सुनील आणि काजल यांचं कॉलेज पासून सुरु झालेल्या मैत्रीच रूपांतर आता प्रेमात झालं होत आणि घरी सर्व आधीच माहित असल्यानं कोणाचाच त्यांच्या लग्नाला असा विरोध न्हवता. खूप थाटात दोघांचं लग्न झालं. सर्व एकदम खुश होते. काही महिन्यांनी काजल ला कळल की ती सर्वांना गोड बातमी देणार आहे तिने ही खुशखबर घरात सर्वांना दिली आता तर घरात नेहमीच आनंदी वातावरण असायचं काही महिन्यांनी त्यांना एक गोंडस मुलगी झाली जिचं नाव ठेवलं परी. पुढे मग कामाच्या निमित्ताने आलेला सुनील इकडेच मुंबईमध्ये स्थायिक झाला. मुंबईत तो त्याची बायको काजल आणि त्यांच्या ४ महिन्यांची मुलगी परी यांच्यासोबत राहू लागला, तसा तो एका Corporate कंपनीत कामाला होता . परिस्थिती तशी चांगलीच होती आणि मित्रांच्या जोडीला राहून त्याला आता हळूहळू दारू पिण्याची सवय देखील लागली होती. त्याच्या या रोजच्या सवयीमुळे काजल आणि त्याच्यात नेहमी वाद होत असत. काजलला त्याच असं वागणं पटत नसे.
असाच आजदेखील तो पून्हा दारु पिऊन घरी जात होता. दरवाजा उघडता क्षणीच काजल ला कळून चुकल की हा पुन्हा दारु पिऊन आला आहे आणि त्यावरुनच त्यांच्यात पुन्हा जोरात वाद सुरु झाला पण सुनील तिलाच उलट बोलू लागला की "तुझ्या बापाच्या पैशाची नाही पीत, मी माझ्या पैशाची पितो." असे सगळे वाद घालून तो काजल ला दुर्लक्ष करून रात्री सोफ्यावरच झोपी गेला, त्याचा डोळा कधी लागला हे त्याच त्यालाही कळलं नाही.
सकाळी त्याला जेव्हा जाग आली तेव्हा परिच्या रडण्याच्या येत होता त्याने घड्याळ्यात पाहिल तर ८ वाजले होतो. बेडरुम चा दरवाजा अजुनही बंदच होता. काजल कधी इतक्या उशिरापर्यंत झोपत नसे त्याला थोड नवल वाटलं त्याने बेडरुमचा दरवाजा ठोकवून पाहिला पण आतून काहिच प्रतिसाद येत नव्हता फक्त परी रडत होती. ५ मिनट वाट बघितल्यानंतर त्याने दरवाजा तोडायला चालू केला. २-४ धक्क्यांमध्ये त्याने तो दरवाजा तोडला आणि आतला प्रसंग पाहून त्याच्या पाया-खालची जमिनच सरकली कारण त्याची काजल समोर पंख्याला लटकली होती आणि परी बेडवर रडत होती. त्या धक्क्याने तो खालीच कोसळला त्याला काहीच सुधरत नव्हते. त्यानंतर त्याला काल काजल काय बोलली ते आठवल आणि तो अजून जोरात रडू लागला. ती म्हणाली होती, "जर तू उदया पुन्हा दारु पिऊन आलास, तर तो माझा शेवटचा दिवस असेल." आणि असच काही आता त्याच्या समोर घडल होत.
तो पटकन उठला तिला खाली उतरवल आणि तसच तिला घेऊन हॉस्पिटलकडे धावला. धावतच जाऊन त्याने डॉक्टरना विनंती केली. डॉक्टरांनी काजलला पाहिल पण वेळ निघून गेलीय हे त्यांनाही कळलं. त्यांनी सुनीलला काजल हे जग सोडून गेलीय याची कल्पना दिली. तो काहीही बोलण्याच्या मनास्थितीत नव्हता त्याला आता सर्व काही संपल्याची जाणिव झाली.
तेवढ्यात त्याला भान आलं की आपण परीला घरी एकट सोडून आलो आहोत, तो तसाच जीवांच्या आंकाताने धावतच घरी पोहोचला त्याने दरवाजा उघडला. घरात एकदम शांतता पसरली होती. बेडरुम मध्ये जाऊन पाहिल तर बेडवर परी होती पण शांत तिच्या रडण्याचा आवाज आता बंद झाला होता. तो जवळ गेला त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केल्या पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता कारण त्या लहानग्या जीवाने रडून - रडून हंबरडा फोडून कधीच या जगाचा निरोप घेतला होता.
आता सुनीलकडे आपल म्हणावं अस कोणीच राहिल नव्हत. दारुमुळे त्यानी स्वतःचच नाही तर आपल्या कुटुंबाच अस्थित्व देखील गमावल होत. त्याच्यावर खूप प्रेम करणारी काजल आणि त्या दोघांच्या प्रेमाची निशाणी परी यांच्या जाण्याने त्याला खूप रडू येत होत पण आता काहिच उरल नव्हत सर्व संपून गेल होत...!!!