Dominant - 4 books and stories free download online pdf in Marathi

डॉमिनंट - 4

डॉमिनंट

भाग चार

डॉमिनंट भाग तीनपासून पुढे....

शहराच्या एका बाजूला असलेल्या खडकपाड्यासारख्या पॉश ठिकाणी नव्यानेच बांधलेल्या मनोरा टॉवरमधल्या एका फ्लॅटमध्ये भरदिवसा काळोखी पसरली होती. तसा तो फ्लॅट सातव्या मजल्यावर असून बिल्डिंगच्या आसपास मोकळेच होते, त्यामुळे प्रकाश आणि हवा येण्यासही चांगलाच वाव होता. परंतु तरीही त्या फ्लॅटच्या सर्व काचाखिडक्या बंद अवस्थेत होत्या. फ्लॅट तसा बर्यापैकी ऐसपैस होता. हॉलची सजावट आणि सामानही जेमतेमच होते.

मेन डोअरला लागून असलेल्या भिंतीवर टांगलेल्या अडतीस ईंची एल् सी डी वर मौसमच्या खुनाची इत्यंभूत माहीती मीठमसाल्यासह विश्लेषित करून दाखवली जात होती.

काही वेळा अगोदर टेबलवर ठेवलेले गरमगरम ब्रेडटोस्ट आता थोडेसे थंड पडू लागले होते. मस्तकावर प्रचंड ताण पडल्यासारखा तो न्यूज चॅनलवर नजर रोकून होता. दिसायला बर्यापैकी स्मार्ट आणि आकर्षक देहयष्टी होती त्याची. पुढ्यात पडलेला फोन उचलत त्याने भाईला कॉल केला.

"व्हाट् द हेल इज गोईंग ऑन... ये क्या दिखा रहे है न्यूजपर..." चवताळतच त्याने सुरूवात केली.

************ पलीकडून भाई बोलत होता.

"छोटीसी मिस्टेक... तू समज भी रहा है... खून हुवा है यु नॉनसेन्स.... ये कोई छोटीमोठी बात नहीं है...
और बकायदा मैंने बोला था.. खुनखराबा नहीं करना था.. पुरा प्लॅन मैंने बनाकर दिया था.. फिर भी क्यूं..?"

*********

"अब तू इस प्लॅन से अपने आदमियों के साथ बाहर हो जा.. मैंने दियी हुई खैरात से एक कोठा बनवा ले और उन चारों से वहा पर रोज मुजरा करवा ले..."

*********

"वैसे भी मुझे मंदार की बदनामी का इंतजार था.. जो की आज नहीं तो कल होने ही वाली है.. अफसोस है की तुम जैसे निकम्मे लोगों की वजह से किसी बेगुनाह की जान चली गई... मुझे लगता है जल्द ही मंदार के सामने अब मुझे आना होगा.. "

समोरून काहीतरी उत्तरादाखल प्रतिक्रिया आली पण त्यात फारशी ऊत्सुकता न दाखवत याने भाईला कायमचा रामराम केला.. आणि मनात स्वतः नव्याने पुढच्या योजनांची आखणी करू लागला.

***********

दुपारच्यावेळी बाहेरच्या व्हरांड्यात काळ्या पठाणीत सोफ्यावर रेलून बसलेला 'भाई' काहीसा चिंताग्रस्त दिसत होता. बाहेर ऊन असले तरी त्याला पत्र्याच्या सावलीचा आधार होता. त्याच्या भारदस्त शरीरावर त्याचं केस नसलेलं डोकं आणि चेहर्यावरच्या सुरकुत्यांनी पडलेल्या सपशेल ठळक खुणा वातावरण अजूनच गंभीर करत होत्या. आसपास पूर्ण शांतता होती. 'काही वेळ आसपास कुणी फिरकायचं नाही' असा सज्जड दम भाईने आपल्या घरातल्या मंडळींना आणि त्याच्या चेल्यांना दिला होता.

नुकताच कुणाचातरी फोन येऊन गेला होता. कधी नव्हे ते काल भाईचे पंटर आपल्या कामात फेल झाले होते. प्लॅन यशस्वी होणं राहीलं बाजूला उलट पोलीस स्टेशनला जबानी देत त्याची चारही कर्तबगार माणसं अडकली होती. ते चौघे पोलिसांचा ससेमिरा कसा चुकवतील याची काळजी भाईला होतीच पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे पैसे घेऊन काम झालं नाही याचं दुःख त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. बदल्यात ज्यानं पैसे दिले होते त्यानं आज फोनवर त्याला चांगलंच सुनावलं होतं. अख्ख्या हयातीत त्याच्याशी कुणी इतकं आवाज चढवून बोललं नसावं.. म्हणूनच भाईचं मन खायला उठलं होतं..

काही वेळातच डिग्री, नसीर, मदन आणि चंदू चौघेही तिथं आले. भाईने एक जळजळीत कटाक्ष त्यांच्यावर टाकला. त्याला पाहताच कुणालाही धडकी भरावी असा काहीसा राक्षसी अवतार होता. दातओठ खात त्याने डिग्रीची कॉलर पकडत विचारले..

"कैसे हुआ ये सब... और क्यू.. भे***... उस मौसमकी बिरादरी में शामील हो गये क्या.." भाईच्या आवाजात जबरदस्त द्वेष होता.

"भाई, हलकीसी मिस्टेक हो गई... वो छि** उस हरामी के साथ सोने गई थी.. और हम उस बात से अंजान थे...." मदन म्हणाला.

"हा भाय.. वही वजह थी के हम मौसम को वहा देख कर हैराण रह गये और उस नाकारा शक्स को वहा से भागने का मौका मिल गया..." नसीरने मदनचीच 'री' ओढत सांगितले.

भाई थोडा शांत झाल्यासारखं दाखवत नसीरजवळ आला. नसीरचं शर्ट व्यवस्थित करत भाईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"अच्छा बेटा.. काम तुने नही किया और नाकारा वो शक्स..."

सुरूवातीला कंठातून निघालेल्या प्रेमळ आवाज रौद्र रूप घेऊ लागला..

"अरे तुम चार लोगों से नहीं संभल पाया वो अकेला.. नाकारा वो था या तुम चारों... और किस भो*** ने उस चमेली को मारा.. मैंने पहलेही कहा था इस काम में हमे किसीका खुन नहीं करना था... पार्टी की वैसी डिमांड थी... फिर भी.. फिर भी ऐसी कौन सी आफत आन पडी की उसका खुन हुआ..?"

भाईच्या शेवटच्या प्रश्नावर जणू काही सन्नाटा पसरला.. डिग्री, मदन, नसीर आणि चंदू चौघेही एकमेकांकडे पाहत होते.. या गोष्टीवर रात्रीपासून त्यांना क्लिक झालेच नव्हते.. चौघेही बुचकळ्यात पडाले होते की नेमका खुन केला कुणी...?

सगळ्यात पहीला मदनच मौसमवर दातओठ खाऊन धावून गेला होता. पण नंतर पाहिले तेव्हा मौसमच्या पाठीत घुसलेला सुरा इतर तिघांच्या हाताजवळ होता. मग नक्की कुणी मारलं मौसमला..? रात्रीपासून या प्रश्नावर कुणाचेच लक्ष गेले नव्हते. किंबहुना रात्रीपासून चौघांना एकत्र बसून त्या विषयावर बोलायची संधीच नव्हती भेटली. रात्री लॉजवर घडलेला अनपेक्षित प्रसंग, त्यानंतर पोलिसांचे आगमन, त्यांचे सवालजवाब, तिथून पोलिस स्टेशन, मग तिथली उलटतपासणी आणि मधल्या वेळातला पोलिसांसमोरचा फालतुचा टाईमपास यातच सगळा वेळ निघून गेला होता.

त्यांना निरुत्तर झालेलं पाहून भाईच्या तळपायाची आग अजूनच मस्तकात गेली..

"अरे.. कोई बकचौ* करके ये बतायेगा क्या... खुन किसने किया... कल को पुलिस बीच में आ गई तो बचाने तुम्हारा ये बाप ही आयेगा..."

"नहीं भाय.. खुन उसी हरामजादे ने किया और वो भाग गया..." इतकावेळ घाबरून शांत असलेल्या चंदूने तोंड उघडले.

त्यांची असली बालीश कारणं ऐकून खरंतर भाई चवताळला होता. पण त्यानं स्वतःला आवरलं आणि म्हणाला..

"तुम लोग जाओ अब कुछ दिन यहा से दुर.. किसीकी नजर में मत आना जब तक मैं ना बुलावूं.. इस काम को अंजाम अब मैं अपने तरीके से दुंगा.."

"पर भाय.. एक मौका तो..." डिग्री काही बोलतच होता की भाईने त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तोडलं..

"मैंने कहा ना.. कुछ दिन इस मामले से दुर रहो.. और चारों साथ में रहना.." भाईने कठोर आदेश दिला. कितीही रागात असला तरी भाईला आपल्या माणसांची काळजी होती. शिवाय उद्या पोलीस त्यांच्यामार्फत भाईपर्यंतही पोहचू शकले असते.

भाईला आता अजून पद्धतशीर प्लॅन करून मंदारला जाळ्यात ओढायचं होतं. पण यावेळी ते अवघड जाणार होतं हे भाईसुद्धा ओळखुन होता. एकतर मंदार आता गाफील राहणार नव्हता. दुसरं म्हणजे आपल्या माणसांच्या हातावर तुरी देऊन निसटून जाणारा कुणी साधासुधा माणूस नसणार, याची खात्री भाईला पटली होती. पार्टीच्या नजरेत आपली झालेली गच्छंतीही त्याला निस्तरायची होती. म्हणूनच भाई स्वतः या प्रकरणात उतरणार होता.

***************

पाच वाजण्याच्या सुमारास ऊन थोडंसं उतरू लागलं होतं. भंडारी बावाच्या अड्ड्यावर ते चौघे आपसात खुसपुस करत होते. भंडारी बावाचं दारू पिण्यासाठीचं साधं हॉटेल होतं. डबल फायदा करून घेण्यासाठी बाहेरच त्याने चायनीज/इटालियन फास्ट फुडचं बस्तानही मांडलं होतं.

डिग्री, मदन, नसीर आणि चंदू एका टेबलवजा बाकड्यावर दारू पित बसले होते. मौसमच्या खुनावरून आता त्यांच्यात वाद सुरू होत होते.

"खुन आपल्यापैकीच कुणीतरी केलाय..." डिग्री गंभीरतेनं निष्कर्षापर्यंत पोहचल्याचं दाखवत म्हणाला.

"आणि तो मी तरी नाहीयं.. कारण तिच्याजवळ बेडवर तुम्हीच तिघे होतात.." मदनने आपली बाजू सेफ केली.

"अयं.... आम्ही तिला मारण्याचा विषय आलाच कुठून... आमची आन् तिची ओळख फक्त बेडपुरतीच असायची.. उलट तूच तिला पहिल्यापासून ओळखत होतास.. तिला या प्लॅन मध्ये तूच घुसवले होते.." चंदू आपल्यावर येणारे आरोप झटकून देण्याच्या पवित्र्यात होता.

"मदन, हम लोग के पास कोई वजह नहीं थी मौसम को मारने की.. मुझे तो अफसोस है वो अब इस दुनिया में नहीं है... साला उसके जैसी आयटम ढुंढना बडी मुश्किल बात है... मुझे अगर खुनी का पता चले तो मैं तो उसका बदला जरूर ले लुंगा... मदन सबसे पहले तू उसकी तरफ घुस्से में भागा था.. कही तूने तो.." नसीरने आपला रोष व्यक्त करू पाहीला.

"कमीने...." मदनचे हात चवताळून नसीरच्या मानगुटीवर पोहोचले.

"रूक... थांब मदन..." डिग्रीने मदन मागे खेचले आणि सर्वांना उद्देशून बोलू लागला.

"फिलहाल तो हम यही मानकर चलते है की उस मंदारने मौसम का खुन किया.. पहले उसे सबक सिखायेंगे बाद में सच्चाई का भी पता कर लेंगे.. आता सगळ्यात आधी आपल्याला भायला खुश केले पाहीजे. चुक आपल्याकडून झालीय.. निस्तरायचीपण आपणच.."

डिग्रीने ढासळत चाललेली त्यांची युनिटी पुन्हा मजबूत केली. सर्व एकमताने त्याला होकारले. पुढच्या अर्ध्या तासांत मंदारला जाळ्यात पकडण्यासाठी यावर चर्चा झाली. आणि भंडारी बावाच्या अड्ड्यावरून ते चौघे मंदारला पकडण्याच्या निर्धारानेच बाहेर निघाले.

************

कित्येक दिवसांनंतर अनुभवलेल्या काहीश्या आळसट अनुभूतीतून जागं झाल्याप्रमाणे मंदारने हळूहळू पापण्यांची उघडझाप केली.. काहीसं भानावर येत असताना शरीरातली मरगळ झटकून देण्यासाठी त्यानं हातपाय पसरवायला केले तर त्याला तिथल्या बंदीपाशाची जाणीव झाली.. खडबडून त्यानं बांधलेल्या पायांकडे पाहीले.. खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत त्याचे हात मागच्या बाजूला करकचून बांधले होते. प्रथम तर जोर लावून त्यानं हातपाय सोडवण्याचा निष्फळ प्रयत्नही करून पाहीला.. पण ताकदीनं काम होण्यासारखं दिसत नव्हते, म्हणूनच तेव्हा त्यानं हाताचा पंजा आणि मनगट यांमध्ये हालचाल करण्यास सुरूवात केली.

आसपास नजर फिरवत त्यानं सभोवतालच्या परीस्थितीचा अंदाज घेतला. सध्यातरी तिथं तो एकटाच बांधलेल्या अवस्थेत होता. काहीसं जुनाट असं दिसणारं ते घर होतं. वर नजर करून पाहताच कळपटलेल्या कौलांचं छप्पर, भिंतींवर ठिकठिकाणी जमा झालेली जळमटं.. असं वाटतं होतं की क्वचितच त्या घरात कुणी राहत असावं. एका बाजूला पाण्याचं मडकं दिसत होतं. बाकी विशेष असं काही सामान त्या घरात नव्हतं.

मंदारनं हातांची हळूहळू हालचाल करत शर्टच्या बाह्यांमधल्या खाचेत लपवलेले छोटेसे 'कटर' बाहेर काढले. मागे हात बांधलेल्या स्थितीत त्याने कसेबसे ते कटर डाव्या हाताच्या बोटांपर्यंत पोहोचवले. तिथून पुढचे काम फारसे अवघड नव्हते.. पण तितक्यात समोरचा दरवाजा उघडून आरीफ आला..

आरीफला पाहताच मंदारला बेशुद्ध होण्यापूर्वीचा प्रसंग आठवला.. आणि तो खुनशी नजरेनं आरीफकडे पाहू लागला..

मंदार काही बोलायला जाणार तोच आरीफने प्रश्नांची सरबत्ती घेऊन सुरूवात केली.

"तु कुछ बोलेगा उस्से पहीले मेरे सवालो के जवाब दे... वही तेरे लिये अच्छा होगा.."

'ह्या मरतुकड्याला एका फटक्यात खाली लोळवावं..' हा विचार क्षणभर मंदारच्या मनात आला पण त्यानं जरा दमानं घ्यायचं ठरवलं. अजून आरीफच्या दुसर्या साथीदाराविषयी जाणणंही महत्वाचं होतं.

"कुछ तो वजह है जो तुझे यहा मैंने पकड के रखा है... तू उसके ऊपरसे परदा हटा दे.. मै तुझे सहीसलामत यहा से निकालुंगा.. इतना ही नहीं मै तुझे डिग्री और उसके दोस्तों का पता भी दुंगा.." आरीफ मिश्किल हसत मंदारला आमिष दाखवत होता.

"हाहाहा... तुझ जैसा मच्छर क्या मुझे यहा पकड के लायेगा.." मंदार खिदळत हसत बोलू लागला.. "मै चाहु तो अभी यहा से निकल सकता हुं.. रही बात डिग्री की तो उन सबका पता मैं खुद धुंड सकता हुं.. और तुझपर एकबार भरोसा करके देख चुका हुं मैं.."

"साले तुझे तो..." आरीफ त्वेषाने मंदारवर धावून गेला पण शेवटच्या क्षणाला त्याने स्वतःला आवरले.

"तेरे साथ और जो कोई भी है उसको पहले सामने आने बोल दे.." मंदार शांतपणे म्हणाला.

मंदारचे शब्द ऐकताच आरीफ थोडा चाचपडला. पण मंदार बांधलेल्या अवस्थेत असल्याने काहीच धोका नव्हता.. आरीफ बाहेर निघून गेला आणि दोन मिनिटाच्या अवधीतच मनूसोबत परत आला..

पायातले ब्लॅक लेदर शुज, ली कूपरची फिटींग जीन्स आणि डार्किश मरून रंगाचा तिचा शर्ट सर्वच तिच्या काहीश्या सुडौल पण कमनीय देहावर परफेक्ट मॅच करत होते. स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखी तिची कांती आकर्षित करण्यासारखी अशी होती. केस बॉयकट किंवा त्याहुन थोडेसेच लांब आणि चेहर्यावर विलक्षण आत्मविश्वास झळाळत होता. साधारण तेविशिची असावी.. स्त्रीया वय लपवण्यात माहीर असतात.. म्हणून पक्कं सांगता येत नव्हतं पण पंचविशीच्या आतली नक्कीच असावी..

मंदारनं ओळखले ही तीच होती जिने त्याच्यावर मागून प्रहार केला होता. बेशुद्ध होतानाची त्याच्या चेहर्यावरली ती आश्चर्याची छटा तिचं रूप आणि कर्म यांतील विसंगती पाहुनच आले होते. तरी तिच्यातल्या आत्मविश्वासाने तो प्रभावित झाला होता.

"ओह.. के.. म्हणजे मागून वार करण्यात तुझेच योगदान होते, नाही का..." मंदार मनूच्या हातातला सुरा निरखून पाहत म्हणाला.

"हो... निर्दयी.. खुनी माणसा..." मनू तावातावाने त्याच्याजवळ पोहचतच होती की आरीफने तिला अडवले.

"का मारलसं तु मौसमला.. तिने काय वाकडं केलेलं तुझं.." मनू हातातला सुरा त्याच्यापुढं नाचवत बोलू लागली. तोपर्यंत आरीफनेसुद्धा मागे पडलेला लोखंडी रॉड हातात घेतलाच होता. त्याला माहीत होते मंदार सहजासहजी काही सांगणार नाही..

"वेट वेट... शांत रहा जरा... तुम्ही दोघेपण.. तुम्हाला असं का वाटतयं की मी मौसमला मारेन.." मंदार मुळीच घाबरला नव्हता पण सद्यपरिस्थितीत तसं चेहर्यावर दाखवणं गरजेचं होतं.

"ये देख भ**.. तेरी करतूद सारे अखबार और टीव्ही चॅनेल चिल्ला चिल्लाकर उछाल रहे है..." आरीफने भडकून दोन-चार वर्तमानपत्रे त्याच्यासमोर फेकली.
मंदारने पहील्यांदा तर तिकडे दुर्लक्ष केले कारण सध्या त्याला आरीफ आणि मनूवर आपले सर्व लक्ष केंद्रित करायचे होते.

मनूला राहवत नव्हते.. तिचे हात शिवशिवत होते मंदारवर वार करण्यासाठी... मंदारला थोडीफार तरी इजा करावीच याउद्देशाने ती पुढे सरसावलीच. तोच परीस्थितीचं गांभीर्य ओळखत मंदारनं मागे बांधलेल्या हातांना हिसका देत सुटका करून घेतली. मनूला पुढ्यात ओढत त्याने डाव्या हाताच्या बकोटीत घेतलं आणि उजवा हातातलं कटर तिच्या मानेला लावलं..

"अहं.. भाईजान... एक इंचपण सरकलास तर समजून जा..." मंदार हल्ला करण्यास येणार्या आरीफला उद्देशून म्हणाला.

मनू सुटकेसाठी झटपट करू लागली.. मंदारला हिसके देऊ लागली.

"जानेमन.. मगरीच्या जबड्यातून कुणी निसटू शकतं का कधी.. या मंदारची पकड मगरीसारखीच आहे मग कश्याला उगाचच त्रास करून घेतेयंस.."

"तू एकदा सोडून तर बघ मला.. नालायका.. दिदीचा बदला तर मी घेऊनच दम खाईन.." मनू आपली सर्व शक्ती पणाला लावून सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण मंदारनं म्हटल्याप्रमाणे त्याची पकड खरोखरच मजबूत होती. ती सोडवण्यासाठी त्याच्याच तोलामोलाच्या माणसाची गरज होती.

मंदारचे सुटलेले हात पाहून आरीफचे तर अवसानच गळाले. आरीफला दरवाज्यावर जायला सांगून मंदारने एका हाताने पायाला बांधलेले दोरही सोडवले. खाली पडलेला सुरा घेऊन तो मनूसोबत दरवाजाजवळ आला. आरीफला त्याने पुन्हा आतमधल्या एका कोपर्यात जायला सांगितले. त्याच्यापाठोपाठ मनूलाही तिकडे ढकलत त्याने दुसर्या हाताने तिथला लोखंडी रॉड उचलला.

"अजिबात चलाखी नकोय मित्रांनो.... अजूनतरी मी कुणाचा खुन केलेला नाही पण यानंतर तसं करायला मागेपुढे पाहणार नाही.." मंदारने धमकीवजा ताकीद दिली.

पण आरीफ आणि मनूचा त्याच्यावर विश्वास नव्हताच. त्यांच्या चेहर्यावरून अजूनही मंदारबद्दलची चीड कायम होती. मंदारने सुरूवातीपासून सगळे काही त्यांना विश्लेषण करून सांगितले. घटीत घटनांवरून साफ जाहीर होत होते की मंदार आणि मौसम पहील्यांदाच भेटले होते. मंदारकडे मौसमला मारण्याचे खास असे काही कारणच नव्हते..

"सध्या तुम्ही दोघं माझ्या ताब्यात आहात.. पारडं माझं जड आहे.. त्यामुळे माझ्या खोटं बोलण्याचा प्रश्नच उरत नाही. मी मौसमला मारलं असतं तर तसं मी इथे बोलू शकतो बदल्यात तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. तुम्हाला मारणं माझ्यासाठी अवघड नाही.. पण मुळात मी खुनी नसल्यामुळे मी तसं करू शकत नाही..." मंदारने मनूच्या डोळ्यात रोखून पाहत म्हटले.

मनू अजूनही काहीशी विचलित होती पण आरीफच्या मनातल्या शंका दूर झाल्यासारखे त्याच्या चेहर्यावरून वाटत होते. मंदारने आरीफ आणि मनूचा अंदाज घेत त्यांच्यावर शेवटची इमोशनल चाल खेळली..

"मला फसवण्याचे कारण आणि त्या माणसांचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही... तुम्ही दोघे तुमच्या मार्गाने जाण्यास मोकळे आहात.."

"पण आता तुझ्यासमोर धोका अजूनच वाढलाय त्याचं काय...?" मंदारसमोर खाली पडलेली वर्तमानपत्रे सरकवत मनू म्हणाली.

"हा.. मियाँ.. अब तो उन लोगो के साथसाथ पुलिसभी तुम्हारे पीछे पडेगी.." आरीफने पुढे पुष्टी जोडली.

मंदार एक वर्तमानपत्र उचलून चाळू लागला. फ्रंट पेजवरच्या त्या बातमीनं तो अक्षरशः चवताळला..

मौसमच्या खुनाचा आरोप अज्ञात इसमावर होता, ज्याचं वर्णन आणि रेखाचित्र मंदारशी तंतोतंत जुळत होतं. हा पण जमेची बाजू अशी होती की मंदारचा फोटो अथवा नाव त्यात छापलं नव्हतं. मंदारने बातमी वाचून ओळखले की त्या लोकांनी आपल्याशी असलेला संबंध लपवला होता. म्हणूनच त्याचे नाव आणि फोटो त्यांच्याकडे असूनही त्यांनी पोलिसांना सांगितले नसावे.

"बुलशिट... हरामखोर मनाला येईल ते काहीपण लिहीतात.." रागाच्या भरात मंदार बोलू लागला.
एव्हाना मंदारने पुढचा प्लॅन डोक्यात रेडी केलाच होता.. मंदारला कसंही करून आरीफची मदत हवीच होती तेही त्याच्या नकळत करून घ्यायची होती. आणि भर म्हणून की काय मनूही साथीला आली होती.

मंदारने मनूकडे पाहीले.. तिच्या डोळ्यांच्या कडा ओलसर झाल्या होत्या. अचानक काहीतरी आठवल्यासारखे जाणवून मंदारने मनूला विचारले,

"पण तुमच्या दोघांचा मौसमशी काय संबंध..? तुम्ही एवढी जोखीम घेऊन मला इथे का आणलं..?"

मनूने एक कटाक्ष मंदारवर टाकला आणि मौसमबद्दल सांगू लागली.

मौसमच मनूचा जगण्याचा आधार होती. अठराविश्व दारिद्र्य आणि कर्जाच्या बोझ्याखाली दबलेला तिचा बाप जगण्याची सारी आशा सोडून बसला होता. मनू तेव्हा दहा-बारा वर्षांची असेल. आई मनू लहान असतानाच देवाघरी गेली होती. बाप आणि मनू आला दिवस कसाबसा ढकलत होते. आपल्यानंतर पोरीचे हाल कसे होतील हे विचार मनूच्या बापाला आत्महत्या करून देत नव्हते. पण त्याला हेही कळून चुकले होते की कसंही करून जगण्यासाठी अनुकूल वातावरण तो निर्माण करू शकत नव्हता.

एका रात्री 'आपल्याला बाहेर जायचे आहे' असे सांगून तो मनूला घेऊन रेल्वेपटरीवर आला. चालताना मनूने विचारलेल्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करीत तो तिचा हात घट्ट पकडून चालत होता. मनूच्या लहान वयातल्या मनात तो अंधार आणि रेल्वेपटरी पाहून चलबिचल होत होती. तरीही ती 'आपण कुठं जातोय..? कश्यासाठी..?' हे सारखेच विचारत होती.

मागून ट्रेनचा हाॅर्न ऐकू आला.. झपझप झपझप ट्रेन मागून काळाप्रमाणे त्यांच्यावर झडप घालण्यास येत होती. मनूने मागे पाहत ओरडायला सुरूवात केली.. बापाला तिथून हटण्यास सांगताना तिला अक्षरशः रडू कोसळत होते.. बापाला हटवण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी ती जोर लावत होती. शेवटी शेवटी स्वतःचा हात सोडवण्याची तीची धडपडही केविलवाणी होती.. मागून ट्रेनने अजून एक जोराचा हॉर्न दिला तसे मनू पिसाळल्यासारखे मोठ्याने ओरडू लागली.. पण एवढ्या वेळात तिचा बाप ढिम्म् म्हणूनही तिथून बाजूला झाला नाही. जणू मरणाला कवटाळण्याचा निर्धार करूनच तो तिथं आला होता.

ट्रेन खुपच जवळ आली तसे पटरीपासून काही अंतरावर असलेल्या झाडीतून दोन तृतीयपंथीय त्यांच्या दिशेने झेपावले. मनूची आर्त हाक त्यांना ऐकू आली होती. त्यांच्यापैकी एक जवळपास मनूच्याच वयाचा होता. तर दुसरा त्याच्यापेक्षा थोडा मोठा होता. त्यादोघांच्या अनपेक्षितपणे अंगावर येण्याने मनूचा बाप बावचळला आणि त्याची मनूवरची पकड सैल पडली. समोर आलेली ट्रेन पाहत त्या दोन तृतीयपंथीयांपैकी जो लहान होता त्याने प्रसंगावधान दाखवून मनूसोबत बाजूला उडी मारली. मागे फिरून डोळ्यांचं पात लवतं न लवतं तोच काळाच्या रूपानं आलेली ट्रेन मनूच्या बापाला घेऊन सुसाट पुढं गेली. दुसरा तृतीयपंथीदेखील त्याच्यासोबत फरफटला गेला.

मौसम तेव्हा पंधरा-सोळा वर्षांचीच होती. तिनंच मनूला वाचवलं होतं. मनूच्या बापासोबत मौसमची गुरू तिची सर्वेसर्वा आपले प्राण गमावून बसली. तिथपासून मौसमने मनूचा सांभाळ आपल्या लहान बहीणीप्रमाणे केला. तिचं शिक्षण, खर्च कश्यात काही कमी पडू दिली नाही. तसंच तिनं नाजूक मनूला या दुनियेत निडर राहून कसं जगावं हे शिकवलं. फक्त मनूसाठी मौसमने कोणताही पंथ वगैर न स्विकारता पैश्यासाठी आपल्या शरीराचे भांडवल केले होते. आणि मौसम जरी तृतीयपंथी असली तरी मनूला तिच्याबद्दल विलक्षण आदर आणि प्रेम वाटायचे. मौसमने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची तिला जाणीव होती.

आणि म्हणूनच आज तिचं असं एकाएकी या जगातून जाणं मनूला असह्य होत होतं. आरीफसुद्धा दुनियेसाठी लफंगा असला तरी तो पूर्वीपासून मौसमची छोटीमोठी कामं करायचा. त्यामुळे त्याचं बर्याचदा त्यांच्या घरी येणंजाणं असायचं.

हे सगळं सांगताना मनू काहीशी भावूक झाली होती. मंदार तिला सावरायला पुढे सरसावणार होता की मनूने तिच्या स्मार्टफोन मधला फोटो मंदारला दाखवला.

मंदार स्वतःचा फोटो पाहून अचंबित झाला.. हा त्या लॉजच्या रूममधलाच फोटो होता. मौसमने शिताफीने तो फोटो काढून मनूला पाठवला होता. रात्रीचं जर कधी बाहेर थांबणं झालेच तर खबरदारी म्हणून मौसम नेहमीच तिच्यासोबतच्या व्यक्तीचा फोटो मनूला पाठवायची.

"अच्छा.. म्हणजे यामुळेच तुम्ही मला गुन्हेगार समजताय तर..." पुढे येऊन मनूला आश्वस्त करत मंदार बोलू लागला.. "त्या रात्री आम्ही एकाच रूममध्ये जरूर होतो पण मला फक्त तिच्याकडून त्या चौघांची माहीती हवी होती. पण ते माहीत करून घेईपर्यंत आमच्यावर हल्ला झाला, आणि मी त्यांचा प्रतिकार करून होईपर्यंत चौघांपैकी कुणीतरी एकाने मौसमचा खुन केला..."

"फिर तू वहा से भागा क्युं...?" आरीफने त्याला प्रश्न केला..

"मैं वहा से नहीं भागता तो अभी यहा तुम लोगों के साथ अपनी बेगुनाही पर विवाद नहीं कर सकता था..." मंदार आरीफकडे वळत म्हणाला. त्याचा आवाज जरा चढ्या स्वराचा होता.

"तु म्हणतोयस त्यात तथ्य असेल तर मला त्या नराधमांना शोधून शिक्षा द्यावीच लागेल.." मनू प्रतिशोधाच्या उद्देशाने लाल झाली होती.

"मला वाटतं आपण तिघं वेगवेगळे होऊन एकाच प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा एकत्र येऊन तो प्रश्न लवकर निकालात लावू शकतो..." मंदार.

त्याच्या बोलण्याचा रोख मनू आणि आरीफने ओळखला. आरीफचा इशारा येताच मनूही तयार झाली. पुढ्यात मांडलेलं कोडं सोडवण्यासाठी आता ते तिघंही एकत्र आले होते. परक्या शहरात येऊनही आता मंदारचं पारडं आरीफ आणि मनूच्या येण्याने जड वाटू लागलं होतं. प्रश्नांची उत्तरं आता लवकरात लवकर मिळण्यास सुरूवात होणार होती.

मुख्य सुत्रधार, भाई, डिग्री, मदन, नसीर आणि चंदू सगळे वेगवेगळे होऊन आपापले नविन प्लॅन बनवून मंदारला पकडण्यासाठी सज्ज झाले होते.. तिकडून मंदार, आरीफ आणि मनू त्यांना शोधण्यासाठी प्लॅन तयार करत होते. शिकारी आणि सावज यांमध्ये नक्की कोण कुणाची भुमिका वठविणार हे थोड्याच अवधित स्पष्ट होणार होते.. पाठशिवणीचा खेळ आता कुठे खर्या अर्थाने सुरू होणार होता. त्या सर्वांमध्ये खरा डॉमिनंट कोण हे येणारा काळच सांगणार होता.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED