Yash kirti books and stories free download online pdf in Marathi

यश किर्ती

ही कथा आहे. यश आणि कीर्ती ह्यांच्या निरागस प्रेमाची ' मैत्रीची यशाची आणि कीर्तीची '. यश आणि कीर्ती हे दोघे ' सावित्रीबाई अनाथाश्रमात राहत होते. जायचय सम्पादक सौ. निर्मला देशपांडे होत्या. त्याना सगळे माय म्हनत. त्यान्च्या आई च्या पिर्त्यथ हे आश्रम बांधलेहोते. त्यात अनेक मुले राहत होती. मा ई त्यांना स्वतः च्या मूला प्रमाणे वागवत. यश एथे पाच वर्षयच असता आला होता. त्याचा मामाने त्याला ऐथे आणुन सोडले होते. त्याचे आई आणि वडील त्याला सोडुन देवा घरी गेले होते. यश ऐथे आल्या पासून कोनशीच बोलत नसे. एकटाच बसे. कोणाशीच बोलत नसे. मा ई त्याला आई ची माया दिली. पण तरीही तो काही तिथे रमेना. अशातत्याची ओळख किर्ती शी जाली. खूप गोड मुलगी होती कीर्ती. ती आश्रमातीलसगळ्यांची च लाडकी होती. यशाची तिच्याशी चांगलीच मैत्री जाली होती. यश पैक्षा किर्ती एक वर्षानी लहान होती. चार वर्षाची असताना तील कोणितरी आणून सोडले होते. गोड निरागस नेहमी आनंदी हसरी दोन वेणयतलि ' कीर्ती ' यशाला खूप आवडू लागली. यश आणि कीर्ती एकत्र खेळू लागली. एकत्र शाळेत जाऊ लागली. यश कीर्तीला चित्र काढायला शिकवू लागला. आणि तिच्या मुले तो आश्रमात कधी रमून गेला. त्याचच त्याला कळलं नाही. यश आणि कीर्ती आत मोठे जाले होते. कॉलेजला जाऊ लागाले होते. पण अजूनही त्यांची मैत्रि तशीच होती. दोघेही पार्टटाईम जॉब करत होते. यशाच शिक्षण पूर्ण होत अल होत. त्याने मुम्बई ला जाण्याचे ठरवले. पण मुम्बई ला जाणे सोपे नव्हते. पैसे तर प्रॉब्लेम होतच. पण नवीन शहर सगळ नवीन. कोणीतरी ओळखीचे हवंच. म्हणून त्याने माई शी बोलायच ठरवले.

यश माई च्या ऑफीस मध्ये माई ची वाट बघत होता. तेवढ्यात माई आल्याच ' यश..... तू एथे काय करतोस ? ' माई थोड काम होत. मला मुम्बई ला.... जायच होत.... अ.… अ..... नोकरी साठी. यश बोलला. माई म्हणाल्या ' ठीक आहे तू जा मुम्बई ला माजी बहीन आहे तिथे. ' ती तुजि काळजी घेयील. ' धन्यवाद माई. ' यश म्हणला. माई नि हळूच मान डोलवली. यश बाहेर आला. माई ला कस कळले की मी ह्या बद्दलच बोलत होतो. ते काही असु दे. माज मुम्बई ला जाण फिक्स जाल. चला सामन भरू या. आणी तो खोलीत निघून गेला. तेवढ्यात कीर्ती आली. यश सामन भरतोय हे पाहून किर्ती म्हणाली. कुठे निघालास यश ? कीर्ती मी मुम्बईला चलोय उद्या. ' अस कस अचानक ? ' आणि तू मला का नाही सांगितलंस ? कीर्ती रागावत म्हणाली. अग..... तू अशी छान रागवतेस म्हणुन ? यश हसत म्हणला. पण तू का चालास ? किर्ती पुनः रागावत म्हणाली. अग..... मुम्बई ला गेल्यावर चांगली नोकरी मिळेल. पण मला तुजी खूप आठवण येयील. तुज्या साठी खूप सारे गिफ्ट्स आणिल. कीर्ती आता रागावू नको. चल माजी मदत कर. यश हसत म्हणाला. मला नको गिफ्ट्स .... मग काय हवं. यश म्हणाला. बर चल काय करू मदत ? किर्ती म्हणाली. आधी तू हास... यश म्हणाला. मग दोघेही हसले.

यशच आवरून जालेल. त्याला आज मुम्बईला जायच होत. सगळी तयारी जालेली. यश सगळयाना भेटत होता. सगळे त्याला शुभेच्छा देत होते. माई नी त्याला पत्ता दिला. आणि तिथे त्यांच्या बहीनीचा मुलगा त्याला नेह्य्ला येणार हे सांगीतल. यश खूप खुश होता. त्याने त्याच्या स्वप्न कडे एक पाऊल टाकल होत. पण कीर्ती मात्र फार दुखावली होती यश च्या जाण्याने. यश ने तिला खूप समजावले. आणी तो निघाला. कुणाल त्याला सोडवायला आला. त्याने त्याला मुम्बईच्या गाडीत बसवले. गाडी चालू लागली. आणि आश्रम मागे पडू लागला. नवीन स्वप्न घेऊन यश पुढे पुढे जात होता.

यश मुम्बई ला पोहचला. तो गाडीतून उतरला आणि पाउसनी जोर धरला. हा पाऊस पण... ऐन वेळी येतो. आता तो सागर आलाय की नाही नेहयाला काय माहीत. यश ने सागर ला फोन केला पण फोन काही लागेना. आता यश ने स्वतःच पत्ता शोधत जायच ठरवले. पण आपल्याला तर ईथल काहीच माहीत नाही. तेवढ्यात त्याने ऐकले बोरिवली ला जाणार का ? अस एक मुलगी एका रिक्षा वाल्याला विचारत होती. यशच्या लक्षात आले की ? त्याला ही बोरिवली ला जायच होत. तो लगेच काही विचार न करता त्या मुलीच्या मागे गेला. आणि त्या रिक्षात बसला. रिक्षा चालू लागली. यश शेजारी बसलेली मुलगी रिक्षात बसल्या पासून फोन वर बोलत होती. केसान मुळे यशला तिचा चेहरा काही दिसत नव्हता. पण तिचा आवाज मात्र खूप छान होता. बोरिवली आली आणि ती मुलगी उतरली. आणि यश ही उतरला. यश ने पुढील पत्ता रिक्षावाल्याला विचारला. तो पत्ता सांगेपर्यंत ती मुलगी गायब जाली. असो यश आता माई ने दिलेल्या पत्ता यावर आला.

त्याने दाराची बेल वाजवली. नीरज ने दार उघडले. नीरज च्या चेहऱ्यावर पडलेले प्रश्न चिन्ह पाहून यश म्हणला ' मी यश '. माई तुमची मावशी तिने तुमचा पत्ता दिलंता. हो....... आल लक्षात ये. मला काम होत म्हणुन नाही येऊ शकलो नेह्य्ला. तू हात पाय धू. मग जेवू या. घरी कोणीच नाही. सगळे चार दिवसानंतर येतील. यश आता हात धुवून आलाता. नीरजने पान वाढली होती. यश जेवायला बसला. पहिला घास तोंडात घातला. आणि नीरज म्हणला. तू किती दिवस राहणार एथे ? नोकरीच काय ? आणि जेवणाच काय करणार ? नीरज च्या कोणत्याच प्रश्ननाच उत्तर यश कडे नव्हत. यश म्हणला नोकरी मिळाली की जायीन मी...... दुसरी कडे..... रहायला. यश खूप हिंमत करून म्हणला.

आता यशला खुप चिंता वाटू लागली. ईत्क्या कमी वेळेत घर नोकरी कशी मिळणार. शिवाय यश कोणाला ओळखतही नव्हता. आता नोकरीच शोधली पहिजे आधी मग घर. नीरज ला विचारावे का ? करेल का तो मदत ? तस पण त्याची मदत नाही घेतली तर दुसऱ्या कोणाची मदत घेणार ? आपण एथे ओळखत पण नाही कोणाला ? यशने नीरजची मदत घ्याचे ठरवले.

यश उठला. त्यानी पहिल नीरज कामावर निघाला होता. यश त्याच्या जवळ गेला. आणि त्याला स्वतःसाठी नोकरी शोधायला सांगितली. नीरज ही तयार जाला. त्याने त्याला त्यच्या सोबत त्याला चलयाला सांगितल. नीरज आणि यश त्याच्या कामाच्या ठिकाणी आले. नीरज दरवाजा उघडून साहेबाच्या तिथे आला यश ला त्याने बाहेरच बसायला सांगितले. यश बाहेर बसून आजूबाजू चा परिसर न्याहाळत होता. तेवढ्यात त्याला त्या दिवशी रिक्षात ऐकलेला आवाज ऐकू आला. आज ही ती फ़ोन वरच बोलत होती. त्याने आजूबाजूला पहिले. खूप मानसे ये जा करत होती. पण फोन वर कोणाच बोलताना त्याला दिसत नव्हते. त्याला आवाज येत होता पण तिथे तशी मुलगी कुठेच दिसत नव्हती. शेवटी त्याने आवाजाच्या दिशेने जायचे ठरवले. तो निघाला त्याला पुढे एक भिंत दिसली. कदाचित ती मुलगी त्या भिंतीमागेच असेल यश हळू हळू निघाला. तो भिंती जवळ पोहचणार तोच त्याला कोणीतरी आवाज दिला ' यश.... यश तिकडे काय करतोस ? यश भानावर आला. त्याने मागे वळून पहिल तर नीरज त्याला आवाज देत होता. यश ने ही त्याला आवाज दिला ' हो..... आलोच. ' एवढ्यात तो आवाज ही बंद जाला. आणि भिंती मागे ही कोणी नव्हत. नीरज ने यश ला पून्हा आवाज दिला. यश आता नीरज कडे निघाला. नीरज त्याला रागावून ' काय करत होतास तिथे ? 'चल सरांनी बोलावलंय ' यश आणि नीरज सरांनकडे आले. नीरज च्या सरांनी यश चा इंटरव्यू घेतला. आणि त्याला नोकरी दिली. यशने नीरज चे आभार मानले. त्यांवर ' घरी गेल्यावर बोलू ' असे नीरजचे उत्तर मिळाले.

यश घरी आला. घर कसल ते ? कोणच नव्हत तिथे ? त्यापेक्षा आपल आश्रम बरं ? सगळी आहे तिथे. एथे तर प्रेमाने बोलणार पण कोण नाही ? मुम्बईत तर काही च चांगल नाही ? पण त्या मुलिचा आवाज तो मात्र खूप गोड होता. पण....... तिचा चेहरा नाही दिसला. पण छानच दिसत असेल जिचा आवाज ईतका गोड तीचा चेहरा पण तितकाच छान असेल. पण ती भेटेल का आपल्याला ? पण आधी नोकरीची तयारी करूया. कोण मुलगी ? जिचा आपण एवढा विचार करतोय ?

यशचा आज पहिला दिवस नोकरीचा. यश आवरून तयार जाला. त्याने नाश्ता केला. आणि रिक्षा पकडून यश कामावर आला. सगळयानी त्याला शुभेच्छा दिल्या. नेहा त्याला सगळ काम समजवून सांगणार होती. पण नेहा अजून आलीच नव्हती. यश तिची वाट बघत बसला होता. तिला यायला अजून अर्धा तास होता. तोपर्यंत यश शेजारी पडलेलं पुस्तक वाचत बसला. अचानक आवाज आला ' यश ' यशच लक्ष पुस्तकातून निघून आवाजच्या दिशेने गेल. पण त्याला तो आवाज ओळखीचा वाटला. अरे हा आवाज तर त्या रिक्षातल्या मुलीचा हो नक्कीच...... यशच्या तोंडून वाक्य निघाले. यश ने नजर वरती केली. पण ती तिरकी उभी असल्या मुळे पून्हा तिचा चेहरा यश ला दिसेना. ती पाठमोरी जाली आणि ती कपाटातून एक फाइल अन्यासाठि गेली. यश खूप वेळेपासुन तिचा चेहरा पाहण्याचा पर्यंत करत होता. पण केसांना मुळे तिचा चेहरा त्याला दिसत नव्हाता. अचानक वाऱ्याची जुळूक आली आणि तिचे केस उडाले ती तिच्या केसांना आणि फाइल स्म्भ्ल्त होती. तेंव्हा यशला तिचा सुंदर चेहरा दिसला. खरच ती खूप सुंदर होती. अगदी परी सारखी. तिने यश ला आवाज दिला. आणि यश भानावर आला. ' हो ' मीच यश. तू नेहा ना ? हो...... मीच नेहा. मी तुला कामाविषयी माहिती देते. आणि तिने माहिती द्याला सुरवात केली. पण यश च लक्ष कामात नव्हत. तो एक सारखा नेहाच्या चेहऱ्याला न्याहाळत होता. ईताकि सुंदर मुलगी त्याने कधीच पहिली नव्हती.

यश आता मन लावून काम करु लागला. दिवसेंदिवस त्याची प्रगती होतच गेली. कम्पनी कडून त्याला घर गाडी मिळाली. आता वर्ष जाल होत त्याला मुम्बईत येऊन. तो आश्रमला पूर्ण विसरला होता. तो किर्तीला ही पूर्ण विसरला होता. ईकडे कीर्ती मात्र त्याला विसरली नव्हती. उलट यश गेल्या पासून तो तिला जास्तच आठवत असे. ती न चुकता रोज त्याला फ़ोन करत. आधी यश फोनवर बोलायचा. पण आता तर तो फोन सुध्दा उचलत नव्हता. कीर्ती आता लेखिका जालेली. त्याच बरोबर ती आश्रमाची जबाबदारी पण पार पडत होती.

यश आणि नेहा खूप चांगले मित्र जाले होते. यश कडे आता सगळ होत. ते त्याने मेहनतीने कमावले होते. पण ह्याही पेक्षा नेहाचा विश्वास त्यानी कामावला होता. आणि तो त्याच्या साठी खूप मोठा होता. यशला नेहा फार आवडे. नेहा ही यश खूप आवडत होता. दोघानी लग्नाचा निर्णय घेतलेला. पण यश अनाथ असल्यामुळे नेहाचे घरचे लग्नाला नकार देत. नेहा त्याना समजावण्याचा खूप पर्यन्त करत होती. पण ते काही ऐकत नव्हते.

कीर्ती ईकडे आश्रम व्यवस्तीत सम्भ्ल्त होती. ती खूप मोठी लेखिका जालेली. तिला लग्नासाठी खूप मागणे येत. पण कीर्ती लग्नासाठी तयार नव्हती. कारण तीच यशवर खूप प्रेम होत. यश कधीतरी फोन उचलेल. आणि आपल्याला मुम्बईला बोलावेल. आपल्याशी लग्न करेल. पण तस काहीच नव्हत होत. माईनी तिला खूप समजावलं. पण ती काही ऐकतच नव्हती. आणि तिच्या मनाविरूध्द तीच लग्न ठरवणे हे ही योग्य नव्हत. पण तिला फक्त एकच व्यक्ती समजवू शकत होती. ती म्हणजे ' यश '. यशच तिला समजवून सांगेन. आणि मगच ती आयुष्यात पुढे जायीन. पण त्यासाठी मुम्बई ला जाऊन यश ला शोधावे लागेल. माई ने मुम्बई ला जायच ठरवल. सोबत कीर्ती आणि आश्रमातील कुणाल दोघाना सोबत घ्याचे ठरवल माई कीर्ती आणि कुणाल तिघे जण मुम्बईला निघाले. आश्रम त्याना सोडायला आला. तिघे जण गाडीत बसले. मुम्बई ला जाऊन कीर्तीच मन किती दुखानार होत हे माई ला माहित होत. पण कीर्ती च्या आयुष्यात हेच लिहिल होत. ' दुरावा '. पण कीर्ती तर खूप खुश होती कारन दोन वर्षा नंतर ती त्याला भेटणार होती. खूप बोलायच होत. खूप सांगायच होत. तिने लिहिलेली पुस्तक दाखवायची होती. त्याला सांगायच होत की ' ती त्याच्यावर खूप प्रेम होत '.

माई त्यांच्या बहीनी कडे आल्या. खूप दिवसानी त्या मुम्बई ला आल्त्या. आश्रमामुळे त्याना वेळच कधी भेटला नाही. जेवणं जाली. गप्पा सुरू जाल्या. माई कुणाल घरातील ईतर मानस गप्पा त रमलेली. पण कीर्ती च मन काही लागेणा. ती अंथरुणावर पडली. नीरज चे लक्ष तीच्या कडे गेले. तिला ईकट बसलेल पाहून नीरज तिच्या जवळ गेला. तो कीर्तीला म्हणला ' काय कीर्ती तुला आमची मुम्बई आवडली नाही वाटत? अस काही नाही. कीर्ती म्हणाली. पण यश विषयी काही महिती मिळाली असती तर..... तीच वाक्य मधेच थाबावत नीरज म्हणाला की ' आपण उद्या मुम्बई बघायला जाऊ. मग नेहील मी संध्याकाळी तुला त्याच्या कडे. अ..... मुम्बई फिरायला...... थेव्ढ्यात तिथे कुणाल आला. ' हो ' मीच त्याला म्हणल की मला मुम्बई बघायची. तू पण चल ना खूप मज्जा येयील. आणि यश ला तर फेट्नारच आपण मग....... थोडावेळ विचार करून कीर्ती ' हो ' म्हणाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्ती नीरज आणि कुणाल मुम्बई दर्शना साठी निघाले. खरतर माई ने कीर्ती च यश वर किती प्रेम आहे हे नीरजला सांगितले होते. आणि यश आणि नेहा च एकमेकावर किती प्रेम आहे हे ही यश ला माहीत होत. पण हे सगळ कीर्तीला कस सांगाव ते त्याला कळतच नव्हत. तिची त्यानंतर होणारी हालत त्याला बघावनारी नव्हती. म्हणून तो यश कडे जाणे टाळत होता. कीर्ती नीरज निघाले. कीर्तीने लाल रंगाचा ड्रेस घातलेला. केस मोकळे सोडलेले. हातात एक बांगडी घातलेली खूप छान दिसत होती. कुणाल त्यांच्या बरोबर निघाला. पण मधीच काम आहे अस सांगुन त्यानी पळ काढला. नीरज ने तिला सगळी मुम्बई दाखवली. तिला खूप गिफ्ट्स घेतले. मग दोघानी आइसक्रीम खाल. मग दोघे चौपाटीला आले. चौपाटी वर आल्यावर कीर्ती नीरजला म्हणाली. नीरज हा समुद्र पाहतोस. किती सुंदर आहे. अथांग पाण्यानी भरलेला. पण..... हा डोळ्याला जरी सुखावत असला तरी..... तहानलेल्याची तहान भागवू नाही शकत. हो..... ग..... कारण त्यानी त्याच्या पोटात खूप खारटपणा साचवुन ठेवलाय. बरं.... हे सगळं जाऊ दे. तुला मुम्बई आवडली का ? हो..... . पण तू मला यश कडे नेहनार होतास ना ? हो..... पण तुला खरच जायच तिकडे. ज्या..... यश ला तू रोज फोन करतेस पण तो तुजा फोन कधीच उचलत नाही. ह्या दोन वर्षात तो तुला कधीच भेटायला आला नाही. तो एका मुलीच्या प्रेमात आहे. नेहा आहे नाव तीच. दोघे लग्न ही करणार आहेत. तरी ही तुला भेटायचंय त्याला.... नीरज शांत होत म्हणला. कीर्ती म्हणाली ' नीरज ' आपल्याला उशीर होतोय चल. ह्यावर नीरज ला काय उत्तर द्यावे कळेना. तो फक्त म्हणला ' चल '....

कीर्ती आणि नीरज यश च्या घरी आले. घरांवर त्याने ' क्षण ' अस नाव दिल होत. तिने दारावरची बेल वाजवली. आज ती दोन वर्षानी त्याला भेटणार होती. पुन्हा त्यांचे मैत्रीचे ते दिवस येतील. सगळ व्यवस्तीत होईल. तेवढ्यात दार उघडले. पण समोर बघून कीर्ती थक्क जाली. कारण समोर यश नव्हता. त्याचा नोकर होता. आणी तिला पाहताच तो म्हणला ' तुम्ही कीर्ती आहात ना.... ? ' हो पण तुम्ही कस ओळखले. एथे तुमचा फोटो आहे. तुमचा काय आश्रमातील प्रत्येकाचा आहे. तो नोकर त्याना एका खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत यश नी त्याच्या आठवणी कैद करून ठेवलेल्या. भिंतींवर प्रत्येकाची नावे लिहिलेली सगळयानचे फोटो लावलेले. सगळी गिफ्ट तिथे होती जी कीर्तीने त्याला दिलेली. शिवाय त्याने त्याच्या बंगल्याला नाव सुधा त्या मुळेच दिलेले ' क्षण ' आश्रमातील क्षण. तो नोकर बोलायचा थाब्ला. कीर्तीचे डोळे पाण्याने भरले होते. नीरजला ही त्याच्या प्रश्नाचे उतर मिळले होते. की किर्ती का म्हणत होती मला यश ला भेटायचय. कीर्तीने डोळे पुसले. आणि तिने विचारले. यश कुठे आहे ? नोकर शांत जाला. तो काहिच बोलेना. कीर्तीने पुन्हा विचारले ' यश कुठाय ? ' नोकर सांगू लागला ' दोन दिवसा पूर्वी यश आणि नेहा कोर्ट मधे लग्न करणार होते. यश तयार जाला. ईकडे तयारी करायला सांगितली. मी सगळी तयारी केली. आणि अचानक फोन आला...... त्याला हुंदका आवरेना.

कीर्ती अधाशीपणाने विचारू लागली. सांगा लवकर...... काका...... फोनवर काय कळल तुम्हाला ? सांगा.... काका ? नोकर पुढे सांगू लागला. फोन हॉस्पिटल मधून होता. यश... ला... काहि जाल नाही ना.... ? बोला काका.... ? नोकर कीर्ती ला शांत हो मुली..... . साहेब' कोमात ' आहे. जिवंत असून मरण यातना भोगतात. लग्न होत त्या दिवशी त्यांच्या गाडीचा अपघात जाला. आणि ते कोमात गेले. अनाथा सारखे एकटेच पडलेत हॉस्पिटल मधे ? कीर्तीने डोळे पुसले. का ? नेहा कुठंय ? काका ? कीर्ती म्हणली. ती तर साहेबाना बघायला सुधा आली नाही. आतातर हे घर पण जाणार ? का..... ? साहेबानी धंदा साठी कर्ज काढलेले म्हणून हे घर हा धंदा नीलाम होणार. कीर्ती च्या डोळ्यातून एक सारख्या धारा वाहत होत्या. नीरज ला सुधा खूप वाईट वाटल. त्यानी कीर्तीला खूप समजावलं. पण कीर्ती एक सारखी रडतच होती. एकदम काही तरी आठवल्या सारख करून कीर्ती नीरज ला म्हणली. नीरज तू माज्या अकाउंटचे सगळे पैसे काढ. आणि यश वर असलेल कर्ज फेड. राहिलेले पैसे त्यांचे त्याना लवकरच मिळतील अस सांग. त्याचे पैसे मी फेडिन. तो अनाथ नाहीये. मी त्याची काळजी घेयील. तो नक्कीच बरा होईल........ नीरज ला कीर्तीचा खूप अभिमान वाटला.

प्रेम हे कधीच स्वार्थ साठी करायच नसत. तीच एक गोष्ट असते जी आपण पैसानी विकत घेऊ शकत नाही. आणि जी निस्वार्थ दुसऱ्याला देऊ शकतो. पुढे दहा वर्षानंतर कीर्ती फार मोठी लेखिका जाली. नेहा परत कधीच यश कडे आली नाही. तिने एका डॉक्टर सोबत लग्न केल. यश चा बिज़्नेस खूप मोठा जाला. यश च्या घराची नीलामी थाबली. नीरज त्याचा बिज़्नेस सम्भ्ल्त. पण..... यश शांत जौप्लेला. कीर्ती त्याची मनापासून काळजी घेत. यश कधी तरी बरा होईल आणि तिचा हात हातात घेयीन. आणि म्हणेन ' कीर्ती लग्न करशील माज्याशी ? ' अस कीर्तीला वाटत. प्रेम हे असच असाव. अथांग समुद्रा सारख.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED