saahitya samiksha-lekhan - 2 books and stories free download online pdf in Marathi

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -२

रसिक वाचक मित्र हो -

या भागात खालिल तीन पुस्तक परिचय -समीक्षा -लेख- आहेत.

१.कविता संग्रह - हिरवी लिपी - कवयित्री -उर्मिला चाकूरकर

२.गझल संग्रह - माझ्या गझला - बदिउज्जमा बिराजदार

३. कादंबरी - टेन पर्सेंट - विलास एखंडे पाटील

आपले अभिप्राय जरूर द्यावेत .

पुढच्या भागात भेटू अजून काही पुस्तकांचे परिचय घेऊन येतो आहे.

१.

-मन वाचण्यास शिकवणारी -कविता -

-हिरवी लिपी -" उर्मिला चाकूरकर....!

----------------------------------------------------

मराठी कवितेत -आपल्या कविता-लेखनाने आश्वासक स्थान

निर्माण केलेल्या कवयित्री - उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचा

५-वा कविता संग्रह- "हिरवी लिपी ",आपल्या आस्वादानासाठी

आला आहे.

या अगोदरच्या "चांदणचाफा " , " पर्णपाचू " , पर्जन्यास्त्र " ,

आणि "पलाशपंख " ,या कविता -संग्र्हांनी उर्मिला चाकूरकर

यांच्या कवितांची "भावमुद्रा " स्पष्टपणे शब्दरूपात उमटवली आहे .

प्रस्तुतच्या "हिरवी लिपी "या संग्रहातील कविता वाचकांना अधिक

आनंद आणि अनुभूती देणाऱ्या आहेत,असे म्हणावेसे वाटते ।

निसर्ग आणि मनुष्य " यांच्यातील नाते तसे एकरूप असायला हवे आहे,

परंतु सद्य:स्थिती पाहून हे नाते भंगलेले आहे असे पहावयास मिळते ,

"हिरवी लिपी - संग्रहाचे मुखपृष्ठ असेच काहीसे सांगणारे आहे असे मला

सारखे जाणवले .

- निसर्ग -रूप जाणून घेण्यास आपली दृष्टी कमी पडते आहे ",

आणि "दुरावलेले मन- निसर्ग -सहवासात "यावे असेच जणू या कविता

सांगत आहेत - फक्त -भाषा मात्र "हिरवी लिपी " मध्ये आहे.

या निमित्ताने दोन लिपी-मधला साम्य -योग" या ठिकाणी मला सांगावासा वाटतो -

तो म्हणजे आपल्या जुन्या -जाणत्या "मोडी लिपी - विषयी आपल्या मनात एक खासअशी

जिव्हाळ्याची भावना आहे ,आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला

- तिच्या प्रसारा साठी आपल्याला कार्य करावे लागत आहे -,

अगदी असेच महत्वाचे कार्य "निसर्गास समजावून घेण्या साठी "हिरवी लिपी "लिहून

- कवयित्री -उर्मिला चाकूरकर आपल्या कवितेतून केले आहे .. -

आपल्या मनोगतातून त्या म्हणतात की -

माणूस- निसर्ग, माणूस-माणूस, माणूस-समाज या नात्यांचा

शोध हा या "हिरव्या लिपीचा " आशय आहे.

पांढऱ्यावरची काळी अक्षरे वाचायची सवय आपल्याला नेहमीच असते ;

पण काळ्यावरची "हिरवी लिपी " समजून घ्याची तर वेगळी दृष्टी ,समज

असायला हवी.

एकूण ६७ कवितांचा समावेश "हिरवी लिपी "संग्रहात केलेला आहे.

काही कविता चार ओळींच्या आहेत, काही कमी ओळींच्या तर काही

जास्त ओळींच्या कविता आहेत- माझ्या दृष्टीने या सर्व रचनेत एक

साम्य मात्र आहे ते म्हणजे- या सर्व कविता "आशय-संपन्न "आहेत.

काही उदाहरणे -

---------------------------------------

ती शिकली

झपाट्याने

शिक्षण नसतांना

अंगच्याच हुशारीने …. (परिवर्तन पृ-। ६८ ),

आणि-

बाहुल्या मेणाच्या

थिजून गेलेल्या ,

आनंदाने खळखळून

हसायचं विसरून गेलेल्या …… (बाहुल्या मेणाच्या पृ-६० ।)

या ओळी पहा -

------------------------------------------------

अन्याय करण्या एवढाच

तो सहन करण

हा ही गुन्हा आहे

हे समजेस्तोवर

अर्धी जन्मठेप सरूनही गेली होती …… ( सोशिक … पृ.४८ )

आणि -

कुठे वेळ आणि काळ

हाती मेंदी रेखायला

कष्टाचाच झुला होतो

ध्यानी मनी झुलायला ……. (झुला पृ.३३ …)

तसेच या ओळी -

सूर्य पाहून आलेली

माझी नाजूक कविता

झालीय आता

अधिकच तेजस्वी …… ( तेजस्वी पृ.२१ …. )

आणि -----

या शीर्षक ओळी -

----------------------------------

हिरवी लिपी

लिहिता येण्याजोगे

माझ्यातही असावे काही

थोडे हरितद्रव्य ……। ( हिरवी लिपी पृ.१० …।)

आपण आपल्या वास्तवा -पासून ,आपल्या अंतर्मानापासून फटकून राहू शकत नाही,

कारण बाह्य -जगात जे -जे घडते -त्यांची संयत तर , कधी संतप्त अशी प्रतिक्रिया मनात

उमटल्याशिवाय कशी राहील, सामन्य -जन कधी का होईना जागृत होतात , पण कवीचे

मन अधिक " गहिरे असते, जागृत असते", वर्तमानाच्या भीषण ज्वाला मनाला होरपळून

टाकतात , तेव्न्हा "त्याची कविता बोलून जाते , प्रखरतेने व्यक्त होत असते."

अस्वस्थ -कवी मनाचे स्पष्ट असे शब्द -रूप म्हणजे उर्मिला चाकूरकर यांच्या कविता ",

असे म्हणता येईल.

"हिरवी लिपी "-मधील कविता जीवन अनुभवांचे फक्त चित्रण करून थांबत नाहीत ,तर या

कविता "जीवना च्या विविध मुल्यांवर चिंतनशील असे भाष्य करतात ", त्यावेळी या कविता

आपल्याला विचार करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करतात .

त्या द्र्ष्टीने - काही कविता -शीर्षके - "रसिया " , शल्यकर्मी " , २६ / ११ " , "मी आणि ज्वालामुखी "

"निखळ सत्य " , "ललना ", "वाळूंचे कण ",

या सर्व कवितातून जीवनानुभव आणि त्याचे अन्वयार्थ "हाती लागतात "असे जाणवेल.

आजूबाजूच्या वर्तमानाचे - आणि " विपरीत जगण्याचे दर्शन - घडवणाऱ्या कविता , त्यातील अर्थवाही शब्द-रचना"

हे या कवितांचे वैशिष्टय आहे.

निसर्ग - माणूस - समाज जीवन -आणि -जनजीवन या विषयी असलेल्या आस्था हे या

कवितांचे विषय आहेत हे "हिरवी लिपी " वाचतांना जाणवेल.

उर्मिला चाकूरकर यांच्या कविता -लेखनाचा दमदार प्रवास - अगोदरच्या कविता-संग्रहातून

आपण पाहिलेला आहेच - "हिरवी लिपी "या नव्या -संग्रहातील कवितांनी त्यांच्या पुढील सरस

कविता -प्रवासाचे अधिक सुंदर चित्र रसिकांच्या समोर रेखाटले आहे हे नक्की .

चित्रकार -नयन बारहाते - नांदेड -यांनी या संग्रहाचे बहारदार आणि

आशयघन मुखपृष्ठ केले आहे.

कवियत्री -उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचे "हिरवी लिपी "या कविता -

-संग्रहाच्या निमित्ताने अभिनंदन , आणि लेखनासाठी शुभेच्छा.

-------------------------------------------------------------------------------------------------

२.

पुस्तक परिचय "-
गझल -यात्रेतील एक दिलचस्प मकाम -
"माझ्या गझला "
-------------------------------------------------
मराठी गझल आणि कविता लेखनातील एक परिचित नाव
बदिउज्ज्मा बिराजदार -साबिर शोलापुरी",सोलापूरचे.
मराठी गझल हिंदी मार्फत दाखल न होता सरळ उर्दूच्या
वाटेने मराठीत आली पण उर्दुचा प्रभाव न घेता मराठमोळ्या
रूपातच घडत गेली .या गझलच्या प्रवासात मुस्लीम मराठी साहित्यिकांचे
योगदान लक्षणीय आहे आणि यात कवी-शायर बदिउज्ज्मा बिराजदार
यांचे ही महत्वाचे योगदान आहे.
माझ्या गझला "हा त्यांच्या नवा संग्रह आहे. साठ गझलांचा समावेश
असलेल्या त्यांच्या संग्रहाचा हा परिचय.
आपल्या मनोगतात कवी म्हणतो आहे की-
छंदोबद्ध रचनेच्या छंदात राहण्याचा छंद आहे म्हणूनच
माझ्या हातून "माझ्या गझलांची "निर्मिती झाली आहे."
समजातील माणसांच्या व्यथा ,आधुनिक माणसांच्या यथार्थ
संघर्ष ,सुख,आणि दुखः यांची कहाणी हा या संग्रह्तील गझलांचा
भावार्थ आहे.
गझल हा ताकदीचा काव्यप्रकार आहे असे म्हटले जाते.
आणि शायर बदिउज्ज्मा बिराजदार -साबिर शोलापुरी
यांच्या गझला या काव्य्प्रकारचा "बेहतरीन अविष्कार आहे.
वर वर पाहता हे "शेर " सभोवतालच्या वृत्ती,प्रवृत्ती, यावर
भाष्य करणारे वाटतील .पण अंतरंग उलगडले जाते आणि मग
त्यातील "पारलौकिक तत्व" आपल्या मनावर प्रभाव टाकते.
सभोवतालची विपरीत परिस्तिथी जगण्यातला आनंद
घालवून टाकणारी आहे .जीवनाच्या मांगल्याची चाड
नसलेल्या लोकांसोबतचे क्षण मनाला अधिकच वेदना देणारे
वाटतात. अशा वेळी कवी म्हणतो-
भामट्यान च्या मैफलीला आज मी टाकून आलो
संगती ती दाम्भिकांची सर्व मी सोडून आलो ..(मैफलीला --पृ-२२)
दहशतीच्या वातावरणात जगण्याची भयावह सक्ती ज्यावेळी
होते त्यावेळी संवेदनशील मनाला होणाऱ्या वेदना ....
-हुंदके दाबून येथे राहतो, पण दहशतीने
सावली पाहून आता चालतो,पण दहशतीने ....(हुंदके दाबून--पृ.२३)
लागला ना अंत केव्न्हां माणसांचा
वागणे ही मज तयांचे ज्ञात नाही ---
कवी आपल्या प्रेरणेने या परिस्तिथी चा शोध गेतांना दिसतो -
का बेचीराग झाली पणतीत ज्योत ही
अंधारले कशाने मतितार्थ शोधतो.......(स्वार्थीच फार झाले..पृ-४३)
व्यथा ,खंत,खेद,विषाद, उपेक्षा -अशा भावनांचे गडद रंग या रचनेतून
दिसत असले तरी कवीची सामाजिक बांधिलकी जाणवते.आणि
सभोवतालचा माणूस आणि कवी यांच्यातील आपले पानाचे नाते दिसते.
कवी बदिऊज्मा बिराजदार-साबिर- यांनी मोठ्या उत्कटतेने
या भावना आपल्या रचनेतून व्यक्त केल्या आहेत.माणूस आणि
त्याच्या व्यथा हा कवीचा काव्य-विषय आहे-त्यामुळेच तो म्हणतो-
डोळे भरून येती साबिर अशा व्यथेने
हे शल्य आसवाना पण गाळता न आले.....(जे जे मनात..पृ-३०)
माझ्या गझला " या संग्रहात सामाजिक जीवन मनावरती भाष्य
करणाऱ्या रचना अधिक प्रभावी आहेत. डा.राम पंडित यांनी कवी
बदिउज्ज्मा बिराजदार यांच्या गझलेची पाठराखण केली आहे.
गझला आणि कविता रसिकांसाठी "माझ्या गझला " हा संग्रह जरूर
वाचावा असाच आहे.
---------------------------------------------------------------------------------

३.

पुस्तक-परिचय "
---------------------------------------------------------------------------------------------
मनस्वी आणि जिद्दी माणसाच्या व्यक्तीमत्वाची
शंभर टक्के कहाणी ( - टेन पर्सेंट ) " १० %-कादंबरी .
***************
विलास एखंडे पाटील या लेखकाची टेन पर्सेंट " ही कादंबरी औगस्ट-२०११ मध्ये
प्रकाशित झालेली आहे. ३०३ पृष्ठांच्या कादंबरीत "शिवा" या तरुणाच्या एका
मनस्वी जीवन प्रवासाची कहाणी लेखकाने प्रभावी आणि प्रवाही शैलीतून सांगितले आहे.
"शिकलेला , भल्या - बुऱ्याची समज असलेला ,मानवी मुल्यांची सजग जाणीव असलेल्या
तरुणाची -"शिवाची " ही कहाणी आहे.
खेड्यातून शहराकडेघेऊन जाणारा रस्ता आणि या प्रवासातील वळण वळणाने कराव्या
प्रवासाची कहाणी लेखक-विलास एखंडे पाटील तपशीलवार रेखाटली आहे.
प्रस्तावनेत असे म्हटले आहे की-
सरकारी व्यवस्थेतील लाचखोरीच्या पद्धती, त्या यंत्रणेतील मिंधेपणा ,त्या विषयाची मनात
चीड असतांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि या प्रवाहाच्या विरोधात पोहणारी काही
मोजकी माणसे भेटल्या नंतर मिळणारा दिलासा आणि वाढणारी आशा---"
हा अवकाश लेखक विलास एखंडे पाटलांनी चांगला पेलला आहे.
"टेन पर्सेंट" कादंबरीच्या कथानका मध्ये गेल्या पन्नास वर्ष्यांच्या
सामाजिक , आर्थिक बदलावरचे भाष्य आणि त्यातून मनावर झालेल्या
घात-आघात यांचे "चिंतनपर " स्वगत नायक -शिवाच्या मनोगतातून
व्यक्त होत गेलेले आहे.
लेखक विलास एखंडे पाटील आपल्या मनोगतात म्हणतात की -
या कथानकातील सारे काही काल्पनिक आहे.तो "कल्पना "विलास" समजावा .
विशेष म्हणजे हेच सर्व घटक कथानकाला प्रभावी करणारे ठरतील असे आहेत.
कहाणीच्या ओघात येणाऱ्या-शासकीय , निम-शासकीय संथा ,त्यांची सगळी
कार्यप्रणाली ,त्यातील कार्यरत व्यक्ती- आणि व्यक्ती समूह , आणि या सर्वांशी
अपरिहार्यपणे जोडला गेलेला नायक-शिवा . त्याच्या जीवन कहाणीला संघर्ष -
कहाणी बनवणारे ह्या व्यक्ती , "सेंट रौन" ही संस्था ,आणि सभोवतालचे विश्व
हे नायक-शिवा" इतकेच महत्वाचे आहे. हे सगळे इतके तपशीलवार पणे येते की
ही संस्था वाचकांच्या नजरेसमोर आकारून येते.
नायक -शिवा स्वतः त्याची कहाणी सांगतो आहे. जुन्या आठवणीत रमणारा शिवा,
वर्तमानातून बोध घेता घेता ,भूतकाळातील चुकांचा हिशोब करतो, आणि त्यातून
भविष्यात नव्या पद्धतीने काम करण्याची तयारी दाखवतो. शिवाचे हे असे घडत
जाणे म्हणजे " टेन पर्सेंट "कादम्बरीचेकथानक आहे.
"टेन पर्सेंट" कादंबरीच्या कथानका मध्ये गेल्या पन्नास वर्ष्यांच्या
सामाजिक , आर्थिक बदलावरचे भाष्य आणि त्यातून मनावर झालेल्या
घात-आघात यांचे "चिंतनपर " स्वगत नायक -शिवाच्या मनोगतातून
व्यक्त होत गेलेले आहे.

सर्व सामान्य माणसांच्या भाव-विश्वात सर्वच गोष्टीना मोठे
भावनिक स्थान असते. शिवाच्या मनात- "शाळेचे दिवस,गावाकडचे
दिवस,गावातली माणसे ,महाविद्यालयीन जग, त्यातील मित्र ,शिक्षक ,सर,
आणि भेटलेली वडीलधारी माणसे यांचे तर स्थान महत्वाचे आहेच, त्या पेक्षा
त्याच्या संघर्षाच्या दिवसात जमेल तशी,जमेल तितकी मदत करणारया
सोबत्यांना अधिक जवळचे स्थान आहे.
मनाच्या हतबल अवस्थेत शिवा आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणीने
विव्हल होऊन जातो, त्याची "ही आपली माणसे" त्याला संघर्ष करण्याचे सांगतात,
त्याला प्रेरणा देतात. शिवाचे हे "भावबंध" मोठे मनस्पर्शी झाले आहेत.
शिवाचे, मनोगत, शिवाचे स्वगत -या दोन्ही गोष्टी सुरेख ललित गद्य लेखनाचे
उदाहरण वाटवे असे सरस उतरले आहेत.
"टेन पर्सेंट" कादंबरी लेखन वाचकांना जीवन -अनुभव देणारे वाटेल.
लेखक विलास एखंडे पाटील यांची कामगिरी हंड्रेड पर्सेंट आनंददायी अशीच झाली आहे.
जरूर वाचावी अशी ही कादंबरी आहे.
*******************************************************

तीन पुस्तक परिचय -समीक्षा लेख.

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED