घुंगरू - 7 वनिता द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ

घुंगरू - 7

#@ घुंगरू@# भाग 7
सौ. वनिता स. भोगील
अस नका जाऊ,बापू येईल एवढ्यात मंग जा
....
नाही माई आमचं काम झालं मालू बी ठीक हाय ,यिऊ की पूना कवातरी......
....
माईजवळच्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवत माया काढून कडकड बोटांचा आवाज केला, आन म्हणला माई आक्षी रत्नावानी नात हाय बघा,
अस म्हणून सगळे भराभर निघून गेले....
माई लेकराला घेऊन मालती जवळ गेल्या,मालतीला म्हणाल्या .... पांग फेडलस वाड्याच माले....
.. पोरगी दिलीस माझ्या बापूच्या कुळाला लक्ष्मी दिलीस ,,,, आज लय आनंदात हाय बघ.....
....
चल हिला तुझ्याजवळ घे, म्या पाणी काढते न्हाऊ घालायच दोघी ला,,,
माईच्या चेहऱ्यावरचं तेज बघून मालती खूप आनंदी झाली,
पाणी काढेपर्यंत बापू वैद्याला घेऊन आले,
बापूला पाहून माई आनंदात म्हणाल्या ..... बापू मालू बाळातीन झाली,तु बाप झालास ,,, रत्नावानी पोर झाली तुला....
बापू ला पण आनंद झाला..
वैद्याला घेऊन माई मालती कड गेल्या वैद्यांनी मालतीची विचारपूस करून काही काढे बाटलीत भरून दिले....
... बापू माईला म्हणाले म्या गावात जिलबी वाटून येतो....वैद्यबुआ आणि बापू निघून गेले,
माईंनी परमेश्वराला हात जोडले, सगळं नीट केलस रे देवा लय उपकार झालं....
.. अस म्हणून माई कामाला लागल्या...
सगळ चांगलं झाल होत,
माई बाळाची आणि मालती ची रोज दृष्ट काढत असत...
सगळ घर आनंदी होत,तस बापू च्या घरात सगळंच भरपूर होत.... जमीन जुमला वाडा, नोकरचाकर ... कमी होती ती लेकराची ,ती पण देवाण आता भरून काढली.....
...
दिवस जात होते,
बाळ ,बाळतणीची पाचवी, सातवी झाली,
बाराव्या दिवशी मालू म्हणाली .... माई म्या त्या दिवसी माळावरल्या लोकांना बोलवया सांगितलं होतं तवा तुमि लय रागात हुता.. माझ चुकलच माई.......
... तस माई म्हणाल्या नाय ग मालू.. तुझं काय बी चुकल नाय म्याच त्याना चुकीचं समजत व्हते....
... त्या दिस आले तवा मला लई आधार झाला बघ त्यांचा, नायतर मला म्हातारीला कायबी जमलं नसत बग.......
.....
मालू इशय काढलाच हाय तर एक ईचारु का?
मालती.....
व्हय ईचारा की, काय ईचारायच हाय ते ईचारा.....
मालू .. तू लई दिस झाल त्या लोकाकड जातीस,
तुला दिस गेलं तवापासून म्या बघते, आक्षी तू बाळातीन व्हयस्तवर जात व्हतीस,,,
आन शेवटाला बी त्यासनी बोलीवलस,,, काय कारण हाय ग आस,गावातली कुणी त्यांच्या वस्तीकडे फिरकत नाहीत पण तू रोज जात व्हतीस.......
....
म्या लई दा ईचारीन म्हणलं पर तुला नाय आवडायचं मनून नाय ईचारल.....
.. तस बी तुझ्यावर माझा इसवास हाय तू कायबी वंगाळ नाय करायची.....
..
..त्यावर मालती म्हणाली ...
व्हय माई तुमि म्हणता ते खरं हाय,
म्या रोज जायचे वस्तीवर,
मला आवडत त्यांच्या संग बोलाय,
आन माई मनान लई चांगली हायती ती सगळी....
त्यावर माई म्हणाल्या.. व्हय तुझं बराबर हाय पर तू का जात व्हतीस?
तुझी आण त्यांची वळख कशी?
तुला भ्या नाही वाटल?
एवढ्या प्रश्नाला मालती न एकाच उत्तर दिलं, माई ती बी मानसच हायत......
.. आन का जात व्हती हे आता सांगायची येळ नाही, तुमचा इसवास हाय न माझ्यावर तर मंग येळ आल्यावर म्या सवताहून सांगणं.......
.... मालतीच्या बोलण्याने माई निरुत्तर झाल्या....
..
सगळ कस घरातलं वातावरण छान आनंदी होत, माई ,बापू खुश होते....
बाळंत होऊन सव्वा महिना झाला...
.. माई म्हणाल्या मुहूर्त बघून लेकराच जावळ काढू आन बारस बी घालून टाकू लगीच.....
.....
माईच बोलणं बापू आणि मालतीला पण पटल......
बाराश्याची तयारी झाली,
पै पाहुणे गोळा झाले,
नवसान झालेलं बाळ मग त्याच्या कौतुकाला काही कमी नव्हते....
...
बारसे झाले,
नाव काय ठेवायच चर्चा सुरू झाली बायांची...
.. आणि माईना किन्नराचा शब्द आठवला,,,
माई लगेच म्हणाल्या पोर रत्नावानी हाय, नाव बी तसच असाय पायजे,
माझ्या नातीच नाव रत्नमाला ठेवायच....
.. सगळ्यांना हे आवडल अन मग काय बाळाचे कान फुंकून नाव ठेवण्यात आले रत्नमाला...क्रमशः...

रेट करा आणि टिप्पणी द्या

Vaishali Kamble

Vaishali Kamble 11 महिना पूर्वी

Manali Sawant

Manali Sawant 2 वर्ष पूर्वी

Surekha

Surekha 2 वर्ष पूर्वी

Rajan Bhagat

Rajan Bhagat 2 वर्ष पूर्वी

Asha Mandlik

Asha Mandlik 2 वर्ष पूर्वी