ब्रेकअप Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ब्रेकअप

' ' काव्या' ' आणि ' ' विक्रम ' ' ह्याचा नुकताच ब्रेकअप झालेला .काव्याला ' ' मी विसरून , अयुषत पुढे जा , अस म्हणून विक्रम अमेरिकेला निघून गेला . पण काव्या मात्र दोन वर्ष झाले , तरी त्याला विसरली नव्हती . तिला अजून ही दोघान मधले ते क्षण आठवत होते . ' काव्याला विक्रम फार आवडत .' दोघांची भेट काव्याच्या भावाच्या लग्नात झाली होती . विक्रम काव्याच्या वाहिनीच्या चुलत आत्याचा मुलगा होता . दोघे ही दिसायला सुंदर , सुशिक्षित . त्यामुळे दोघांनाही ते एक मेक जण आवडले . लग्नात ओळख , पुढे जाऊन भेटी गाठी वाढल्या , शाररिक आकर्षण म्हणून एकदा दोघानमधे ' सेक्स ' ही झाला . विक्रम ला कामानिमित्ताने अमेरिकेला जाणे झाले , आणि तो काव्याशी ब्रेकअप करून अमेरिकेला निघून गेला .
पण ईकडे काव्या मात्र विक्रम च्या आठवणीत आसवे ढळू लागली होती . अश्यात काव्या ला एक स्थळ आले होते .मुलगा पाहून गेला .
मुलाला काव्या फार आवडली . त्याने
लवकरचाच मुहूर्त काढून तिला बायको म्हणून घरी आणण्याचे ठरवले .
जाहले पंधरा दिवसात लग्न होऊन काव्या सासरी आली . सगळ कस मनासारखे जाहले म्हणून आदित्य काव्याचा नवरा खूप खुश होता . पण , पुढे काय होणार आहे , हे त्याला काय माहीत ?
आदित्य ही गडगंज श्रीमंत , त्याच्या वडिलांचा तो व्यवसाय सांभाळत . आई वडीलाचा एकुलता एक मुलगा . म्हणजे एकंदरीत सगळी
सुखाची लक्षणे .
ईकडे आदित्यने ' मधूचण्द्र ' सगळी केली होती . सगळी खोली त्याने फुलांनी सज्व्ली होती . खोलीत फुलांचा सुगंध दरवळत होता . सगळ कस व्यव्स्तीथ होते .कमी फ़क्त ' काव्या ची होती .
थोड्यावेळाने पैज्ना चा आवाज येऊ लागला . दरवाजा उघडून काव्या आतमधे आली .
ती त्या लाल रंगाच्या शालू मधे खूप सुंदर दिसत होती . तिचा त्या बांगड्याचा आवाज आदित्याला अजून वेड करत होता . एवढ्या सुंदर मुलीने आपल्याला हो म्हणाले म्हणून , आदित्य खूप खुश होता .
काव्या हळुच खोलीत येऊन सोफा वर बसली .तिने बेड वर आदित्य शी बसायचे कटाक्षाने टाळले . आदित्यला ही ते जाणवले .
बेडरूम मधे भयाण शांतता होती , शेवटी न राहून आदित्यनेच विषयाला हात घातला . ' ' काव्या , तू किती सुंदर दिसतेस ' ' . तू मला पाहताक्षणी फार आवडलीस . तू माज्याशी लग्न करून माज्यावर एक प्रकारचे उपकारच केलेस . ' ' i love u' '
तो उत्तरा ची अपेक्षा करत होता , पण त्याला उत्तर काही मिळाले नाही . त्याने हळूच खिशातून काही काढले . आणि तो काव्याच्या जवळ गेला , त्याने ते काव्याच्या हातात दिले .तो म्हणाला , ' ' हे सोन्याचे कानातले , तुला माज्याकडून गिफ्ट म्हणून ' ' . एवढे बोलून काव्याने कानातले ठेवलेल्या हातावर त्याने हात ठेवला . आणि हळूच तिच्या गालाचे चुंबन घेणार ऐत्क्यात , त्याला थांबवत ती म्हणाली .
आदित्य मला तुला काही सांगायचे आहे .आश्चर्यचकित , होऊन आदित्य तिच्याकडे बघतो . त्याही वेळी तिच्या तोंडातून त्याचे नाव ऐकून तिला अजूनच आनंद झाला .
हो, सांग ना ..... काव्याने ठरवले आज आपण आदित्यला , विक्रम विषयी सगळ सांगून टाकू या .या आधी आपण घाबरून शांत राहिलो .पण , आता जर आपण त्याला नाही सांगितल तर , ती एकप्रकारची त्याची आणि ह्या नात्याची फसवणूक असेल .