शिंग फुटलीयत, अरे भडव्यांनो नुसते उमेदवारीचे अर्ज भरुन काय होणार आहे……. इथं खो-याने पैशे ओतावे लागतात, ते जमत का? तर नाही! मग गप्प संघटनेचं काम करा, पक्षबांधणीसाठी सपोर्ट दया…. तर नाही!……. आणि नगरसेवक व्हायचयं, अरे विरोधी पार्टीतला माणूस असता तर समजू शकलो असतो हा मादरचोद आपला निघाला, आता आम्हाला विचार तो काय ! कालपर्यंत बॅनरला आपल्याकडून पैसे घेवून जायचा, आज भाऊच्यां विरोधात फोटो लावतो काय….. मला ते काय नकोय कंटाळा आलेय रे तेच तेच सांगून त्या मिडीयावाल्यांना…… विकास, विरोधक, मिडीयावाल्यांना भेनचोद संगळ गुलूगुलू बोलायला लागत…… च्यायला त्यांच्यापेक्षा ते प्रिंटप्रेसवाले बरे…… हे भेनचोद कॅमेरेवाले, भोकडं पसरुन, कुठं हे चेक करं ते चेक कर…… अरे येथे निवडणुका तोडांवर आहेत आणि पैसे इकडं तिकडं न्यायचे त्यांची काळजी, बरं यांना संगळ माहिती तरी आपलं उगाच विचारत बसायचं…… मला काय अनुभव नाय काय…… उगाच नाय मिशी वाढवलीय, इतर वेळी एवढया खालच्या लेव्हलला मिडिया रिपोटिंगला कोण जात नाय पण निवडुणकीच्या टाईमाला वातावरण वेगळं असतं, आता सगळ्यांना मॅनेज केलयं, या मिडीयातल्या लोकांना पण देत चला जमले तर फुलना फुलांची पाकळी, किमान विरोधात बातम्या जाणार नाहीत असं बघा, या अपक्षाचा बंदोबस्त करा…… हा जर शहाणा निवडून आला तर मग पुढे वचक राहणार नाय एरियात…… हे अपक्षवालं बेन जिवंत ठेवू नका…… उगाच पुढं वाढवू नका…… ही अशी बांडगूळ छाटत चला इथं लयं डोईजड होत नंतर…… तळहाताला खाज यायला लागली बघ…… काहीपण करा…… बघा तो इथं दिसला नाही पाहिजे पैसाची फिकीर करु नका…… तो पोचता होईल…… एखादा नवीन पोरगा बघा, जो पोलिस रेकार्डला नसलेला…… बरं लांबचा बघू नका आणि उगाच घाबरगुंड पळपूट चुकूनसुदधा बघू नका, असं बघा जे लॉग टर्मला कामाला येईल, ही एकच इलेकशन नाय, वर्षाभरात आमदारकी आहे मढावरं, सुमेध सारख्या लोंकाना आज सोडला तर उदया आपण राहयचो नाय बघ.

रेट करा आणि टिप्पणी द्या

सर्वप्रथम टिप्पणी टाइप करा!

शेयर करा