Dominant - 9 books and stories free download online pdf in Marathi

डॉमिनंट - 9

डॉमिनंट

भाग नऊ

डॉमिनंट भाग आठपासून पुढे....

भाईने आपण बारमध्येच असून चंदूही सोबत असल्याची माहीती डिग्रीला कॉलवर अगोदरच दिली होती. शिवाय तिथून निघून ताबडतोब आपल्या घरी बोलावले होते.

इरफान भाईशी बोलून झाल्यावर डिग्रीने मदनला भायच्या घरी निघण्यास सांगितले. पण मदनने डिग्रीला जरूरी कामासाठी त्याला बाहेर जायचे असल्याचे सांगत तिथून भायच्या घरी डायरेक्ट येऊन भेटण्याचे नक्की केले. मदन डिग्रीला सांगून तेथून निघून गेला. डिग्रीच्या मनात मदनबाबत काहीसा गोंधळ असल्याने आणि आता भायही तिथून निघणार असल्याकारणाने नसीरच्या खुनाची खबर पोलिसांना देण्याचा विचार आला. आणि त्याने फारसा विचार न करता तसे लगेचच केले. तसेही पोलिस तिथं पोहोचेपर्यंत तो आणि इरफान भाय शिवाय चंदू तिथून निघाले असते.

इकडे मनूचा कॉल कट केल्यानंतर आरीफ घाईतच पुन्हा बारच्या वॉशरूमच्या दिशेला जायला निघाला. भलेही नुकतेच मनूने त्याला तिथे जाण्यास मनाई केली होती. तरीही त्याला लवकरात लवकर तिकडे जाऊन काही ना काही सुगावा लागतोय का.. ते पाहायचे होते. शिवाय मंदार खुनी असेल यावर त्याचा अद्यापही विश्वास बसत नव्हता, किंबहुना त्याला ते पचवणं ही जड जात होते. म्हणुनच या बाबीचा पडताळा लावण्यासाठी तो पुन्हा तिकडे जात होता.

बारमधील वॉशरूमच्या दरवाज्याबाहेर पोहोचताच आरीफला आत कुणाच्यातरी उपस्थितीची चाहुल लागली. वॉश बेसिनच्या नळातून निघणार्या पाण्याचा आवाज तिथल्या शांततेवर मात करू पाहत होता. आरीफने सावध होत दरवाजा उघडला. समोर मंदारच आपला चेहरा धुत होता. त्याने मागे वळून पाहीले. आरीफला पाहताच थोड रीलॅक्स होत त्याने पुन्हा आरश्यात पाहत आपले काम सुरू ठेवले.

थोडावेळ त्यांच्यात काहीच संभाषण झाले नाही. सन्नाट्याच्या धुक्यात विरलेली ती एक-दोन मिनिटे जीवघेणी ठरावीत अश्याप्रकारची होती. तेवढ्या कालावधीत आरीफने तिथलं शक्य तितकं सारं न्याहाळण्याचा प्रयत्न केला. आणि तिथल्या एकएक गोष्टींना छेदत त्याची बारीक नजर शेवटी खाली ठेवलेल्या मंदारच्या त्या मळकट निळ्या अमेरीकन टुरीस्टरवर पडली.

मंदारने आपली कॅप काढून त्या सॅकवर ठेवली होती. सॅकची मधली झिप् अर्धवट उघडलेलीच होती. पण त्या कॅपने त्यावर आच्छादनाचे रूप घेऊन फतकल मांडले होते.

काय करावे... एक चान्स् आहे.. ती कॅप बाजूला करून आत काही आक्षेपार्ह आहे की नाही ते पाहायचा.. पण कसे.. मंदार काय विचार करेल.. तो खुनी नसलाच पाहीजे पण आपण त्याच्यावर शंका घेतोय हे पाहून त्याला कसे वाटेल..? किंवा जर खरेच तो खुनी असेल तर आपल्या या हरकतीने पिसळून उठला तर...?

आरीफ बारकाईने विचार करत पुढे होऊ लागला. आणि एकक्षण मागचापुढचा विचार न करता त्याने खाली वाकत ती कॅप उचलून आपल्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. मंदार झटकन त्याच्याकडे वळाला आणि अर्धवट उघडलेल्या त्या सॅकच्या मधल्या कप्प्यात असलेल्या नोटांवर दोघांची नजर एकसाथ जाऊन विसावली.

"मंदारभायऽऽऽ....?" आरीफने दीर्घ श्वास घेऊन मंदारकडे पाहत एकाच शब्दात आपला प्रश्न विचारला. त्याचे डोळे विस्मयजनक अवस्थेत मोठाले झाले होते. जणू कल्पनेतही त्याला मंदार दोषी असल्याचे वाटले नसावे असेच काहीसे..

मंदार गप्प होता. त्याची नजर आरीफच्या नजरेपासून हटत दुसरीकडे जाऊन विसावली होती.

"ये मौसम के ही पैसे है ना.. मंदारभाय.." आरीफ अजूनही त्याच्यावर नजर रोखून होता.

"हा.." मंदारने शांतपणे उत्तर दिले.

"क्यूं.. मंदार..? यकीन नहीं होता के तूने ये सब किया होगा.." आरीफ पिसाटासारखा मंदारच्या कॉलरपर्यंत येऊन पोहोचला होता.

"एक मिनिटं ... ये सब मतलब.." मंदारने आरीफला आवरत विचारले. खरंतर आरीफ मंदारच्या तोडीचा नव्हताच. पण तरीही मंदार त्याला काही इजा करण्याच्या मूड मध्ये दिसत नव्हता.

"तू कहना क्या चाहता है, आरीफ..?" मंदार त्याच्यापासून नजर चोरत म्हणाला.

"यही के जिसका पता हम लगाने की कोशिश में थे.. वो तू है.. हा.. मौसम को तूनेही मारा है.. और इस बात का सबूत है.. ये पैसे... तू यहा पे आया था तब तेरे पास इतने पैसे नहीं थे.. तूने पैसों के लिये मौसम को मारा..." आरीफ तोंडात येईल ते भडाभडा बोलत होता.

आतापर्यंत जो आपल्या सोबत असल्याचं नाटक करत होता तोच खरा खुनी असावा, या विचारानेच आरीफच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्याच्या कल्पनेच्या अगदी विरूद्ध हे सर्व घडत होते, आणि म्हणूनच त्याचा पारा भलताच चढला होता.

"आरीफ, मैं मानता हुं ये मौसम के पैसे मैंने ही लिये.. पर मौसम को मैंने नहीं मारा.." मंदार आरीफला विश्वासात घेत सांगत होता.

"उस शाम किसी भी गलत इरादे से मैंने मौसम को नहीं बुलाया था.. मौसम मेरे कमरे में आई थी.. और उसके बाद मैंने उससे थोडीबहुत पुछताछ की थी.. मुझे लगा था, के वो भी उन सब लोगों को शामील हैं.. बस् इतनी सी बात थी.. पर मौसम के कहने के अंदाज से मैं समझ गया के वो सिर्फ एक मोहरा थी.. इनफॅक्ट वो सारी बातों से अंजान थी.. दॅट्स इट्... इसके अलावा और कुछ नहीं था हमारे बीच.."

"फिर उसके पैसे तुम्हारे पास कैसे आये मंदारऽऽ..." आरीफ पुन्हा ओरडत विचारू लागला.

"वो पैसे मैंने पहले से ही मौसम के बॅग में देखे थे.. वहा से भागते वक्त मैंने सोचा, उसका खुन होने के बाद मैं अगर उन पैसों को ले लेता तो किसीका क्या नुकसान होता.. वैसे भी अंजान शहर में अगर मुझे छुपकर कुछ पता लगाना है, तो मेरे पास पैसों का होना जरूरी था.. अब तु ही सोच जब मैंने तुझे पैसे दिये तभी तो तुने मुझे इन लोगों की इन्फॉर्मेशन दी.." मंदारने सफाईदारपणे आरीफला समजावले.

"फिर भी मंदार.. अगर खुन तुमने नहीं किया था, तो तुम वहा से भागे क्यूं थे.. और नसीर का खुन..? तुम्हारा इसवक्त यहा पर होना.. ये सब यही बयान कर रहें है के कहीं न कहीं तुम शक के दायरे आ रहे हो... मुझे अब पुलिस को बीच में लाना ही होगा.. जो सच होगा वो बाहर आ ही जायेगा..." आरीफने बोलता बोलता आपला फोन बाहेर काढला आणि तो पोलिसांना फोन करू लागला.

पण त्याचा फोन लागण्याअगोदरच पोलिसांच्या जीपचा सायरन ऐकू येऊ लागला. यावेळी खरोखरच पोलिसांना कुणीतरी बोलावून घेतले होते.

पोलिसांच्या जीपचा सायरन ऐकून काहीश्या सुखावलेल्या आरीफच्या चेहर्यावरची खळी सेकंद-दोन सेकंदच टिकली आणि वॉशरूमच्या दरवाज्यातून वेगाने येणार्या चाकूने त्याच्या उजव्या खांद्याचा वेध घेतला..

"या अल्लाह्...." आरीफच्या मुखातून शब्द बाहेर आले.

"आरीफ्ऽऽ.. त्याला सावरण्यासाठी मंदार पुढे आला.. घाव फारसा खोलवर नव्हता पण आरीफ तितकासा सशक्त नसल्याने घाबरूनच मूर्छित होऊ लागला. त्याच्या डोळ्यांसमोर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला मंदार दिसत होता.

मंदार दरवाज्यापाशी धावला पण दरवाज्यातली ती व्यक्ती सुसाट पळत सुटली. मंदारजवळ पर्याय नव्हता.. त्याच्या मागून जाणे परवडणारे नव्हते. आरीफ जखमी होता आणि त्याला वाचवणे आद्यकर्तव्य होते. शिवाय पळालेल्या व्यक्तीबद्दल आता मंदारला थोडासा अंदाज आलाच होता.. म्हणूनच मंदार पुन्हा मागे फिरला.

मंदार खरेतर तिथं नसीरच्या खुनासंबंधी काही पुरावे मिळतील या आशेने तिथं आला असावा. पण नसीरची ती अवस्था पाहून त्यालाही बहुधा चेहर्यावर पाणी मारण्याची गरज भासली. आणि आता त्यात भर म्हणून आरीफही जखमी होता.

मंदार पुन्हा आरीफजवळ आला. आरीफला उठवण्याच्या प्रयत्नात असलेला मंदार त्याला उचलून बाहेर कॉरीडॉरपर्यंत घेऊन आला. बारच्या मुख्य बाजूकडून बाहेर निघण्याचं मनाशी नक्की करत मंदार आरीफला उचलून पुढे आला. तिथून निघताना आपली अमेरीकन टुरीस्टर घ्यायला तो विसरला नाही, पण हा त्या सॅकची झिप लावणं मात्र त्याला त्या गडबडीत सुचलं नाही. तिथून खाली जिना उतरून जाण्याअगोदर त्याने पोलिसांचा अंदाज घेण्यासाठी आरीफला खाली जमिनीवर ठेवले आणि समोरच्या खिडकीपाशी जाऊन तो खाली पाहू लागला. खिडकी संपूर्णतः काचेची असून टाईल्सपासून माणूसभर उंचीची होती.

खाली नजर टाकताच त्याला तिथं पोलिस जीप दिसली. आणि तिच्यापाशी उभ्या असलेल्या एका कॉन्स्टेबलाला न्याहाळत त्याला कश्याप्रकारे चकमा द्यायचा याचा मनात ओबडधोबड आराखडा मंदारने तयार केला. एकंदरीत आरीफला वाचवायचे असेच काहीसे त्याच्या मनात होते. का.. ते त्यालाच माहीत.. .. कदाचित सध्यातरी त्याला आरीफसारख्या खबर्याची गरज होती. कारण काही असो पण उद्देश मात्र एकच होता की आरीफचा जीव वाचवायचाय.

*************

मनू मेहजबीनला बाहेर सुखरूप खाली घेऊन आली. आणि पुन्हा आत जाण्यासाठी म्हणून वळाली. वर बारचं प्रवेशद्वार ओलांडल्यावर तिनं वॉशरूमकडे लगबगीने प्रस्थान केले. मघाच्या गोंधळामुळे जवळपास बार रिकामा झाला होता. धावपळीत असलेल्या तिथल्या एका वेटरला तिने वॉशरूमकडे जाण्याचा मार्ग विचारला. त्या बिचार्यानेही घाईगडबडीत हाताने इशारा केला आणि तो बारच्या प्रवेशद्वारातूनच एक्झिट करत तिथून बाहेर पडला. मनूच्या मागोमाग पोलिसही वर वॉशरूमकडे पोहचत होते.

वॉशरूमचे उघडे दार दिसताच झटकन आत घुसणार्या मनूला काहीतरी जाणवले म्हणून ती जितक्या वेगाने आत वॉशरूममध्ये शिरली तितक्याच वेगाने बाहेर येऊन तिने बाहेरील कॉरीडॉरच्या दुसर्या टोकाला पाहीले. आणि तिला खिडकीतून बाहेर पाहणारा मंदार दिसला. त्याच्या पाठीवर अडकवलेल्या बॅगमधले पैसे आणि खाली जमिनीवर चाकू लागून पडलेला आरीफ दिसताच मनू चवताळून उठली. आणि शक्य तितक्या जोरात धावत ती मंदारजवळ पोहोचली. मागून येणार्या चाहूलीनं मंदारच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मनूच्या टपाऽटप वाजणार्या शूजचा आवाज त्याच्या कानी पडताच तो मागे फिरून पाहण्यासाठी वळाला. मंदारवर त्वेषाने धावून जाणार्या मनूने मंदारची हालचाल तत्परतेने ओळखली आणि त्यानं पूर्णपणे वळून पाहण्याआधीच तिने हवेत स्वतःला झोकून आपल्या लाथांचा आधार घेत त्याच्यावर हल्ला केला. आघात ऐनवक्ताला झाला आणि मंदारचा तोल जाऊन तो काचेवर आदळला. क्षणात त्याच्या शरीरानं खिडकीच्या काचांना ठिकठिकाणी तडे गेले. काचांच्या तुकड्यांपासून डोळे शाबूत राहावेत म्हणून आपसुकच मंदारच्या डोळ्यांच्या पापण्या मिटल्या गेल्या. त्यातून स्वतःला सावरत कसाबसा मंदार गडबडत डोकं हलवत थोडासा पुढे सरकावा की मनूने पुन्हा संधी साधत उजव्या लाथेने त्याच्यावर प्रहार केला. यावेळी मंदारला सावरण्याचा वेळच नाही मिळाला. आणि तो पुन्हा काचांवर ढासळला.. अगोदरच तडा गेलेल्या त्या खिडकीच्या काचा त्या धक्क्यानं पूर्णपणे निखळल्या आणि त्यातून तोल जाऊन बाहेर निघालेला मंदार सरळ पहील्या मजल्यावरून खाली पडत नेमका पोलिस जीपच्या बोनेटवर जाऊन पडला.

'धडाडऽडम्म्ऽऽ...'

एकच आवाज झाला. जीपला खेटून उभ्या असलेला कॉन्स्टेबलदेखील त्या हादर्याने दचकून गेला. वर बारमध्ये नक्की काय तमाशा चालू आहे ते पाहण्यासाठी खाली उभी असलेली दोन-चार टाळकी धावतच पुढे झाली. मंदार बराचसा घायाळ झाला होता. शरीरावर ठिकठिकाणी काचांचे बारीक वार होते. बोनेटवर आसपासही काचा विखुरलेल्या होत्या. नशिब म्हणून डायरेक्ट जमिनीवर न येता जीपच्या बोनेटवर पडल्याने हात-पाय शाबूत होते. पण त्याला फारशी हालचाल करता येणे शक्य होत नव्हते. तरीही मनातला दृढनिश्चय म्हणा की आणखी काही आपली अशी अवस्था करणारा कोण हे पाहण्यासाठी त्याने अलगद मान वर केली.

वर खिडकीपाशी मनू एक पाय पुढे करून आणि कंबरेवर हात ठेवून उभी होती. तिला पाहताच त्याला कळून चुकलं की विनाकारण मनूने त्याला अशी शिक्षा दिलीय. सालीऽऽ ही भवानी नको तिथे टपकली.. त्याच्या मनात साहजिकच असं आलं. तिच्या मागोमाग आलेल्या दोन पोलिसांपैकी एकानं वरूनच खालच्या कॉन्स्टेबलला फर्मान सोडलं.

"शेलार, उचलून जीपमध्ये घाल रे त्यालाऽऽ.."

'साल्यांनो.. जखमी आहे म्हणून.. न्हायतर एकेकाला धडा शिकवला असता आज...' मंदार मनातच बोलत होता. नाहीतरी सध्या त्याला तोंड उघडणंही अवघड जात होतं.

त्यानं मान तिरकस करत त्याला खाली उतरवण्यासाठी आलेल्या कॉन्स्टेबलला पाहीलं. कॉन्स्टेबल शेलारनेही त्याला आधार देत खाली आणलं आणि आत बसवण्यासाठी घेऊन जाऊ लागला.

वरती इन्स्पेक्टरने आरीफ जिवंत असल्याचे स्पष्ट करत ताबडतोब बाहेरच्या मेन रोडवर ॲम्ब्यूलसला यायला सांगितले, आणि आपल्या सोबतच्या दोन कॉन्स्टेबलला त्यांनी आरीफला तिकडे घेऊन जाण्याच्या सुचना दिल्या.

मनूच्या धाडसाचं कौतुक करत इन्स्पेक्टरने तिचं तिथं येण्याचं कारणही अलगद विचारले. पण मनूने तितक्याच सफाईने इन्स्पेक्टर साहेबांना काही वेळापूर्वी झालेल्या गडबड गोंधळामुळे आपण इथे आल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्यावर शंका घेण्याचे कारणही उरले नाही.

मंदार जीपमध्ये मागच्या बाजूला पहूडला होता. कॉन्स्टेबल शेलार बाहेरच उभा होता. जमिनीवर पडलेला कसलासा कागद उचलण्यासाठी म्हणून शेलार खाली वाकला आणि मंदारची नजर समोरच्या गाडीवर गेली.

'राखाडी रंगाची काहीशी लांबट होंडा सिटी...'

मंदारला क्लिक झालं.. त्याला मौसमच्या खुनाची रात्र आठवली. अर्रर्र ही तर तीच गाडी आहे जी मौसमच्या खुनाच्या नंतर आपण झाडीत लपलेलो असताना समोर येऊन थांबली होती..

वाकलेला कॉन्स्टेबल शेलार पुन्हा मध्येच ताठ उभा राहील्याने मंदारला ती कार दिसेनाशी झाली. परीणामी तिच्याजवळ कोण जातेय कोण नाही याचा पत्ता लागु शकत नव्हता. त्यात मंदारला हालचाल करणंही अवघड झालं असल्याकारणाने तो बाजूला वाकूनही पाहू शकत नव्हता.

'च्याऽऽ... मारीऽऽऽ.... कुठून कडमडलंय हे कोण जाणे..' मंदारने मनातच शेलारला शिव्यांची लाखोली वाहिली.

पण मनातली ऊत्सुकता काही त्याला शांत बसून देत नव्हती. वर बारमध्ये गेलेले पोलिस नसीरच्या खुनाची पडताळणी करत असावेत बहुधा, नाहीतर इतक्या वेळात ते खाली असते. कसाबसं कुस बदलण्यासाठी मंदारने आपली उरलीसुरली शक्ती एकत्र केली आणि यावेळी तो सीटवरून खाली पडला. मंदारच्या अंगातून सरसरत वेदनेची कळ आली. पण तिला फारसं लक्षात न घेता तो त्या कारकडेच पाहू लागला.

कॉन्स्टेबल शेलार त्याच्या धडपडण्यानं आत जीपमध्ये लगबगीनं आला.

"एयं.. सुक्काळीच्याऽऽ.. कश्याला मरतयंस इकडून तिकडून..." मंदारला पुन्हा नीट सीटवर आडवं करत शेलार म्हणाला.

शेलार बाकी हट्टाकटटा तरूण होता, आणि त्याच्या भाषेच्या लहजावरून तो पक्का गावठी वाटत होता. जीपमधून बाहेर आल्यावर यावेळी शेलार दुसर्या बाजूला थोडा अंतरावर येऊन उभा राहीला.

हुश्श्... आता मंदारला समोरचे दृश्य विनाअडथळा दिसत होते.

मंदारने त्या कारवर नजर फिरवली. कारची समोरची बाजू त्याच्या अगदी समोरच होती. जवळपास पंचवीसतीस फुटांचं अंतर असावं मंदार आणि त्या कारच्या मधलं. बारकाईनं न्याहाळत असताना मंदारची नजर त्या कारच्या नंबर प्लेटवर गेली. आणि त्या नंबर प्लेटवरचा नंबर पाहून मंदारला अक्षरशः धक्काच बसला.

"MH05-CA-3156"

'whaatऽऽऽऽऽऽ......' नकळत मंदार मनातच ओरडला. त्या नंबर प्लेटवरचे 'थ्री वन् फाईव्ह् सीक्स्' त्याच्या डोळ्यांसमोर नाचत होते. हा कोड तोच होता जो डिग्रीने मंदारला इकडे बोलावताना सांगितला होता. शिवाय आरीफनेही रेल्वे फलाटावर हाच कोड पुटपुटला होता.

'अरेऽऽ... पण ते सर्व जाऊ दे भो***ऽऽ... मंदारऽऽ.. डॅम्.. इट्ऽऽऽ.... तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी आजपर्यंत कुठे पाहीला नाही... तू तो नंबर विसरू कसा शकलास... हा तोच आहे.. त्याने तुला सुरूवातीपासूनच हींट दिली होती. पण तु अतिशहाणपणामुळे तिकडे दुर्लक्ष केलेस... शीट्ऽऽ... भिकार्.. लक्षणं आहेत ही तुझी...' मंदार डोळे मोठे करून आणि दात एकमेकांवर आपटत स्वतःलाच मनात शिव्या घालत होता.

समोरच्या कारमधून थोडी हालचाल जाणवली. मंदार निरखून तिकडे पाहू लागला.

ड्रायव्हरसीटच्या बाजूचा डोअर उघडला गेला आणि पठाणीमधला एक धिप्पाड माणूस बाहेर पडला. तो मंदारकडे रोखून पाहत होता. पण मंदारची नजर अजून शांत नव्हती. काही क्षणांत उजव्या बाजूचाही डोअर उघडला गेला. त्यातून स्वतःचे केस ठिकठाक करत विक्रम रुबाबात बाहेर निघाला. तो मंदारकडे पाहत गालातल्या गालात हसत होता.

मंदारने कारचा नंबर पाहील्यापाहील्याच ते ओळखले होते, हा सर्व विक्रमचाच डाव होता. अतिशय थंड डोक्याने विक्रमने मंदारला पुरते फसवले होते. आणि ते ही हींट देऊन, मंदार त्याच्या हींट्स ओळखू शकला नाही. ती कार मंदारने याअगोदरही पाहीली होती. विक्रमच्या कारचा नंबर त्याला तोंडपाठ होता. पण तो नंबर आपल्याला सांगितलेल्या कोडशी मॅच होतोय हे त्याला सुरूवातीला लक्षात आले नाही. आणि आता वेळ निघून गेली होती.

इतक्यात वरून इन्स्पेक्टर, त्यांच्या सोबतचा एक कॉन्स्टेबल आणि मनू बाहेर आले. इतर दोन कॉन्स्टेबल अगोदरच आरीफला घेऊन मागच्या बाजूच्या मुख्य रस्त्याला गेले होते. ॲम्ब्यूलस तिथंच मुख्य रस्त्यावर बोलावून घेतली होती.

इन्स्पेक्टर साहेब जीपच्या मागे येऊन मंदारला न्याहाळू लागले.

"काय पैलवान, दोन खुन आणि एक हाल्फ मर्डर्... कसं वाटतंय आता.. आता बाराच्या भावात गेलास म्हणून समज.."

मंदारनं यावर काहीच प्रतिसाद दिला नाही, तो इन्स्पेक्टरपासून नजर फिरवून विक्रमकडे शुन्य भावाने पाहत होता. मनूनेही मंदारसमोर जाणे पसंद केले नाही. तिचं लक्ष विक्रमकडे गेले. विक्रम शांतपणे मंदारला पाहत पुन्हा रुबाबात गाडीत बसला. इरफान भाई देखील ड्रायव्हींग सीटवर बसला. गाडीचा दरवाजा बंद होण्याचा आवाज लांबूनही मंदारला स्पष्ट ऐकू आला. आणि रिव्हर्स गिअर टाकून जाणार्या विक्रमच्या गाडीकडे मंदार हताशतेने पाहू लागला.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED