पार - एक भयकथा
भाग ३
मालती मावशी आल्या, आल्यावर सगळा प्रकार तिने त्यांना सांगितला.
“ताई, लई मोठी चूक केली इथे येऊन जेवढ्या लवकर इथून निघता येईल तेवढं बघा, पारावर वारं आहे, आज पर्यंत खूप जन झाडावरून पडून गेलेत, आता त्या वडाच्या झाडावर काय आहे फळ का फूल का म्हणून चढाव एखाद्याने आणि झाडावरून एखाद दुसरं जण पडणं आपण समजू शकतो पण वीस पेक्षा जास्त बळी घेतलेत त्या झाडान, आधी ती झापाटते वेडं करते आणि पौर्णिमेच्या रात्री झाडावर सूर-पारंब्याचा खेळ मांडून आयुष्याच्या डावातूनच उठवते, ताई साहेबांना लागण व्हायच्या आत परत निघा मला माहितीये तुमचा विश्वास नाय ह्या गोष्टींवर पण ईशाची परीक्षा कशाला घ्यायची ”
“मावशी तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कितीदा सांगितलंय असल्या गोष्टी मला सांगत नका जाऊ ” मनीषाला अजूनही हि एक अफवाच वाटतं होती
“ऐकल्या पासून माझा जीवाची तगमग सुरु झालीये तुम्ही एकदा बोला सायबांशी ”
“मावशी तुम्ही पाहताना कामाच्या बाबतीत अरविंद किती जिद्दी आहे ते तो नाही ऐकणार माझं ”
“ताई शांत डोक्याने विचार करा जस मीनाची आई बोलली शेवटी प्रश्न........”
“मावशी..... ” मनीषाने कानावर हात ठेवला आणि खुर्चीत बसली.
“ताई तूम्ही माझ्या लेकरांन सारखे आहात म्हणून सांगते माझ्यासाठी एकदा विचार फक्त ”
“पाहते ” मनीषा बोलली.तिला एकाएकी खूप आजारी असल्यासारखं वाटू लागला.
त्या रात्री जेवताना अरविंद अगदीच गप्प होता मुलांशीपण तो निट बोलत न्हवता. जेवण झाल्यावर तो थेट बिछान्यात जाऊन झोपला. रोज प्रमाणे अंगणात गप्पा मारायला तो गेला नाही.आवरावारी झाल्यावर सगळे झोपी गेले. मनीषा अरविंद जवळ जाऊन बसली
“बर वाटतंय ना आता ” ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली.
“झोप आली ए झोपू दे ” त्याने तिचा हात झटकला. तो तिच्याशी इतकं तुटक कधीच वागला न्हवता.
झोपताना तिच्या डोक्यात मालती मावशी ने सांगितलेल्या गोष्टी घोळू लागल्या.खरच तसं काही असेल का की कुठल्या तरी टेन्शन मुळे तो अस वागत असेल, पण गेल्या सात वर्षात तो कधीच असा वागला नाही, आणि दोन दिवसात इतका बदल. मी रिस्क नाही घेणार मी उद्याच अरविंदशो परत जाण्याविषयी बोलणार. विचार करता करता तिचा डोळा लालागला.
******