Ti Ek Shaapita - 21 books and stories free download online pdf in Marathi

ती एक शापिता! - 21

ती एक शापिता!

(२१)

भर दुपारची वेळ होती. सर्वत्र का कोण जाणे भयाण शांतता पसरली होती. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते. सुबोधचे कुटुंब राहत होते तो परिसर सारा चाकरमान्यांचा! सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत त्या भागात नीरव शांतता असे. पुरुषांसोबत अनेक कुटुंबातील स्त्रियाही नोकरी निमित्ताने बाहेर पडत असल्यामुळे घराघरात मोजकीच माणसे असायची. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्त्रियांनाही अर्थार्जनासाठी घराबाहेर पडावेच लागते त्यामुळे कुटुंबासोबत मुलांचेही भविष्य उजळते. आर्थिक बाजू भक्कम असली म्हणजे समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त होते. मात्र त्याचवेळी घरकामाचा अतिरिक्त बोझाही स्त्रियांवर पडतो आहे. पत्नी दिवसभर घराबाहेर राहून आर्थिक स्थिती बळकट करते म्हणून कुटुंबातील पुरुष तिला घरकामात मदत करताना दिसत नाहीत. स्त्रिया पुरुषांच्या मदतीला धावत असल्या तरीही पुरुष तिला घरकामात सहकार्य करण्यासाठी फारसे उत्सुक नसतात उलट पुरुषांची छोटी छोटी कामेही बायकांनाच करावी लागतात. लैंगिकमुक्ती तर फार पुढचा प्रश्न!

अशोक दिवाणखान्यात अशाच विचाराच्या गर्तेत अडकलेला असताना बाहेरून आवाज आला,

"अशोक... अशोक..." त्याच्या आवाजातला आनंद लपत नव्हता. अचानक अशोकच्या डोक्यात एक वीज शिरावी एका विचाराने प्रवेश केला,

'अरे, माधवीच्या सुखाचा दावेदार तर दररोज घर चालून येतोय. मीता सोडून गेल्यापासून पीयूषही त्या सुखासाठी नक्कीच तळमळत असणार. अशा दोन समदुःखितांना आपण जवळ आणले, संधी दिली तर...' तितक्यात पीयूषची पावले वाजली आणि अशोकने नेहमीप्रमाणे डोळे मिटले. गेली अनेक दिवस असेच चालू होते. पीयूषची चाहूल लागताच अशोक डोळे मिटून पडायचा. ते पाहून पीयूष माधवीच्या खोलीत जायचा. त्यांच्या गप्पा बराच वेळ रंगायच्या. त्या दिवशीही तसेच झाले. अशोकला झोपल्याचे पाहून पीयूष आतल्या खोलीकडे निघाल्याची चाहूल लागताच अशोकच्या मनातील विचाराने पुन्हा उभारी घेतली.

'काय हरकत आहे, पीयूष-माधवीला एकत्र आणायला? मी जरी तसे केले नाही तरी.. तरी... मी याक्षणी झोपलोय या विचाराने पीयूष माधवीच्या खोलीत जातोय. काय असेल तिथले दृश्य? काही क्षणांपूर्वी मी खोलीत डोकावले तेव्हा माधवी पलंगावर तळमळत होती. आताही तीच अवस्था असणार. कदाचित तिचे कपडेही अस्ताव्यस्त झाले असणार. ती तशा अवस्थेत पीयूष खोलीत पोहोचणार. ते दृश्य पाहून पीयूषच्या भावना अनावर होणार नाहीत काही महिन्यांपासून पीयूषही त्या सुखासाठी पारखं झाला आहे. तो त्या सुखासाठी धजावणार नाही? तळमळणाऱ्या माधवीचे त्याच्याकडे लक्ष गेल्यानंतर ती त्याला साद घालणार नाही? तिची साद ऐकून, तिची तगमग पाहून पीयूष तिच्याकडे झेप घेणार नाही? त्यावेळी का त्यांना कुणाची आठवण येणार आहे? माधवीला तिच्या पतीची आणि पीयूषला का त्याच्या मित्राची आठवण येणार आहे? मित्राशी विश्वासघात करतोय ही जाणीव त्याला त्या संबंधापासून दूर करणार आहे? आनंदाच्या परमोच्च क्षणी का त्यांना मी आठवणार आहे? त्यांचे संबंध असे लपूनछपून रंगण्यापेक्षा.... पाहू तर खरं आत काय चालले आहे?' अशा विचारात अशोकही माधवीच्या खोलीकडे निघाला...

अशोकला बैठकीत झोपलेला पाहून पीयूष माधवीच्या खोलीत शिरला. पलंगावरचे दृश्य पाहून तो थबकला. पलंगावर झोपलेल्या माधवीचा पोशाख अस्ताव्यस्त झाला होता. माधवी अंगोपांगी भरलेली होती. रंग गोरापान होता. त्वचा नितळ, लुसलुशीत दिसत होती. त्या सौंदर्याने बेभान झालेला, स्वतःला विसरलेला पीयूष वेगळ्याच उत्कंठतेने पलंगाजवळ पोहोचला. पलंगावरचे ते सळसळते, मुसमुसलेले, तळमणारे यौवन त्याच्यापासून अगदी जवळ होते. ते अंतर मिटवण्यासाठी हाताचे अंतरही कमी पडणार होते. एका अनामिक ओढीने पीयूषने स्वतःचा हात तिच्या शरीरावर ठेवला. त्या स्पर्शाने तो वेडापिसा झाला. विशिष्ट ठिकाणी त्याने हाताचा दाब वाढवला. त्या स्पर्शाने माधवी जागी झाली. काय प्रकार आहे ते तिला समजत नव्हते. एका क्षणातच तिला वास्तवाची जाण आली. तिच्या शरीरात एक ज्वाला पसरली, श्वास गरम झाला, अंगात काही तरी सळसळू लागलं. ती जागी झाली असल्याचे पाहून पीयूषला लगेच वास्तवाची जाण आली तरीही तिच्या शरीरावरचा हात न काढता तो म्हणाला,

"माधवी.. माधवी, मी जिंकलो ग..."

"क.. क.. काय झाले?" साथ सोडू पाहणाऱ्या शब्दांची जुळवाजुळव करीत माधवी म्हणाली.

"अग, मी पेपर काढतोय." पीयूषचा आनंद गगनात मावत नव्हता.

"का..य सांगतोस? अभिनंदन!" त्याचे अभिनंदन करीत असताना तिचे हात त्याच्या हातावर स्थिरावले त्यामुळे त्याच्या हाताचा दाब आपसूकच तिच्या शरीरावर वाढल्यामुळे दोघेही सुखावले पण जास्त कोण सुखावले असेल तर तो अशोक! दाराच्या आडून तो सारे पहात होता...

काही वेळाने पीयूष निघून गेला. त्याचे लक्ष अशोककडे गेलेच नाही. त्याला सोडायला दारापर्यंत आलेली माधवीही त्याच्याकडे न पाहता बेडरूममध्ये निघून गेली. जणू त्या घरात दुसरे कुणीही नव्हते, किंवा अशोक तिच्यासाठी अपरिचित होता. माधवी आत गेली आणि बैठकीत जणू विचारांचे वादळ आले. त्या वादळात अशोक गरगरू लागला. त्याला वाटले,

'ज्या सुखासाठी माधवी तळमळतेय, पीयूष तडफडतोय आणि जे सुख मी माधवीला देऊ शकत नाही म्हणून माझी तगमग होते, मी अस्वस्थ असतो त्या सुखाचा झरा असा अचानक सापडला. झरा म्हणण्यापेक्षा धबधबा गवसलाय...'

झाली. अखेर पीयूषची इच्छा पूर्ण झाली! संपादक आणि पूर्ण अधिकार असलेला त्याचा पहिला अंक बाहेर पडला होता. अंकाचे स्वरूप, मांडणी पाहून पीयूषचे मन भरुन येत होते. दुसऱ्या दिवशीच्या अंकाची तयारी करायची होती म्हणून त्याने तो सुंदर, मनमोहक अंक बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशीच्या अंकासाठी बातम्यांची निवड करत असतानाच एका बातमीने त्याचे लक्ष वेधले.

'मित्राच्या पत्नीवर बलात्कार करून बलात्कारी फरार...' ती बातमी वाचून पीयूष जास्तच कावराबावरा झाला. वास्तविक पीयूष मनाने हळवा नव्हता, परंतु मीताच्या पलायनानंतर आणि वर्तमानपत्राच्या क्षेत्रात त्याला पदोपदी येणाऱ्या अनुभवांच्या धक्क्यातून तो बराच हळवा झाला होता. साध्या-साध्या गोष्टीवरही त्याचे डोळे भरून येत. वास्तविक त्या बातमीमुळे त्याला अस्वस्थ व्हायची गरज नव्हती परंतु तो चलबिचल झाला. त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली,

'प्रत्यक्ष मित्राच्या बायकोवर बलात्कार? या समाजाला ही काय विकृती म्हणावी? मित्राने संकटकाळी मदत करावी की, मित्रालाच संकटाच्या खाईत ढकलावे? मित्राची पत्नी म्हणजे माता, भगिनीच! मित्राच्या पत्नीकडे त्यादृष्टीने पाहायचे सोडून वासनामयी दृष्टीने पाहावं? पाहायचे सोडा पण तिच्यावर बलात्कार? हे मात्र भलतेच झाले. ज्या गोष्टीचा विचार करवत नाही ती गोष्ट प्रत्यक्षात? छे! छे! विकृतीने पछाडलेल्या किड्यांचेच ते काम. मित्राच्या पत्नीची साथ असेल तर गोष्ट निराळी! पण तरीही मित्राशी विश्वासघात करणे अयोग्यच...' विचारात गढलेल्या पीयूषचे लक्ष माधवीने नुकत्याच पाठवलेल्या लेखावर गेले. जिव्हाळा सुरू झाल्यानंतर पीयूषने माधवीला नोकरी दिली होती. लेख वाचत असताना त्याच्या मनावर एका विचाराने जोरदार प्रहार केला,

'मी त्या बातमीतील बलात्कारी माणसाला दोष देतोय परंतु मी तरी दुसरे काय करतो? अशोक माझा बालपणापासूनचा मित्र! मीही त्याच्याशी लपंडाव खेळताना त्याला फसवतोच ना?सध्या अशोक आजारी आहे. त्याला... शिवाय तो माधवीला ते समाधान, ती तृप्ती देऊ शकत नाही. म्हणून मी त्याच्या उपस्थितीत माधवीच्या... पण ज्या ज्या वेळी मी त्याच्या घरी जातोय. त्यावेळी तो झोपलेला असतो पण खरेच का तो झोपलेला असतो की झोपेचे सोंग घेत असतो? माझे आणि माधवीचे संबंध जुळावेत म्हणून तर तो तसे वागत नसावा? त्याची तर तशी इच्छा नसावी? माधवी अगोदरच अतृप्त, असमाधानी आहे, माझ्यासारखा पूर्ण पुरुष तिला मिळत असेल तर.. तर.. पण तशा संबंधामुळे सारेच बदनाम होतील त्याचे काय?..' पीयूष विचारात गुंग झालेला असताना माधवी त्याच्या दालनात शिरली. पीयूषला तसा ध्यानस्थ बसलेला पाहून हातातला कागद त्याच्या चेहऱ्यासमोर हलवत म्हणाली,

"अहो, संपादक महोदय, कशाचा विचार करता? आता झाले ना सारे मनासारखे?"

"अं..अंं.. हो.. हो.." गडबडलेला पीयूष म्हणाला.

"चलायचे ना?" माधवीने विचारले.

"अरे, बाप रे! नऊ वाजले की. जावे तर लागेल..." पीयूष बोलत असताना त्याच्या आवाजात असलेली नाराजी माधवीच्या लक्षात आली. पण ती काही बोलली नाही. पीयूषच्या मागे ती बाहेर आली. पीयूषने स्कुटी सुरू करताच ती त्याच्या पाठीमागे बसली..जरा जास्तच खेटून बसली...

माधवीने घरात प्रवेश केला. त्यावेळी सुहासिनी सर्वांची ताटं वाढून घेत होती. माधवीने हातपाय धुतले आणि ती सर्वांसोबत जेवायला बसली तरी नेहमीप्रमाणे वातावरणात निःशब्द कटुता होती. एखाद्या अपरिचित व्यक्तींनी हॉटेलमध्ये समोरासमोर जेवायला बसावे. कुणीही कुणाशी न बोलता जेवावे आणि आपापल्या कामाला निघून जावे त्याप्रमाणे त्या चौघांनी जेवणे टोपली. नंतर आपापल्या खोलीत निघून गेले. माधवी खोलीत शिरली आणि स्वतःच्या पलंगावर तिने अंग टाकले. शरीरात जसा अग्नी चेतला होता तसाच विचारांचा अग्निकुंडही मनात धगधगत होता,

'असं धगधगतं शरीर घेऊन मला किती दिवस काढावे लागणार आहेत? ही धग शांत करणारा माझ्यापासून हाताच्या अंतरावर आहे पण मला त्याचा काही उपयोग. उलट तो माझ्याजवळ आला की, ही धगधग उग्र रुप धारण करते. त्याचे समाधान झाले की तो बाजूला होतो. माझे समाधान होतच नाही. मला रात्रभर तळमळत पडावे लागते. मलाही आजकाल स्वतःचे समाधान स्वतःच करुन घेण्याची एक विकृती जडते आहे. आम्ही पती-पत्नी एकमेकांचे समाधान करण्यासाठी विकृत मार्गावर जात आहोत. अशोकच्या घराण्याला जणू अर्धवटपणाचा शापच आहे. अशोकच्या बाबांचेही तसेच आहे. आईंनी काही काळ का होईना पण ऐन तारुण्यात पतीच्या मित्राकडून ते सुख मिळवलं. त्यासाठी बाबांनी मोठ्या मनाने ते संबंध जुळवून येण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु अशोक तसा मोठेपणा दाखवेल असे वाटत नाही. पण बहुतेक त्याच मनात तसे काही तरी शिजत असावे कारण अशोक कधीच दुपारी झोपत नाही. आजारपणातही कधी दुपारी झोपला नाही पण आजकाल पीयूष यायच्या वेळी तो झोपी जातो की झोपेचे सोंग घेऊन आम्हाला एकांत मिळवून देतो काही समजायला मार्ग नाही. मात्र अशोक निघून गेला की तो झोपेतून जागा होतो. त्यावेळी त्याला झोप लागली असल्याचे कोणतेही चिन्ह त्याच्या डोळ्यात किंवा चेहऱ्यावर दिसत नाही. त्याच्या मनात आहे तरी काय? त्याच्या मनात माझ्या पावित्र्याबद्दल तर काही शंका नसेल ना? माझे पाऊल वाकडे तर पडत नाही ना, याची तर तो खात्री करून घेत नाही ना? माझी अतृप्ती, अशोकची झोप यामुळे मी पीयूषकडे आकर्षित होतेय, नको ते संबंध आमच्यामध्ये सुरू असताना नेमके त्याचवेळी अशोकने खोलीत प्रवेश केला तर? तो धक्का मला सहन होईल? जे काय होईल ते बघता येईल पण आज जे सुख मिळतेय... मिळणार आहे ते मी का नाकारू? उद्याची काळजी करण्यापेक्षा आजचे... हाती असलेले सुख का सोडू? पीयूषची यायची वेळ झाली की मी का कावरीबावरी होते? त्याचा आवाज आला आणि त्याची पावलं खोलीच्या दिशेने वळल्याचे लक्षात आले आणि तो खोलीत आला की, मन का कासावीस होते? शरीरात एक वेगळीच संवेदना का संचारते? लग्नापूर्वी अशोकच्या चाहुलीने आणि त्याच्या दर्शनाने अशीच हुरहूर वाटत असे. नियतीला माझे आणि पीयूषचे संबंध मान्य असावेत का? नेमकी मीता का पळून जावी? त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या लग्नापूर्वीची प्रेयसी असलेल्या मीताने का धोका द्यावा?

ठरलं...ठरलं. आता माघार घ्यायची नाही. अशोककडून जे सुख मिळत नाही ते... तेच सुख त्याच्याच मित्राकडून... पीयूषकडून मिळवायचे. अशोकचा, त्याच्या आईवडिलांचा समजेल, त्यांना काय वाटेल याची चिंता करायची नाही. आता असे तळमळताना, विकृतीला जवळ करायचे नाही. अशोकला रक्तदाबाचा आजार आहे. अनपेक्षित दृश्य पाहिल्यावर त्याला निश्चितच धक्का बसेल, त्याने आमच्या संबंधाची तशी कितीही स्वप्नं पाहिली असली, त्याने आम्ही एकत्र यावे म्हणून तशी परिस्थिती जुळवून आणली असली तरीही त्याला मनातून असेच वाटत असेल की, मी तशी वागणार नाही, मी त्याचा विश्वासघात करणार नाही हा विचार असेलच. आम्हा दोघांना एकत्र पाहून त्याला प्रचंड धक्का बसला आणि त्याला ह्रदयाविकाराचा झटका आला तर? कदाचित तो हे जग सोडून गेला तर? माझे पांढरे कपाळ आणि माझ्या टिकलीचा धनी गेलेला मला सहन होईल? परंतु त्या धन्याचा, त्या टिकलीचा मला काहीच उपयोग होत नाही. कारण पती असूनही मी तशी कुमारिकेचे जीवन जगते आहे. वृथा अभिमान मिरविण्यात काय अर्थ आहे? लावत असलेल्या टिकलीमुळे जर कपाळावर खाज येत असेल तर आपण टिकलीची कंपनी बदलतो. धक्क्यामुळे जर अशोक या जगातून गेला तर बिन औषधाचा आजार बरा होईल. नंतर बिनधास्तपणे पीयूषसोबत मनसोक्त सुख लुटता येईल. पण त्यासाठी अशोकचा मृत्यू आवश्यक आहे. पण ते कसे शक्य आहे? म.. मला.. अशोकचा खून तर... मग मलाही फाशी झाली तर सारे मुसळच केरात जाईल. मग मी करु तरी काय? अशोकचा मृत्यू व्हायला तर पाहिजे पण सारे कसे बिनबोभाट होणे गरजेचे आहे. या कामात पीयूष काही मदत करेल अशी शक्यता फार कमी आहे. कारण पीयूष हा अशोकचा बालपणापासूनचा मित्र आहे. मित्राला संपविण्याचा तो विचार करू शकणार नाही. पण का करू शकणार नाही? माझ्या हट्टापुढे पीयूषला वाकावेच लागेल. माझ्या सुंदर शरीराच्या जाळ्यात अडकलेला पीयूष मी सांगेन तसेच करेल, त्याला तसे करायला मी भाग पाडेल. पण तोही मुर्खपणाच ठरेल. कारण नंतर पीयूषला फाशी दिली तर? देवा, मी काय करु? असं जीवन माझ्या वाट्याला का घातलं? देवा, मला जसा पीयूष हवा आहे त्याचवेळी अशोक माझ्या जीवनात नको आहे. आणि अशोकच्या नसण्याची सजा मला किंवा पीयूषला नको आहे. काही तरी मार्ग दाखव, परमेश्वरा, मार्ग दाखव. परमेश्वरा, माझ्या मागणीचे तुला आश्चर्य वाटत असेल कारण बहुतांश स्त्रिया पतीचे आरोग्य मागतात, शेवटची घटका मोजत असलेल्या नवऱ्याच्या बायकाही पतीला लवकर आरोग्य लाभू दे, तो लवकर चांगला होऊ दे अशी प्रार्थना करीत असतील पण मी मात्र माझ्या पतीला मृत्यू दे असा वर मागत आहे. परमेश्वरा, काहीही कर परंतु अशोकच्या जन्मोजन्मीच्या बंधनातून मला मोकळे कर. माझी याचना स्वीकार. दया कर. मला मार्ग दाखव...

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED