Ghughru - 3 books and stories free download online pdf in Marathi

घुंगरू - 3

#@घुंगरू@#भाग 3
सौ.वनिता स. भोगील

मालतीला शेतात जायची घाई झाली होती,, माईकडे तीच लक्ष सुद्धा नव्हतं......
.. भराभर काम आटोपून भाकरी बांधून घेतल्या..
वर चटणी. कांदा अन आंब्याच्या खाराच्या दोन फोडी घेऊन भाकरी गुंडाळून घेतली,,
पाटीत सगळं ठेऊन पाण्याचा तांब्या भरला,
अन सगळं घेऊन शेतावर निघाली,
... आज मालतीला न्याहरी करायची सुद्धा आठवण नव्हती,
माईच्या ध्यानात होत ,
पण मालतीच्या वागण्यात फरक बघून माई काहीच बोलत नव्हत्या..
..
मालती आपल्याच तंद्रीत वाड्याबाहेर निघाली,
तस माईन हाक दिली ,
मालती सांच्याला लवकर ये.....
.
व्हय माई येईल लवकरच म्हणून मालती झपाझप पावलं टाकत निघाली.....
... माईन वाड्याबाहेर येऊन बघितलं ..
मालती पुढ बघून चालली होती...
माईन वाड्याच दार बाहेरून ओढून घेतल अन तिच्या मागावर हळूहळू निघाल्या......
...मालती पुढे बघून भराभर पावलं टाकत होती,
माई आडोसा घेत घेत तिच्या माग निघाल्या,..
गावाची वेस गेली,
गावखरची शिवार लागली,
....
रस्त्यानं कुठतरी माणूस दिसायचा.....
.. मालती आपल्याच धुंदीत पुढ बघून चालत होती...

मोकळ वावर असल्यामुळं माईला थोड सावधच चालव लागत होत....माळाजवळ पोहचायला थोडच अंतर बाकी होत...
.. झाडाचा आडोसा घेऊन माई चालत होत्या,,,,,,
...
थोड्या वेळाने सटवाईचा माळावर पोहचताच मालती जवळच्या खडकावर पाटी टेकवून उभी राहिली....
.. माई मागच थांबल्या..
नेमक काय चालय हे काही कळत नव्हत त्यांना.....मालतीन पदराने घाम पुसला,
इकडं तिकडं कुणी आहे का याचा अंदाज घेत पाटी उचलून डाव्या हाताला चालू लागली,
...
माईच्या काळजाचा ठोका चुकला.........
.. मालती तिकड का चाली असलं?
थांबवू का तिला?
नग तिला माहीत पडल की मी तिच्या माग आले तर तिला काय वाटल...
..
डाव्या अंगास किन्नराची वस्ती होती,
गावातील लोक कधीच तिकड जात नसत,
किन्नर चांगले नसतात असा सगळ्या गावकऱ्यांचा समज होता....
... संध्याकाळी अंधार पडल्यावर तिकड कुणी फिरकत नसे,
गावकरी म्हणत त्या किन्नराणा भानामती येती,
म्हणून माई मालतीला नेहमी म्हणत,
सांच्याला शेतावरून लवकर येत जा........
पण आज काही वेगळच घडत होतं,
मालतीच स्वतः त्या वस्तीकडे जात होती,,,
माईला घाम फुटला......
आता काय करायच?
मालती पोटुशी हाय ..
आन समदी म्हणत्यात हित भानामती करत्यात ,
मंग मालती तिथं का गिली आसल?
माईला काही कळत नव्हते..
मागे जायची हिम्मत नव्हती.....
... काय घडतय हे त्यांना काही समजत नव्हतं,
काय करू ?
जाऊ का माग मालतीच्या?
पर दुसरच काय असल तर?
अनेक प्रश्न माईच्या डोक्यात चालू होते,
मालतीवर भानामती तर नसलं केली न ?
नाही नाही अस कस होईल......
काय करू?
म्होर शेतावर जाऊन बापूला सांगू का?
नाय नग बापू असल्यावर इस्वास नाय ठिवयचा......
.. मंग काय करू?
मालती येईस्तोवर थांबते हितच आडूष्याला,,,,,
माई झाडाआड तशाच उभ्या राहिल्या मालतीची वाट बघत.........
थोड्यावेळाने कुणीतरी आल्याची चाहूल लागली, तस माई लपून बघू लागल्या,,
...
एक बावीस ,तेवीस वर्षाची पोर अन 2 किन्नर सोबत आलेले दिसले....

माई बघत होत्या...
ते तिघे पुढे आले त्यांनी माईला बघितल पण काही न बोलता हसून निघून गेले......
.. माईला काहीही समजण्या पलीकडे होत.....
..... मालतीला जाऊन बराच उशीर झाला होता....
.. पण अजून तिचा यायचा पत्ता नव्हता,
थोड्या वेळाने मालतीच्या बोलण्याचा आवाज आला....
अजून कुणीतरी सोबत होत
थोडं पुढ आल्यावर दिसल तिच्यासोबत पण एक किन्नर होता,
दोघे हसत होती ....
माईला विचित्र वाटत होतं.....
मालतीन विचारलं किन्नराला चल मी निघते , शेतात वाट बघत असतील सगळे.....
त्यावर तो किन्नर मालतीला म्हणाला सांभाळून जा,
आन सांभाळून राहा....
मालती बर म्हणून पाटी डोक्यावर घेऊन शेताच्या रस्त्याला लागली,
माई हा सर्व प्रकार स्वत:डोळ्यांनी पाहत होत्या,
नक्की काय घडतय काही समजत नव्हतं,
मालती पुढे गेल्यावर माईंना वाटल जाव तिच्या माग अन विचाराव काय होत हे सगळं,
,, पण माईंनी विचार केला इथ नको घरी आल्यावर बघू,
माई विचारात परत फिरल्या,
डोक्यातील विचारचक्र थांबेना.......
..... काय अस असेल तिथ जिथं लोक चुकून पण जात नाहीत तिथ ही का गेली असल....... क्रमश

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED