गोस्ट एका वाचकीची - भाग - 6 Anji T द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गोस्ट एका वाचकीची - भाग - 6


२ तास झाले होते. आम्ही दमण पोहचून पण आम्हाला राहायला घर नव्हता मिळत.

शेवटी एक सारखे घरआम्हाला दिसले आणि ते पाहून आम्हाला वाटलं कि इथे पाहावं कि आहे का. तर आम्ही सर्व कार पार्क करून तिथे पाहायला गेलो.
खूप गरम वातावरण असल्या मुले काही पण कशी पण रूम मिळाली तरी चालणार वाटत होत.

फायनली आम्हाला एक घर देण्यात येते कारण तिथे Non-Ac असल्या मुले कोणीच राहात नव्हता.
आम्ही काही न विचार करता घर घ्यायचा निर्णय करतो आणि सामान कार मधून काढून रूम मध्ये ठेवतो आणि परत कार घेऊन आम्ही समुद्रा कडे थोडा वेळ बसायचा विचार करतो, संध्याकाळ असल्या मुले sunset view पाहायला आम्ही जातो.
बराच वेळ झाला असतो फोटोस काढून पण झाले होते.

आम्ही शॉपिंग करायला जातो.
मी आणि राशी सर्व मार्केट फिरून येतो रात्र झाल्या मुळे आम्ही जेवण करायला निघतो.
तिथे एक पारशी फूड फेमस असल्याच राम कळवतो आणि आम्ही पारशी लोकांचं जेवण करायला जातो.
राम शिवाय आमच्या सर्वान साठी पारशी फूड खूप वेगळा आणि पहिली वेळेस एक्सपेरिन्स असतो. पण खरच ते खूप टेस्टी असते.

आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सापुतारा साठी निघायचं असल्या मुळे आम्ही जेवण करून रूम वर लवकर जातो. त्या दिवशी india match असते.
त्या रात्री match असल्या मुले सर्व पाहत बसतात.
राम झोपून जातो त्याला ड्राइविंग करायची असल्या मुळे.

मी आणि राशी पण झोपायला जातो तर सुमित आणि प्रिन्स नुसत्या मस्ती करत असतात तर झोप पण नाही येत.
कशी बशी झोप येते मला, तर सुमित आणि प्रिन्स नुसता आरडा ओरड करतात कारण त्यान्हा match पाहायची असती आणि आम्हाला झोपू नाही द्यायचं असते.
मला खूप झोप येत असल्या मुळे मी रागावते आणि झोपेत ओरढते के हे काय आहे ?? झोपा आता.
त्यांची मस्ती म्हणजे टेबले खुर्च्या कुठच्या कुठे फेकम फाक. कोणी पण झोपेतला चिडून जाणार आवाजा मुले.

ते दोघे केव्हा झोपले कोणालाच माहित नाही पण सकाळी मीच लवकर उठले असते आणि सर्वाना झोपले पाहून मी माझा आणि सर्वांचे फोन चार्जे करायला ठेवते आणि परत झोपून जाते.
सकाळचे ९ वाजले असतात प्रिन्स उठतो आणि सांगतो सर्वाना कि ९ वाजले उठा आता.
सर्व उठतात आणि पटकन तयारी करून आम्ही सापुतारा साठी निघतो. आम्हाला रस्त्यात आणखी एक प्लेस कव्हर करायची असते तर आम्ही timepass न करता निघतो.

दुपारची वेळ असते आम्ही एक प्लेस कव्हर करून जेवण करायला जातो.
आम्ही खानदेश जेवणा विषय ऐकलं असते तर कुठे न थांबता आमच्या फेमस जागी जेवायला जातो.
तिथे जाऊन माहित होते कि ते बंद आहे. आम्हाला दूर दूर पर्यंत काहीच नव्हता दिसत तर बाजूला एका घरी थोडं लांब जेवण मिळते आम्हाला माहित पडते.
आम्ही तिथे पोहचतो आणि खान्देश जेवण करतो. एवढं काही चांगलं नसते ते पण हो नागलीची पोळी खास आम्हाला पाहायची असते तर ती असते.

आम्ही ५ वाजे पर्यंत सापुतारा पोहचतो आणि तिथलं थंड वातावरण इतकं सुंदर असते कि फोटो आणि विडिओ नि आमचा फोन फुल व्हायची वेळ आली होती.

हिल स्टेशन असल्या मुळे सर्व अचानक इतकं शांत पाहायला मिळते कि ते वातावरण कोणालापण तिथून जाव नाही आवडणार.

काही वेळ आम्ही बसलो सर्व चुपचाप आणि तो sunset view पाहत बसलो.
खूपच वेगळी फीलिंग्स असते ती. sunset point वरून तुम्हाला दूर दूर पर्यंत फक्त पहाड पहाड आणि हिरवळ च दिसणार.
ती हिरवळ पहाडा मधली वेगळीच होती.

शेवटी जास्त वेळ झाल्या मुले आम्ही वर जास्त राहू नव्हतो शकत. आम्ही परत रामच्या घरी जायला निघतो.

सापुतारा ते नवसारी लांब रस्ता असल्या मुळे रस्त्यात आम्ही जेवण करतो आणि रात्रेचे परत २ विजेला घरी पोहचतो.

घरी पोहचल्या वर मला परत सर्व आठवू लागते राम च्या आई बाबा ला माहित आहे राम ची माझ्या बद्दल फीलिंग्स. मी काही कोणाशी न बोलता डायरेक्ट रूम मध्ये जाते आणि कपडे बदलते.
तेवढ्यात मला बोलवायला राम येतो.. मला अचानक खूप भीती वाटू लागते कि काय झालं असणार...
पण तो काही खायचं आहे का ?? हे विचारायला आला असतो.

मला प्रिन्स आणि राम ला झोप नसते येत तर आम्ही कॅमेरा आणि फोन चे फोटोस share करत बसतो. सर्वाना स्टेटस ठेवायचं असते तर खूप excitment असते फोटोस पाहायची.
राम म्हणतो आपण सर्व फोटोस उद्या आई बाबा सोबत TV मध्ये पाहू. आणि आम्ही झोपून जातो.

दुसऱ्या दिवशी सर्व उशीरा उठतात. आम्ही फ्रेश होऊन बसले असतो तेवढ्यात राम आणि त्याचे बाबा dandi beach ला जायचं ठरवतात.

beach वर आम्ही सर्व जायला निघत. खूप गर्मी आणि ऊन असल्या मुळे आम्ही जास्त तिथे न थांबता परत येतो. रस्ताने आम्ही चा नास्ता आणि उशीर झाल्या मुले जेवण बाहेरून घेऊन घरी पोहचतो. सर्वे आंघोळ करून फ्रेश होतात. आमची ट्रेन असते संध्यकाळ ची तर दुपारी जेवण करून फोटोस Tv मध्ये पाहायला बसतो. फोटोस आणि विडिओ एवढे असतात की २ तास कशे जातात माहीतच नाही पडत. ४ वाजले असतात राम ची आई सर्वांन साठी चा कॉफी बनवते आणि आम्ही तेवढ्यात बॅग पॅक करून बसले असतो. चा पिता पिता राम ची आई भरपूर वेळ बोलत बसले असते माझ्या सोबत.
राम ला एक बहीण आहे तिच्या विषय पण सर्व सांगते आणि मला काय बोलावं काही कळताच नव्हता तेव्हा मी काही न बोलता फक्त ऐकत बसले असते.
आमची ट्रेन असल्या मुळे आम्ही जायला निघतो.

स्टेशन वर पोहचल्या वर आम्ही ट्रेन ची वाट पाहत बसले होतो. अचानक मी राम कडे पाहते तर तो मला खूप चिंतेत दिसतो. खूप विचार करत बसला असणार असं मला दिसत असते. मी जाते त्याचा जवळ आणि विचारते कि काय झालं तू का एवढ्या विचारात दिसत आहेस ??
तर तो मला विचारतो कि आई ने तुला काही पण बोलल्या असेल तर सॉरी....

मी राम ला हसत म्हणते कि असं काहीच बोलल्या नाही त्या मला. आमची नॉर्मल गोस्ट झाली आहे बस. त्यात तू का एवढा घाबरत आहेस ??
राम मला सांगतो कि सकाळी त्याची आई राशी ला तुझ्या विषय विचारात असते.
तुला कस माहित राम ??
राशी नि आताच मला विचारलं कि अंजली विषय राम तुझी आई मला का विचारात आहे ??

म्हणजे राम ची आई माझ्या विषय विचारात होत्या. मला ज्या गोष्टीची भीती होती त्याची सुरुवात झाली समझा....
मी म्हटलं होत राम कि तू घरी सांगशील कि मी फक्त सहज फिरायला आली आहे सध्या काही बोलायचं वेळ नाही.

राम आणि मी नक्की करतो कि घरी पोहचून तो त्याच्या आई सोबत बोलणार नंतर आम्ही या वर विचार करू.
आम्ही रात्री आप आपल्या घरी पोहचतो.

दुसऱ्या दिवशी मला कळते कि फक्त एक सहज राम च्या आईने माझ्या विषय विचारलं असते तर त्यात काही काळजी करण्या सारखं नाही.


हळू हळू ऑफिस आणि घराच्या कामात आम्ही सर्व भेटू पण नाही शकत.

राम यायचा तरी मला भेटायला आणि आम्ही नेहमी प्रमाणे बसले असतो.

to be continued....