Ghungaru books and stories free download online pdf in Marathi

घुंगरू

#@ घुंगरू@#
सौ.वनिता स. भोगील

बापू घाम पुसत वाड्यात शिरले तस रत्नमाला धावत दारात आली ,तेवढ्यात माई म्हणाली आग रत्ना किती तो पायाचा आवाज.....
पोरीच्या जातीला शोभत का?
कस नाजूक सारख चालव..
.
माईच्या बोलण्यानं रत्नमालाच तोंड पडल...
तस बापू माईला हसून म्हणाले ,अग माई माझी रत्ना पोरगी नाही पोरगा आहे माझा,
.....
तस माई म्हणाली अस बोलूनच तिला तू लाडाऊन ठेवलस रे बापू..
आतून मालती रत्नमालाची आई पाण्याचा तांब्या हातात घेऊन आली,
माई बरोबर बोलता तुम्ही,
दोघं बाप लेकीचं काय चालय काही समजत नाही,आणि हो हिच्या लग्नाचं काही बघायचं की नाही ?
...
मालती एवढं बोलून उत्तराची अपेक्षा न करताच आत निघून गेली.
सखाराम बापू आणि मालती यांची एकुलती एक लाडकी रत्नमाला,
नवस करून झालेली,
एक देव सोडला नव्हता मालती आणि बापू ने ,..
माळावरच्या म्हसोबा पासून ते कुळदेवीच्या जागरा पर्यंत सगळं करून झालं होतं....
पण मालतीची कूस काही उजवत नव्हती...
.. माहेरचे देव झाले,
मग कुणी सुचवलं तो डॉक्टर गाठला पण कुठल्या डॉक्टर च्या हाताला यश येईना,..
बापू बागायतदार असल्यामुळं बक्कळ माल पिकायचा घरी साक्षात लक्ष्मी पाणी भरत होती,
...पण एवढ्या संपत्तीला कुणीही वारस नव्हते,
माई म्हणजे बापूची आई, मालती आणि बापू, एवढंच कुटुंब होत,
....
माईंनी एक दिवस बापूला बोलावलं,
बापू मी काय म्हणते तू दुसरं लग्न कर,
एवढ्या इस्टेटीला मालक नको का?
आग माई काय बोलतीस तू?
मूल व्हायचं असत तर मालतीत काय कमी आहे ?...

त्यावर माई म्हणाल्या ...
असेल ही कमी तुला काय माहीत?
.... मग बापू थोड रागातच बोले माई मी सांगतो मूल नाही झालं तरी चालेल पण मी दुसरं लग्न करायचो नाही बघ.....
मग माईचा ईलाज बंद झाला....
. मालतीला जेव्हा समजलं तेव्हा तिलाही खूप वाईट वाटलं ,
पण... मग थोडा विचार करून मालतीच बापूला म्हणाली..
...
मी काय म्हणते माई म्हणतात ते बरोबर हाय,,
आपण किती दिवस अस देव देवरूषी आणि डॉक्टर करत फिरायचं?
वय निघून गेल्यावर आपल्याला बघायला नग का कुणी?
तुम्ही दुसरं लग्न करा.....

माझी काही हरकत नाही.
त्यावर बापुचा रागाचा पारा चढला,,,
माईला अन तुलाबी यड लागला का?
मला नाही दुसरं लगीन करायच...
आन असबी माझ्यातच काय कमी असेल तर ग काय करायचं?
मी तुलाबी सांगून ठेवतो पुन्हा हा इषय काढायचा नाही.......
.. बापू एवढं बोलून तावत निघून गेले,,,
दोघांच बोलण माईन ऐकलं होतं....
मालती किती समजदार आहे आणि मी कसला विचार करते म्हणून त्यांना वाईट वाटत होतं...
..
त्यानंतर दोघींनि पण कधी लग्नाचा विषय काढला नाही....
.
मालती ला रोज शेतात,मळ्यात जावं लागतं असे मजुरांच्या माग....
..मध्ये बरेच अंतर माळरान लागे,,,
ते माळरान सटवाईचा माळ म्हणून ओळखला जाई,
माई नेहमी मालतीला म्हणत येताना तिन्हीसांजेला लवकर येत जा....
.. सटवाईच्या माळावर अंधार नको करत जाऊ...
पुढे काही दिवस गेल्यानंतर मालतीला एक दिवस कोरड्या उलट्या होऊ लागल्या,,,
माई वयस्कर आणि अनुभव ठेवढाच..... त्यांनी लगेच ओळखलं मालतीला दिवस गेलेत म्हणून....
बापू अरे बापू आधी पेढ आन तू बाप होणार आहेस.....
बापूला तर काहीच सुचत नव्हतं,,
माईन देवाजवळ दिवा लावला,
पण दिवा विझला,
माईला वाटलं वाऱ्याने विझला असेल, म्हणून त्यांनी पुन्हा लावला ,,,, पुन्हा दिवा विझला.....
माईच्या मनात शँकेची पाल चूकचुकली.....
हा कसला अपशकुन?
परत दिवा लावून माई मालतीजवळ आल्या...
. मालतीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या मालू फेडलेस ग आपल्या कुळाचे पांग....
.. आता तू काहीही करायचं नाही नुसती लेकराची आणि तुझी काळजी घ्यायची, बाकीची काम मी अन मोलकरीण बाई बघून घेऊ.....
... माईच्या या मायेच्या दम देण्याने मालतीचे डोळे भरून आले....माई एवढं बोलून तिथून वाड्याबाहेर निघाल्या आनंदाची बातमी गावभर देण्यासाठी,,,,
वाड्याबाहेरच काळ कुत्रा माईकडे बघून गुरगुरायला लागलं,,, माईच्या काळजाचा ठोका चुकला नक्कीच काहीतरी अशुभ आहे,,,,,, हे त्यांच्या वयोवृद्ध अनुभवाने हेरलं होत.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED