gungharu - 6 books and stories free download online pdf in Marathi

घुंगरू - 6

#@घुंगरू@#भाग 6

सौ वनिता स. भोगील
......
मालतीला पाय उचलत नव्हता,,
कशीबशी आतल्या खोलीत माईंनी नेली,
...
बाहेरच्या दारात जाऊन माईंनी शेजारच्या मुलाला हाक दिली,
मुलाला बोलावून सांगितले
बापू गावाच्या चौकात आसल लागलीच बुलीव त्याला सांग लय घाई हाय लगीच य......
... मुलगा धावत बापूंकडे गेला
,,
निरोप ऐकून बापू धावतच घराकडे आले,
माई तोवर बंबात पाणी गरम करायला ठेवत होती,
...
बापू म्हणाले,,
काय ग माई लई घाईत बोलीवलस?
काय झालं ग?
त्यावर माई म्हणाल्या आर बापू
मालती ला कळा यिऊ लागल्यात ,,,,
..
बाळंत व्हायची येळ जवळ आली बघ..
पर तू आताच जाऊन शेजारच्या गावातून वैद्याला घिऊन ये,मनजी काय इपरित नग घडाय...
.. बापू "व्हय माई "म्हणून लगेच निघाले....
...
आतून मालतीचा व्हीवळण्याचा आवाज येत होता,,
माई तिच्या जवळ जाऊन बसल्या,
मालतीला घाम फुटला होता, त्यात ती म्हणत होती ,माई म्या काय जगत नाय आता.....
.. माई आतून घाबरून गेल्या होत्या तरी पण त्या मालतीला धीर देत होत्या,
...
त्यात तास भर निघून गेला,
मग मालती म्हणाली माई मला आता सईन व्हत नाय,
तुमि कायतरी करा,
माई म्या जगते का मरते ठाव नाय,
म्या सांगते ते करता का?
माई म्हणाल्या ,व्हय करते तू सांग म्या लागलीच करते...
.. मालती म्हणते मंग एका माई तुमि माळावर जा आन तिथल्या लोकांना जाऊन माझा निरुप सांगा, त्यांना मना माझं दुखतंय लागलीच या..

.. माई ओरडून म्हणाल्या ... माले.......ह्या येळला भी तुला असलं आठवतय व्हय ग?
काय यळ काळ हाय का नाय?
त्यावर मालती म्हणते, माई मला जित बघायचं असलं तर लागलीच जाऊन त्याना बोलून आणा,
..
माईंचा नाईलाज होता...
त्या म्हणाल्या ,माले म्या गेले तर तुझ्यापाशी कुनिबि नाय, बापू आल्यावर जाते म्या,
पण मालती ऐकत नव्हती,
... माई तुमि जाता का म्या च निघू असच?
माई गप निघाल्या ,दुसरा पर्याय नव्हता,
वेळ अडचणीची होती,
माई शेताच्या वाटेने निघाल्या,
मालातीच्या काळजीत पावल आपोआप झपाट्याने पडत होती...
.. एकदाचे पोहचल्या सटवाईच्या माळावर....
.. रणरणत्या उन्हात कुणीच दिसेना,
थोडं खालच्या अंगाला उतरून पाहिलं,
तिथून आवाज येत होता कुणी असल्याचा,,
माईन दुरूनच आवाज दिला...
.. हाय का कुणी ?
म्या माई ,मालतीची सासू,
कुणी आसल तर आव द्या....
...
छावणीसारखं घर होत त्यातून पाच सहा जण बाहेर आले,त्यांनी माईना ओळखलं,
या की माई, आज हिकडं कस वाट चुकलासा?
या आमच्या गरीबाच्या झोपडीत,
,,
माई म्हणाल्या ... नग ,मालतीला कळा येत्यात तीन तुमाला बोलावली हाय,
म्या नाय म्हणलं तरी ती ऐकणा झाली....
.. त्यातील सगळे एकमेकांकडे पाहू लागले,
माई म्हणाल्या ,,येतायसा नव्ह?
हा येतोय की का नाय येणार ,,मालूसाठी अमी कुठबि यिऊ...
... सगळे आत गेले ,
पाच मिनिटं झाली असतील तीन जण बाहेर आले,
माईना म्हणाले, आमी सोबत येतूत मागन बाकीची येतील,
सारी सांग असल्यावर गावात लोक काय बाय म्हणत्याल
,,,, वाड्याच्या मागल्या दारान येत्याल बाकीची..
माई किन्नरांसोबत वाड्यावर आल्या, तोपर्यंत मालती तळमळत होती
....
एकजनांनी बंबातील पाणी गरम झाले का ते बघितलं,
पाणी बादलीत काढलं,
आत दोन जण मालतीला सावरत होते ,
तेवढ्यात परसदारातून आवाज आला ,
आमी अलोत यावं का आत,
आतल्या दोघांनी फटकन आवाज दिला थांबा तिकडच ,,,, तेवढ्यात माई म्हणाल्या , का काय झालं ?येऊ द्याच की आत त्यासनी,
त्यावर एकजण म्हणाला.... तस नाय बघा माई , माळावरण आल्यात मंग पायावर पाणी नग घ्यायच का?
म्हणून बोलो....
...
माई...हं बर अस म्हणून बाहेर आल्या,
तस त्यांच्या मागे एकजण आला त्याने कळशी भरली हातात घेऊन माईना म्हणाला ,माई..... तुमि बंबात अजून पाणी वता, मनजी मालती च्या आन लेकराच्या न्हायाला पुरल....
..
माई दारात गेल्या,तोवर परसदारी उभे असलेले दोघेजण आत आले. पायावर थोड पाणी घेतलं ,हातात कसलतरी बोचक होत खूप सांभाळत होते ,
माई आत येण्या अगोदरच सगळे आत मालती जवळ गेले होते...
..
माई आत जाणार तोवर लेकराचा रडण्याचा आवाज आला,
एकजण म्हणाल देविआई पावली...
मालू सुखासुखी बाळंत झाली,
लेकराच्या रडण्याचा आवाजानं माई लुगडसावरत आत गेल्या ....
..मालती वाकळावर झोपली होती,
एक किन्नरकड लेकरू होत
त्यानं लेकराला कपड्यात गुंडाळून माईकड हात पुढे केला,
माई घ्या की ...
माई च्या चेहऱ्यावर हसू होत,
हात पुढं केलं लेकराला घ्यायला ,घेताना विचारलं,
काय झालं?
मालती पडूनच माईकड बघत होती, माईच्या विचरण्यां वर तिनेच उत्तर डीलर....
माई नात झाली तुमाला,
देवी आई पावली आपल्याला,
माई खूप खुश होत्या,
सगळे किन्नर मालतीचा निरोप घेऊन निघाले ,
तेव्हा माई म्हणाल्या नका जाऊ,
थांबा थोडं, तुमच्या हाताला यस आलय.....क्रमश....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED